व्हर्चुअल असिस्टंट म्हणजे काय?व्हर्चुअल असिस्टंट कसे बनायचे? How to become virtual assistant,virtual assistant services

व्हर्चुअल असिस्टंट म्हणजे काय?व्हर्चुअल असिस्टंट कसे बनायचे? How to become virtual assistant,virtual assistant services

जेव्हा आपण एक खुप मोठ्या पदावर असतो ज्यामुळे आपल्यावर कामाचा व्याप खुप अधिक प्रमाणात असतो आणि आपल्याला आपले सोशल मिडिया अकाऊंट वगैरे हाताळण्यासाठी वेळ नसतो अशा वेळी आपण एक व्हर्चुअल असिस्टंट हायर करत असतो.

हा व्हर्चुअल असिस्टंट आपल्या सोशल मिडिया अकाउंटला हाताळत असतो.आपल्या जागी आपल्या फाॅलोअर्सला सोशल मिडिया वर आवश्यक तो रिप्लाय देत असतो.

आपले महत्वाचे ईमेल चेक करणे आपल्या रोजच्या मिटिंगचे वेळापत्रक तयार करणे अशी वेगवेगळ्या प्रकारची सर्व कामे व्हर्चुअल असिस्टंट करत असतो.

फक्त व्हर्चुअल असिस्टंट म्हणून आपण जे काही काम करतो आहे त्या कामासाठी आपल्या अंगी एक्सपर्टीज असणे आवश्यक आहे.आपण त्यात पारंगत असणे आवश्यक आहे.

आज मोठमोठे युट्यूबर्स सोशल मिडिया इंफ्लुएनसर अभिनेता सेलिब्रिटी देखील आपल्या युटयुब चॅनल वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाऊंटला हॅन्डल करण्यासाठी एका व्हर्चुअल असिस्टंटला हायर करीत असतात.

आज आॅनलाईन अशा अनेक वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे ज्या आपणास आपली ज्या कामात एक्सपर्टीज आहे त्या कामात व्हर्चुअल असिस्टंटचे काम मिळवून देतात.फक्त यासाठी इथे आपल्याला आपले अकाऊंट तयार करावे लागते.

आपले स्कील एक्सपर्टीज काय आहे?आपले कामाचे रेट काय आहेत?आपण कोणकोणत्या सर्विस देतो हे देणे आवश्यक आहे सोबत आपल्याला ह्या कामाचा अनुभव किती आहे का आपण फ्रेशर्स आहे आपण अनुभवी असल्यास वर्क सॅपल देणे हे देखील प्रोफाईल बनविताना नमुद करायला हवे

उदा,अपवर्क,फायवर, इत्यादी

ज्यांना फ्रिलान्सिंग मध्ये फुलटाईम आपले करीअर करायचे आहे त्यांच्यासाठी व्हर्चुअल असिस्टंट हे एक उत्तम करीअर आॅप्शन ठरू शकते.

See also  मधमाशा पालन योजना (पोकरा अंतर्गत) -Bee keeping

व्हर्चुअल असिस्टंट बनण्यासाठी काय करायचे?

व्हर्चुअल असिस्टंट बनण्यासाठी आपणास सर्वप्रथम हे जाणुन घेणे आवश्यक आहे की आपण कुठल्या कामात अधिक उत्तम आहात कोणते काम करण्यात आपण पारंगत एक्सपर्ट आहात.

व्हर्चुअल असिस्टंट म्हणून आपण इतरांसाठी घरबसल्या आॅनलाईन काम करू शकतो.

समजा तुम्ही सोशल मिडिया अकाऊंट हाताळण्यात एक्सपर्ट असाल तर आपण कोणाचे तरी सोशल मिडिया अकाऊंट हाताळण्याचे काम सोशल मिडिया मॅनेजरचे काम व्हर्चुअल असिस्टंट बनुन करू शकतात.

किंवा आपल्याला उत्तम रीत्या व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर आपण व्हिडिओ एडिटिंगचे काम व्हर्चुअल असिस्टंट म्हणून इतरांसाठी करू शकतो.असे कुठलेही काम ज्यात आपण एक्सपर्ट आहे अणि मार्केट मध्ये त्याची लोकांना आवश्यकता आहे ते आपण व्हर्चुअल असिस्टंट म्हणून करू शकतो.

