आयई एक्सच्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता शेअर २०० च्या पार जाणार – IEX shares

आयई एक्सच्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता शेअर २०० च्या पार जाणार

मागील काही दिवसांपासून आय ई एक्सचे india energy exchange limited कंपनीचे शेअर खुप चर्चेत आहे कारण हे शेअर सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पडताना दिसून येत आहे.

ह्या पाच दिवसांमध्ये आई एक्सचे शेअर २० टक्के पेक्षा अधिक खाली गेले आहेत.

अणि जर आपण ह्या शेअरचा मागील एक महिन्याचा चार्ट बघायला गेले तर आपणास असे दिसून येईल की ह्या शेअरने मागील एका महिन्यात गुंतवणूक दारांना २२ टक्के इतका नकारात्मक परतावा दिला आहे.

पण आज ह्या शेअर विषयी एक चांगली बातमी यात गुंतवणूक करू इच्छित असलेल्या किंवा आधीपासून यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांसाठी ऐकायला मिळते आहे.

आई एक्सच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घट मुळे ह्या शेअर्सची बाजारात अधिक प्रमाणात विक्री होताना दिसुन येत होती.

पण आता ह्या शेअरची केली जात असलेली विक्री थांबणार आहे असे लक्षण दिसुन येत आहे.

एक मोठे ब्रोकरेज हाऊस युबीएसने असे सांगितले आहे की ज्या कारणामुळे आय ई एक्सचे शेअर बाजारात घसरताना दिसुन येत होते ते कारण आता संपुष्टात आले आहे.

आई एक्सचे शेअर ज्या मार्केट कपलिंग मुळे घसरत होते ती घटना पुर्णपणे संपली असल्याचे युबीएसने सांगितले आहे.

याचसोबत युबीएसने आई एक्सच्या शेअर्सवर बायची रेटिंग देखील दिली आहे.युबीएसचे असे मत आहे की आई एक्सचे शेअर्स १२४ वरून २०० पर्यंत जाऊ शकतात.

ड्रीम इलेव्हनचे को फाऊंडर यांनी आज आई एक्सचे ५३ लाख शेअर्स खरेदी १२५ च्या भावात केली असल्याचे अपडेट नुकतेच समोर आले आहे.

ह्या शेअर्समध्ये सध्याच्या पातळीपेक्षा ६५ टक्के इतकी अधिक तेजी येण्याची शक्यता युबीएसकडुन वर्तवली जात आहे.

ज्या गुंतवणूक दारांना करंट लेव्हल पासुन ६५ टक्के इतके रिटर्न प्राप्त करायचे आहे ते गुंतवणूकदार ब्रोकरेज हाऊसचा सल्ला घेऊन ह्या आय ई एक्स कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात.

See also  Investment Banking म्हणजे काय ? कार्य व प्रकार - Investment Banking Information In Marathi

आय ई एक्सच्या शेअर्समध्ये घसरण येण्याचे कारण काय होते?

असे सांगितले जाते आहे की शासनाने जारी केलेल्या एका परिपत्रका नंतर आय ई एक्सच्या शेअर्समध्ये घसरत होण्यास सुरुवात झाली होती.

वीज मंत्रालयाने सेंट्रल इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी कमिशन Centra electricity regulatory commission CERC ला मार्केट कपलिंग लागु करण्याचे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

वीज मंत्रालयाने मार्केट कपलिंग लागु करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याची सुचना देखील दिली होती.यानंतरच बाजारात इंडियन एनर्जी एक्सचेंजचे शेअर्स कमकुवत होताना दिसुन आले होते.

NOTE -The information in this blog is not meant to be an endorsement or offering of any stock purchase. Investments in securities market are subject to market risks, Always Refer your financial consultant advice before Investing.