कृष्ण जन्माष्टमी का अणि कशी साजरी केली जाते?तिचे महत्व काय आहे? – Why do we celebrate Krishna Janmashtami ?

कृष्ण जन्माष्टमी का अणि कशी साजरी केली जाते?तिचे महत्व काय आहे? – : Krishna Janmashtami Date, history, significance and importance

मित्रांनो श्रीकृष्ण जयंतीला आपण गोकुळाष्ठमी तसेच जन्माष्ठमी कृष्ण असे देखील संबोधित असतो.

कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?

श्रावण महिन्यातील वद्य अष्ठमीच्या दिनी मध्यरात्रीच्या वेळेस जन्माष्ठमीलाच देवकीच्या गर्भातुन श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

द्वापर युगात पृथ्वीवर जेव्हा राक्षसांचे अन्याय अत्याचार हे वाढतच होते.तेव्हा पृथ्वी माता गाईचे रूप धारण करते अणि ती ब्रम्हा अणि विष्णु या दोघांकडे भेटीस जाते.

अणि पृथ्वी माता ब्रम्हा अणि विष्णु या दोघांना पृथ्वीवर राक्षसांकडून मानव जातीवर होत असलेल्या सर्व अन्याय अत्याचारा बददल सांगते.

तेव्हा ब्रम्हदेव हे विष्णुंना म्हणतात हे प्रभु पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करायची वेळ आता आली आहे.

तेव्हा विष्णु म्हणतात ठिक आहे ब्रम्हदेव पृथ्वीचा उदधार करण्यासाठी अणि राक्षसांपासुन तिचे रक्षण करायला पापींचा अत्याचारींचा संहार करण्यासाठी मी मानव रूपात नक्की जन्म घेईल.

हिंदु मान्यते अनुसार देखील भगवान विष्णुच्या दहा अवताराविषयी सांगितले गेले आहे.जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीवर पाप वाढेल अन्याय अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतील.

श्रीकृष्ण देखील भगवान विष्णु यांच्या दहा अवतारांपैकी एक आहे.

भगवान विष्णुंच्या ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम,पापी अत्याचारी राक्षसाचा अंत करणे ह्या उददिष्ठासाठी झाली होती.

म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे,अत्याचारी दुराचारी नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसापासुन मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एका बालकाच्या रूपात जन्म घेतला होता.

See also  सावित्रीबाई फुले पुण्यतिथी २०२३ : भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेबद्दल १० तथ्ये

गोकुळाष्ठमी कशी साजरी केली जाते?

गोकुळाष्ठमीच्या दिवशी अनेक कृष्ण भक्त व्रत उपवास देखील ठेवत असतात.

  • गोकुळाष्मीच्या दिवशी एकमुक्त राहुन पांढरया रंगाच्या तीळाचा कल्क अंगाला लावला जातो.अणि अंघोळ केली जाते.
  • व्रताचा संकल्प केला जात असतो.व्रताचा संकल्प करून झाला की संपुर्ण देवघर लता पल्लवांनी सुशोभित केले जात असते.
  • त्याच जागेवर देवकीचे सुतिकागृह देखील स्थापण करण्यात येत असते.मग मंचकाच्या वर देवकी अणि कृष्ण यांच्या मुर्तीची भक्तीभावाने स्थापना केली जात असते.
  • कृष्ण अणि देवकी या दोघांच्या मुर्तीच्या बाजुस श्रीकृष्णाचे पालन पोषण करणारी माता यशोदा,वासुदेव नंद,यशोदेच्या पोटी जन्म घेणारी कन्या यांची मुर्ती बसविण्यात येत असते.
  • सप्तमीच्या मध्यरात्रीस शुर्चिभुत होऊन व्रताचा संकल्प केला जात असतो.अणि संपुर्ण कुटुंबासमवेत श्रीकृष्णाच्या मुर्तीची पुजा केली जाते.कृष्णाची मुर्ती पाळण्यात ठेवून पाळणा हलविला जात असतो
    श्रीकृष्णास दुधाचा अभिषेक केला जात असतो.

ह्या दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो अणि रात्रभर जागरण केले जाते.श्रीकृष्णाच्या कथा वाचल्या जातात.कृष्ण लीलांचे श्रवण केले जाते.भजन कीर्तन नृत्य गीत इत्यादी अनेक कार्यक्रम चालत असतात.

अष्ठमीला घरोघरी उपवास करण्यात येतो.देवाला फराळाचे अन्नपदार्थ नैवेद्य म्हणुन दाखवले जात असतात.विशेषकरून लोणी साखर इत्यादी.कारण हे कृष्णाचे आवडते अन्नपदार्थ होते.

अणि गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीचा प्रसाद खाऊन उपवास सोडण्यात येत असतो.

नवमीच्या दिनी पंचोपचार केला जात असतो.उत्तरपुजा केली जाते मग शेवटी महानैवेद्य सपर्पित केला जात असतो.

पुजा करून झाली की पुरूषसुक्त,विष्णुसुक्त इत्यादी स्त्रोतांनी स्तवन करून घ्यावे.

कृष्ण जन्माष्टमीचे महत्व काय आहे?

कृष्ण जन्माष्टमी हा पापावर पुण्याचा,वाईटावर चांगल्याचा विजयाचा,दृष्टांच्या संहाराचा दिवस मानलो जातो.

श्री भगवान विष्णुने कृष्णाच्या रूपात सृष्टीच्या कल्याणासाठी,मानवतेचे अणि धर्माचे रक्षण करण्यासाठी,पापींचा संहार करण्यासाठी पृथ्वीला पापींपासुन मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन एका बालकाचा अवतार धारण केला होता.

कृष्ण जन्माष्टमी २०२२ मध्ये कधी आहे?

२०२२ मध्ये कृष्ण जन्माष्टमी १८ आँगस्ट रोजी आहे अणि १९ आँगस्टला गोपाळकाला आहे.

See also  जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? - World intellectual property day info Marathi

 

कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

 

कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth

श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार – Lord Krishna Inspirational Thought In Marathi