साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference Between Hardware and Software in Marathi

साँफ्टवेअर आणि हार्डवेअरDifference Between Hardware and Software in Marathi

  कोणताही कंप्युटर,लँपटाँप तसेच अँड्राईड मोबाईल हा त्याच्या दोन घटकांवर अवलंबुन असतो एक म्हणजे त्याचे हार्डवेअर पार्ट आणि दुसरे त्याचे साँफ्टवेअर.

साँफ्टवेअर आणि हार्डवेअर हे कंप्युटर सिस्टमचे दोन असे महत्वाचे भाग आहेत ज्यातील एकही नसला तर आपली सिस्टम म्हणजेच कंप्युटर व्यवस्थित वर्क करणार नाही.

कारण कुठलेही इलेक्ट्राँनिक डिव्हाईस तसेच कंप्युटर सिस्टम आँपरेट करण्यासाठी आपल्याला साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांची नितांत आवश्यकता असते.

कारण कोणत्याही सिस्टमला इनपुट देण्यासाठी आपल्याला त्याच्या हार्ड वेअर पार्ट जसे की माऊस,किबोर्ड,सीपीयु,माँनिटर ह्या हार्डवेअर पार्टची गरज असते.

आणि ह्याच हार्डवेअर डिव्हाईसेसचा वापर आपण आपल्या सिस्टीमला इनपुट देण्यासाठी करत असतो ज्यात कंप्युटरवर आपण इनपुट देऊन जी कोडिंग करत असतो तसेच कंप्युटरला जे इंस्ट्रक्शन देत असतो त्याला साँफ्टवेअर असे म्हटले जाते.

आजच्या लेखात आपण ह्याच हार्डवेअर आणि साँफ्टवेअर मधील फरक सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

 

साँफ्टवेअर म्हणजे काय?What is Software

साँफ्टवेअर हे वेगवेगळया प्रोग्रँमचे एक कलेक्शन असते.जे काही विशेष कार्य करण्यासाठी कंप्युटरला इंस्ट्रक्शन देण्यासाठी तयार केले जाते.आणि याची भाषा देखील कंप्युटरला समजेल अशा पदधतीची असते.

साँफ्टवेअर हे फक्त कंप्युटरमध्येच युझ केले जात नसुन ते आपल्या मोबाईल मध्ये देखील युझ केले जात असते.

साँफ्टवेअर कंप्युटरचा असा भाग असतो ज्याला आपण कुठलाही स्पर्श करू शकत नाही.फक्त डोळयांनी बघू शकतो.

See also  Anxiety म्हणजे काय? Anxiety meaning in Marathi

साँफ्टवेअर हे दोन प्रकारचे असतात :

  • सिस्टम साँफ्टवेअर :
  • अँप्लीकेशन साँफ्टवेअर :

 

हार्डवेअर म्हणजे काय?What is Hardware

 हार्डवेअर हा कंप्युटरचा एक फिजिकल पार्ट असतो ज्याला आपण बघू देखील शकतो आणि त्याला स्पर्श देखील करू शकतो.

हार्डवेअरचा वापर प्रत्येक इलेक्ट्रानिक डिव्हाईस मध्ये केला जातो.

उदा.मोबाईल,कंप्युटर,लँपटाँप इत्यादी.

हार्डवेअरची उदाहरणे :

  1. माँनीटर
  2. किबोर्ड
  3. माऊस
  4. प्रिंटर

फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर माहिती – Top 6 Best And Free Data Recovery Software 

साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये काय फरक आहे?  – – Difference Between Hardware and Software in Marathi

साँफ्टवेअर हे विविध प्रोग्रँम्सचे एक कलेक्शन असते.जे कंप्युटरला इंस्ट्क्शन देण्याचे काम करते.आणि हार्डवेअर कंप्युटरचा एक फिजिकल पार्ट असतो ज्याचा वापर आपण कंप्युटरला इनपुट देण्यासाठी करत असतो
साँफ्टवेअर हा कंप्युटरचा असा महत्वाचा घटक असतो ज्याला आपण फक्त पाहु शकतो पण स्पर्श करू शकत नाही.याचठिकाणी हार्डवेअर हा कंप्युटरचा असा महत्वाचा भाग असतो ज्याला आपण पाहु देखील शकतो तसेच स्पर्श देखील करू शकतो.

