ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? What is Operating System in Marathi

ऑपरेटिंग सिस्टम  माहिती ? What is Operating System in Marathi

Operating System याला आपल्या संगणकातील एक सर्वात महत्वाचे सॉफ्टवेअर म्हणून ओळखले जाते. संगणकात सिस्टम सॉफ्टवेअर आणि अँप्लिकेशन सॉफ्टवेअर असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच ओएस हे सिस्टम सॉफ्टवेअर आहे.

आपण संगणकाला माउस, मायक्रोफोन किंवा कीबोर्डच्या सहाय्याने English इनपुट जरी देत असलो तरी देखील संगणकाला फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते आणि तिला आपण बायनरी (Binary) म्हणून ओळखतो.

संगणकसोबत आपल्याला जर संवाद साधायचा असेल किंवा communication करायचे असेल तर त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ओएस ची गरज लागते.

आपण दिलेले इनपुट आणि आपल्याला स्क्रीन वर दिसणारे आउटपुट यांच्या मध्ये हार्डवेअर सोबत संवाद साधण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम काम करत असते. वापरकर्त्याला अगदी सहज समजेल असे मेन्यू, आयकॉन्स, बटण देण्यासाठी ओएस काम करते. याला टेक्निकल भाषेत ग्राफिकल युझर इंटरफेस म्हणजेच GUI म्हणून ओळखले जाते.

ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार Types of Operating System

 ऑपरेटिंग सिस्टमचे विभाजन हे तिच्या वापरानुसार, किती टास्क सांभाळू शकते या नुसार आणि किती डेटा एका वेळी प्रोसेस करू शकते यानुसार केले जातात.

  • Time Sharing Operating System

आपण साधारणतः ही ऑपरेटिंग सिस्टम कंपन्यांमध्ये बघतो. या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एकाच वेळी अनेक वापरकर्ते वेगवेगळे टास्क करू शकतात. त्यामुळे या ऑपरेटिंग सिस्टमला Multitasking Operating System म्हणून देखील ओळखले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यामध्ये एकच सिस्टम असते आणि त्या सिस्टमचा टाईम हा वापरकर्त्यांमध्ये विभागला जातो. एका पाठोपाठ एक असे टास्क या ऑपरेटिंग सिस्टम प्रकारात प्रोसेस केले जातात.

  • Batch Processing Operating System
See also  मराठी म्हणींचा इंग्रजी भाषेतील अर्थ - 101 Common English Proverb With Their Marathi Meaning

ज्या ठिकाणी आपल्याला कमी काळात जास्त डेटा प्रोसेस करायचा असतो तिथे आपण या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करतो. एकदा वापरकर्त्याने ऑफलाईन पद्धतीने एक डेटा सेट बनवला आणि तो संगणकाला दिला तर मग त्यानंतर तो संगणक या ऑपरेटिंग सिस्टम सोबत या डेटाचे Batches बनवतो. या सर्व बॅच ग्रुप नुसार प्रोसेस केल्या जातात आणि मग संपूर्ण काम झाल्यानंतर वापरकर्त्याला त्याचे आउटपुट मिळते.

  • Distributed Operating System

आपण ज्या ठिकाणी आपल्या सिस्टम एका नेटवर्कच्या सहाय्याने वापरतो त्या ठिकाणी ही ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली असते.

  • Multiprocessor Operating System

आपल्याला जिथे एकच टास्क हा खूप वेगाने करायचा असतो तिथे ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते. शक्यतो साधारण वापरकर्त्याला याची गरज नसते मात्र सुपरकॉम्प्युटरला इतक्या वेगाने आणि क्षमतेने प्रोसेसिंग ची आवश्यकता असल्याने ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते.

  • Embedded Operating System

एटीएम मशीन, लिफ्टस किंवा इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यामध्ये एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमची गरज असते तिथे या प्रकारच्या ओएस वापरल्या जातात.

ऑपरेटिंग सिस्टम – Examples of Operating System

 Android, iOS आणि Windows या काही महत्वाच्या आणि जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अशा ऑपरेटिंग सिस्टम आहेत.

  1. Windows

संगणक क्षेत्रात सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे windows ऑपरेटिंग सिस्टम होय. Microsoft Windows चे अनेक वेगवेगळे संस्करण आलेले आहेत. Windows XP, 7, 8, 10 आणि आता Windows 11 हे काही प्रमुख windows संस्करण आहेत.

  1. Linux

ही ऑपरेटिंग सिस्टम आपण दैनंदिन जीवनात जरी वापरत नसलो तरी आपले भरपूर ओएस हे linux चे संस्करण आहेत. जगभरातील 500 हुन अधिक सुपर कॉम्प्युटर लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. लिनक्स ही फ्री आणि ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे.

  1. Android

जगातील सर्वाधिक स्मार्ट डिव्हाईस आणि मोबाईल मध्ये Android या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला जातो. Android चे देखील Windows प्रमाणे वेगवेगळे संस्करण आहेत. Android 1 ते 12 हे प्रत्येक वेगळे संस्करण आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे अँड्रॉइड संस्करणाची नावे ही मिष्टान्न म्हणजेच desserts च्या नावावर आधारित आहेत.

  1. iOS
See also  पेटंट म्हणजे काय (Patent Information In Marathi ) -

Apple कंपनीच्या iPhone मध्ये iOS ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते. iOS ही ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल क्षेत्रातील एक सर्वाधिक सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम म्हणून ओळखली जाते.

याशिवाय Blackberry OS, Symbian, MacOS, Chrome OS, KaiOS या काही ऑपरेटिंग सिस्टम देखील प्रसिद्धीला आल्या होत्या.

ऑपरेटिंग सिस्टम काम कशी करते?How Operating System works

 ऑपरेटिंग सिस्टम काम कशी करते याविषयी तुम्हाला समजले असेलच मात्र याविषयी एका उदाहरणातून समजून घेऊयात. आपण एखादी वर्ड फाईल सुरू करू.

  • आता आपण या वर्ड फाईल मध्ये कीबोर्ड वरून 1 हे बटन दाबून स्क्रीन वर आपल्याला 1 हा अंक दिसतो.
  • आपण जेव्हा 1 हे बटन दाबतो तेव्हा त्याची बायनरी किंमत म्हणजेच 0001 ही कीबोर्ड कडून पाठविली जाते. ऑपरेटिंग सिस्टम बायनरी पद्धतीने ती किंमत इनपुट हार्डवेअर कडून घेऊन आउटपुट साठी पाठवते.
  • आता आउटपुट स्क्रीन वर दाखवत असताना ही बायनरी किंमत पुन्हा वापरकर्त्याला कळेल अशा दशांश अंकात दाखवली जाते.
  • म्हणजेच वापरकर्ता हा देणारे इनपुट आणि त्याला मिळणारे आउटपुट हे पूर्णपणे त्याला समजेल असे असते.

[ultimate_post_list id="39028"]