इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे – How To Earn Money From Instagram

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे – How To Earn Money From Instagram

 आज आपले प्रत्येकाचे फेसबुकवर,व्हाँटस आणि इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे.तिथे आपण आपल्या मित्रांसोबत आपले उत्तम फोटो व्हिडिओ शेअर करत असतो.जेणेकरून आपल्याला जास्तीत लाईक्स,कमेंट मिळतील आणि आपले फाँलोअर्स देखील वाढतील.

याने आपल्याला व्यक्त होण्याचा आनंद मिळत असतो पण ह्या व्यक्त होण्याच्या आनंदाबरोबरच आज करोडोच्या संख्येने लोक इंस्टाग्रामवरून भरपुर पैसे देखील कमवित आहेत.ही इंस्टाग्रामची एक जमेची बाजु आहे.

म्हणजेच इंस्टाग्राम हे फक्त मित्रांसोबत चँटिंग करणे आणि फोटो आणि व्हिडिओ पब्लिश करण्याचे माध्यम राहिलेले नसुन आज इंस्टाग्रामवरून लोक आपल्या बिझनेसचा डिजीटल मार्केटिंग करून प्रचार करीत आहे तसेच विविध मार्गांचा वापर करून आज इंस्टाग्रामवरून आँनलाईन पैसे देखील कमवत आहेत .म्हणुन आजच्या लेखात आपण इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

इंस्टाग्राम काय आहे?

 इंस्टाग्राम हे एक सोशल मिडिया प्लँटफाँर्म आहे.केविन सिट्रोम आणि माईक क्रेगर या दोघांनी मिळुन 2010 मध्ये केली होती.आणि मग नंतर इंस्टाग्रामची वाढती प्रसिदधी आणि लोकप्रियता बघून फेसबुकने इंस्टाग्रामला विकत घेतले होते.

इंस्टाग्रामचे फिचर्स कोणकोणते आहेत?

 आपण अपलोड केलेले फोटो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावे यासाठी आपण हँश टँगचा वापर यात करू शकतो.

  • तसेच आता इंस्टाग्रामवर एक नवीन फिचर सुरू करण्यात आले आहे ज्यात आपण शाँर्ट व्हिडिओ बनवू शकतो ज्याला आपण रील असे म्हणतो.

इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते?

 1)इंस्टाग्राम अकाऊंट :

2) इंस्टाग्राम गृप तसेच पेज :

3)भरपुर फाँलोवर्स :

4) आपले एक नीश सिलेक्ट करावे

5) डेली कंटेट पब्लिश करत राहणे :

6) फाँलोवर्सची एंगेजमेंट वाढविणे :

See also  पॅन कार्डचा फुलफाॅम काय होतो - Pan card Full form in Marathi

1) इंस्टाग्राम अकाऊंट :

इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्यासाठी आपल्याला स्वताचे एक इंस्टाग्राम अकाऊंट तयार करावा लागत असते.मग त्यावर आपले एक चांगले प्रोफेशनल प्रोफाईल तयार करावा लागते.

2) इंस्टाग्राम गृप तसेच पेज :

मग आपल्याला इंस्टाग्रामवर आपले एक पेज तसेच तयार करावा लागतो जेणेकरून तिथे आपल्याला डेली कंटेट टाकता येईल आणि ते रीडर्सला रोज वाचता येईल

3)भरपुर फाँलोवर्स :

आपण पब्लिश कंटेट वाचण्यासाठी आपल्याला आपले फाँलोवर्स वाढवावे लागतात.इंस्टाग्रामवर फाँलोवर्स कसे वाढवायचे हे जाणुन घेण्यासाठी आपण आमचा मागील लेख इंस्टाग्रामवर फाँलोवर्स कसे वाढवावे हा वाचु शकता.

4) आपले एक नीश सिलेक्ट करावे : ज्या नीशवर आपण कंटेट तयार करून तो इंस्टाग्रामच्या पेजवर गृपवर पब्लिश करणार आहे आहे तो नीश येथे आपल्याला सिलेक्ट करावा लागत असतो.

मग तो फँशनशी संबंधित असु शकतो किंवा ट्रँव्हल,टेक्निकल,फुड ज्यावर आपण डेली कंटेट पब्लिश करू शकतो असा कोणताही नीश आपण निवडु शकतो.

