ए एन एमचा फुलफाॅम काय होतो?ANM कोर्स पात्रता,फि व नोकरी संधी- ANM Full form in Marathi

ए एन एमचा फुलफाॅम काय होतो?ANM Full form in Marathi

ए एन एमचा फुलफाॅम auxiliary nurse midwifery असा होतो.यालाच मराठी मध्ये सहाय्यक परिचारीका मिडवायफरी असे देखील म्हटले जाते.

ए एन एम हा वैद्यकीय क्षेत्रातील एक पदवीपुर्व नर्सिंग डिप्लोमा कोर्स आहे.हया कोर्सचा एकुण कालावधी दोन वर्षे इतका असतो.

हा नर्सिंग डिप्लोमा कोर्स पुर्ण केल्यानंतर महिला उमेदवारांना नर्सिंग डिप्लोमा कोर्स पुर्ण केल्याचे एक अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जाते.

हा कोर्स केल्यानंतर नोकरी प्राप्त करण्यासाठी आपणास सहा ते सात महिन्यांची इंटर्नशिप देखील करावी लागते.तेव्हाच आपणास हा कोर्स केल्यानंतर लगेच नोकरी प्राप्त होते.

ज्या विद्यार्थ्यांला बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात आपले करीअर घडवायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे.

एन एम मध्ये आपणास आजारी पिडीत रूग्णांची सेवा सुश्रुषा करण्याचे पुण्य प्राप्त होते.हया कोर्स मध्ये महिला परिचारीकांना मातृ आरोग्य सेवा अणि गर्भधारणे विषयी माहिती दिली जाते.

हा कोर्स झालेल्या महिला उमेदवारांना आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण तसेच खेडेगावात आदिवासी भागात वास्तव्यास असलेल्या महिलांना महिला आरोग्य,मातृ आरोग्याशी तसेच गर्भधारणेशी निगडित माहीती द्यावी लागते.

ए एन एम हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रोफेशनल असतात जे आपणास वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्याचे काम करतात.हे रेजिस्टर डाॅकटरांच्या हाताखाली काम करत आपणास प्राथमिक आरोग्य सेवा देण्याचे काम करतात.

ए एन एम कोर्स मध्ये कुठल्याही रूग्णाची काळजी कशी घ्यावी त्यांना वेळेवर औषध कसे द्यावे,सलाईन कशी लावावी इंजेक्शन कसे द्यावे त्यांच्यावर उपचार कशा पद्धतीने करावे हे शिकवले जाते.

See also  डिप्लोमा इन फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट विषयी माहिती fire and safety management diploma course in Marathi

याचसोबत डाॅक्टरांच्या अनुपस्थित पेशंटची मदत कशी करावी याविषयी देखील मार्गदर्शन केले जाते.सहाय्यक परिचारीका ह्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टरांची मदत करत असतात.

ए एन एम कोर्स करीता प्रवेश प्राप्त करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  • ए एन एम ह्या कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास मान्यताप्राप्त बोर्डातुन किमान ४५ टक्के गुण मिळवून बारावी पास असणे गरजेचे आहे.
  • कला वाणिज्य विज्ञान अशा कुठल्याही एका शाखेतुन बारावी उत्तीर्ण झालेली महिला उमेदवार ह्या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकते.
  • ह्या कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १७ अणि जास्तीत जास्त ३५ असावे किंवा त्याच्या आत असावे.
  • ए एन एम कोर्स करीता प्रवेश घेत असलेल्या महिला उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगले असणे आवश्यक आहे.
  • ए एन एम कोर्स करण्यासाठी सर्वप्रथम आपणास एक परीक्षा द्यावी लागते त्यासाठी रेजिस्टर करावे लागते.
  • मग आपल्या शहरातील जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर याची परीक्षा दिल्यानंतर आपणास निकालातील टक्केवारीच्या मेरीटच्या आधारावर प्रवेश दिला जात असतो.

हा कोर्स आपण सरकारी तसेच एखाद्या खाजगी महाविद्यालयातुन देखील करू शकतो.

काही महाविद्यालयात ए एन एम ह्या कोर्सला प्रवेश देण्यासाठी वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाते.यात सामान्य मुल्यांकन करून आपली योग्यता तपासली जाते.

काही ठाराविक महाविद्यालयात ए एन एम कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी कुठलीही मुलाखत प्रवेश परीक्षा घेतली जात नाही फक्त आपली बारावी मधील टक्केवारी बघितली जाते.त्या आधारावर प्रवेश प्राप्त होतो.

ए एन एम कोर्स करण्यासाठी किती फी लागते?

ए एन एम कोर्स आपण कुठुन करतो आहे त्यावरून याची फी ठरत असते समजा आपण हा कोर्स एखाद्या सरकारी काॅलेज मध्ये प्रवेश प्राप्त करत केला तर आपणास वर्षाला दहा ते पंधरा हजार इतका खर्च येऊ शकतो.

पण हाच कोर्स आपण एखाद्या प्रायव्हेट काॅलेज मधुन केला तर आपणास दोन ते लाख इतका देखील खर्च लागु शकतो.

See also  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू - AIATSL Bharti 2023 in Marathi

ए एन एम हा कोर्स आपणास इंग्रजी किंवा राज्य भाषेत देखील करता येईल.

ए एन एमच्या नोकरी मध्ये आपणास कोणती कामे करावी लागतात?

ए एन एमच्या नोकरी मध्ये ए एन एम कोर्स पुर्ण केलेल्या महिला परिचारीकांना नवजात अर्भक लहान बाळ,महिला तसेच लहान मुलांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करावे लागते.

याचसोबत ग्रामीण आदिवासी खेडेगावात आरोग्य शिबिर राबवावी लागतात.एमरजनसी मध्ये रूग्णांवर प्रथमोपचार करावे लागतात.

आॅपरेशन थिएटर मध्ये शस्त्रक्रिया तसेच प्रसुती दरम्यान डाॅक्टरच्या हाताखाली काम करावे लागते.पेशंटचे काऊन्सिलिंग करणे त्यांच्या नोंदी ठेवणे इत्यादी महत्वाची कामे महिला उमेदवारांना करावी लागत असतात.

ए एन एम कोर्स पुर्ण केल्यानंतर महिला उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करता येते?

  • १)सरकारी तसेच खासगी हाॅस्पिटल दवाखाना
  • २) विविध ग्रामीण आरोग्य केंद्र
  • ३) वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओ
  • ४) वृद्धाश्रम

इत्यादी ठिकाणी काम करता येते याचसोबत आपणास नर्सिंग स्कुल मध्ये टीचर म्हणून देखील नोकरी करता येते.