मिझलेसचा मराठीत अर्थ आणि ह्या आजाराविषयी संपुर्ण माहिती – Measles meaning and information in Marathi

मिझलेसचा मराठीत अर्थ आणि ह्या आजाराविषयी संपुर्ण माहिती- Measles meaning and information in Marathi

 

मिसलेस म्हणजे काय?Measles meaning in Marathi

 

मिसलेस चा मराठीत अर्थ गोवर असा होत असतो.गोवर हा एक असा संसर्गजन्य आजार आहे जो विषाणुंच्या माध्यमातुन पसरत असतो.

ह्या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये बालकांमध्ये अधिक जास्त प्रमाणात आढळून येत असते.काही केसेसमध्ये असे निदर्शनास आले आहे की मोठया माणसाला देखील हा आजार जडु शकतो.

फक्त ह्या आजाराचे एक वैशिष्ट्य आहे ज्याला हा आजार एकदा झाला असेल त्याला हा आजार परत जडत नही.

गोवर हा आजार होण्याचे कारण काय?reason causes of measles in Marathi

गोवर हा आजार आपणास पँरामायसो ह्या व्हायरसच्या संसर्गामुळे जडत असतो.ह्या विषाणुची लागण झाल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येत नसते.

लागण झाल्यानंतर किमान ८ ते १० दिवसांनी याची लक्षणे आपल्याला जाणवायला लागतात.

गोवर हा आजार कशा पदधतीने पसरत असतो?

ज्या व्यक्तीला ह्या आजाराची लागण झालेली असते त्याच्या शिंकेतुन किंवा खोकल्यामधून ह्या आजाराचे विषाणु वातावणात तसेच हवेत पसरत असतात.यातच कोणी व्यक्ती हा आजार झाल्यावर आपल्या संपर्कात आला की त्याला देखील हा आजार जडत असतो.

See also  उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधित घेण्याची काळजी

म्हणजेच ज्याला गोवर झाला आहे त्याने खोकताना शिंकताना तोंडावर रूमाल धरणे आवश्यक आहे नाहीतर त्याच्या मार्फत इतरांना हा आजार जडू शकतो.

गोवर ह्या आजाराची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?symptoms of miseles in Marathi

● हा आजार जडलेल्या रूग्णाला सुरूवातीला खोकला ताप सर्दी होत असते.

● गोवर झालेल्या व्यक्तिस अंगात अशक्तपणा जाणवतो.त्याचे अंग दुखते.घसा देखील दुखतो.

● याचसोबत डोळे लाल पडतात डोळयांना जळजळ होत असते.प्रकाशाची किरणे डोळयांना मानवत नही.

● आपल्या चेहरयाच्या पोटाच्या तसेच पाठीच्या भागावर लहान लहान पुळया येऊ लागतात.

● यूएस सीडीसीप्रमाणे लक्षणे दिसु लागल्यावर तीन चार दिवसांनी रूग्णाच्या तोंडामध्ये सफेद डाग स्पाँट दिसु लागतात.

गोवर ह्या आजारावर काय उपचार केले जाऊ शकतात?measles treatment in Marathi

तसे पाहायला गेले तर ह्या आजारावर कुठलीही एक विशिष्ट उपचार पदधत उपलब्ध नाहीये.आपल्याला म्हणजेच हा आजार जडलेल्या रूग्णास जसजशी ह्या आजाराची लक्षणे जाणवत असतात तसतसे ह्या आजारावर उपचार करण्यात येत असतो.

जर रूग्णाला सर्दी झाली तर सर्दीचे औषध दिले जाते.खोकला किंवा ताप असेल तर यावर देखील गोळया औषध घेऊन औषधोपचार केले जातात.

हा आजार झालेल्या रूग्णाने आवश्यक तेवढी विश्रांती घ्यायला हवी.गोळया औषध वेळेवर घेतल्यास अणि पुरेसा आराम केल्यास आहारात तरल पदार्थ समाविष्ट केल्यास साधारणत १० ते १५ दिवसांत हा आजार बरा होत असतो.

लहान मुलांना,बालकांना गोवर झाल्यास काय करायला हवे?

जसे की आपण गोवरची लक्षणे बघितली की गोवर झाल्यानंतर आपल्या शरीरातील प्रतिकार क्षमता कमी होते शरीरात अशक्तपणा येतो.

लहान बालकांना गोवर झाल्यास त्यांच्यावर त्वरीच गोळया औषधे देऊन उपचार करायला हवा.

कारण लहान मुलांना यात न्युमोनिया अतिसार असे गंभीर आजार जडण्याची यांची लागण होण्याची शक्यता असते.ज्याचे परिणाम स्वरूप बालकाच्या जीवाला धोका पोहचु शकतो.

गोवरची लागण होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी?

● लहान मुलांना गोवरची लागण होऊ नये याकरीता त्यांना वेळेवर लस द्यायला हव्या.

See also  म्हशीच्या दुधाचे आहारातील महत्व- गाई आणि म्हशीच्या दुधातला न्यूट्रिशन फरक -Nutritional values of cow and Buffalo milk  

● ज्या व्यक्तीला गोवरची लागण झाली असेल अशा व्यक्तीने शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरावा जेणेकरून त्यांच्या आजुबाजुच्या व्यक्तींना याची लागण होणार नही.

● गोवर झालेल्या रूग्णापासुन आपण थोडेफार अंतर राखायला हवे.

● आपल्या आजुबाजुच्या परिसरात गोवरची साथ पसरली असेल तर आपण तोंडावर नेहमी रूमाल किंवा मास्क बांधायला हवा.

● गोवर झालेल्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात येऊ नये तसेच गोवर झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो असेल तर साबणाने हात स्वच्छ धुवून घ्यावे याशिवाय तोंडाला शरीराला आपल्या हाताचा स्पर्श करू नये.

लहान मुलांना,बालकांना गोवरची लस कधी अणि केव्हा दिली जाते?

लहान बालकांना शिशुंना नवव्या महिन्यामध्ये ह्या लसीचा पहिला डोस देण्यात येतो.अणि याचा दुसरा डोस बाळ दीड वर्षाचे झाल्यानंतर दिला जात असतो.
ही लस घेतल्याने लहान बालकांना गोवरची लागण होत नही.

गोवर अणि रूबेला हे दोघे आजार सारखे आहेत का?

गोवरला मिसलेस असे म्हणतात अणि रूबेलास वारया फोडया असे संबोधिले जाते.

गोवर अणि रूबेला हे दोघे आजार वेगवेगळे आहेत.यांची लागण देखील वेगवेगळया व्हायरसमुळे होत असते.

लहान बालकांना लहानपणीच एम एम आर व्हँक्सिन का दिली जाते?

लहान मुलांना,बालकांना लहानपणीच एम एम आर व्हँक्सिन दिल्यास त्यांना गोवर,गालगुंड,वारयाफोडया हे आजार जडत नसतात.ह्या आजारांपासुन त्यांचे रक्षण होते.