MPSC (राज्यसेवा) संपूर्ण माहिती – स्वरूप ,पात्रता,अभ्यासक्रम व पुस्तके  – MPSC Exam complete guide in Marathi

Table of Contents

MPSC (राज्यसेवा) संपूर्ण माहिती –  MPSC  Exam Complete Guide In Marathi

नमस्कार , मी अरुण फेगडे ,सध्या महाराष्ट्र् पोलीस दलात कार्यरत असून , एमपीएससी  परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या सर्वांकरता  उपयोगी खालील माहितीपूर्ण लेख मी ही वाचला आणि त्या लेखा सोबतच मी काही चार गोष्टी आपल्याला उपयोगात येतील त्या खाली लिहिण्याचा प्रयत्न करतोय , आपल्याला नक्की त्याचा उपयोग होईल.
राज्य सेवा परिक्ष यशा करता – 
 1. सर्वांत महत्त्वाच सात्यत , सात्यत आणि सात्यत- आपल्या प्रयत्नांत सात्यत असावं, धरसोड वृत्ती नसावी. अपयश, अडचणी या आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी आवश्यक असतात.
 2. नियमित वाचन – नियतकालिक, मासिक, दैनंदिन वृत्तपत्रांचं  शालेय जीवनापासून  वाचणे या राज्यसेवा परिक्षते उत्तीर्ण होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग .
 3. प्लॅन B तयार असावा
 4. सदैव सकारात्मकता असावी
 5. आपण अभ्यास करत असलेली पुस्तकं ही दर्जेदार ,उत्तम लेखकांची असावी, अपडेटेड असावीत
 6. परीक्षा सध्या नेगेटिव्ह मार्किंग असल्याने , योग्य नियोजन करावे ,उदाहरण
 7. सर्वात आधी – आपण जर पूर्ण प्रश्न पत्रिका नजरेसमोरून घातली तर काही प्रश्न असे आढळतात  जे आपल्याला 1 सेकंदात उत्तर देता येत असतात त्यांची priority वर उत्तर द्यावीत.
 8. नंतर असे प्रश्न असतात ज्यांना थोडा विचरा करावा लागतो, किमान 5-7 सेकंद लागतात ती सोडववावीत , 
 9. नंतर काही प्रश्न अशी असतात ज्यांना आपल्याला साधरण 20-35 सेकंद लागतात त्यांना सोडवावीत 
 10. काही प्रश्न मात्रआपल्याला अशक्य वाटतात , आपल्या अभ्यासात ,वाचनात आलेली नसतात अश्या प्रश्नांची अंदाजे उत्तर देण टाळावं, निगेटिव्ह मार्किंग असल्याने नुकसान करून घेण्यात अर्थ नाही.
 11. आज विश्लेषनात्मक अभ्यासला जास्त महत्व असून त्यावर भर द्यावा.

आपण वरील मुद्दे लक्षात  कायम लक्ष्यात असू  द्यावेत – खालील लेख वाचल्यानंतर काही प्रश्न असल्यास नक्की विचारा

राज्यसेवा माहिती:

आपण खुपवेळा स्पर्धा परिक्षेविषयी वर्तमानपत्रात वाचत असतो तसेच टिव्हीवरील बातम्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला,ऐकायला मिळत असते की एमपीएससी परिक्षेत अमुक गावातील तरूण तसेच तरूणी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

आणि तो किंवा ती पी एस आय,डेप्युटी कलेक्टर तसेच तहसिलदार झाली म्हणुन त्यांचा पुर्ण गावातर्फे सत्कार करण्यात आला.अभिनंदन करण्यात आले.

तेव्हा मी ही बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर,टिव्हीवर बघितल्यावर आपल्या सर्वाच्या मनात एमपीएससी म्हणजे काय असते?ही परिक्षा कशी घेतली जाते?ही परिक्षा कोणकोणत्या पदासाठी घेण्यात येते?ह्या परिक्षेचा अभ्यासक्रम काय असतो?ही परिक्षा देण्यासाठी पात्रता काय असावी लागते?

असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात.खासकरून दहावी बारावीच्या तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी वर्गामध्ये याबाबत जाणुन घेण्याची खुप उत्कंठा,उत्सुकता असते.

