जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – World intellectual property day info Marathi

जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World intellectual property day info Marathi

जागतिक बौदधिक संपदा दिवस हा दरवर्षी २६ एप्रिल ह्या तारखेला जागतिक पातळीवर संपूर्ण जगभरात साजरा केला जात असतो.

World intellectual property day info Marathi
World intellectual property day info Marathi

मानवी बुद्धिमत्तेच्या,बुद्धीच्या माध्यमातून ज्या संपत्तीचे निर्माण करण्यात आले आहे.अशा संपत्तीचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टाने समाजात जनजागृती करण्यासाठी हा बौद्धिक संपदा दिवस साजरा केला जात असतो.

मानवी बुद्धिमत्तेच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आलेल्या संपतीचे रक्षण करण्यासाठी जागतिक पातळीवर एक जागतिक बौदधिक संपदा हक्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती.

जागतिक बौदधिक संपदा हक्क संघटनेचे सदस्य म्हणून १९० देशांचा समावेश आहे.यात आपल्या भारत देशाने देखील ह्या जागतिक बौदधिक संपदा हक्क संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

यानंतर २००० सालानंतर दरवर्षी २६ एप्रिल रोजी हा जागतिक बौदधिक संपदा दिवस साजरा केला जाऊ लागला.

जागतिक बौद्धिक संपदा दिवस, थीम, इतिहास, महत्त्व

बौदधिक संपदेचे रक्षण कशापदधतीने केले जाते?

जी आय टॅग,ट्रेडमार्क,पेटंट,काॅपीराईट,कंपनीचा लोगो डिझाईन, ट्रेड सिक्रेट इत्यादी माध्यमांतून आज निर्मात्यांच्या बौदधिक संपदेचे रक्षण करण्यात येत असते.

असे करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बौदधिक संपदा निर्माण करणारया व्यक्तीच्या बौदधिक संपदेला जागतिक पातळीवर मान्यता तसेच प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी,बौद्धिक संपत्ती निर्मात्याच्या कष्टाला,मेहनतीला कौशल्याला कर्तृत्वाला त्याचे योग्य फळ प्राप्त करून देण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर दरवर्षी साजरा केला जातो.

बौदधिक संपदा म्हणजे काय?

जसा आपला आपल्या घर गाडी बंगला इस्टेट इत्यादी वैयक्तिक मालमत्तेवर संपत्तीवर अधिकार असतो तसाच आपला आपल्या बुदधीमत्तेतुन निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तुवर निर्मितीवर देखील अधिकार असतो.

जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडुन संस्थेकडुन कंपनीकडुन एखाद्या बौदधिक संपदेची निर्मिती केली जाते नवीन कल्पणेची निर्मिती केली जाते नवीन संशोधन केले जाते.त्याला बौदधिक संपदा असे म्हटले जाते.

त्या बौद्धिक संपदेचा मालकी हक्क त्या संस्था कंपनीला प्राप्त करून देण्यासाठी पेटंट,काॅपीराईट,जी आय टॅग,ट्रेड मार्क इंडस्ट्रीयल डिझाईन इत्यादींचा वापर केला जातो.ज्याने ही त्या विशिष्ट कंपनीने संस्थेने निर्माण केलेली बौदधिक मालमत्ता आहे जिच्यावर त्या विशिष्ट कंपनीचाच अधिकार असेल हे सिदध होत असते.

कोणता बौद्धिक संपदा प्रकार कशाशी संबंधित असतो?

बौदधिक संपदा ही एक अदृश्य स्वरुपातील संपत्ती असते.

पेटंट,ट्रेडमार्क इंडस्ट्रियल डिझाईन हे बौदधिक संपदेचे प्रकार औद्योगिक उत्पादन याच्याशी संबंधित आहेत.याचसोबत काॅपीराईट हा बौदधिक संपदा प्रकार लेखन साहित्य कला संगीत यांच्याशी संबंधित असतो.

जी आय टॅगचा वापर हा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वस्तुंसाठी करण्यात येत असतो.

बौदधिक संपदा हक्काचे फायदे –

बौदधिक संपदा हक्कामुळे व्यावसायिक पातळीवर कुठलीही दुसरी कंपनी संस्था आपल्या कंपनीद्वारे निर्माण होत असलेल्या प्रोडक्टची उत्पादनाची निर्मिती करू शकत नाही आपल्या कंपनीचा लोगो डिझाईन वापरू शकत नाही.

कोणीही आपल्या बौदधिक संपदेचा वापर करू शकत नाही त्यावर आपले स्वामित्व मिळवू शकत नसते.

बौदधिक संपदा अधिकार प्राप्त झाल्याने व्यवसाय उद्योगात वृदधी होण्यास मदत होते.

आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट वस्तुंचा मार्केटमध्ये एक ब्रँड तयार होतो ज्याने इतर कंपनींपेक्षा आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट वस्तुंचे वेगळेपण दर्जा काॅलिटी कसा वेगळा आहे हे सिदध होण्यास मदत होते.