इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?- Best Time To Post On Instagram In Marathi

इंस्टाग्रामवर पोस्ट करता सर्वोत्तम वेळ कोणती?- Best Time To Post On Instagram In Marathi

आज आपल्यातील खुप जणांचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे.

काही जण मित्र मैत्रीणींसोबत चँटिंग करण्यासाठी आपले फोटो अपलोड करून भरपुर लाईक आणि कमेंट प्राप्त करण्यासाठी फक्त आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचा वापर करताना आपणास दिसुन येतात.

तर काही जण इंस्टाग्रामवरूनच आज पेड प्रमोशन करून,अँफिलिएट मार्केटिंग,विविध प्रोडक्ल सेल करून पैसे देखील आज कमवित आहेत.

पण मित्रांनो आज इंस्टाग्रामवरून पैसे कमविणे देखील सोपे राहिले नाहीये कारण इंस्टाग्रामवरून पेड प्रमोशन करून,अँफिलिएट मार्केटिंग,विविध प्रोडक्ल सेलिंग करून पैसे कमविण्यासाठी सगळयात पहिले आपणास आवश्यकता असते भरपुर फाँलोअर्सची.

कारण आपल्यातील खुप जण असे असतात जे इंस्टाग्रामवर नवीनच आलेले असतात आणि ते डेली पोस्ट देखील टाकत असतात पण त्यांच्या फाँलोअर्स मध्ये काही वाढच होत नसते.

यामुळे खुप नवोदित कंटेट क्रिएटर्सची निराशा होत असते त्यांना असे देखील वाटत असते की आपण एवढी मेहनत घेऊनही आपले फाँलोअर्स वाढत नाहीये आपल्या मेहनतीचे फळ आपणास मिळत नाहीये.

आपण जर डेली सातत्याने कंटेट टाकुनही आपल्या इंस्टाग्रामवरील फाँलोवर्समध्ये वाढ होत नसेल तर मग अशावेळी आपण स्वताला प्रश्न विचारायला हवा की इतर काँपीटिटर्सचे फाँलोवर्स वाढता आहे.मग माझे का वाढत नाहीये?मी काय अशी चुकी करतो आहे ज्यामुळे सातत्याने कंटेट टाकुनही माझ्या फाँलोवर्समध्ये वाढ होत नाहीये.

See also  ईस्टर डे निमित्त WhatsApp Status, images, Facebook Messages | Happy Easter Day 2023 Wishes In Marathi

इंस्टाग्रामवरुन फाँलोवर्स वाढवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची मुख्य आवश्यकता असते.एक म्हणजे लोकांना एंगेज करून ठेवणारा कंटेट,आणि पोस्ट टाकण्यात सातत्य हवे.

पण वरील ह्या दोन्ही गोष्टी असुन देखील आपले इंस्टाग्रामवरचे फाँलोवर्स वाढत नसतील तर त्याला अजुन एक कारण कारणीभुत असु शकते ते म्हणजे आपली रोजची इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्याची वेळ.

हा एक खुप महत्वाचा फँक्टर आहे मित्रांनो कारण आपण कुठलीही पोस्ट ही व्हिझिटर्ससाठी टाकत असतो पण आपण पोस्ट टाकतो तेव्हा जर कोणी आपली पोस्ट वाचण्यासाठी इंस्टाग्राम ओपन करतच नसेल तर मग आपल्याला तरी त्याचा फायदा कसा होणार?

याचसाठी आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की आपण इंस्टाग्रामवर रोज अशी किती वाजता पोस्ट टाकावी.ज्याने आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त लोक व्हिझिट करतील आणि आपले इंस्टाग्रामवरचे फाँलोवर्स देखील वेगात वाढतील.

इंस्टाग्रामवर रोज पोस्ट टाकण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणकोणत्या आहेत?(Best Time To Post On Instagram In Marathi)

मराठीत एक म्हण आहे कुठलीही गोष्ट करण्याची एक योग्य वेळ असते.आणि ती त्या योग्य वेळेवर नाही केली तर त्याचा आपल्याला नंतर कोणताच फायदा होत नसतो.

हीच म्हण आपल्या दैनंदिन जीवनात देखील प्रत्येक बाबतीत लागु होते.

मग ते सकाळी उठणे असो रात्री वेळेवर झोपणे,व्यायाम करणे,आहार घेणे असो.किंवा आपल्या दैनंदिन जीवनातील कोणतेही कार्य करणे असो.किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणे असो.

इंस्टाग्रामवर पोस्ट कधी टाकावी?तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्याची वेळ का अधिक महत्वाची असते?