5) डेली कंटेट पब्लिश करत राहणे :

मग आपले कोणतेही एक नीश सिलेक्ट करून झाले की आपण त्यावर डेली आपल्या इंस्टाग्राम पेजवर तसेच गृपवर कंटेट पब्लिश करायला सुरूवात करावी.

रोज आपण कमीत कमी तीन कंटेट टाकत राहावे याने यूझर्स देखील आपल्या पोस्टवर नेहमी एंगेज राहत असतात.

6) फाँलोवर्सची एंगेजमेंट वाढविणे :फाँलोवर्सची आपल्या पोस्टवर एंगेजमेंट वाढण्यासाठी आपण नवनवीन ट्रेंडिंग टाँपिकवर कंटेट तयार करू शकतो.

आपण इंस्टाग्रामवरून पैसे कसे आणि कोणकोणत्या मार्गानी कमवू शकतो?

 आज इंस्टाग्रामवरून आपण अनेक मार्गानी पैसे कमवू शकतो.

इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्याचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत :

1) पेड प्रमोशन/स्पाँन्सरशिप

2) अँफिलिएट मार्केटिंग

3) प्रोडक्ट तसेच सर्विसची सेलिंग

4) इंस्टाग्राम पेज तयार करणे आणि विकणे

5) इंस्टाग्राम पेजची रिसेलिंग करणे

6) इंस्टाग्रामवरची ट्रँफिक आपल्या ब्लाँगवर डायव्हर्ट करणे

1)पेड प्रमोशन/स्पाँन्सरशीप :

See also  मराठीत 50 वाक्यप्रचार त्याच्या अर्थासहित- 50 Vakprachar in Marathi with meaning

पेड प्रमोशन हा पहिला मार्ग आहे इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्याचा ज्यात आपण इतर इंस्टाग्राम अकाऊंटचे आपल्या तसेच प्रोडक्ट सर्विसचे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्पाँन्सरशिप घेऊन प्रमोट करून पैसे कमवू शकतो.

फक्त यासाठी आपल्याकडे भरपुर ट्रँफिक असणे गरजेचे आहे कमीत कमी 50 हजार ते 1 लाख फाँलोवर्स आपले असावे लागतात याने आपली कमाई देखील चांगली होते.कारण आपले फाँलोवर्स जास्त असतील तर आपल्याला मोठमोठया आँफर देखील येत असतात.

2) अँफिलिएट मार्केटिंग :

अँफिलिएट मार्केटिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे.यात आपण ज्या नीशवर डेली आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या पेजवर कंटेट पब्लिश करतो आहे.

त्याच नीशवर आधारीत प्रोडक्टची अँफिलिएट लिंक आपल्या अकाऊंटवर शेअर करू शकतो.जेणेकरून कोणीही आपल्या लिंकवर जाऊन कोणतीही वस्तु खरेदी केली तर त्याचे अँफिलिएट प्रोग्रँममध्ये ठरल्या प्रमाणे कमिशन प्राप्त होत असते.

फक्त यासाठी आपल्याला एका चांगल्या अँफिलिएट प्रोग्ँमला जाँईन करावे लागते जेणेकरून आपल्याला चांगले कमिशन प्राप्त होईल.

3) प्रोडक्ट तसेच सर्विसची सेलिंग :

इंस्टाग्राम अकाऊंटवरून पैसे कमविण्याचा तिसरा मार्ग आहे.आपण आपल्या स्वताच्या प्रोडक्ट सर्विसचे प्रमोशन करून देखील इंस्टाग्रामवरून पैसे कमवू शकतो.

यासाठी आपल्या प्रोडक्टचे तसेच सर्विसचे आँनलाईन इंस्टाग्राम स्टोरी तसेच पोस्ट द्वारे प्रमोशन करावे लागते.

आणि आपल्या प्रोडक्ट सर्विसविषयी लोकांना सुचित करावे लागते.त्यांना आपली सर्विस घेण्यासाठी आकर्षुन घ्यावे लागत असते.

