कोल्ड काॅलिंग म्हणजे काय?Cold calling information

कोल्ड काॅलिंग म्हणजे काय?Cold calling information

प्रत्येक कंपनीच्या सेल्स डिपार्टमेंट मध्ये प्रोडक्टची दोन प्रकारे सेलिंग केली जाते एक म्हणजे कस्टमरच्या घरापर्यंत जाऊन त्याच्या समोर प्रत्यक्ष बसुन प्रोडक्टची माहीती देऊन त्याला कन्व्हेयन्स करून सेलिंग केली जाते.

अणि दुसरे म्हणजे कस्टमरला कंपनीच्या मध्ये बसुन काॅल दवारे प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देणे ते खरेदी करण्यासाठी कन्व्हेयन्स करणे अणि जास्तीत जास्त सेल्स जनरेट करणे.

कंपनीतील इन्बाऊंड सेल्स करणारे कर्मचारी हे कस्टमरला फोन करून कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देत असतात त्यांना ते प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करत असतात.

ह्याच सर्व गोष्टींचा एक महत्वाचा भाग म्हणून कोल्ड काॅलिंगला ओळखले जाते.

Cold calling information
Cold calling information

प्रत्येक कंपनी आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची सेलिंग करण्यासाठी खालील दिलेल्या दोन पद्धतीच्या काॅलिंगचा वापर करते

१) कोल्ड काॅलिंग-

२) हाॅट काॅलिंग –

१)हाॅट काॅलिंग-

जेव्हा कस्टमर हा प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी इच्छुक असतो तो प्रोडक्ट सर्विस विकत घेऊन लगेच पेमेंट देखील करीत असतो.तेव्हा त्यास हाॅट काॅलिंग असे म्हटले जाते.

जेव्हा कुठल्याही कंपनीचा सेल्स पर्सन हा एखाद्या कस्टमरला कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी फोन करत असतो.तेव्हा दोन परिस्थिती निर्माण होत असतात.

एक म्हणजे कस्टमरला प्रोडक्ट सर्विस विकत घेण्याची ईच्छा असु शकते तो आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी इंटरेसटेड असु शकतो किंवा त्याला आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी करण्यात कुठलीही ईच्छा तसेच रूची नसते.त्याला त्या प्रोडक्ट सर्विसेसची कुठलीही आवश्यकता नसते.

हाॅट काॅलिंग मध्ये जेव्हा एखाद्या कंपनीचा सेल्स पर्सन कस्टमरला प्रोडक्ट सर्विसेसची सेलिंग करण्यासाठी काॅल करत असतो तेव्हा तो कस्टमर कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घ्यायला लगेच राजी होऊन जात असतो.

फक्त इथे आपणास कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची सविस्तर माहिती कस्टमरला देणे आवश्यक आहे.त्या प्रोडक्टची वैशिष्ट्ये फायदे नीट व्यवस्थित कस्टमरला समजावून सांगावे लागतात जेणेकरून कस्टमर त्या प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी करेल.

See also  संजय गांधी निराधार पेंशन योजना विषयी माहीती - Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana and Special Assistance Scheme.

कारण त्याला देखील ते प्रोडक्ट सर्विस विकत घेण्याची आधी पासुन ईच्छा असते त्याला त्या प्रोडक्ट सर्विसेसची नितांत आवश्यकता देखील असते.फक्त त्याला हवे आहे तसे त्याच्या आवश्यकता नुसार प्रोडक्ट मिळण्याची तो वाट बघत असतो.

२) कोल्ड काॅलिंग –

जेव्हा एखादा सेल्स पर्सन कंपनीचे प्रोडक्ट सर्विस सेल करण्यासाठी कस्टमरला काॅल करत असतो तेव्हा कस्टमर ते प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतो.

कस्टमर ते प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी अजिबात इच्छुक नसतो.अशा परिस्थितीत सेल्स पर्सन यांना आपल्या टार्गेट कस्टमरला आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करावे लागते.

कस्टमरची इच्छा नसताना इथे आपणास प्रोडक्ट सेल करावा लागतो हे एक खुप चॅलेंजिंग काम असते ज्याला कोल्ड काॅलिंग असे म्हटले जाते.

इथे आपणास कस्टमरला आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेणे त्याच्यासाठी किती अत्यावश्यक आहे याची जाणीव करून द्यावी लागते आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी गरज आवश्यकता निर्माण करावी लागते.

तेव्हा कस्टमर आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यास तयार होत असतो.

कोल्ड काॅलिंग दवारे सेल्स जनरेट कसा करायचा?

कोल्ड काॅलिंग मध्ये जेव्हा एखादा कस्टमर प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी उद्धटपणे नकार देत असतो किंवा आपल्याशी वैतागात फोनवर ओरडुन चिडुन बोलत असतो तेव्हा देखील आपण आपल्या कस्टमरशी नम्रपणे शांत राहुन बोलणे आवश्यक असते.

यात आपण कस्टमरला प्रोडक्ट सर्विस विकत का घ्यायचे नाही आहे ते कारण सर्वप्रथम विचारणे आवश्यक आहे.

यानंतर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस खरेदी करणे त्याच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे सांगायला हवे त्याची वैशिष्ट्ये कस्टमरला नीट व्यवस्थित समजावून सांगायला हवी.

अणि समजा कस्टमरचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्या इतपत बजेट सध्या नसेल तर कंपनीकडून कस्टमरला दिल्या जात असलेल्या डिस्काउंट आॅफर्स विषयी आपण कस्टमरला सांगायला हवे.

किंवा आपण कंपनीकडुन कस्टमरला काही दिवसांचे फ्री ट्रायल सर्विस आॅफर करू शकतो अणि कस्टमरला सांगु शकतो की आपण काही दिवस आमचे प्रोडक्ट वापरा आपणास उपयुक्त वाटत असेल किंवा आपणास याची आवश्यकता वाटत असेल तर आपण प्रोडक्ट विकत घ्या अन्यथा घेऊ नका.

See also  मधमाशा पालन योजना (पोकरा अंतर्गत) -Bee keeping

असे बोलण्याने कस्टमरचा आपल्या प्रोडक्ट सर्विस वरील ट्रस्ट वाढतो.अणि यात कस्टमर प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी तयार होण्याचे सेल्स जनरेट होण्याचे अधिक चान्सेस असतात.