म्हणून आपण आजच्या लेखात एमपीएससी विषयी सविस्तरपणे MPSC  Exam Complete Guide In Marathi

माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून ज्या विदयार्थ्यांना एमपीएससीची तयारी करायची असेल त्यांच्या मनात एमपीएससी विषयी कुठलाही डाऊट राहणार नाही.आणि ते पुर्ण ताकदीनिशी योग्य दिशेने पाऊल उचलून आपल्याला हवे त्या पदासाठी मेहनत घेऊन एक चांगले अधिकारी पद प्राप्त करू शकता.आणि ते देखील आपल्या गावाचे शहराचे,नाव मोठ करू शकता.

MPSC  म्हणजे काय?  What Is MPSC 

एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सÍव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. या आयोगची स्थापना ही भारतीय राज्यघटनेच्या च्या कलम ३१५ अन्वये करण्यात आली असून ,घटनेच्या कलम ३२० नुसार , राज्यासेवेतील सेवक भरती व त्यासंबंधी राज्यसरकरास सल्ला देण्याचे काम , हे महाराष्ट्र लोकसेवा करत असतो. महाराष्ट्र प्रशासनात कर्तबगार ,पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड केली जावी, याची जबाबदारी ही आयोगाची असते.  राज्यघटनेत तरतूद नुसार प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची असते. घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.एमपीएससीला आपण मराठीत महाराष्ट लोकसेवा आयोग असे देखील म्हणतो.एमपीएससीद्वारे विविध पदांची भरती करण्यासाठी परिक्षा घेतल्या जात असतात.

ज्यात उपजिल्हाधिकारी,पोलिस उप अधिक्षक,तहसीलदार,गटविकास अधिकारी,नायब तहसिलदार,मुख्याधिकारी तसेच वर्ग एक,दोन,तीन श्रेणीची पदे इत्यादी अशा विविध पदांचा समावेश असतो.

See also  Communication Process विषयी माहीती- Process Of Communication In Marathi

MPSC  चा फुल फाँर्म काय आहे? –

एमपीएससीचा मराठीत महाराष्ट लोकसेवा आयोग असा अर्थ होतो.तर इंग्रजीत एमपीएससीचा फुल फाँर्म (Maharashtra Public Service Commission) असा होतो. एमपीएससीद्वारे प्रशासनातील विविध पदांची भरती करण्यासाठी वेळोवेळी परिक्षा घेतल्या  जावून उमेदवारांची निवड केली जाते

MPSC  परिक्षेसाठी काय पात्रता असावी लागते? – Eligibility Criteria For MPSC

स्पर्धा परिक्षेची तयारी करायची ईच्छा असलेल्या आपल्यापैकी प्रत्येक तरूण तरूणीच्या मनात उदभावणारा प्रश्न आहे की मला जर एमपीएससीची परिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी माझी योग्यता,तसेच पात्रता काय असणे गरजेचे आहे.

तेव्हा आपल्याला देखील त्यांच्याप्रमाणे ही परिक्षा देण्याची तीव्र ईच्छा होत असते.तेव्हा मी सुदधा ही परिक्षा देऊ शकतो का?हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे एकदम साहजिकच आहे.

 

 

MPSC Exam complete guide in Marathi
पात्रता व निकष राज्यससेवा परीक्षा – Eligibility Criteria For MPSC

एमपी-एससी-साठी पुढील पात्रता असावी लागते: Age eligibility

 • ह्या परिक्षेसाठी बसणारा उमेदवार हा भारताचा नागरीक असावा.
 • एमपीएससीची परिक्षा देण्यासाठी आपले वय किमान 19 असणे गरजेचे असते.ओपन कँटँगरीमधील उमेदवाराचे वय हे कमाल 38 असणे आवश्यक आहे.आणि रिझर्व(रखीव गटातील) कँटँगरीमधील उमेदवाराचे वय हे 43 पेक्षा अधिक नसावे.
 • एमपीएससी परिक्षेस पात्र होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
 • उमेदवार हा महाराष्टाचा उमेदवार असावा तसेच यासोबत त्याच्याकडे वय अधिवासाचे(Domicile) सर्टिफिकिट असणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराचे मराठी भाषेचे उत्तम ज्ञान देखील असायला हवे.

