ईडबलयु एसचा फुलफाॅम काय होतो? ESW पात्रता, फायदे, प्रक्रिया व कागदपत्रे – EWS Full form in Marathi

ईडबलयु एसचा फुलफाॅम काय होतो?EWS Full form in Marathi

ईडबलयु एसचा फुलफाॅम economically sections असा होतो.यालाच आपण मराठीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक तसेच विभाग असे देखील म्हणतो.

ज्या व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना ईडबलु एस अंतर्गत शिक्षण अणि नोकरी ह्या दोन्ही क्षेत्रात आरक्षण प्रदान केले जाते.

ईडबलयु एस अंतर्गत शिक्षण अणि नोकरी मध्ये आरक्षण प्राप्त करण्यासाठी आपल्या परिवाराची शेती पाच एकर पेक्षा अधिक नसावी.

ईडबलयु एस अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक संस्थेत दहा टक्के आरक्षणाचा लाभ दिला जातो.ईडबलयु एस सुविधा प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे ईडबलयु एस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

ईडबलयु एस सुविधा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल अणि सामान्य घटकास खाजगी तसेच सरकारी शिक्षण अणि नोकरी ह्या दोन्ही क्षेत्रात दहा टक्के आरक्षण दिले जाते.

कायद्यात नमुद केलेल्या नुसार सर्व अनुसूचित जाती जमाती तसेच ओबीसी मागास प्रवर्गातील जाती जमातींना कायद्याने नोकरी अणि शिक्षण या दोघांमध्ये आरक्षण प्रदान करण्यात आले आहे.

ईडबलयु एस आरक्षण हे कुठल्याही इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लागता दिले जाते.

ईडबलयु एस सर्टिफिकेट कोणास काढता येते?

सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या जाती जमाती, विशेष मागासवर्गीय,विमुक्त जाती तसेच भाषिक अल्पसंख्यांक उमेदवारांना हे सर्टिफिकेट काढता येऊ शकते.

ईडबलयु एस सर्टिफिकेट साठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

  • ईडबलयु एस सुविधेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक तसेच सामान्य प्रवर्गातील उमेदवार घेऊ शकतात.
  • सदर सुविधेचा लाभ प्राप्त करण्यासाठी उमेदवार ओबीसी तसेच एससी एनटी आरक्षणाचा लाभार्थी नसणे आवश्यक आहे.
  • ईडबलयु एस सुविधेचा लाभ फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेऊ शकतात.
  • ईडबलु एस सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवाराचे आपले वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असायला हवे.
  • अणि केरळ राज्यात हीच उत्पन्नाची अट ४ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.
  • आपण तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सभासद १३ आॅक्टोंबर १९६७ रोजी किंवा त्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराची पाच एकर पेक्षा जास्त शेती असु नये.याचसोबत उमेदवाराकडे हजार फीट स्क्वेअर तसेच त्यापेक्षा अधिक निवासी प्लाॅट आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नसावा.
  • हीच अट केरळ मध्ये अडीच एकर पेक्षा जास्त शेती असु नये तसेच पाचशे स्क्वेअर फूट पेक्षा जास्त जागेमध्ये आपले घर असु नये अशी ठेवण्यात आली आहे.
  • प्रत्येक राज्यात ईडबलयु एस आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत.हया आरक्षणामुळे इतर जातींच्या आरक्षणाला देखील धक्का पोहोचत नाही.
See also  आयआरसीटीची एक नवीन उत्तम योजना प्रवास आत्ता करा पैसे नंतर द्या - IRCTC new scheme travel now pay later in Marathi

ईडबलयु एस सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करायचे?

ईडबलयु एस सर्टिफिकेट हे आपणास कुठल्याही स्थानिक सरकारी प्राधिकरण कार्यालयात तसेच तहसिल कार्यालयात उपलब्ध होऊन जाते.

हे सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारच्या आॅनलाईन प्रक्रियेला सामोरे जावे लागत नाही.हे सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपणास तहसील कार्यालयात सर्वप्रथम अर्ज करावा लागतो.

मग पाच सहा दिवसांनंतर अर्जाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आपणास हे सर्टिफिकेट दिले जाते.हे सर्टिफिकेट ईडबलयु एस पात्रता धारक उमेदवारांना दरवर्षी रिनिवह करून नवीन बनवावे लागते.

कारण याचा एकुण कालावधी एक वर्ष इतकाच असतो.

ईडबलयु एस सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते महत्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

१)आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) चार पासपोर्ट साईज फोटो

४) मिळकतीचे तसेच मालमत्तेचे प्रमाणपत्र

५) बॅकेचे स्टेटमेंट

६) जातीचे प्रमाणपत्र (खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आवश्यकता नाही)

७) बीपीएल कार्ड

ईडबलयु एस योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

भारतातील अशा काही जाती ज्यांना भारत सरकारच्या वतीने आरक्षण लागु करण्यात आले नाहीये पण त्यांची आर्थिक परिस्थिती खुप बिकट तसेच हलाखीची आहे.

अशा जातीतील उमेदवारांसाठी शासनाने ह्या योजनेचा प्रारंभ केला आहे.