श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार – Lord Krishna Inspirational Thought In Marathi

श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार – Lord Krishna Inspirational Thought In Marathi

 • माणुस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो जसा तो विचार करत असतो तसाच तो बनत देखील असतो.
 • फळाची अपेक्षा सोडुन कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर अणि यशस्वी बनवित असतो.
 • आयुष्यात कशीही वेळ येवो त्यात कुटुंबाची साथ असायला हवी कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते अणि दुख असेल तरी देखील ते सर्व मिळुन वाटुन घेता येते.
 • आयुष्य आपणास तेव्हा कठिन वाटु लागते जेव्हा आपण स्वतात बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो.
 • कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडुन विविध गोष्टी मागत असतो
  त्याची अपेक्षा करत असतो पण कर्म केल्यावर देव स्वता आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो.
 • जो व्यक्ती आपल्या कर्म अणि कर्तव्याचे पालन करत नाही स्वता देव देखील त्याचा आदर करत नसतो.
 • वेळ कधीच थांबत नाही.आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात.फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे.कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते.
 • कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येत त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे त्रण तुम्ही आज ह्या जन्मात फेडत आहात.
 • धर्म आपल्याला जीवणाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यत पोहचवत असतात.
 • आपले कर्म हीच आपली खरी ओळख वेगळेपण निर्माण करत असते नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे आज आहेत.
 • जर निर्धारीत ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय बदलू नका ते ध्येय प्राप्त करण्याची आपण आखलेली रणनीती बदला.
 • जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकांत प्राप्त होत नाही.
 • जीवन हे ना भुतकाळात तसेच भविष्यात आहे
  जीवन हे वर्तमानात आनंदाने जगण्यात आहे.
 • क्रोध हा माणसाची बुदधी भ्रष्ट करतो.अणि बुदधी भ्रष्ठ झाली की आपण स्वताच स्वताचे नुकसान करून घेत असतो.
 • मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत-काम, क्रोध,लोभ,निद्रा,भय,आळस
 • आपण कमावलेले नाव ऐश्वर्य धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमवण्याची वेळ येत असते.
 • ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तींमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका.
 • जेव्हा एखादी समस्या जन्माला तेव्हा तिचे निवारण करण्याचा उपाय देखील त्या समस्येबरोबरच जन्माला येत असतो.
 • कर्म करणे आपल्या हातात त्याचे फळ द्यायचे की नाही तसेच कधी द्यायचे अणि किती द्यायचे हे सर्व प्रकृतीच्या हातात आहे.
 • जशी वागणुक इतरांनी आपणास दिलेली आपणास अजिबात आवडत नसते तशी वागणुक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये.
 • एखाद्याला चुकी केल्याबददल समोरासमोर तोंडाने बोलुन माफी द्यायला एक क्षण सुदधा आपणास लागत नसतो.पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासुन माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जात असते.
 • कोणाचे वाईट करायला वाईट काम करायला कुठलीही मेहनत करावी लागत नसते ते लगेच होऊन जाते.पण याच ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याचे चांगले करू पाहतो,चांगले कार्य करू पाहतो आपल्याला त्यासाठी खुप संघर्ष करावा लागत असतो.
 • स्वताला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका.
 • प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण कला कौशल्य अणि सामर्थ्य असते म्हणुन कधीच कोणाला कमी लेखु नका.कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो.
 • आपल्या अपेक्षा अणि मोह हेच आपल्या दुखाचे सर्वात मोठे कारण आहे.
 • जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रुप्रमाणे कार्य करू लागते.
 • अज्ञानी व्यक्ती फक्त स्वताच्या फायद्याचा विचार करत असतो.अणि बुदधीमान व्यक्ती सर्वाच्या फायदयाचा सुखाचा विचार करत असते.
 • ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्या साठीच घडत असते.हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत अणि देवाकडे तक्रार करत बसत नाही.
 • ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात देव दिसु लागतो.
 • प्रेमाने जोडलेले नाते कधी तुटत नाही अणि स्वार्थीपणाने जोडलेले नाते कधीच अधिककाळ टिकत नाही.
 • अशांत मनाला नियंत्रित करणे नक्कीच अवघड आहे पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो.
 • मनुष्य त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनत असतो.
 • परमेश्वर चांगल्या लोकांची परीक्षा घेतो पण त्यांची साथ देखील देत असतो.
 • कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते ते कोणालाच चुकवता येत नाही.मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट.
 • माणुस वाईट काम करताना आजुबाजुला कोणी आहे का हे बघतो पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो.
 • कुठलेही नाते शेवटपर्यत जपुन ठेवण्यासाठी मनात विनम्रतेची भावना असावी लागते.
 • आत्मा जन्म घेत नसतो तो मरत देखील नाही.न त्याला कोणी अग्नीत जाळु शकते.न पाण्यात भिजवू शकते.कारण आत्मा हा अमर अणि अविनाशी आहे.
 • जर एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपणास खुप वाट पाहावी लागत असेल तर समजुन जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे.

कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

See also  जागतिक वारसा दिना निमित्त काही कोट्स । World Heritage Day Quotes In Marathi

1 thought on “श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार – Lord Krishna Inspirational Thought In Marathi”

Comments are closed.