शारीरीक पात्रतेची अट : Physical Fitness requirement

 • काही पदांसाठी आपली ठाराविक शारीरीक स्वास्थय आणि उंची देखील असावी लागते.
 • पोलिस खाते आणि परिवहन खात्यातील पदांसाठी शारीरीक पात्रतेच्या पुढीलप्रमाणे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत :
 • डीवाय एसपी पद –
 • उंची 165 सेंटीमीटर (पुरूष उमेदवार)
 • उंची 157 सेंटीमीटर (महिला उमेदवार)
 • वरील सर्व अटींची जो उमेदवार पीयूआरटीएटीए करत असेल तो एमपीएससी परिक्षा देण्यासाठी पात्र ठरतो .

एमपी-एससी किती वेळा संधी 

 

MPSC-किती वेळा- संधि-दिलीजाते-Number-of-Attempts
MPSC-किती वेळा- संधि-दिलीजाते-Number-of-Attempts

एमपीएससीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया कशा पदधतीची असते? – Selection Process in MPSC exam

एमपीएससीमध्ये उमेदवारांची निवड ही एकुण पुढील तीन टप्प्यात केली जात असते. –  

MPSC exam criteria – 3 exam steps and syllabus

 

1)पुर्व परिक्षा(Prelims Exam) :

2)मुख्य परिक्षा (Mains Exam) :

3)मुलाखत (Interview) :

 

1)पुर्व परिक्षा(Prelims Exam) : स्वरूप

एम पी एससीत सर्वात आधी  आपल्याला पुर्वपरिक्षा द्यावी लागते.ज्यात आपल्याला

 • दोन पेपर द्यायचे असतात.पहिल्या पेपरमध्ये मल्टीपल चाँईस टाईपचे दोनशे प्रश्न विचारले जातात.
 • दुसरी परिक्षेत फक्त 80 प्रश्न विचारले जात असतात.पुर्व परिक्षा ही एकुण ४०० मार्काची असते.
 • कालावधी – 2 तास

यात आपल्याला पेपर सोडविण्यासाठी एकूण फक्त दोन तासांचा कालावधी दिला जात असतो.म्हणुन आपण  पेपर लवकरात लवकर सोडवायला सुरू करायला हवे.आणि पुर्ण प्रश्न अचुकपणे सोडवायला हवे.

जर आपल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर नेगेटिव्ह मार्कीग देखील दिली जाते.ज्यात एका चुकीच्या उत्तराचे ¼ मार्क वजा केले जातात.आणि हे दोघे पेपर इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत असतात.

2) मुख्य परिक्षा (Mains Exam) : स्वरूप

पुर्वपरिक्षा देऊन झाल्यावर आणि त्यात कट आँफ मार्क्सने पास झाल्यावरच आपल्याला मुख्य परिक्षेस बसता येते.तसेच सामोरे जाता येत असते.यात आपल्याला एकुण सहा पेपर द्यायचे असतात.जे एकुण 800 मार्कासाठी घेतले जात असतात.

Paper 1 :

पेपर फस्टमध्ये आपल्याला मराठी किंवा इंग्रजी भाषेत निबंध म्हणजेच इसे लिहायचा असतो.आणि त्यावर आधारीत शंभर मार्कासाठी आपणास दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.पेपरचा कालावधी एकुण तीन तास इतका असतो.

Paper 2 :

यात आपल्याला मराठी किंवा इंग्रजी भाषेत व्याकरणावर आधारीत शंभर मार्कासाठी मल्टीपल चाँईस टाईप प्रश्न विचारले जात असतात.यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ दिला जात असतो.

Paper 3 :

यात आपल्याला हिस्टी आणि जिओग्राफी ह्या विषयावर दीडशे मार्कासाठी मल्टीपल चाँईस क्वेशन विचारले जात असतात.हा पेपर दोन तासाचा असतो.

Paper 4 :

यात आपल्याला कायदा आणि राजकारण यावर आधारीत मल्टीपल चाँईस प्रश्न विचारले जातात.हा पेपर एकुण दीडशे मार्काचा असतो.आणि याचा कालावधी दोन तास इतका असतो.