● जेव्हा आपली टारगेट आँडियन्स त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अधिक जास्त प्रमाणात अँक्टिव्ह असते.अशाच वेळी आपण इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायला हवी.
● कारण याने आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त व्युव्ह,लाईक,कमेंटस,शेअर येण्याचे आणि पोस्ट व्हायरल होण्याचे अधिक चान्सेस असतात.याने काय होते की इंस्टाग्राम आपल्या पोस्टला येत असलेला व्हिझिटर्सचा चांगला प्रतिसाद पाहुन स्वता दुसरया हँश टँगवर आपली तीच पोस्ट प्रमोट करत असते.
● कारण इंस्टाग्राम ह्यावर स्वता नेहमी लक्ष ठेवत असते की आपण पोस्ट टाकल्यानंतर आपल्या पोस्टवर सुरूवातीच्या अर्धा एक तासात किती लाईक,कमेंट,शेअर्स येता आहे.
● जर आपली पोस्ट चांगली असेल आणि आपल्या पोस्टला सुरूवातीच्या अर्ध्या ते एक तासामध्येच व्हिझिटर्सकडुन भरपुर लाईक कमेंट शेअर्स येत असतील तर आपली पोस्ट व्हायरल होण्याची अधिक शक्यता असते.
● आणि पोस्टमधील व्हिझिटर्सची एंगेजमेंट बघुन इंस्टाग्राम देखील आपल्या पोस्टला एक्सप्लोअर पेजमध्ये किंवा हँश टँग मध्ये पाठवत असते.

See also  पुस्तक परीक्षण - अवेकन द जायांट विदिन - Book Review of Awake The Giant Within in Marathi

आपले इंस्टाग्रामवरील टारगेट आँडियन्स कधी जास्त अँक्टिव्ह असतात हे आपल्याला कसे समजेल?

  • आपले इंस्टाग्रामवरील टारगेट आँडियन्स कधी जास्त अँक्टिव्ह असतात हे जाणुन घेताना आपण काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्वाचे आहे जसे की आपली टारगेट आँडियन्स कुठली आहे?कोणत्या देशातील आहे?आणि त्या देशात दिवस कधी असतो रात्र कधी असते?इत्यादी बाबी माहीत असणे फार गरजेचे आहे.
  • आणि समजा आपली टारगेट आँडियन्स आपल्याच भारत देशातीलच असेल तर मग आपल्याला ह्या फंदयात पडायची कुठलीही आवश्यकता नाही.आपले इंस्टाग्रामवरील टारगेट आँडियन्स कधी जास्त अँक्टिव्ह असतात हे आपल्याला कसे समजेल
  • फक्त आपली टारगेट आँडियन्स कोणत्या दिवशी अधिक अँक्टिव्ह असते?आणि रोज किती वाजता सर्वाधिक प्रमाणात इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त अँक्टिव्ह असते.याचे आपण इंस्टाग्राम इन्साईटस मध्ये जाऊन नीट निरीक्षण करायला हवे.(मोस्ट अँक्टिव्ह टाईम चेक करण्यासाठी आपले अकाऊंट हे क्रिएटर किंवा बिझनेस या दोघांपैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.)
  • यासाठी आपण इन्साईटस मध्ये जाऊन हे चेक करायला हवे की आपण इंस्टाग्रामवर पोस्ट टाकल्यावर कधी आणि किती वाजता आपल्या पोस्टवर अधिक लाईक,कमेंटस आणि शेअर मिळणे सुरू होत असते.
  • आणि मग इन्साईटस मध्ये चेक केल्यावर ज्या वेळेला आपल्याला आपल्या पोस्टवर अधिक लाईक,कमेंट,शेअर मिळताना दिसुन येत असेल आपण रोज त्याच वेळेवर आपली पोस्ट टाकायला हवी.
  • कारण याने आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त व्युव्ह,लाईक,कमेंटस,शेअर येण्याचे आणि पोस्ट व्हायरल होण्याचे,फाँलोअर्स वाढण्याचे,व्हिझिटर्सची आपल्या पोस्टमधील एंगेजमेंट वाढण्याचे चान्सेस असतात.

भारतातील जास्तीत जास्त इंस्टाग्राम फाँलोवर्स अंदाजे दिवसभरात कधी जास्त अँक्टिव्ह राहत असतात?

  • भारतातील इंस्टाग्राम फाँलोवर्स दिवसभरात संध्याकाळी 6.30 ते रात्री 10.ह्या कालावधीत अधिक जास्त अँक्टिव्ह राहत असतात.
  • कारण भारतातील बहुतेक जण ह्या वेळेला कामावरून,नोकरी,व्यवसाया-उद्योगधंद्यावरून दमुन थकुन घरी येत असतात.आणि घरी आल्यावर फ्रेश होऊन आधी विरंगुळा म्हणुन आपले इंस्टाग्राम अकाऊंट चेक करत असतात.
  • (हा अंदाजे टाईम थोडा मागे पुढे देखील होण्याची शक्यता आहे.)
See also  दिनविशेष 13 मे 2033- Dinvishesh 13 May 2023

इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करण्याची योग्य वेळ कोणती आहे?

  • इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करण्याची योग्य वेळ आहे सकाळी नऊ ते दहाचा कालावधी.
  • कारण आपण पोस्ट केलेल्या कोणत्याही स्टोरी वर दिवसभर व्हिझिटर्सचे लाईक कमेंटस आणि शेअर्स येत असतात.
  • म्हणून आपण इंस्टाग्रामवर स्टोरी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान पोस्ट करायला हवी.याने आपल्याला दिवसभर आपल्या पोस्टवर लाईक कमेंट आणि शेअर्स येत राहतील.