दिवाळी दिवाली दीपावली – दीपोत्सवाची तयारी सण 2021 – Diwali Marathi 2021

Diwali Marathi 2021

दिवाळी म्हणजे आनंद,सुख,समाधान,यश,

प्रकाश,ओढ,लगभग,उत्साह, हुरहूर आणि आठवणी,,,

दिवाळी हा भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक सण.दिवाळीमध्ये कुटुंबातील सर्वजण आनंदी आणि उत्साही असतात.आपण दिवाळी ची तयारी पंधरा दिवस आधीपासूनच चालू झालेली असते.

घरातील कमावत्या मंडळींना दिवाळीत पगार बोनस मिळतो. घरातील स्त्री मंडळी दिवाळीचा फराळ बनवण्यात व्यस्त असतात.घरातील लहान मंडळी नवीन कपडे घेण्याच्या तयारीत असतात.

दिवाळीत लहान मुलांना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे फटाके. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायचे ,आईकडून अंघोळ करून घ्यायची आणि तोटे वाजवायला जायचे.

मुख्यतः दिवाळी हा सण चार दिवसांचा असतो.

 • अश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी),
 • अश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी),
 • अमावास्या(लक्ष्मीपूजन) व
 • कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) हे चार दिवस दिवाळी चे असतात.
 • भाऊबीज हा सण दिवाळी मध्ये येत नाही;परंतु भाऊबीज हा सण दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी लगेच असतो,म्हणून भाऊबीज सणाला दिवाळी सणामध्ये समजले जाते.

दिवाळी आठवणी , चालीरीती –Diwali Marathi 2021

 • पहिल्या अंघोळ दिवशी लहान मुलांचा दिनक्रम – शक्यतो लहान मुलांना दिवाळीच्या आदल्या दिवशी झोपच लागत नाही.ते आपल्या बाबांना घेऊन दिवाळीच्या चार-पाच दिवस अगोदर फटाके आणायला जातात.
 • ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून ,आईकडून उठणे लावून घेऊन अंघोळ करतात.नंतर अगरबत्ती पेटवतात आणि फटाके वाजवायला जातात;फटाके वाजवून ते दिवस उजाडल्यावर घरी येतात.घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा फराळ करतात.दिवाळीमध्ये लहान मुलांना मातीचा किल्ला बनवायला आवडतो.
 • दिवाळीच्या दहा दिवस अगोदर ते कुठूनतरी तांबडी माती आणतात आणि दगडांची योग्यरीत्या रचना करून त्या रचेनवर ती ओली तांबडी माती लावतात.काही मुलांना किल्ला बनवायला जमत नसेल,तर तो आपल्या शेजारील ज्याला चांगला किल्ला बनवायला येतो त्याला किल्ला बनवायला सांगतो.किल्ला बनवून झाल्यावर लहान मुले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे मावळे यांच्या छोट्याश्या मूर्त्या ठेवतात.
 • काही गावांमध्ये तर चांगला किल्ला बनवण्याच्या स्पर्धा असतात.या स्पर्धांमध्ये गावातील काही चार-पाच मंडळी प्रत्येक किल्ला असणाऱ्या ठिकाणी जातात आणि गावातील सर्व किल्ल्याना मार्क्स देतात.ज्याचा किल्ला त्या प्रशिक्षकांना चांगला वाटेल,त्या किल्याला म्हणजे त्या किल्ला बनवणाऱ्याला ते गिफ्ट देतात.