Paper 5 :

यात मानव अधिकार तसेच मानव संसाधन विकास यावर आधारीत मल्टीपल चाँईस प्रश्न विचारले जातात.हा पेपर एकुण दीडशे मार्काचा असतो आणि याचा कालावधी दोन तास इतका असतो.

Paper 6 :

यात आपल्याला इकोनाँमिक्स म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था,सायन्स टेक्नाँलाँजीवर वर आधारीत मल्टीपल चाँईस प्रश्न विचारले जातात.हा पेपर एकुण दीडशे मार्काचा असतो.आणि हा सोडविण्यासाठी आपल्याला दोन तास दिले जातात.

3) मुलाखत (Interview) :

जे उमेदवार मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होत असतात त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाते.मुलाखत हा शेवटचा टप्पा असतो.

इथे आपली व्यक्तिमत्व,वैचारिक क्षमता,निर्णय क्षमता ,विवेचन क्षमता ,आऊट आँफ बाँक्स थिंकिंग आणि पदासाठी असलेली योग्यता बघण्यासाठी मुलाखत घेत असलेल्या अधिकारी वर्गाकडुन काही प्रश्न विचारले जातात.त्यानुसार आपल्याला मार्क्स दिले जात असतात.इंटरव्युहसाठी एकुण शंभर मार्क असतात.

मग पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा,मुलाखत या तिन्ही परीक्षेत पास झाल्यावर आपल्या सर्व डाँक्युमेंटचे व्हेरीफिकेशन केले जात असते.मग आपल्याला कोणत्याही एका ठिकाणी नोकरीसाठी रूजु करण्यात येते.

See also  API फुल फॉर्म मराठी - एपीआय माहिती - API full form in Marathi

 

MPSC  परिक्षेसाठी अर्ज कसा केला जातो?  How to apply for MPSC exam

एमपीएससी परिक्षेसाठी आपण सायबर कँफेवरून एमपीएससीच्या www.mpsc .gov.in आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन फाँर्म भरून आँनलाईन अर्ज करायचा असतो.

यात आपल्याला पहिले आपले नाव रेजिस्टर कराव लागते.तसेच ज्या पदासाठी आपल्याला अँप्लाय करायचे आहे ते पद निवडावे लागते.आणि त्यासाठी अर्ज करावे लागते.

एमपीएससी परिक्षेचा अर्ज भरण्याची संपुर्ण प्रक्रिया : Procedure to fill online MPSC exam application

 • एमपी एससीचा फाँर्म करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एमपीएससीच्या MPSC .Gov.In ह्या आँफिशिअल साईटवर जावे लागते.
 • वर आपल्याला लाँग इन हा पर्याय दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.
 • यानंतर आपल्यापुढे दोन आँप्शन येत असतात.ज्यात एक Candidate Log In असतो तर एक Admin Log In असतो.यात आपल्याला Candidate Log In हा पर्याय निवडायचा असतो.कारण आपण परिक्षा देणारा उमेदवार आहोत.
 • जर आपण जुने कंँडिडेट असाल तर आपणास आपला युझर नेम आणि पासवर्ड इंटर करून लाँग इन करायचे असते.
 • आणि नवीन युझर असाल तर आपणास New User Registration वर क्लीक करावे लागते.New User Registration वर क्लीक केल्यावर आपल्यासमोर एक विंडो ओपन होत असते.तिथे आपल्याला आपले युझर नेम तयार करावे लागते.तसेच आपल्या ईमेल आयडीला आणि मोबाईल नंबरला व्हेरीफाय करून घ्यायचे असते.
 • त्यानंतर आपली डेट आँफ बर्थ आणि पासवर्ड पुन्हा फिल करून व्हेरीफिकेशन फोटो मध्ये दिलेला नंबर तसेच शब्द सबमीट करून Create User ह्या आँप्शनवर क्लीक करावे.यानंतर आपला लाँग इन आयडी तयार होऊन जात असतो.
 • जे कँडिडेट आपला युझर आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत त्यांनी खाली दिलेल्या Forget Password आँप्शनवर क्लीक करून आपल्याला आपला नवीन पासवर्ड सेट करता येतो.
 • जेव्हा आपण Forget Password वर ओके करतो आपल्यासमोर एक विंडो ओपन होत असते.
 • त्यात आपल्याला आपला ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर तसेच डेट आँफ बर्थ फिल करावी लागते.त्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर तसेच मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड केला जात असतो.
 • तो ओटीपी आपल्याला सबमीट करावा लागतो.ओटीपी सबमीट केल्यावर आपल्याला आपला New Password दोन वेळा इंटर करायचा असतो.आणि इंटर करून सबमीट करण्यासाठी ओके बटणावर प्रेस करायचे असते.यानंतर आपला पासवर्ड रिसेट होत असतो

