आंब्यावरील रोगाचे व्यवस्थापन:- Mango Diseases

आंब्यावरील रोगाच्या (Mango Diseases)अती तीव्रतेमुळे आंब्याचे पुर्णत: नुकसान होते. यासाठी रोगांचे अचुक निदान करुन एकात्मिक व्यवस्थापनाची उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

भूरी रोग:-

भ्रूरी रोग -Mango Diseases management
 • आंब्यावरचा हा सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
 • मोहरावर बुरशीची पुर्ण वाढ झाल्यावर पांढऱ्या रंगाची असंख्य बीजे तयार होतात. व तेथे पांढरी भुकटी फवारल्याप्रमाणे दिसते.
 • हवामानानुसार भुरी त्यांची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. थंड व दमट हवामान रोगवाढीस पोषक असल्याने हा रोग येतो.
 • आंब्याचा मोहोर, कोवळ्या पालवीवर बुरशींची तंतूमय वाढ त्यावर तयार होणारी असंख्य बीजे वाऱ्यामार्फत पसरतात.
 • रात्रीचे २०-२५ अंश से. कमी तापमान आणि ८०% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता, जोडीला ढगाळ वातावरण असल्यास बुरशीचा प्रसार झपाटयाने होतो.
 • बुरशीच्या वाढीस व आंब्याला मोहोर येण्यासाठी लागणारे तापमान यामध्ये साधर्म्य असल्यामुळे मोहरापाठोपाठ भुरी रोग दरवर्षी येतोच. अशा प्रकारचे वातावरण डिसेंबर ते जाने वारी महिन्यात असते. त्यावेळेस आंब्याला भरपूर मोहोर व पाठोपाठ भूरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.

नुकसानीचा प्रकार:-

 • बुरशीच्या वाढीमुळे पेशीवरील अन्नरस शोषला जातो व मोहर करपतो.
 • रोगाची तीव्रता अधिक असल्यास ७० ते ८० टक्क्यापर्यंत नुकसान होते.
 • कोवळया पालवीवर रोग असल्यास पाने तांबुस व पांढरी होऊन वाळतात व गळून पडतात.
 • फळधारणेनंतर रोग उद्‌भवल्यास फळांचे देठ त्यांची गळ होते.

व्यवस्थापन:- ।

 • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी २०० लीटर पाण्यात ८०% गंधक ४०० ते ५०० ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम (बाविस्टीन) २०० ग्रॅम किंवा
 • डिनोकॅप किंवा ट्रायडिमेफॉन किंवा पेन्कोनॅझोल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आलटून पालटून १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा फवारणी करावी

 करपा:-

 • या रोगाचा प्रादुर्भाव आंबा लागवडीपासून आंबाफळ विक्रीपर्यंत ढहाळ्या,पाने, मोहोर आणि फळे यावर वर्षभर कोणत्या न कोणत्या प्रकारे होतो.
 • रोगकारक बुरशी आंबा बागेत सतत राहिल्यामुळे तिचा प्रसार झपाटयाने होऊन रोग नियंत्रण करणे कठीण जाते.
 • वळिवच्या हलक्याश्या पावसानेसुध्दा बुरशीची जोमदार वाढ होऊन रोग लगेच बळावतो.
 • बुरशीच्या वाढीसाठी २४ ते ३० अंश से. तापमान व जास्त आर्द्रेता अनुकूल असते.
See also  Dream 11 game - ड्रिम इलेव्हन गेम विषयी संपूर्ण माहीती - Dream 11 game detail information in Marathi
करपा -Mango Diseases management

नुकसानीचा प्रकार:-

 • कोवळ्या पानावर किंवा डाहाळ्यावर रोगाचे ठिपके पडल्यामुळे त्यांची वाढ थांबते गळून पडतात.
 • पानांवर डाग आल्यामुळे ती करपल्यासारखी दिसतात.
 • निष्पर्ण डहाळ्या वाळल्याने झाडावर काडक्यांचे प्रमाण वाढते मोहोरावर प्रादुर्भाव झाल्यास मोहोर वाळतो आणि फलधारणा होण्यापुर्वीच फुले वाळतात.
 • लहान फळांवर काळे डाग पडल्यामुळे ती सुरकतुन गळुन पडतात. मोठया फळांवर बुरशीची वाढ होऊन ती डागाळतात तसेच मऊ होऊन कुजतात.

व्यवस्थापन:-

 • या रोगाच्या नियंत्रणासाठी बागांची स्वच्छता वाळलेल्या फांदया, रोगट फळे यांचा नाश करावा.
 • एक  टक्का तीव्रतेचे बोर्डोमिश्रण या बुरशीनाशकाची डहाळ्या, पाने मोहोर, लहान फळे यावर फवारणी केल्यास डागविरहीत फळे मिळु शकतात.
 • कॉपर ऑक्सिक्लोराइड ४०० ते ५०० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम २०० ग्रॅम तसेच कॅप्टन ४०० ग्रॅम ही बुरशीनाशके २०० लिटर पाण्यात घेऊन फवारावेत.

