सुरणाचे आरोग्यदायी फायदे – Yam Health Benefits In Marathi
सुरण या कंदमुळाचे सर्वाधिक म्हणजे ७० ते ७५ टक्के उत्पादन नायजेरियात होते. सुरणाचा जास्तीत जास्त वापर मानवी खाद्य, अन्न व औषधनिर्मितीसाठी केला जातो.
हे पीक फिलीपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया या देशांत पसरले आहे. हे पीक व्यापारी दृष्टीकोनातून भारत, श्रीलंका, चीन, जावा आदी प्रमुख देशांमध्ये घेतले जाते.
भारतात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
या पिकाचा प्रसार आता बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात वाढत चालला आहे. सुरणापूसन विविध खाद्यपदार्थ बनविले जातात कारण त्यापासून पौष्टिक आहार व औषधी गुणधर्म मिळतात.
सुरणाचे संत्रागच्छी, कोऊ, श्री पद्या, श्री अधिरा, बिदानकुसूम, पालम’झिमिखंड-१ आणि गजेंद्र हे वाण विविध विभागात लावले जातात व त्यांचे उत्पादन हेक्टरी सर्वसाधारण १२ ते २२ टन मिळते.
सुरणाचे पांढरे, पाणीदार, पिवळे आणि कडवट बिटर सुरण असे प्रकार पडले जातात. या पैकी फक्त कडवट/बिटर सुरण, वरानटी सुरण (डायस्कोरिया हिसपीडा आणि डायस्कोरिया हूमेटोरियम) हे प्रकार खाद्यात्र म्हणून वापरले जात नाहीत कारण त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेद्स आणि अल्कलॉईडस डायोसरजेनिन (३.० ते ३.५ टक्के) हे विषारी घटक असतात.
महाराष्ट्रातही सुरणाचे उत्पादन वाढत चालले आहे. चांगली प्रक्रिया करुन उत्तम प्रतिचा कच्चा माल आणि मुल्यवर्धीत पदार्थ निर्माण करता यावेत यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
सुरणाचे आरोग्यदायी फायदे – Yam Health Benefits In Marathi
- सुरणामुळे शरीरातील एल.डी.एल. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
- दमा आणि फुप्फुसनलिका दाह कमी करण्यासाठी सुरणाचा उपयोग होतो.
- रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास तसेच उदराचा दाह कमी करण्यास मदत होते.
- स्नायुंमध्ये अचानक होणाऱ्या वेदना कमी करणे, वजन कमी करणे, कॅन्सर प्रतिबंध करण्यात मदत होते.
- स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि हार्मोन्सचा समतोल साधला जातो. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- मानवी यकृतामधील स्त्राव नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ख्रियांमधील प्रसुतीनंतरचा स्त्राव नियंत्रणात ठेवणस मदत होते.
- सुरणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- सुरणापासून आपणास उत्कृष्ट प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि ओमेगा-३ स्निग्ध आम्ल मिळतात.
- सुरण हे एक उत्कृष्ट अन्टीऑक्सिडंट म्हणून कार्य करते त्यामुळे मानवी शरीर निरोगी राहण्यास मदत हेते.
आधुनिक तंत्रज्ञान वापरुन सुरणापासून विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात.
- सुरणाची बटाट्याप्रमाणे भाजी होते. तसेच विविध प्रकारच्या करीज आणि लोणचे तयार करण्यासाठी केला जातो. सुरणापासून पीठ , फ्लेक्स, वेफर्स, भाजलेले काप.
- वेगवेगळ्या प्रकारच्या माज्या, सूप, चटणी, केक, गुलाबजाम, खीर, कटलेट, पकोडा, वडा, सुरण चोप, मिक्स व्हिजीटेबल चोप आदी पदार्थ तयार केले जातात.
सुरणापासून पीठ आणि वेफर्स :
सुरण स्वच्छ करणे,धुवून घेणे व साल काढणे, मध्यम आकाराचे काप पाडणे/फोडी करणे/चीप्स करणे, गरम पाण्याची प्रक्रिया करणे, गंधकाची धुरी देणे, शिजविणे/उकडणे, ६० ते ८० सें. तापमानात वाळवणे.त्यानंतर त्याचे पीठ करणे.