MPSC   तर्फे घेतल्या जाणार्‍या पदांची भरती  – Name of civil service exam conducted by MPSC

एमपीएससी तर्फे अनेक विभागातील पदे भरून काढण्यासाठी परिक्षा आयोजित केल्या जातात.आणि ह्या परिक्षा पुढीलप्रमाणे असतात.

 • महाराष्ट स्टेट सर्विस कमिशन (राज्यसेवा परिक्षा)
 • महाराष्ट अभियांत्रिकी सर्विस गृप ए एक्झाम
 • महाराष्ट अभियांत्रिकी सर्विस गृप बी एक्झाम
 • महाराष्ट फाँरेस्ट सर्विस एक्झाम
 • महाराष्ट अंँग्रीकल्चर सर्विसेस एक्झाम
 • असिस्टंट मोटार वाहन इंस्पेक्टर
 • पोलिस सब इन्सपेक्टर
 • सेल्स टँक्स इंस्पेक्टर
 • सहाय्यक परिक्षा
 • क्लार्क तसेच टायपिस्ट एक्झाम
 • सिव्हील जज,जुनिअर लेव्हल जस्टीस मँजिस्ट्रेट,प्रथम वर्ग परिक्षा

 

MPSC EXAM – लागणारे कागदपत्रे यादी   – List of Documents for MPSC  ONLINE exam application

 

 1. MPSC परिक्षेचा आँनलाईन फाँर्म भरताना लागणारे महत्वाचे Documents पुढीलप्रमाणे आहेत :
 2. दहावी पासचे तसेच पदवीचे प्रमाणपत्र
 3. आधार कार्ड
 4. ईमेल आयडी(दिलेला ईमेल आयडी अँक्टिव्ह असणे गरजेचे असते)
 5. काँन्टँक्टसाठी मोबाईल नंबर (दिलेला काँन्टँक्ट नंबर देखील अँक्टिव्ह असणे गरजेचे असते)
 6. वय अधिवास प्रमाणपत्र
 7. जातीचे प्रमाणपत्र
 8. नाँन क्रिमिलियर प्रमाणपत्र
 9. स्कँन केलेले फोटोची काँपी (Size 50 Kb,Width 125,Pixel 130,125/170 Height)
 10. स्कँन केलेली सही (Size 50 Kb,Width 125,Pixel 130,Height 50

 

MPSC  परिक्षेच्या अनुप्रयोगाबाबत लक्षात ठेवायच्या अशा महत्वाच्या बाबी : very important things to remember by exam candidates  

 • MPSC परिक्षेच्या अनुप्रयोगाबाबत लक्षात ठेवायच्या अशा महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत :
 • एमपीएससीच्या परिक्षेसाठी अर्ज करण्यासाठी एससी/एसटी,ओबीसी,पीडब्ल्युडी उमेदवारांना साधारणत 324 इतकी फी लागते.आणि ओपन कँटँगरीसाठी 524 इतकी आहे.
 • परिक्षेसाठी अँप्लाय करताना फाँर्ममध्ये भरलेली सर्व माहीती योग्य आणि सत्य असायला हवी.
 • फाँर्म भरताना कुठलीही चुक होऊ नये म्हणुन घाई न करता संपुर्ण एकाग्रतेने शांततेने फाँर्म भरायला हवा.
 • परिक्षेचे हाँल तिकिट कधी मिळणार आहे आणि परिक्षा कधी असणार आहे हे याबाबद अपडेट राहण्यासाठी उमेदवाराने एमपीएससीच्या आँफिशिअल साईटवर नियमित भेट देत राहणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराकडे मार्कशीटची मेन झेराँक्स आणि सर्टिफिकिटसची झेराँक्स असणे खुप गरजेचे असते.
 • MPSC परिक्षेची तयारी कशी करावी याबाबद काही महत्वाच्या सुचना तसेच गाईडलाईन्स :
 • एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप हे उमेदवाराच्या संपुर्ण व्यक्तीमत्वाची टेस्ट घेण्याच्या हेतुसाठी तयार केले गेलेले असते.
 • म्हणुन सर्व उमेदवारांनी ह्या परीक्षेची तयारी अष्टपैलू दृष्टीकोन बाळगणे फार गरजेचे असते.वेळे नूसार अभ्यास करण्याच्या पदधतीमध्ये देखील बदल झालेला आहे.

