कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth

कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth

द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते.तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण केले अणि ती ब्रम्हा अणि विष्णु या दोघांकडे जाते.

अणि ब्रम्हा विष्णुला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार विषयी सांगु लागते.

तेव्हा ब्रम्हा हे विष्णुंना सांगतात हे प्रभु पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे.

तेव्हा विष्णु म्हणतात ठिक आहे ब्रम्हदेव पृथ्वीचा उदधार करण्यासाठी अणि राक्षसांपासुन तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल.

भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते.त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते.कंस हा जनतेवर लोकांवर खुप अन्याय अत्याचार करायचा.

त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुदधा बंदी बनवुन कारागृहात डांबुन ठेवतो.

कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एकेदिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात.अणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात.

अणि मग कंस मथूरेत राज्य करू लागतो.तेव्हाच कंसची लहान बहिण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालु असते.देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधु देवक यांची छोटी कन्या होती.

 

कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

तेव्हा कंस देवकीकडे जातो अणि म्हणतो लाडकी बहिण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे अणि तु कायमची इथुन निघुन जाशील.तुझ्याविना हा राजमहल खुप खाली खाली वाटेल.

तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधु मला सुदधा तुझी खुप आठवण येईल.

मग दुसरा दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होता.मग देवकी अणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खुप प्रेम आहे.म्हणुन देवकीला मी माझ्या रथावरून स्वता सोडायला येणार.

तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खुप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस.

मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी अणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो.देवकीच्या वडीलांनी तिला सोबत भरपुर धन धान्य दागिने दिलेले असतात.

See also  गोमुत्र पिण्याचे फायदे कोणते असतात? - Gomutra Benefits

कंस देवकी अणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढयात एक आकाशवाणी होते अणि ती कंसच्या कानावर पडते.

हे कंस ज्या देवकीला तु एवढया प्रेम अणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे.तिच तुझ्या मृत्युचे कारण बनणार आहे.कारण देवकीच्या गर्भातुन जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे.

ही अशी आकाशवाणी ऐकुन कंस खुप विचलित होऊन जातो.मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातुन जन्मलेल्या पुत्रापासुन मृत्युचे कुठलेही भयच राहणार नाही.

कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते.अणि सांगते कंस माझ्या नवरयाला मारू नको.मी तुला वचन देते माझ्या गर्भातुन जे बाळ जन्माला येईल ते मी स्वता तुझ्या स्वाधीन करून टाकेन.
पण माझ्या पतीस मारू नको.

मग देवकीची गयावया बघुन अणि दिलेले आश्वासन बघुन कंस वासुदेव याला मारत नाही.पण देवकी अणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो.

यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहिण आहे तिच्यासोबत असे वागु नको तुला हवे तर मला बंदी बनव.पण कंस दोघांची काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो.

देवकी अणि वासुदेव हे दोघेही खुप दुखी असतात.व्यथित झालेली देवकी वासुदेवला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनुन राहावे लागत आहे.मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुख अणि संकटांचे कारण आहे.

यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणून नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तु मला पत्नी म्हणुन लाभली याकरीता मी मनापासुन अत्यंत प्रसन्न आहे.

एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथुन सुटका होईल अणि कंसच्या पापाचा घडा भरेल.

यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातुन जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण करायच.

कंस हा सतत वासुदेव अणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकावायचा.देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावुन घ्यायचा.अणि तिच्या डोळया देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता.दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकुण सात पुत्रांना तिच्या डोळया देखत मारून टाकले.

See also  जन समर्थ पोर्टलविषयी माहीती- Jan Samarth portal information in Marathi

वासुदेव अणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसच्या अत्याचारातुन बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासुन रक्षण कर.

मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते.म्हणुन कंस कारागृहात देवकी अणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगुन कडक लक्ष ठेवू लागतो.

देवकी अणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील कानी पडते.

मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते.अणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते.राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसच्या तावडीतुन कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात.

योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते.हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णने रचलेली माया असते.

मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो.श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी अणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो.

अणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान विष्णु अवतरतात.अणि वासुदेवला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातुन जन्म घेतला आहे.

दृष्ट अणि पापी कंसचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे.म्हणुन कुठलाही विलंब न करता तु मला नंद कडे गोकुळात पोहचव.अणि नंद कडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसच्या स्वाधीन करून दे.

असे म्हणताच विष्णु अंतर्धान पावतात.मग अचानक वासुदेवच्या हातातील बेडया आपोआप सुटतात.कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात.अणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात.

अणि देवकी बेशुदध अवस्थेत पडलेली असते.मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात.अणि डोक्यावर टोपली ठेवून भरपावसात वादळ चालु असताना निघतात.

यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणुन यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणुन वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबद खुप चिंतीत असतात.

पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते.कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळयांनी बघत असतात.

मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहचतात.अणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे.हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातुन मुक्त करेल.

See also  पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check

यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो.अणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो.

मग वासुदेव नंद राजाकडुन यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो.

वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात.वासुदेवच्या हातात पुन्हा बेडया येऊन लागतात.सर्व पहारेकरींना देखील जाग येऊन लागते.

मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात.वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातुन जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसुन मुलगी आहे.

हे ऐकुन पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे.तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले अणि त्यांनी जन्म घेतला नाही.विधीचे विधान बदलले आहे.

पण मी कुठलाही धोका पत्कारणार नाही देवकीच्या गर्भातुन जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन.

मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठल्या पुत्रापासुन धोका आहे.ही तर मुलगी आहे.मग हीला का मारतो आहेस हिला मारू नको.

पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडुन हिसकावतो अणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढयात ती कन्या कंसच्या हातातुन सुटुन हवेत जाते अणि अचानक देवीचे रूप धारण करते.

देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे?तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे.अणि तो गोकुळात राजा नंद अणि यशोदेकडे पोहचला आहे.

एवढे बोलून देवी अंतर्धान पावते.हे ऐकून कंस खुप चिडतो.मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो.पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो.

अणि मग मोठा झाल्यानंतर मथूरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथूरेतील जनता यांची कंसच्या तावडीतुन कायमची सुटका करतो.

 

श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार – Lord Krishna Inspirational Thought In Marathi

1 thought on “कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth”

Comments are closed.