सुरणाचा व्यापारी तत्वावर प्रामुख्याने स्टार्च तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.
बटाटा आणि रताळ्यापेक्षा सुरणामध्ये स्टार्चचे प्रमाण आधिक असते. सुरणाच्या स्टार्चमध्ये अधिक फायदेशीर गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती, कापड निर्मिती (टेक्सटाईल), खाद्य पदार्थ, कागद कारखान्यामध्ये आणि पेट्रोल व केमिकल्स प्रोसेसिंग प्रक्रियेमध्ये होतो.
स्टार्च तयार करण्यासाठी लहान, मध्यम, मोठा किंवा खराब असा कोणत्याही प्रकारचा सुरण वापरता येतो.
सुरणाचे विविध पदार्थ तयार करताना जो भाग वापरला जात नाही (शिल्लक किंवा वाया जाणारा भाग) त्याचाही वापर स्टार्च करण्यासाठी वापरला जातो.
स्टार्च तयार करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- सुरण स्वच्छ धुवून घेणे, साल काढणे, लहान काप करणे व
- एक टक्का पोटॅशियम मेटाबायसल्फेटच्या द्रावणात बुडवून घेणे. ग्राईंडरच्या मदतीने दळून घेणे, मलमल कापडातून गाळून घेणे, उभट भांड्यात संथ अग्नी तेवत ठेवून स्टार्च मांडयाच्या तळाला साचू न देणे
- स्टार्चच्या तळावरील पाणी काढणे. २ ते ३ वेळा पाण्याने स्टार्च धुवून घेणे. स्टार्च६० सें.ग्रे. तापमानास सूर्यप्रकाशात वाळवणे. त्याची बारीक पावडर करुन साठवणे.
सुरण य़ा कंदमुळापासून ग्लुकोमानान हा एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तयार केला जातो. यामध्ये मॅनोज आणि ग्लुकोज यांचे प्रमाण १.६:१ असे असते.
याचा वापर जेलिंग एजन्ट म्हणून विविध खाद्यपदार्थ, औषधनिर्मितीमध्ये तसेच इतर पदार्थांमध्ये केला जातो.
सुरणापासून प्रथम कोनजॅक ग्लुकोमानान तयार केले जाते व त्याचे शुद्धीकरण करुन ग्लुकोमानान शुद्ध स्वरुपात मिळवला जातो.
माहिती -VCO नारळतेलाचे चे फायदे – Virgin Coconut Oil
प्रथम कोनजॅक पावडर तयार करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- सुरण स्वच्छ करुन धुवून घेणे, साल काढून बारीक काप करुन ते वाळवणे व दळणे.
- ही पावडर शुद्ध करुन घेतली जाते. त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे.
- कोनजॅक सुरण पावडर (७० मेस चाळणीने चाळलेली), स्निग्ध पदार्थ शुद्धीकरण प्रक्रिया, प्रथिने पदार्थ शुद्धीकरण प्रक्रिया, २५ टक्के कोनजॅक संतृप्त द्रावण तयार करणे, गाळून घेणे (१३० मेसची चाळण/कापड वापरणे),
- साका वेगळा करणे, द्रावणीय भाग वेगळा करणे, यामध्ये अँक्रॅलिक आम्ल समाविष्ठ करावा. त्यातून पांढरा साका तयार होतो तो १४० मेस चाळणीने गाळून घेतल्यावर कोनजॅक ग्लुकोमानान मिळते.
- त्यात पाणी मिसळणे, एक ग्रॅम/मि.ली. प्रमाणे पोटॅशिअम अन्सुमीनेट/ सल्फेट मिसळणे, अल्ट्रासेटींग यूज़ करणे. साका व द्रावणीय भाग वेगळा करुन त्य़ाचे शुद्धीकरण करणे (२-इथिनिल ऑक्झीरीन मिसळणे) ३०सें.ग्रे. ला नायट्रोजनद्वारे वाळविणे.
