भारतात महागाई तसेच मंदी येणार का? -Nirmala Sitharaman on inflation and economy
महागाई अणि मंदीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्या लोकसभेत काय म्हणाल्या?
अमेरिका सारख्या बलाढय अणि विकसित देशाची अर्थव्यवस्था मंदीत जाताना दिसुन येत आहे.
अशा परिस्थितीत आपल्याही भारत देशात श्रीलंकेसारखीच महागाई मंदी येणार का हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला होता.
पण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत असे स्पष्टीकरण दिले आहे की भारतात महागाई अणि मंदी येणार नाही?
महागाईमुळे देशाच्या आर्थिक विकासाला देखील बाधा देखील पोहचणार नाही असे मत प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.याबाबद अधिक सविस्तर माहीती आपण जाणुन घेऊया.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत असे म्हणाल्या आहे की देशात महागाई मंदी येण्याची शुन्य शक्यता आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत असे की दितीय त्रैमासिकात अमेरिका ह्या देशाचा जीडीपी हा 0.9 टक्के इतका घसरला होता.
अणि पहिल्या त्रैमासिकात 1.6 टक्के इतका घसरला होता.अमेरिकेमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे ही मंदी आल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा वेळी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की भारतात देखील अशी महागाई मंदीची परिस्थिति निर्माण होणार का?
तेव्हा निर्मला सीतारमण असे म्हणाल्या की भारतात मंदी येण्याची शक्यता नाहीये.ब्लूमबर्ग मधील अर्थतज्ञांनी देखील असे सांगितले आहे.भारत देशाची आर्थिक स्थिती ही बळकट आहे.
पण इतर देशांमध्ये मंदी येण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही.कारण सध्या चीन ह्या देशामधील जवळजवळ चार हजार बँक ह्या दिवाळखोरीच्या परिस्थितीत आल्या आहेत.
अणि जर आपण आपल्या भारतातील बँकांचे अनुत्पादक कर्ज एनपीए बघितले तर त्यात घट होताना दिसुन येत आहे.
म्हणजेच विरोधकांचे सर्व आरोप चुकीचे आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत म्हणाल्या.
इनफ्लेशन म्हणजे काय?Inflation meaning in Marathi
इनफ्लेशन म्हणजेच महागाई.भाववाढ,चलनवाढीचे प्रमाण,भाववाढीचा दर इत्यादी.
रिसेशन म्हणजे काय?Recession meaning in Marathi
रिसेशन म्हणजे मंदी.