 

आधी एमपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला एखादा क्लास वाचनालय लावावे लागायचे तसेच अँकँडमी जाँईन करावा लागायची पण जेव्हापासून स्मार्ट फोन आला आहे तेव्हापासुन इंटरनेटचा वापर करून आँनलाईन अभ्यास करणे अतिशय सोपे झाले आहे.फक्त विदयार्थ्यांनी इंटरनेटचा मर्यादित आणि गरजेपुरताच वापर करायला हवा.

एमपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरूवात कशी  करावी: How to start MPSC exam preparations

1)आधी अभ्यासक्रम जाणुन घ्यायला हवा :

See also  गटचर्चा Group discussion म्हणजे काय ? का महत्वाची असते ?

एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात करण्यापुर्वी विदयाथ्यांनी सर्वप्रथम आपला परिक्षेचा Syllabus प्राप्त करायला हवा याने विदयाथ्यांना अभ्यास करण्यास एक योग्य दिशा प्राप्त होत असते.आणि त्यांनी केलेली मेहनत देखील जात नसते.

आणि असे म्हटले जाते की चुकीच्या दिशेने  मेहनत करण्यापेक्षा योग्य दिशेने केलेली थोडी मेहनत करणे देखील यश प्राप्त करण्यासाठी पुरेसे ठरते.म्हणुन विदयाथ्यांनी आधी अभ्यासक्रम समजुन घ्यावा आणि मगच अभ्यासाला लागावे.

आणि अभ्यास करताना नेहमी सिलँबस आपल्या डोळयासमोर ठेवायला हवा.याने आपल्या मेहनतीला योग्य दिशा आणि गती प्राप्त होते.

2) मागील पाच ते सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या:

एमपीएससीच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्यायला हवा याने परीक्षेत कसे प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात.प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते याचा उमेदवाराला अंदाजा येतो .

3) संदर्भासाठी फक्त महत्वाच्या आणि दर्जेदार पुस्तकांचेच वाचन करणे :

आज स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांचा ढिगारा विकण्यासाठी बाजारात पडलेला आहे आणि त्यातील सर्वच पुस्तके वाचायला आपल्याकडे वेळ नसतो म्हणुन आपण आपल्या अभ्याक्रमावर आधारीत काही मोजक्याच तसेच दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा संदर्भ घ्यायला हवा.

बाजारात आज शंभर पुस्तके विकायला आलेली असतात त्यातल्या आपल्याला कोणत्याही दहा ते वीस पुस्तकांची निवड करता यायला हवी.याने सर्व पुस्तक वाचण्यात आपला वेळ देखील वाया जात नसतो

 

4) स्वताच्या मायक्रो नोटस तयार करायला हव्यात:

आपण वाचलेल्या पुस्तकांतील काही महत्वाच्या छोटझ

छोटया नोटस देखील काढायला हव्यात.याने आपल्याला प्रत्येक धडयातील महत्वाचे मुददे समजले असल्यास त्यावर आधारीत कुठलाही प्रश्न सोडवायला सोपे जात असते.

नोटस काढल्याने आपली उजळणी होत असते कारण यात आपण वाचुन वाचुन प्रत्येक शब्द लिहित असतो.