शेंडेमर-Mango Diseases

 • या रोगाची उष्ण व दमट वातावरणात बीजे तयार होणे आणि त्यांचा प्रसार होणे सतत चालू असते. ही बीजे योग्य वातावरणात चार तासांत रुजुन बुरशीची तंतुमय वाढ होते.

नुकसानीचा प्रकार:-

 • च झाडाच्या फांद्या किंवा नवीन घुमारे टोकापासुन पाठीमागे मरत येतात.
 • रोगट फांदयाच्या सालीला प्रथम सुरकुत्या पडतात. आणि नंतर भेगा पडून खोड उघडे पडते. फांदया मागे मागे वाळत येतात.
 • रोंपावर किंवा लहान झाडांवर रोग मोठया प्रमाणात झाल्यास झाड अल्पावधीत मरु शकते. मोठया झाडांची वाढ खुंटले.
 • जुन फांदयांच्या अभावामुळे मोहोर कमी येतो. रोगग्रस्त फांदया, फुटवे कापून त्यांचा नाश करावा. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावा.
 • रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पावसाळ्यापुर्वी फांदयावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ५०० ग्रॅम मकिंवा काबेन्डेझिम २०० ग्रॅम २०० लिटर याण्यातून फवारणी करावी.
 • त्यानंतर उघडीप मिळेल त्या प्रमाणे य़ा बुरशीनाशकांच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

फांदीमर (डिंक्या):-

 • या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर दिसून येतो.
 • आंब्याची लहान तसेच मोठी झाडे या रोगाला बळी पडतात.
 • हवामानातील आकस्मिक बदल, ताम्र या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि पाणथळ, कातळ, चुनखडीयुक्त जमिनीवरील आंबा लागवडीत डिंक्‍्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
See also  प्रधानमंत्री किसान मानधन योजना - PM Kisan Mandhan Yojana Marathi

नुकसानीचा प्रकार:- ,

 • प्रथम सालीला लहान भेगा पडून पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर येण्यास सुरुवात होते.
 • चीक झाडाचा अन्नरस असल्यामुळे पुढील भागाला अन्नद्रव्यांची कमतरता भासते.
 • फांदी शेंडयापासून डिंक येण्याच्या जागेपर्यंत सुकत येते.
 • लहान वयाच्या झाडांना हा रोग खोडावरच येतो. म्हणून संपूर्ण झाड काही दिवसातच मरते. झाडाची वाढ खुंटते व झाडे कमजोर होऊन उत्पादनावर विपरीत परीणाम होतो.

व्यवस्थापन:-

 • आंब्याची नविन लागवड डोंगर उतारावर किंवा चांगल्या निचऱ्याच्या चुनखड नसलेल्या जमिनीत नसलेल्या जमिनीत करावी.
 • रोगट फांदया डिंक येण्याच्या खाली तोडून तोडलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी २०० लि. पाण्यात डायथेन एम-४५, ५०० ग्रॅम किंवा
 • १ टक्के बोर्डोमिश्रण या बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात. खताबरोबर ताम्रयुक्त अन्नद्रव्ये द्यावे.

किड रोग Mango Diseases नियंत्रणासाठी आंबा छाटणी व विरळणी:- .

 • आंब्यावरील किड-रोग प्रादुर्भाव व कमी उत्पादनाची अनेक कारणे आहेत.
 • झाडांच्या आतील भागात सूर्यप्रकाश शिरत नाही.
 • पर्यायाने नवीन पालवी येत नाही बुरशी व कीटकांना वातावरण पोषक होते व फळधारणा कमी होते.
 • झाडाची मध्य फांदी तोडल्याने झाडांमध्ये सूर्यप्रकाश शिरल्याने चांगली नवीन पालवी येवून मोहोर येतो व फळधारणा होते.
 • छाटणी मे महिन्याअखेर फळ काढणीनंतर करावी.
 • झाडांच्या आतील भागात येणारा सूर्यप्रकाश अडविणारी फांदी तळापासुन छाटावी.
 • छाटणी करतांना फांदी पिचणार नाही किंवा साल निघणार नाही यासाठी धारदार करवतीचा वापर करावा
 • छाटलेल्या भागाला बोर्डोपेस्ट लावावी.
 • छाट केलेल्या भागाला खोडकिडयांचा उपद्रव होऊ नये म्हणुन उपाय योजावेत.
 • छाटणी केल्याने सूर्यप्रकाश आतील खोडावर, फांद्यावर पोहोचतो. नवीन पालवी येते.
 • जुनी पालवी पुनर्जिवीत होते. मोहोर येण्यास मदत होते.
 • त्याचप्रमाणे तुडतुडे व बुरशी यांचा आश्रय नष्ट झाल्याने उपद्रव कमी होतो व पर्यायाने अधिक फळधारणां होऊन उत्पादन वाढते

 

source- http://www.nicra-icar.in/nicrarevised/

[ratemypost]