Vermicompost Unit – अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट ची यशोगाथा .

 

Vermicompost Unit

 

मित्रांनो Vermicompost bed काय असते? सेंद्रिय खत म्हणजे काय? असा प्रश्न बर्‍याचदा विचारला जातो. सेंद्रिय खत म्हणजे रासायनिक घटकांचा पुर्णपणे उपयोग टाळून नैसर्गिक रित्या निर्माण केलेले खत ,पारंपारिक बियाने वापरुन केलेली शेती.

सेंद्रिय शेतीत उपयोग होणार्‍या खतात सहसा हिरवळी पासून केलेलं खत, शेणखत , कंपोस्ट, कोंबडी खत आणि गांडूळखता Vermicompost च्या प्रामुख्याने वापर केला जातो.

आज माहिती करून घेणार आहोत अशाच एक Vermicompost यूनिट बद्दल. हे यूनिट आहे अहमदनगर जिल्यात भगवतीपूर ह्या ठिकाणी.

श्री संजय राऊत ह्यांचा कृषिक्षेत्रातली अनुभव आणि Vermicompost unit ची आखणी

श्री संजय राऊत, ह्यांनी कृषिपदवीधर झाल्यानंतर तुमच्या माझ्यासारखीच एक नोकरी शोधली आणि आपला जीवन प्रवास सुरू केला, बाभळेश्वर ईथ कृषि विज्ञान केंद्रात नोकरी करता असताना त्यांचा शासना मार्फत जाहीर होणार्‍या शेतकरीकल्याण योजनांचा जवळचा संबध आला. आपल्याला माहीत असेलच की शासन बरेच शेतीपूरक उद्योगधंदे पुरुस्कृत करत असते.

स्वत: कृषिपदवीधर असलेल्या राऊत ह्यांना ही आपण शेतीउद्योजक बनाव ही मनापासून ईछ्या होतीच, नोकरी मुळे शेतीपूरक उद्योगधंदे जसे कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादान , रेशीम शेती ,आवळा कॅन्डी, पनीर उत्पादन सोलार टनेल, सोलार मळणी यंत्र ,गांडूळ खत(vermicompost) ईत्यादी. शेतीपूरक उद्योगधंदे बद्दल त्यांच्या गाठीशी ६-७ वर्षाचा अनुभव आला.

शेतीपूरक उद्योगधंदे बद्दल ईत्यंभूत ज्ञान असणार्‍या श्री राऊत ह्यांनी शेवटी शेतीउद्योग सुरू करायचाच हे पक्क ठरवलं. एप्रिल २०१४ साली नोकरीचा राजीनामा देवून आपल उद्योजक होण्याच स्वप्न सत्यात उतरवायच ठरवलं.

स्वतच्या: गांडुळा खत प्रकल्प ची त्यांनी आखणी सुरू केली, शेतीपूरक उद्योगधंद्या करता आवश्यक असणार्‍या गोष्टी चा अभ्यास होताच. पूर्ण प्रकल्प त्यांनी लिहून काढला ,सर्व आवश्यक बाबी विचार केला. जसे

See also  शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(Why stock market crash )

  • शास्त्रोक्‍त शिक्षण – ह्याचा त्यांना अनुभव होताच.
  • बाजारपेठ आणि विक्रि.
  • प्रकल्पा करता लागणारी जमीन.
  • प्रकल्पा करता लागनारी मजुरांची उपलब्धता.

ध्येयवेडे असणार्‍या राऊत ह्यांनी घरात कुटुंबीयांना (आई वडील,पत्नी, लहान बंधु )आपल्या गांडूळखत प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली. घरात कुटुंबीयांना असणार्‍या काही शंकाच निरसन केले ,प्रश्नची उत्तर दिलीत.

अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट-Vermicompost Unit

ची स्थापना

कुटुंबीयांनि दिलेल्या सपोर्ट मुळे हुरूप आलेल्या श्री राऊत ह्यांनी अर्थरीच गांडूळखत (vermicompost) प्रकल्प प्रत्यक्ष राबवयाला सुरवात केली. जुने २०१४ मध्ये  स्वत:च्या शेतातच त्यांनी गांडूळ खत प्रकल्प राबवयाच  ठरवलं .

सुरवातीच्या अडचणी वर मात करीत , मेहनत,जिद्द आणि सचोटीने प्रयत्न करत श्री राऊत ह्यांनी आपला प्रकल्प प्रत्यक्षात राबवला आणि यशस्वी केला.

आज अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट  च्या गुणवत्तापूर्ण उत्पादनां मुळे यूनिट नावारूपाला आले असून, नगर जिल्यातील कृषि क्षेत्रात ह्याची दखल घेण्यात येत आहेत.उत्पादनां च्या वाढत्या मागणीला  पाहून २०१९ मध्ये प्रकल्प विस्तार करण्यात आला ,१ गुंटा वर सुरू केलेला प्रकल्प आता ३ गुंट्यावर सुरू असून , वार्षिक 100 टन उत्पादन सुरू आहे, त्यासोबत व्हर्मीवॉश च वर्षकाठी २ हजार लिटर उत्पन्न मिळत आहेत.

उत्पादनं आणि अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट च प्रवास

अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट  प्रकल्पाची माहिती एकल्यानंतर राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा ह्यांनी स्वता: यूनिट ल भेट देवून श्री राऊत हांच्या कार्याची दाखल घेतली आणि प्रकल्पाची एक आदर्श प्रकल्प म्हणून नोंद केली .

एका कृषिपदवीधर ते एक यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास जाणून घेतला. श्री राऊत ह्यांच्या ज्ञानाची , अनुभवच फायदा शेतकर्‍यांना व्हावा ह्या करता कुलगुरूंच्या पुढाकाराने श्री संजय राऊत ह्यांची राहुरी कृषि विद्यापीठ च्या कृषि बैठकी, सेमिनार मधून एक वक्ता, कृषि सल्लागार म्हणून नेमणूक झालीय.  

अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट प्रोड्कट्स

  1. व्हर्मीकंपोस्ट
  2. व्हर्मीकल्चर
  3. व्हर्मीवॉश
See also  साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये काय फरक आहे? - Difference Between Hardware and Software in Marathi

आपल्यास किंवा शेतकरी ग्रुप ला अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट ला भेट द्यावयची असलयास, अधिक तांत्रिक बाबी बद्दल माहिती घ्यायची असल्यास श्री राऊत ह्यांना पूर्वसूचना देवून नक्की भेटता येईल

मित्रांनो लेख आवडल्यास खालील जागेत आपला अभिप्राय नक्की कळवा

किचन गार्डन करता लागणार्‍या साहित्या च्या माहिती करता क्लिक करा

 

6 thoughts on “Vermicompost Unit – अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट ची यशोगाथा .”

  1. Can you please give the contact details of Raut sir to get information regarding vermicompost plant and guidance to prepare manure for self farm.

Comments are closed.