- त्यातून शुद्ध स्वरुपातील ग्लुकोमानान पावडर तयार होते. ग्लुकोमानान पावडरचा वापर जेलिंग ऐजन्ट म्हणून मटणाच्या विविध पदार्थांनमध्ये केला जातो.
- तसेच याचा उपयोग सॉसेजेस,ग्रेवीज, पुडींग्न, पाई फिलींग आणि पदार्थास घट्ट पणा आनण्यासाठी केला जातो. ग्लुकोमानानचा उपयोग विविध प्रकारची औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो.
सुरणाचे लोणचे
- सुरण स्वच्छ करुन धुवून त्याची साल काढावी व त्याचे बारीक चौकोनी तुकडे करावेत. या फोडीमध्ये चिंचेची पेस्ट, मिरची पावडर, थोडा गुळ, हिंग, आले पेस्ट, लसणाची पेस्ट आणि गरम मसाला टाकून त्यास गरम क तेलामध्ये तळून घ्यावेया 2. आणि
- नंतर गरम तेल आवश्यकतेनुसार टाकून लोणचे तयार करावे. हे लोणचे चांगल्या निर्जतूक बाटलीमध्ये भरुन त्याची साठवण करावी.
सुरणाचे गुलाबजाम
- ३ चांगली पेस्ट तयार करणे.या पेस्टमध्ये गव्हाचा स्टार्च, दुध पावडर, बेकींग पावडर आणि थोडे तेल टाकून त्याचे लहान-लहान गोल गोळे तयार करुन घ्यावेत. हे सुरणाचे गोल गोळे गरम तेलात चांगले तांबडे होई पर्यंत तळून घ्यावेत व नंतर साखरेच्या पाकात साधारणता एक तास मुरविण्यासाठी ठेवावेत.
सुरणापासून इस्क्रुडेड प्रॉडक्टस
- इस्क्रूडेड प्रकियेमध्ये अतिउच्च तापमानास अति कमी वेळ पदार्थास उष्णता देऊन तो खाण्यास योग्य केला जातो.
- सुरण स्वच्छ करणे, धुवून घेणे व साल काढणे, बारीक तुकडे करुन परत धुवून घेणे व ११ टक्के आर्द्रतेपयैत वाळवणे. हॅमर मिलने दळणे/पावडर तयार करणे.
- ही पावडर १०० मि.मी. च्या चाळणीने चाळून घेणे व पावडरची आर्द्रता १६ टक्क्यांपर्यंत स्थिर करणे. पावडर १९ मि.मी. स्क्रूच्या सिंगल इस्क्रुडर मशिनमध्ये टाकणे.
- सिंगल इस्क्रुडर योग्य तापमानास चालवून चांगला पदार्थ तयार करणे. सुरणचा इस्क्रुडेड प्रॉडक्ट पॅकिंग करुन साठवणे व विक्री करणे.
सुरणापासुन इथेनॉल
- सध्या आधुनिक यांत्रीकीकरणाच्या युगामध्ये बायोइथेनॉल निर्मितीला फार मोठा वाव आहे.
- सुरण या कंदमुळामध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्याचे हायड्रॉलिसिस करुन तसेच सुरण प्रकिय़ामध्ये टाकावू पदार्थ म्हणून साल काढली जाते तीचाही वापर इथेनॉल निर्मितीसाठी करता येतो.
सुरणाचे इतर खाद्यपदार्थ
- सुरणाचे पीठ तयार केल्यावर त्यापासून आपण पोरजी, कटलेट, ही पकोडा, वडा, चटणी, ही सुप, केक सारखे पदार्थ सहज बनवू शकतो.
- सुरण या कंदमुळाची करील सर्व प्रक्रिया युक्त माहिती पाहिली असता या पिकास भारतात तसेच महाराष्ट्रात लागवडीसाठी व प्रक्रिया उद्योगासाठी चांगली संधी आहे. तरी शेतकरी वर्गानी व उद्योजकांनी या पिकाकडे एक व्यवसाईक, नगदी व व्यापारी दृष्टीकोनातून विचार करुन प्रयत्न केले पाहिजेत.
शेतकरी मासिक – डिसेंबर – २०२०