किटकनाशके फवारतानाची काळजी(safe spraying of pesticides)

 

किटकनाशके फवारतानाची काळजी (safe spraying of pesticides).बद्दल लिहताना लक्षात येईल की गेल्या दोन वर्षापूर्वी किटकनाशके विषबाधे मुळे महाराष्ट्र त काही शेतकर्‍यांना, मजुरांना आपला जीव गमवावा लागला, कृषि विभातर्फे केलेल्या अभ्यासाअंतर्घत ह्या बाबी समोर आल्यात की किटकनाशके विषबाधे च एक प्रमुख कारण म्हणजे फावरणी करताना पुरेशी , किटकनाशके हातळताना (safe spraying of pesticides) आवश्यक असणारे सुरक्षितता न बाळगन ,पुरेशी काळजी न घेणे.

मानवी शरीराल अतिशय घातक अश्या ह्या रसायांनांच माहिती नसल्यामुळे थोड दुर्लक्ष होवून , विषबाधे चे प्रसंग ओढवू शकतात.

किटकनाशके, तणनाशके वापरतांना हे (safe spraying of pesticides.)लक्षात घेण आवश्यक आहे की

  • श्वासाद्वारे – रासायनिक औषधांचे अत्यंत बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.
  • त्वचा आणि डोळ्याद्वारे – फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.
  • तोंडाद्वारे- फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना, बीडी पीतांना शरीरात जाऊ शकतात.

किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी-(safe spraying of pesticides.)

  • वर्षभर फावरणी यंत्र ची अधून अमधून देखभाल करावी , गळके फवारणी यंत्र असल्यास ते तसे च न वापरता ते दुरुस्त करुन मगच वापरावे.
  • किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा (चाडीचा) वापर करावा.
  • तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत.
  • फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत.
  • झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
  • किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
  • फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.
  • किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
  • फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवुन खाणे-पिणे करावे.
  • फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणा पासून दुर ठेवावे
  • उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी
  • फवारणी करतांना वापरलेली भांडी इ.साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवु नयेत, तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे.
  • किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात..
  • फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावुन फुंकु नये अथवा हवा तोंडाने आत ओढु नये यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.
  • किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्तवेळ करु नये
  • . हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टराकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
  • किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वा-यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
  • किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये.
  • जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातंनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या साह्याने शोषुन घ्यावेत व जमिनीत गाडुन टाकावीत.
  • डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.
  • लाल रंगाचे चिन्ह/खुणा असलेली औषधी विषारी असुन त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.
See also  जन गन मन भारताचे राष्टगीत - Jana Gana mana national anthem in Marathi
safe spraying of pesticides
safe spraying of pesticides)

विषबाधाची लक्षणे विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना

 

  • विषबाधा ही किटकनाशके/तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क अथवा पोटत गेल्यास होते.
  • इतर आजार व विषबाधा यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
  • अशक्तपणा व चक्कर येणे.
  • त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे.
  • डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे
  • तोडातुन लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे.
  • डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.

विषबाधेची शंका आल्यास खात्री करा.

  • रोग्याच्या किटकनाशकांसह संपर्क आला होता काय ?
  • नेमके कोणते किटकनाशके वापरले ?
  • शरीरात किती गेले ? व ते केव्हा गेले ?
  • डॉक्टरांसाठी वरिल माहिती महत्वाची आहे.

विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार

  • किटकनाशके/तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडुन धुवावे.
  • शरीरावर उडाले असल्यास १० मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
  • श्वास सुरू आहे की नाही ते ललगेच पहावे , अन्यथा जिवावर बेतु नये ह्या करता तत्काळ कृत्रिम श्वासोपचार  व्यवस्था करावी.
  • विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही .
  • विषबाधीत व्यक्ती त्वरितपिण्यासाठी दूध तसेच विडी/सिगारेट व तंबाख देऊ नये.
  • विषबाधीत व्यक्तीला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरूण द्यावे
  • कीटकनाशकांच्या माहिती पत्रकासह डॉक्टरांकडे विषबाधीत व्यक्ती त्वरित दाखवावे किंवा आवश्यक असल्यास दवाखान्यात अॅडमिट करावे व डॉक्टरांच्या देखरेखीखाली च उपचार करावे.
  • विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
  •  

अधिक माहिती साथी क्लिक करा_