दिवाळी सणावेळी घरातील बायकांचा दिनक्रम – Diwali Marathi 2021

 • घरातील स्त्री मंडळी दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर दिवाळीचा बाजार भरतात आणि दिवाळीचा फराळ बनवायला सुरवात करतात.प्रत्येक घरातील बायका एकमेकींना फराळ बनवण्यामध्ये मदत करतात.म्हणजे
 • आपल्या घरातील आई दुसऱ्याच्या घरामध्ये कानावले किंवा अन्य दिवाळी पदार्थ बनवायला जाते अन आपल्या घरात दुसऱ्या बायकांना कानावले किंवा अन्य दिवाळी पदार्थ बनवायला आणते.ह्याने कोणावरही इतका ताण येत नाही आणि दिवाळीचा फराळही लवकर बनवून होतो.
 • दिवाळी सणावेळी घरातील पुरुष मंडळींचा दिनक्रम – घरातील वडिलांचा जर व्यवसाय असेल तर ते दिवाळीच्या काळात आपल्या व्यवसायासाठी नवनवीन स्कीम शोधण्यात व्यस्त असतात.घरातील पुरुष मंडळी जर दुसऱ्याकडे काम करत असेल तर भेटलेल्या पगार बोनस चे ते आपल्या मुलांना कपडे,फटाके,बायकोला साडी आणि दिवाळी फराळासाठी बाजार भरतात.

दिवाळी सणामागील शास्त्र – Diwali Marathi 2021

नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता;तेव्हापासून नरकासुराच्या वधाच्या आनंदात नरक चतुर्दशी साजरी केली जाते.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मीला म्हणजे पैश्याला, दागिन्यांना पूजले जाते.हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त पवित्र मानला जातो.

 • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक घरात नवीन वस्तू घेतात,जसे की कार, दागिने,इत्यादी.बलिप्रतिपदा दिवशी बळी राजाचा वध झाला होता.
 • भाऊबीज दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून आपल्या असंख्य बहिणींना वाचवले होते. या दिवसाची आठवण म्हणून बहीण भावाला ओवाळते.भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या बंधाचा दिवस आहे.
 • या सर्व दिवसामध्ये धर्माने अधर्मावर विजय मिळवला होता. धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या आठवणीत दिवाळी सण साजरा केला जातो.
 • दिवाळी च्या सणामध्ये आपण घराबाहेर पणती लावतो.दिवाळी सणच प्रकाशाचा.लावलेल्या पणती मुळे किंवा आकाश दिव्यांमुळे घराला शोभा येते.म्हणून दिवाळी सणाला ला आपण दीपावली असेही म्हणतो.
 • दिवाळीत लावलेले दिवे आपल्याला सांगतात,जीवनात अंधारकडून प्रकाशाकडे गेले पाहिजे, अधर्माकडून धर्माकडे गेले पाहिजे.
 • आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास आणि ज्ञानाचा प्रकाश उजळत असावा,म्हणून सर्वांनी दिवाळीच्या दिवशी आपल्या घराबाहेर पणत्या आणि आकाश कंदील लावावेत.याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते.

आकाश कंदील –

दिवाळीच्या दिवसामध्ये आपण घरासमोर आकाश कंदील लावतो.त्यालाच आपण आकाश दिवा असेही म्हणतो.आता बाजारात मोठे आकाश कंदील आणि छोटे आकाश कंदील दोन्ही उपलब्ध असतात.काहीजण स्वतः आकाश कंदील तयार करून घरासमोर लावतात.विकत आणलेल्या किंवा घरी बनवलेल्या आकाश कंदील मध्ये आपण बल लावतो;ज्याने त्या बलाचा प्रकाश घरासमोरील अंगणामध्ये पसरतो.दिवाळी मध्ये वातावरणही मस्त असते.बाहेर थंडी पडलेली असते,थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जातो,त्यात फटाक्यांच्या आवाज ,त्यात सर्व घरामध्ये लावलेले दिवे आणि आकाश कंदील.दिवाळीचे वातावरण अगदी प्रकाशमय झालेले असते.