 

साँफ्टवेअर विविध प्रकारचे असतात :सिस्टम साँफ्टवेअर,अँप्लीकेशन साँफ्टवेअर,प्रोग्रँमिंग साँफ्टवेअर,इत्यादी.आणि हार्डवेअरच्या प्रकारात इनपुट डिव्हाईस तसेच आऊटपुट डिव्हाईस,स्टोरेज डिव्हाईस,तसेच कंप्युटरमधील इतर इंटरनल कंपोनंटसचा समावेश होत असतो.

 

साँफ्टवेअर हे साँफ्टवेअर डेव्हलपर साँफ्टवेअर कंपनीत डेव्हलप करत असतोआणि हार्डवेअरला फँक्टरीमध्ये मँँन्युफँक्चर केले जाते.

 

कंप्युटरमध्ये जर एखादा व्हायरस आला तर त्याचा परिणाम साँफ्टवेअरवर होत असतो. 

पण कंप्युटरमध्ये घुसुन आलेला व्हायरस आपल्या कंप्युटरच्या हार्डवेअर डिव्हाईसवर कोणताही परिणाम करत नसते.

 

साँफ्टवेअरमध्ये काही प्राँब्लेम आला तर आपण आपल्या महत्वाच्या डाँक्युमेंटचा बँक अप घेऊन पुन्हा ते रिइंस्टाँल करू शकतोपण हार्डवेअर मध्ये काही प्राँब्लेम आला तर आपल्याला त्याचा पुर्ण पार्ट चेंज करावा लागत असतो.

 

साँफ्टवेअरच्या उदाहरणात एम एस वर्ड,एक्सेल,पाँवरपाँईट इत्यादींचा समावेश होतोतर त्याच ठिकाणी हार्डवेअरच्या उदाहरणात किबोर्ड,माऊस,प्रिंटर,इत्यादी हार्डवेअर डिव्हाईसचा समावेश होतो.
पण साँफ्टवेअरची निर्मिती ही छोटछोटया प्रोग्ँम्स द्वारे केली जात असते.

 

हार्डवेअरची निर्मिती वेगवेगळया छोटया तसेच मोठया इलेक्ट्रानिक साधनांनी मिळुन होत असते.
साँफ्टवेअरला जर अपग्रेड करायचे असेल तर आपण त्याचे नवीन लेटेस्ट व्हरझन डाऊनलोड करत असतो.पण याचठिकाणी हार्डवेअरला अपग्रेड करण्यासाठी आपल्याला त्याचे जुने पार्ट काढुन नवीन पार्ट बसवावे लागतात.तेव्हा ते अपग्रेड होते.

 

याचठिकाणी साँफ्टवेअर आपल्याला इलेक्ट्रानिकली ट्रान्सफर करता येत असते.

 

हार्डवेअर डिव्हाईसला आपण फक्त फिजीकली ट्रान्सफर करू शकतो.
.पण साँफ्टवेअरच्या आपण पाहिजे तितक्या डुप्लीकेट काँपी तयार करू शकतो.

 

सीपीयु,माँनिटर,प्रिंटर किबोर्ड इत्यादी अशा हार्डवेअर डिव्हाईसची आपल्याला डुप्लीकेट काँपी तयार करता येत नसते
 

साँफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोघे एकमेकांवर अवलंबुन असतात.कारण साँफ्टवेअर शिवाय हार्डवेअर आपले कार्य करू शकत नाही तसेच हार्डवेअर कंपोनंटशिवाय सिस्टमला कंप्युटरला इंस्ट्क्शन तसेच इनपुट देता येत नसते.

 

 

See also  राष्टीय टपाल कामगार दिवस - National Postal Worker Day In Marathi

2 thoughts on “साँफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference Between Hardware and Software in Marathi”

Comments are closed.