4) इंस्टाग्राम पेज तयार करणे आणि विकणे :

आज खुप जण असे आपणास दिसुन येतात जे इंस्टाग्रामवर अकाऊंटवर अकाऊंट तयार करून नवीनवीन पेज तयार करतात.त्यावर भरपुर फाँलोवर्स जमा करतात आणि मग नंतर तेच पेज एखाद्याला विकुन देत असतात.

आणि भरपुर लोक असे आधीपासुन ट्रँफिक असलेले पेज विकत घेत असतात.ज्यांना इनबिल्ड ट्रँफिक असलेले इंस्टाग्राम पेज हवे असते.कारण याने त्यांचा वर्षभर कंटेट टाकुन ट्रँफिक जमा करण्यात जो वेळ जात असतो तो वाचत असतो.

See also  व्ही आयटी म्हणजे काय?व्हि आयटीचा फुलफाॅम काय होतो? - VELLORE IT

म्हणुन हा सुदधा एक चांगला पर्याय आहे इंस्टाग्रामवर पेज तयार करून त्यावरून फाँलोवर्स गोळा करून नंतर ते एखाद्याला चांगल्या किंमतीत विकुन देणे.

5) इंस्टाग्राम पेजची रिसेलिंग करणे :

खुप जण आज एक आधीपासुन भरपुर ट्रँफिक असलेले इंस्टाग्राम अकाऊंट कमी जास्त करून परवडेल अशा किंमतीत विकत घेतात आणि मग नंतर तेच अकाऊंट एखाद्याला जास्त किंमतीत विकुन रिसेलिंग करून चांगला प्राँफिट मिळवत असतात.

हा सुदधा एक पर्याय आहे इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्याचा.

6) इंस्टाग्रामवरची ट्रँफिक आपल्या ब्लाँगवर डायव्हर्ट करणे :

काही जण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील ट्रँफिकचा वापर करून अँफिलिएट मार्केटिंग,पेड प्रमोशन,सेलिंग इत्यादी मार्गानी पैसे कमवण्यासोबत आपल्या ब्लाँगवरील ट्रँफिक वाढावी म्हणुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्याच ब्लाँगची लिंक शेअर करून प्रमोशन करत असतात.

आणि मग इंस्टाग्रामवरची ट्रँफिक ब्लाँगवर डायव्र्हर्ट करून ब्लाँगिंगद्वारे भरपुर पैसे कमवित असतात.

इंस्टाग्रामवरून पैसे कमविण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :

1)ज्या नीशमध्ये आपल्याला आवड आहे त्याच नीशवर आपले इंस्टाग्राम पेज तयार करावे.कारण आपण ज्या नीशवर कंटेट टाकतो आहे तो आपल्या आवडीचा असला तर आपल्याला सातत्याने मन लावून काम करता येते.

2) ज्या नीशवर आपण आपल्या इंस्टाग्राईम अकाऊंटवर रोज कंटेट पब्लिश करतो आहे त्याच नीशवर आधारीत अँफिलिएट प्रोग्रँम जाँईन करावा याणे आपल्याला आपला एक स्पेशल ब्रँड तयार करता येत असतो.

3)आपले प्रोफाईल देखील आपण चांगले प्रोफेशनली बिल्ड करायला हवे.

4) डेली कंटेट पब्लिश करत राहावे याने रीडर्स,आँडियन्सही अधीच आपल्या पेजवर एंगेज होत असते.

5) इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताना हँश टँगचा वापर करावा

6) इंस्टाग्रामवर रील्स देखील अधुनमधुन टाकत राहावे तसेच लाईव्ह देखील येत राहावे याने देखील युझर्सची आँडियन्सची एंगेजमेंट आपल्या पेजवर वाढत असते.

2 thoughts on “इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे – How To Earn Money From Instagram”

  1. मैं आपकी वेबसाइट को बहुत ही ज्यादा पसंद करता हूं, ऐसी वेबसाइट किसी की नहीं मिली अभी तक। और आपके ऑर्टिकल पढ़ने के बाद मैंने भीं ब्लॉग लिखाना शुरू किया हैं, क्या आप मेरी वेबसाइट देख कर बता सकते हैं। क्या मैं सही काम कर रहा हूं प्लीज़ मेरी मदद करें।

Comments are closed.