दिवाळी मुहूर्त – 4 नोव्हेंबर 2021 – Diwali Marathi 2021

लक्ष्मी पुजा मुहूर्त :18:56:54 ते 20:16:07

कालावधी :1 तास 19 मिनिटे

प्रदोष काळ :17:43:11 ते 20:16:07

वृषभ काळ :18:56:54 ते 20:53:21

दिवाळी महानिशिता काळ मुहूर्त

लक्ष्मी पुजा मुहूर्त :23:40:02 ते 23:52:15

कालावधी :0 तास 12 मिनिटे

महानिशिता काळ :23:40:02 ते 24:31:00

सिंह काळ :25:29:21 ते 27:46:56

दिवाळी शुभ चौघडी मुहूर्त

सकाळ मुहूर्त (चल, लाभ, अमृत):09:16:12 ते 13:29:41

दुपार मुहूर्त (शुभ):14:54:11 ते 16:18:41

सायंकाळ मुहूर्त (लाभ):19:18:46 ते 20:54:21

रात्र मुहूर्त (शुभ):22:29:56 ते 23:52:15

2021 वर्षांमध्ये दिवाळी सण कधी आहे ?

 • ह्या वर्षी दिवाळी सण हा 4 नोव्हेंबर पासून चालू होतं आहे.दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे आणि हा सण भारताबरोबर ,नेपाळ आणि जगातील खूप देशामध्ये साजरा केला जातो.
 • पहिल्या अंघोळ पासून ते भाऊ बीज पर्यन्त 5 दिवस दिवाळी सण असतो.
 • हिंदू धर्मा व्यतिरिक्त शीख,बोध्द ,जैन धर्मातील माणसे दिवाळी सण साजरा करतात.जैन धर्मातील लोक दिवाळी सण हा “महावीरांचा मोक्ष दिवस” म्हणून साजरा करतात, तर शीख धर्मातील माणसे दिवाळी सणाला ‛बंधी छोड दिवस’ म्हणून साजरा करतात.दिवाळी सण संपूर्ण भारतामध्ये विविध धर्माची लोक अगदी उत्साहात साजरा करतात.

दिवाळी सण केव्हा साजरा केला जातो ?

 • हिंदू धर्मतील पंचांगाच्या मानाने ,कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळ असेल तर त्या अमावस्येच्या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो.अमावस्येच्या दोन्ही दिवसामध्ये प्रदेश काळाचा स्पर्श झाला नाही तर दिवाळी हा सण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
 • काही लोकांचे असे मत आहे की,दोन्ही अमावस्येच्या दिवशीही प्रदोष काळ स्पर्श करत नसेल तर दिवाळी सण अमावस्येच्या पहिल्या दिवशी साजरी करायला हवा.

लक्ष्मी पूजन हे प्रदोष काळामध्ये केले पाहिजे.हिंदू धर्मामध्ये प्रदोष काळानुसार लग्नाची वेळ ठरवली जाते. प्रदोष काळामध्ये वृषभ,सिह,वृश्चिक आणि कुंभ राशी ह्या स्थिर असतात.म्हणून प्रदोष काळामध्ये लग्न केले तर लक्ष्मी घरामध्ये वास करते.

दिवाळी सणामधील लक्ष्मीपूजनची विधी

दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपूजन महत्वाचे समजले जाते.हा दिवस नवीन वस्तू घेण्यासाठी शुभ समजला जातो.या दिवशी संध्याकाळी घरातील देवाची,तसेच दाग-दागिने ,पैसे यांची पूजा केली जाते.

पुराणांच्या नुसार कार्तिक अमावस्येच्या रात्री लक्ष्मी आपल्या घरी येते.या वेळी जे घर स्वच्छ आणि प्रकाशमय असेल,त्या घरात लक्ष्मी वास करते.म्हणून दिवाळीच्या काळात घराची साफ सफाई करून लक्ष्मीची मनोभावे पूजा केली पाहिजे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीबरोबर कुबेर देवाचीही पूजा केला जाते.

