Sibling म्हणजे काय? – Sibling meaning in Marathi

Sibling  माहिती – Sibling meaning in Marathi

आपल्या प्रत्येकाच्या कानावर एक शब्द नेहमी ऐकायला मिळत असतो तो म्हणजे सिब्लिंग.सिब्लिंग हा शब्द मुख्यकरून आपणास इंग्लिश मुव्ही बघताना त्यातील पात्रांच्या तोंडुन ऐकायला मिळत असतो.

किंवा जे व्यक्ती इंग्रजीमध्ये नेहमी संभाषण करतात त्यांच्या तोंडुन देखील आपल्याला नेहमी हा शब्द ऐकायला मिळत असतो

आजच्या लेखात आपण सिब्लिंग म्हणजे काय?सिब्लिंग कोणाला म्हटले जाते अशा आपल्या मनात निर्माण होत असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहून जाणार नाही.

सिब्लिंग म्हणजे काय? – 

 सिब्लिंग ह्या शब्दाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवणात इंग्रजीत संभाषण करताना करत असतो.तसेच टिव्हीवर एखादी इंग्रजी मुव्ही बघताना त्यातील पात्रांच्या तोंडुन देखील आपण असे शब्द ऐकत असतो.फक्त याचा अर्थ काय होतो हेच आपल्यापैकी खुप जणांना माहीत नसते.

कारण सिब्लिंग हा प्रामुख्याने इंग्रजी भाषेत संभाषण करताना वापरला जाणारा शब्द आहे आणि आपली रोजची संभाषणाची भाषा ही मराठी आहे.

त्यामुळे इंग्रजी भाषेशी आपला नियमित संपर्क नसल्याने आपल्याला अशा दैनंदिन जीवणात वापरल्या जात असलेल्या महत्वपुर्ण शब्दांचे अर्थ माहीत नसतात.

  • सिब्लिंग ह्या शब्दाचा मराठीत भावंडे असा अर्थ होत असतो.आणि भावंडे म्हटले तर त्यात आपली बहिण येत असते भाऊ येत असतात.
  • म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपले जेवढेही बहिण तसेच भाऊ असतात त्या सर्वाना आपण सिब्लिंग असे म्हणत असतो.
  • आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे सिब्लिंगचा अर्थ बहिण आणि भाऊ असा दोघे होत असतो ज्यामुळे सिब्लिंग हा शब्द आपण स्त्रीलिंग,पुरूषलिंग यापैकी दोघांसाठी सारख्या पदधतीने वापरू शकतो.
  • याचाच अर्थ हा शब्द कुठल्याही लिंगावर आधारीत नसतो.सिब्लिंग ह्या शब्दाचा वापर दोन्ही लिंगासाठी सारखाच केला जात असतो.
  • जेव्हा आपण असे म्हणतो की मला दोन सिब्लिंग आहे तेव्हा त्याचा अर्थ मला दोन भाऊ तसेच बहिण आहेत असा होत असतो.
See also  होम लोन घेण्यासाठी लागणारया महत्वाच्या कागदपत्रांची यादी - List of important documents required for get home loan in Marathi

 

सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाची काही उदाहरणे कोणकोणती आहेत?

 सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :

1)i have a only two siblings.

मराठीत अर्थ :मला फक्त दोनच भावंडे आहेत.

2) i don’t have any siblings.i am only single child of my mom and dad.

मला कोणीही भावंडे नाहीयेत (म्हणजेच मला कोणीही भाऊ तसेच बहिण नाहीयेत).मी माझ्या आई आणि वडिलांचे एकुलते एक अपत्य तसेच मुलगा,मुलगी आहे.

3)  i really love my all siblings.

माझे माझ्या सर्व भावंडांवर खुप मनापासुन प्रेम आहे.

4) tomorrow is my siblings birthday party.

उद्या माझ्या भावाच्या तसेच बहिणीच्या वाढदिवसाची पार्टी आहे.

5) after two days my sibling get married.

दोन दिवसानंतर माझा भाऊ तसेच बहिण लग्न करणार आहे तसेच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

सिब्लिंग ह्या शब्दाबददल असलेली व्याकरणिक माहीती काय आहे?

 सिब्लिंग हे एक noun म्हणजेच एक नाम आहे.आता आपल्यापैकी व्याकरणाचा सखोल अभ्यास नसलेल्या काही जणांच्या मनात हा देखील प्रश्न उठत असेल की हे noun म्हणजे काय असते?

नाम(noun) ही एक अशी गोष्ट असते जी आपल्या डोळयांना दिसत असते.तसेच ज्याच्या स्वरुपाची आपण डोळयांनी कल्पणा करू शकतो.त्यालाच नाम असे म्हटले जाते.

Sibling हे एकवचनी रूप आहे आणि जेव्हा आपण त्याला s हा प्रत्यय लावत असतो तेव्हा याचे अनेकवचनी रूप siblings हे तयार होत असते.

 

सिब्लिंग ह्या शब्दांचे निघणारे काही इतर मराठीतील अर्थ कोणकोणते आहेत?

 सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाचे मराठीत वेगवेगळे अर्थ होत असतात जे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

चला तर मग जाणुन घेऊया सिब्लिंग ह्या शब्दाचे मराठी भाषेत असणारे इतर अर्थ कोणकोणते आहेत.

1)Sibling – सख्खी भावंडे

2)Twin Sibling – जुळी भावंड (यात दोन जूळे भाऊ तसेच दोन जुळया बहिणी,जुळे भाऊ बहिण देखील येऊ शकतात)

See also  भारतातील पहिल्या वाॅटर मेट्रो प्रकल्पा विषयी माहिती -India first water Metro project information in Marathi

3)Step Sibling -सावत्र भावंडे(यात दोन सावत्र भाऊ दोन सावत्र बहिणी,सावत्र भाऊ बहिण हे येत असतात)

4) Younger Sibling – लहान भावंडे

5) Sibling Day – भावंडांचा दिवस 

6) Sibling In Law-बायकोची भावंडे

7) Siblings Home -सर्व भावंडे एकत्र राहत असलेले घर

8) Siblings Love -भावंडांमधले प्रेम आणि ममता

9) Two Siblings – दोन भावंडे

10) God Siblings – गाँडफादर आणि गाँडमदरचा मुलगा तसेच मुलगी

11) information about my all siblings –

माझ्या सर्व भावंडा विषयीचा संपुर्ण तपशील तसेच माहीती.

सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाचे काही समानार्थी आणि विरूधार्थी शब्द कोणकोणते आहे?

सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत:

 

  • भाऊ – brother
  • बहिण – sister
  • नातेसंबंधीत,नातेवाईक -relatives
  • नातलग – kin

 सिब्लिंग ह्या इंग्रजी शब्दाचे काही विरूधार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत:

Non relatives person-आपल्याशी कुठलेही नाते नसणारी व्यक्ती.

 

 

FSSAI फुल फॉर्म मराठी – FSSAI  संपूर्ण माहिती – FSSAI

1 thought on “Sibling म्हणजे काय? – Sibling meaning in Marathi”

Comments are closed.