फुलटाईम व्हर्चुअल असिस्टंट बनण्यासाठी आपण ज्या स्कील मध्ये उत्तम आहे त्यात एखादा चांगला आॅनलाईन कोर्स देखील करू शकतो.व्हर्चुअल असिस्टंट बनण्यासाठी आपले कुठल्याही एका कामात एका स्कील मध्ये मास्टर पारंगत एक्सपर्ट असणे आवश्यक आहे.

व्हर्चुअल असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कंप्युटरचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच वर्ड प्रोसेसर एक्सेल शीट,गुगल शीट,गुगल डाॅक इत्यादी वर काम करता येणे आवश्यक आहे.

सोबत आपले कम्युनिकेशन स्किल्स देखील चांगले असायला हवे.

व्हर्चुअल असिस्टंट बनुन आपण आपल्या क्लाईटला कोणकोणत्या सर्विसेस देऊ शकतो?Virtual assistant services

व्हर्चुअल असिस्टंट म्हणून आपण आपल्या क्लाईट करीता आॅनलाईन पदधतीने घरबसल्या खालील दिलेली वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतो.

सोशल मिडिया अकाऊंट पेज हाताळणे सोशल मिडिया मॅनेज करणे

अकाऊंट हाताळणे

एक्सेल शीट रिपोर्ट तयार करणे

व्हिडिओ एडिटिंग करणे- व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आपणास व्हिडिओ एडिटिंग टुलस साॅफ्टवेअरचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

ग्राफिक्स डिझायनिंग करणे -ग्राफिक डिझायनिंग करीता फोटोशॉप कॅनवा इत्यादीचे उत्तम नाॅलेज आपणास असायला हवे.

वेब डेव्हलपमेंट अॅप डेव्हलपमेंट

See also  आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी उद्या लाॅटरी काढली जाणार - RTE admission Lottery tomorrow

एस ई ओ एक्सपर्ट- एस ईओ एक्सपर्ट म्हणुन सर्विस देण्यासाठी आपल्याला एस ईओचे उत्तम नाॅलेज असायला हवे.

व्हर्चुअल असिस्टंट खालील दिलेली टास्क परफाॅर्म करत असतो.प्रत्येक टास्क परफाॅर्म करण्यासाठी आपल्या वर्क प्रोफाईल नुसार अंगी वेगवेगळे कला कौशल्य असणे आवश्यक आहे.

अॅडमिन टास्क-

अॅडमिन टास्क करण्याकरीता आपले टाईम मॅनेजमेंट अणि राईटिंग स्कील उत्तम असणे आवश्यक आहे.

सोशल मिडिया टास्क

ग्राफिक्स टास्क

ईकाॅमर्स टास्क

रिअल इस्टेट टास्क

कंटेट टास्क

आपल्या अंगी जर उत्तम संवाद संभाषण कौशल्य असेल तर आपण क्लाईट करीता व्हर्चुअल असिस्टंट म्हणून इमेल रायटिंगचे तसेच काॅल रिसिव्ह करण्याचे रिपोर्ट तयार करण्याचे काम करू शकतो.

आपण सोशल मिडिया हाताळण्यात एक्सपर्ट असाल तर आपण क्लाईटचे सोशल मिडिया अकाऊंट हाताळण्याचे काम करू शकतात.

व्हर्चुअल असिस्टंटचे वेतन किती असते?

व्हर्चुअल असिस्टंट म्हणून आपण परदेशातील क्लाईट करीता काम केले तर आपण एका तासाला २० ते ४० डाॅलर कमवू शकतो.यात आपणास आपला चांगला अनुभव असेल आपले स्कील एक्सपर्टीज असेल तर आपण १०० डाॅलर एका तासाला कमवू शकतो.

भारतातील क्लाईट करीता व्हर्चुअल असिस्टंट म्हणून सुरूवातीला काम केले तर आपण महिन्याला २० ते २५ हजारांपर्यंत दरमहा कमाई करू शकतो.

व्हर्चुअल असिस्टंट म्हणून आपण कोणासाठी काम करू शकतो?

व्हर्चुअल असिस्टंट बनुन आपण घरबसल्या आॅनलाईन पदधतीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी काम करू शकतो किंवा एखाद्या कंपनी,सोशल मिडिया इंफ्लुएनसर,युटयुबर सेलिब्रिटी इत्यादी करीता काम करू शकतो.

व्हर्चुअल असिस्टंट हा फायनान्शिअल टेक्नीकल नाॅन टेक्नीकल इत्यादी सर्व प्रकारची कामे आपल्या क्लाईटसाठी करीत असतो.

Leave a Comment