मराठीत 50 वाक्यप्रचार त्याच्या अर्थासहित- 50 Vakprachar in Marathi with meaning

मराठीत 50 वाक्यप्रचार त्याच्या अर्थासहित- 50 Vakprachar in Marathi with meaning

1)किंमत ओळखणे – महत्व कळणे,एखाद्या वस्तुचे तसेच व्यक्तीचे महत्व लक्षात येणे

जेव्हा राहुलला एक वर्ष घरच्यांपासुन दुर राहुन बाहेरच्या जगाचा अनुभव आला तेव्हा त्याने खरया अर्थाने आपल्या कुटुंबाची आई वडिलांची खरी किंमत ओळखली.

2) गर्क असणे -एखाद्या कामात मग्न असणे,गुंतलेलो असणे

आई रोज स्वयंपाकघरातील काम आवरण्यात दिवसभर गर्क असते.

3) दाद लागु न देणे -विशिष्ट व्यक्तीला एखादी गोष्ट माहीती होऊ न देणे

पोलिसांनी चोरांच्या टोळक्यातील एका चोराला पकडले अणि त्याच्याकडुन इतर चोरांची नावे काढण्याचा प्रयत्न केला पण चोराने आपल्या इतर साथीदारांविषयी कुठलीही दाद लागु दिली नही.

4) जाळयात अडकवणे -मोहात पाडणे,पकडणे

चोराने पोलिसांच्या तावडीतुन पळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी शेवटी चोराला आपल्या जाळयात पकडले.

5) दंड थोपटणे – आव्हान करणे,आव्हाण देणे

राहुलने अमितला त्याच्यासोबत कबडडी खेळण्यासाठी मैदानात उतरून आपले दंड थोपटले.

6) जोड मिळणे -मदत तसेच सहकार्य प्राप्त होणे

वडिलांच्या निधनानंतर मुलाची जोड मिळाली म्हणुन स्नेहलता बाईंना घरातील आर्थिक भार उचलता आला.

7) दवंडी पिटणे -जाहीर करणे,घोषणा करणे

घरोघरी जाऊन मुलांना पोलिओचा डोस द्या अशी शासनाने दवंडी पिटली.

8) डोळयात अंगार भडकणे -अतिशय संताप येणे

जालियानवाला बाग हत्याकांड बघुन सर्व भारतीयांच्या डोळयातील अंगार भडकली.

9) तोंड सुकणे – निस्तेज होणे

खुप प्रयत्न करुनही नोकरी न प्राप्त झाल्याने राहुलचे तोंड सुकले.

10) डोळे खिळणे – थक्क होऊन एकसारखे एकटक बघत राहणे

दोघे पहिलवानांची रंगतदार लढत बघुन प्रेक्षकांचे डोळे खिळले.

11) धडकी भरणे -अतिशय भीती वाटणे,खुप घाबरणे

जंगलात फिरताना अचानक माझ्या समोर एक कुत्रा आला अणि मला धडकीच भरली.

12) डोळे झाकुन जाणे -कुठलीही चिंता न करता टेंशन न घेता निश्चिंत होऊन बिनधास्तपणे जाणे

See also  UDID 2022 - युडी आयडी कार्ड म्हणजे काय?अर्ज प्रक्रिया नोंदणी व फायदे - Benefits of UDID card 2022 in Marathi

लहान मुले आई वडिलांच्या पाठीमागे एकदम डोळे झाकुन जात असतात.

13) धाव घेणे -मनाच्या ओढीने खेचले जाणे

शाळा सुटताच सर्व मुलांनी घरी जाण्यासाठी धाव घेतली.

14) डोळे विस्फारने -आश्चर्याने चकित होऊन बघणे

पुण्यात छोटया मोठया नोकरीसाठी आलेल्या मोहनचे पुण्यातील मोठमोठया साँफ्टवेअरच्या कंपन्या बघुन डोळेच विस्फारले.

15) भंडावून सोडणे -खुप हैराण करून टाकणे,गोंधळुन टाकणे

लहान मुलांच्या कलकलाटाने आईला अक्षरश भंडावून सोडले.

16) नाद असणे -खुप आवड असणे,छंद असणे

विजयला वाचनाचा खुप नाद आहे.

17) पाठ थोपटणे -शाबासकी देणे

परीक्षेत चांगले गुण मिळवले म्हणुन वर्गातील सर्व शिक्षकांनी माझी पाठ थोपटली.

18) बस्तान बसवणे -जम बसवणे,एकाजागी स्थिर होणे

बाजारात रोज सकाळपासुन संध्याकाळपर्यत भाजीवाल्यांचे बस्तान बसवलेले दिसते.

19) नाव सोनेरी अक्षरात उमटणे -संपुर्ण विश्वात किर्ती पसरणे,नाव अजरामर होणे

क्रिकेटच्या विश्वात सचिनचे नाव सोनेरी अक्षरात उमटले आहे.

20) पाय न ठरणे -सतत भटकत राहणे

राहुलला फिरण्याची इतकी आवड आहे की घरात त्याचा पायच ठरत नही.

21) धारातीर्थी पडणे -युदधात वीरमरण येणे मृत्युमुखी पडणे

शत्रुशी लढत असताना लाखो भारतीय सैनिक धारातीर्थी पडले.

22) चेहरा पडणे -लाज वाटणे

मला समोर बघताच त्याचा चेहरा पडला.

23) तोंड देणे -सामना करणे

आज लाखो भारतीय दिवसरात्र मेहनत करून गरीबीचा सामना करत आहेत अणि जीवनात आलेल्या सर्व चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देत आहे.