5) परिक्षेच्या ऐनकाळात पुस्तके न वाचता फक्त महत्वाच्या नोटस वाचायला हव्यात :

खुप विदयार्थी हे परिक्षेच्या काळात सुदधा मोठमोठे ग्रंथ वाचत असतात ते टाळावे . योग्य पद्धत हीआहे की  विदयाथ्यांनी परिक्षेला एक महिना बाकी असताना  फक्त आपल्या काढलेल्या नोटसचे रिव्हीजन करायला हवे.

6) परीक्षेची तयारी करताना दोन्ही भाषेतील पुस्तकांचे वाचन करावे:

एमपीएससी अभ्यासक्रमातील काही महत्वाची पुस्तके म्हणजेच साहित्य ही फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहेत तर काही महत्वाची पुस्तके इंग्रजी भाषेतच फक्त उपलब्ध आहे म्हणून विदयार्थ्यांनी दोन्ही भाषेतील पुस्तकांचे वाचन करणे सोयीस्कर ठरत असते.

7) सर्व विषयांचा समानतेने अभ्यास करणे :

काही विदयार्थी आपल्याला इतिहास आवडतो म्हणुन फक्त इतिहासाचा अभ्यास करत असतात आणि अर्थशास्त्राचा विषय आवडत नाही म्हणुन त्याचे फार थोडेच वाचन करत असतात.

पण अभ्यासक्रमात जे घटक समाविष्ट असतात त्यात अर्थशास्त्र देखील असतो आणि त्याचा कमी अभ्यास केल्याने आपल्या गुणा वर परिणाम होत असतो.

म्हणुन विदयार्थ्यांनी अभ्यासक्रमात दिलेल्या प्रत्येक घटकाचा समानतेने अभ्यास करायला हवा.तसेच ज्या घटकांचे अधिक वेटेज आहे त्याच्यावर जास्त फोकस करायला हवे.भलेही मग तो कितीही अवघड असो.

सर्व विषयांचा समानतेने अभ्यास व्हावा यासाठी यासाठी आपण आपल्या अभ्यासाचे एक निश्चित वेळापत्रक देखील तयार करून घ्यायला हवे.

8) स्पर्धा परिक्षेकडे चैनचंगळ तसेच टाईमपास म्हणुन बघणार्यांनी या क्षेत्रात पडुच नये :

 • काही विदयार्थी हे मनात अधिकारी बनण्याची ईच्छा नसतानासेच अधिकारीची वट,रूबाब लाईफस्टाईल सँलरी बघुन आपल्याला देखील असा सम्मान मिळण्याच्या हेतुने स्पर्धा परीक्षेकडे वळत असतात.
 • आणि मग अभ्यास न पेलवल्यावर निराश आणि हताश होऊन बसत असतात.स्पर्धा परिक्षा हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे जिथे यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक ते दोन वर्षे कठोर मेहनत घेणे गरजैचे असते.म्हणुन ज्यांची मेहनत घण्याची मनापासून तयारी आहे त्यांनीच या क्षेत्रात यायला हवे.
 • एमपीएससीचा अभ्यास कशा पदधतीने करायचा त्यासाठी काय वाचायचे काय नाही वाचायचे अभ्यास कसा करावा हे ज्यांना व्यवस्थित माहीत आहे ते विदयार्थी यात कोणतीही अकँडमी तसेच क्लास न लावता आपला नोकरी व्यवसाय सांभाळुन तसेच स्त्रिया आपली घरगुती कामे सांभाळुन,खेडयातील मुले गावातच अभ्यास करून देखील एमपीएससी परिक्षेत सेल्फ स्टडी करून यश संपादन करू शकतात.
 • एमपीएससीमध्ये आपण कोणत्या क्षेत्रातुन डिग्री प्राप्त केली आहे.आपल्या शिक्षणाचे माध्यम तसेच इकोनाँमिकल बँकग्राऊंड काय होते अशी कोणतीही बाब महत्वाची नसते.
 • इथे फक्त आपल्या गुणवत्तेच्या बळावर अधिकारी पदासाठी आपली निवड केली जात असते.म्हणुन विदयार्थ्यांनी मनात कोणताही न्युनगंड न बाळगता तसेच अफवांना बळी न पडता जिददीने एमपीएससीची तयारी करायला हवी.

