जन गन मन भारताचे राष्टगीत – Jana Gana mana national anthem in Marathi
भारताचे राष्टगीत –
जन गन मन अधिनायक जय है
भारत भाग्यविधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गन मंगल दायक जय है
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे
जय जय जय जय है
हे भारत देशाचे राष्टगीत आहे.ह्या राष्टगीताचे लेखन बंगाली भाषेत करण्यात आले आहे.ह्याचा गायनाचा कालावधी एकुण 52 सेकंद इतका आहे.
ह्या राष्टगीतास हिंदीमध्ये देखील अनुवादीत करण्यात आले आहे.
भारताच्या राज्यघटनेने 24 जानेवारी 1950 रोजी ह्यास भारताचे अधिकृत राष्टगीत म्हणून मान्यता प्राप्त करून दिली होती.
जन गन मन हे भारताचे राष्टगीत सगळयात पहिले 27 डिसेंबर 1911 ला कोलकत्ता येथे भरवलेल्या एका काँग्रेसच्या भरविलेल्या अधिवेशनात गाण्यात आले होते.
प्रसिदध बंगाली कवी साहित्यिक नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी जन गन मन हे गीत गायले होते.ज्याला अनेक राजकीय पक्ष तसेच धार्मिक संघटनांची सुदधा मान्यता प्राप्त झाली होती.संस्कृत वळण असलेल्या बंगाली भाषेत टागोर यांनी हे गीत लिहिले होते.
हे राष्टगीत कविता म्हणुन बंगाली साहित्यात सुदधा बंगाली भाषेतुनच लिहिले गेले आहे.हे गीत स्वर अणि क्रियापद या दोघांचा वापर करून तयार करण्यात आले आहे.जन गन मन ह्या गाण्यात एकुण पाच पदे समाविष्ट आहेत.
भारताचे राष्टगीत हे भारतातील शाळा,काँलेज,सिनेमा थिएटर तसेच शासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी गायले जाते.राष्टगीताचे गायन करणे सर्गळयांसाठी अनिवार्य करण्यात आलेले नाहीये.
जेव्हा राष्टगीत चालु असते तेव्हा त्याचा आदर करण्यासाठी आपणास राष्टगीत संपेपर्यत स्तब्ध होऊन उभे राहावे लागते.राष्टगीत गात असताना आपण सावधान स्थितीत असणे आवश्यक आहे.
जन गन मनचा अर्थ –
जन गन मन हे आपल्या देशाचे राष्टगीत आहे.हे गीत आपण आपल्या मनात असलेले आपल्या देशाविषयीचे प्रेम,आदर व्यक्त करण्यासाठी गात असतो.
तु ह्या देशातील जनतेच्या हदयाचा स्वामी आहोत.देशाचा भाग्योदय करणारा देखील तुच आहोस.
तुझा सदैव जयजयकार असो
पंजाब सिंध गुजरात महाराष्ट दक्षिण भाग उडिसा बंगाल तुझ्या नामघोषाने हे सर्व जागृत होतात.
विंध्य हिमाचल पर्वत इथपर्यत तुझ्या यशाची गाथा ऐकु येते.उसळ घेणारी समुद्राची लाट सुदधा तुझ्याच नावाचा जयघोष करते.
हे सर्व तुझ्यापाशी वरदान मागतात.तुझ्या किर्तीचे गायन करतात.तु सर्व व्यक्तींचे मंगल करणारा आहे.