लक्ष्मी पूजनावेळी खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

 • लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराची योग्यरीत्या साफ-सफाई केली पाहिजे.आपले घर प्रकाशमय दिसावे यासाठी ते स्वच्छ केले पाहिजे.नंतर घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढली पाहिजे आणि घराच्या दारावर पणत्या लावल्या पाहिजेत.जेणेकरुन आपले घरासमोरील अंगण प्रकाशमय होईल.
 • ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पूजा करणार आहे त्या ठिकाणी चौरंग ठेवा.शक्यतो आपण देवाऱ्यासमोरच लक्ष्मीपूजन करतो.त्या चोरंगावर स्वच्छ कापड ठेवून त्यावर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवा.लक्ष्मीपूजन करताना जवळ तांब्याचा कलश असला पाहिजे. याबरोबरच सरवस्ती,कुबेर,विष्णू यांची विधिपूर्वक आराधना करा.
 • लक्ष्मीच्या आणि गणपतीच्या मूर्तीवर हळद कुंकू व्हा.
 • लक्ष्मीपूजनाची पूजा कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन केली पाहिजे आणि देवीकडे आपल्या मनातील इच्छा सांगितली पाहिजे.
 • देवीची पूजा झाल्यानंतर घरातील लक्ष्मी म्हणजे पैसे,डाग-दागिने यांची पूजा करा.
 • लक्ष्मीपूजनानंतर गरजू लोकांना मदत करा.कारण जेवढी तुम्ही गरजू लोकांची मदत कराल, तेवढे देव तुम्हाला जास्तच देईल.

दिवाळी सणावेळी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत– Diwali Marathi 2021

 • दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठले पाहिजे आणि उठल्यानंतर  उठण्याने मालिश करून मोती साबणाने अंघोळ केली पाहिजे.अंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम देव्हाऱ्यातील देवाच्या पाया पडून,नंतर घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतले पाहिजे.
 • दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना आठवून त्यांची पूजा केली पाहिजे.
 • दिवाळीच्या दिवशी घरामध्ये देवाची गाणी,भजने  लावली पाहिजेत.जेणेकरून आपले घर प्रकाशमय होईल.ती लावलेली देवाची गाणी किंवा भजने एकत्र कुटुंबासोबत ऐकली पाहिजेत.
 • दिवाळी सणासंदर्भात असणाऱ्या पौराणिक कथा –

तुम्ही जर प्रत्येक सणांचा विचार केला तर,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणासंबंधीत वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत.दिवाळी सनासंबंधी ही काही पौराणिक कथा आहेत,त्या पौराणिक कथा आपण पाहुयात :

 • तुम्ही रामायण नक्की पाहिले किंवा वाचले असेल.श्री रामांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि श्री राम दिवाळीच्या दिवशी अयोध्येत आले होते.श्री राम वनवसातून अयोध्येत आल्यामुळे तेथे अयोध्येत सणांचे वातावरण होते.अयोध्येतील लोकांनी घराबाहेर दिवे लावून श्री रामाचे उत्साहात स्वागत केले होते.या दिवसापासूनच दिवाळी साजरी केली जाते.
 • महाभारतामध्ये नरकासुर राक्षस माणसांवर खूप जुलूम करायचा.नरकासुर राक्षसाने 16 हजार स्त्रियांना बंदी बनवले होते.प्रतिपदेदीवशी श्री कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून बंदी केलेल्या 16 हजार स्त्रियांना सोडवले होते.वधाच्या दुसऱ्या दिवशी नरकसुराच्या वधाच्या खुशीत तेथील लोकांनी घराबाहेर दिवे लावले होते.
 • भगवान विष्णू यांनी बळीला मारून पातळ लोकांना तेथील राजा बनवले होते.इंद्र देवांनी या खुशीत दिवाळी साजरी केली होती.दिवाळीच्या दिवशी देवीने भगवान विष्णूंना पतीच्या रुपात स्वीकारले होते.