24) छाती दडपणे -भीती वाटणे

डोळयासमोर साप बघुन त्याची छाती दडपली.

25) पोपटपंची करणे -अर्थ लक्षात न घेता पाठांतर करून दाखवणे घोकंपटटी करणे

विनयने सर्व प्रश्नांच्या उत्तराची पोपटपंची केली.

26) पाठ देणे -शिकवण देणे

मुलांना लहानपणापासुनच आईवडिलांनी प्रामाणिकपणाचे पाठ द्यायला हवे.

27) मनावर न घेणे -एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे

परीक्षा जवळ आली तरी राहुलने अभ्यासाचे मनावर घेतले नही.

See also  डीबीटीचा फुलफाॅम काय होतो DBT full form in Marathi

28) हसुन पोट दुखणे -खुप खुप हसणे

त्याचे विनोद ऐकुन सर्वाचे हसुन पोट दुखले.

29) मार्ग सापडणे -रस्ता मिळणे

अखेर चोराला पोलिसांच्या तावडीतुन सुटका करून पळण्याचा मार्ग सापडला.

30) सोने पिकणे -धान्य उगवणे

शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो म्हणुन शेतात सोने पिकते.

31) अभय देणे -रक्षण करण्याची हमी घेणे रक्षण करण्याची खात्री पटवून देणे

शिवाजी महाराज शरण आलेल्या शत्रुला अभय देत असे.

32) घोकंपटटी करणे -अर्थ समजून न घेता पाठांतर करत बसणे

राहुलने परीक्षा जवळ आल्यावर घोकंपटटी केली.

33) उलथुन पाडणे -संपुर्णत कोसळुन टाकणे समुळ नायनाट करणे नष्ट करणे

त्या भयानक चक्री वादळाने सगळयांची घरे उलथुन पाडली.

34) उखडुन टाकणे -उपटुन फेकणे

इंडियाने पाकिस्तानला ३-० ने हरवत विश्वचषक सामन्यामधून उखडुन टाकले.

35) घाम जिरवणे -कष्ट करणे

शेतकरी उन्हा तान्हात शेतात काम करून आपला घाम जिरवतात.

36) उरभरून येणे -आनंद अणि अभिमान वाटणे गदगदुन येणे

आपला मुलगा अधिकारी झाला हे ऐकताच आईवडिलांचा उर भरून आला.

37) घात करणे -एखाद्याला हानी पोहचवणे त्याचे नुकसान करणे

फितुरांनी घात केला म्हणुन संभाजी राजे मोगलांच्या तावडीत सापडले.

38) कटाक्ष टाकणे -डोळयाच्या कोपरयातुन नजर फिरवणे

वडिलांनी एक कटाक्ष टाकला अणि दोघे मुले गप्प बसली.

39) घर चालणे -कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे

वडिलांच्या पेशंनवर त्याचे सर्व घर चालते.

40) कानोसा देणे -चाहुल घेणे

आमच्या घरात थोडेही तु तु मेमे झाले की आमचे शेजारी लगेच भिंतीचा कानोसा घेतात.

41) भुवया उंचावणे -आश्चचर्य होणे तसेच नाराजी व्यक्त करणे

वर्गातील शिक्षकांनी भुवया उंचावल्या हे बघुन सर्व मुले एकदम गप्प बसली.

42) पित्त खवळणे -खुप राग येणे

मुलाचे परीक्षेत कमी मार्क आले हे पाहुन संपतरावांचे पित्त खवळले.

43) हुलकावणी देणे -चकवा देणे किंवा फसवणे

See also  गॅसलाइटिंग नेमके काय आहे- भावनिक अत्याचार - What is Gaslighting 

चोराने पोलिसांनी हुलकावणी दिली अणि तुरूंगातुन पलायन केले.

44) मात्रा न चालणे -इलाज न होणे

चोराने पळण्याचा खुप प्रयत्न केला पण पोलिसांच्या पुढे त्याची काही मात्रा चालली नही.

45)पोटाशी धरणे -जवळ करणे माया करणे

मुलगा परीक्षेत पहिला आला हे ऐकताच आईने मुलाला पोटाशी धरले.

46) सैरावैरा पळत सुटणे -वाट मिळेल तिकडे भीतीत पळत सुटणे

पोलिसांना बघताच चोर वाट सैरावैरा पळत सुटले.

47) माग काढणे -शोध घेणे तपास करणे

पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत करून खुन्याचा माग काढला.

48) वतन राखणे -जमिन जपणे

शेतकरीने जीवापाड मेहनत करून वतन राखले पण सावकाराने ते त्याच्यापासुन गोड बोलुन लुबाडले.

49) हात जोडणे -नमस्कार करणे

राहुल परीक्षेला जाताना नेहमी देवासमोर हात जोडतो.

50) अंग चोरणे -मोजकेच अणि फार थोडे काम करणे

राहुल नेहमी अभ्यासात अंग चोरतो.

51) अंगवळणी पडणे -सवय होणे

रोज सकाळी लवकर उठणे हे त्याच्या अंगवळणी पडले आहे.

52) अंगाची लाहीलाही होणे -अतिशय राग येणे अतिशय संताप निर्माण होणे

राहुलला पाहताच मोहनच्या अंगाची लाहीलाही होते.

53) अंगात वीज संचारणे -अचानक अंगात बळ ताकद येणे

चित्रपटात हिरोला व्हिलन मारत असतो पण अचानक तिथे हिरोईन येते तिला बघुन हिरोच्या अंगात वीज संचारते.