MPSC आरक्षण  –

 महिला खेळाडू व दिव्यांग आणि माजीसैनिक

 

MPSC Exam complete guide in Marathi
MPSC आरक्षण महिला खेळाडू व दिव्यांग आणि माजीसैनिक

MPSC आरक्षण  –

 दिव्यांग

MPSC Exam complete guide in Marathi
MPSC आरक्षण – दिव्यांग

एमपीएससी परिक्षेच्या  उपयुक्त पुस्तके यादी – Most useful MPSC exam book list

एमपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणुन अभ्यासासाठी आपण खालील पुस्तके वाचु शकतात.

1)राज्यशास्त्र :Political science

·         लक्ष्मीकांत (मराठी,इंग्रजी अनुवादीत)

·         पंचायत राज – लवटे (ज्ञानदीप)

·         रंजन कोळंबे (भागीरथ)

·         तात्याचा ठोकळा

2) अर्थशास्त्र : Economics

·         रंजन कोळंबे (भागीरथ)

·         देसले( दीपस्तंभ )भाग एक

3)भुगोल : Geography

·         स्टेट बोर्डाचा चौथी ते बारावी अभ्यासक्रम

·         सवदी -मेगा स्टेट

·         सवदी -अँटलास

·         महाराष्टाचा भुगोल(दिपस्तंभ)

·         अँटलास (आँक्सफर्ड)

4)पर्यावरण : Environment

·         तुषार घोरपडे (युनिक)

·         रंजन कोळंबे (भागिरथ)

·         पर्यावरण (स्टेट बोर्ड अकरावी, बारावी)

5)इतिहास : History

·         स्टेट बोर्ड(सहावी,आठवी अकरावी,)

·         गाठाळ

·         समाधान महाजन(युनिक)

·         रंजन कोळंबे (भागिरथ)

·         एनसीआरटी (प्राचीन तसेच मध्ययुगीन)

6) विज्ञान आणि तंत्रज्ञान : Science and Technology

·         ज्ञानदीप(सचिन भस्के)

·         रंजन कोळंबे(भागीरथ)

·         स्टेट बोर्ड (पाचवी ते दहावी)

·         पाचवी ते दहावी एनसीआरटी

·         अकरावी बारावी सिलेक्टिव्ह पीसीबी

7) टेक्नाँलाँजी : Technology

·         कोळंबे सर (सिलेक्टीव्ह)

·         कंप्युटर आयसीटी चे मागील शेवटच्या वर्षाचे प्रश्न

·         स्पेस टेक्नाँलाँजी -कोळंबे सर (पृथ्वी परिक्रमा मधुन करंट इशु ,इसरोची वेबसाईट

·         बायोटेक्नाँलाँजी -लास्ट ईयरचे प्रश्न,इंटरनेट सर्च केलेली माहीती,

·         न्युक्लीअर पाँलिसी -कोळंबे सर (पृथ्वी परिक्रमा मधले करंट इशू लास्ट ईयर क्वेशन)

·         डिझास्टर मँनेजमेंट(विज्ञान भुगोलची एनसीआरटी बुक,स्टेट बोर्डाच्या पुस्तकातुन गोळा केलेली माहीती.

8) चालु घडामोडींसाठी – Current  affairs book list

·         परिक्रमा(पृथ्वी)

·         सकाळ ईयरबुक

·         लोकसत्ता न्युज पेपर

Referrence साठी इतर पुस्तके :

सी सँट पेपर 2

एमपीएससी सिम्प्लीफाईड – अजित थोरबोले सर आर एस आग्रवाल

मराठी :मो.रा.वाळींबे बाळासाहेब शिंदे

इंग्रजी :बाळासाहेब शिंदे,पाल आणि सुरी

कृषी :स्टेट बोर्ड अकरावी,बारावी व गारगोटे ज्ञानदीप 

MPSC मॅजिक ठोकळा

विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का? -What is the Right Time for Preparation

11 thoughts on “MPSC (राज्यसेवा) संपूर्ण माहिती – स्वरूप ,पात्रता,अभ्यासक्रम व पुस्तके  – MPSC Exam complete guide in Marathi”

Comments are closed.