दिवाळी सणाचे ज्योतिषीय महत्व

हिंदू धर्मामध्ये दिवाळी सण हा कोणत्याही गोष्टीची सुरवात करण्यासाठी आणि कोणतीही नवीन वस्तू घेण्यासाठी पवित्र मुहूर्त मानला जातो.दिवाळी दरम्यान चंद्रदेव आणि सूर्य देव तूळ राशीमध्ये असतात.तूळ ही एक संतुलित भाव असणारी राशी आहे. सूर्य आणि चंद्र तूळ राशीमध्ये स्थिर असल्यामुळे दिवाळी सणाला शुभ संकेत किंवा शुभ मुहूर्त समजला जातो.

आपण दिवाळीच्या पाच दिवसाबद्दल थोडक्यात माहिती पाहुयात :

 1. धनत्रयोदशी –

दिवाळी सणाची सुरवात धनत्रयोदशी या दिवसापासून होते.हा दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो.

 1. नरकचतुर्दशी –

या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता आणि 16 हजार स्त्रियांना नरकासुर राक्षसाच्या तावडीतून सोडवले होते.हा दिवाळी सणांचा दुसरा दिवस असतो

 1. लक्ष्मीपूजन –

या दिवशी लक्ष्मी,गणपती आणि कुबेराची पूजा केली जाते.याबरोबरच लक्ष्मीपूजणदिवशी घरातील पैसे आणि डाग-दागिने यांची देखील पूजा केली जाते.नवीन वस्तू किंवा नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी लक्ष्मीपूजन हा दिवस शुभ मानला जातो.

 1. पाडवा –

पाडवा दिवशी पत्नी पतीला ओवाळते.भारतामध्ये या दिवशी काही ठिकाणी बैलांची पूजा केली जाते.

 1. भाऊबीज –

दिवाळी सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज.हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा दिवस आहे,बहीण भावाच्या बंधनाचा दिवस आहे. नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाने 16 हजार स्त्रियांना सोडवले आणि भावाचे कर्तव्य पार पाडले .तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची प्रथा चालू झाली.

दिवाळी सणासंदर्भात असणाऱ्या पौराणिक कथा –- Diwali Marathi 2021

तुम्ही जर प्रत्येक सणांचा विचार केला तर,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणासंबंधीत वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत.दिवाळी सनासंबंधी ही काही पौराणिक कथा आहेत,त्या पौराणिक कथा आपण पाहुयात –

 • तुम्ही रामायण नक्की पाहिले किंवा वाचले असेल.श्री रामांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि श्री राम दिवाळीच्या दिवशी अयोध्येत आले होते.श्री राम वनवसातून अयोध्येत आल्यामुळे तेथे अयोध्येत सणांचे वातावरण होते.अयोध्येतील लोकांनी घराबाहेर दिवे लावून श्री रामाचे उत्साहात स्वागत केले होते.या दिवसापासूनच दिवाळी साजरी केली जाते.
 • महाभारतामध्ये नरकासुर राक्षस माणसांवर खूप जुलूम करायचा.नरकासुर राक्षसाने 16 हजार स्त्रियांना बंदी बनवले होते.प्रतिपदेदीवशी श्री कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून बंदी केलेल्या 16 हजार स्त्रियांना सोडवले होते.वधाच्या दुसऱ्या दिवशी नरकसुराच्या वधाच्या खुशीत तेथील लोकांनी घराबाहेर दिवे लावले होते.
 • भगवान विष्णू यांनी बळीला मारून पातळ लोकांना तेथील राजा बनवले होते.इंद्र देवांनी या खुशीत दिवाळी साजरी केली होती.
 • दिवाळीच्या दिवशी देवीने भगवान विष्णूंना पतीच्या रुपात स्वीकारले होते.

आपण सर्वांना येणारी दिवाळी सुख समाधान आणि उत्तम आरोग्य आणो !!

14 विद्या आणि कला

2 thoughts on “दिवाळी दिवाली दीपावली – दीपोत्सवाची तयारी सण 2021 – Diwali Marathi 2021”

 1. खूप छान माहिती आहे.आभारी आहे.अशीच माहित देत राहा.

  Reply

Leave a Comment