मराठी म्हणींचा इंग्रजी भाषेतील अर्थ – 101 Common English Proverb With Their Marathi Meaning

मराठी म्हणींचा इंग्रजी भाषेतील अर्थ 101 Common English Proverb With Their Marathi Meaning

1)शब्दांपेक्षा कृती अधिक श्रेष्ठ असते- Actions Speak Louder Than Words

2) करावे तसे भरावे -As You Sow So Shall You Reap

3) जसा राजा तशी प्रजा -As The Kings So Are The Subjects.

4) पिकते तिथे विकले जात नाही -A Things Is Not Valued Where It Belongs.

5) उथळ पाण्याला खळखळाट फार -An Empty Vessel Makes Such Noise.

6) जशी दृष्टी तशी सृष्टी -Good Mind Good Find

7) आरोग्य हीच संपत्ती -Health Is Wealth.

8) अनोळखी शत्रुपेक्षा ओळखीचा शत्रु कधीही बरा -Better Than Devil You Know Than The Devil You Don’t.

9) कधीही न केल्यापेक्षा उशिरा का होईना केलेले अधिक चांगले -Better Late Than Never.

10) कर नाही त्याला डर कशाला -Pure Gold Doesn’t Fear The Flame.

11) हाताच्या काकणाला आरसा कशाला?-A Self Evident Truth Needs No Proof.

12) जिथे कष्ट नाही लाभ देखील नाही -No Pain No Gain

13) काळ हा कोणाकरताच थांबत नसतो -Time Once Lost Cannot Be Regained.

14) बळी तो कान पिळी -Might Is Right

15) सारखे विचार असलेले व्यक्ती नेहमी सोबत राहत असतात -Birds Of Feather Flock Together.

16) एकीमध्ये,संघटनात बळ असते -Unity Is Strength.

17) जे गरजतात ते कधीच बरसत नाही -Barking Dog Seldom Bite

18) इच्छा तिथे मार्ग असतो -Where There Is A Will There Is A Way.

19) नाचता येईना अंगण वाकडे -A Bad Carpenter Quarrel With His Tools

20) अर्धवट ज्ञान कधीही घातक ठरत असते -A Little Knowledge Is A Dangerous Things.

21) ज्याचा शेवट गोड त्याचे सर्वच गोड असते -All Is Well That End Is Well

22) दुधाने पोळलेला ताक फूंकुन पिणे -Once Bitten Twice Shy.

23) प्रत्येक गोष्टीची एक ठाराविक वेळ असते -There Is A Time For Everything

24) जसा समाज असतो तसा माणुस बनतो -Society Moulds Man

25) कधीही एका हाताने टाळी वाजत नाही -It Takes Two To Makes Quarrel.

26) मोती हा कधीही खोल पाण्यातच मिळत असतो -Truth Lies At The Bottom Of Well

27) संकटात कामी येतो तोच खरा मित्र -A Friend In Need Is A Friend Indeed

28) आपण चांगले तर सर्व जग चांगले -To The Good The World’s Appear Good

29) कुठलीही व्यक्ती कशी आहे हे त्याचे मित्र कसे आहे यावरून ओळखली जाते-A Man Is Known By His Friends.

30) बुडत्याला काडीचा आधार -Drowning Man Catches At A Straw

31) काटयाने काटा काढायचा असतो -One Nail Drives Another.

32) जसे बीज तसे अंकुर -Gather This Thisteles And Expect Pickles

33) व्यक्तीचा पोशाख पाहुन मान दिला जात असतो -Style Makes Man

34) वेळीच केलेल्या उपायामुळे होणारी हानी टळत असते -A Stitch In Time Save Nine

35) हाजीर तो वजीर -First Come First Serve

36) प्रत्येक मनुष्य स्वता आपल्या भाग्याचा निर्माता असतो -Every Man Is Creature Of His Own Fortune

37) दोन्ही घरचा पाहुणा उपाशी -Between Two Stools We Came To The Ground

38) बडा घर पोकळ वासा -Much Disply But No Substance

39) दाम करी काम -Money Makes The Mare Go

40) बैल गेला नि झोपी गेला -A Day After The Fair

41) इकडे आड तिकडे विहीर -Between The Devil And Deep Sea

42) न्यायास विलंब करणे हा एक अन्याय आहे -Delay Of Justice Is Injustice

43) जो कधीच चुकला नाही समजुन घ्यावे त्याने काही केलेच नाही -He Who Makes No Mistakes Makes Nothing.

44) संयम हा सर्व दुखावरील उपाय आहे-Patience Is A Plaster For All Sores

45) ज्यावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे -The Wearer Best Knows Where The Shoe Pinches.

46) एक चित्र हजारो शब्दांइतके असते -A Picture Is A Worth A Thousand Words.

47) सौजन्य हे अमुल्य असते -Civility Cost Nothing

48) Charity Begins From Home -चांगल्या कामाचा शुभारंभ स्वताच्या घरापासुन करायला हवा.

49) मुर्ख माणसाजवळ लक्ष्मी जास्तकाळ नांदत नसते -A Fool And His Money Are Soon Parted

50) प्रेमात अणि युदधात सर्व काही माफ असते -All Is Fair In Love And War.

51) भित्रयापाठी ब्रम्हराक्षस -Cowards May Die Many Time Before Their Death.

52) Cut Your Cot According To Your Clothes-कधीही अंथरून पाहुन पाय पसरावे

53) सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आपण नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकतो -A Positive Attitude Can Overcome A Negative Situation.

54) चमकणारी प्रत्येक वस्तु सोने नसते -All That Glitters Is Not Gold.

55) गाढवापुढे वाचली गीता -Casting Pearls Before Swine

56) अतिराग भीक माग -Passion Leads To Poverty Anger Punishes Itself

57) हातचे सोडुन पळत्याच्या मागे कधीही लागु नये -A Bird In Hand Is A Worth Two In Bush.

58) अतिघाई संकटात नेई -Haste Makes Waste

59) शरीर निरोगी असेल तर मन देखील निरोगी राहते -Sound Mind In A Sound Body.

60) माकडाच्या हाती कोळसा -A Fireband In The Hand Of Madman

61) शेरास सव्वाशेर -More Than Match

62) बोलण्यापेक्षा करून दाखवणे अधिक चांगले ठरते -Doing Is Better Than Saying

63) उपाशी राहिल्यापेक्षा अर्धी भाकर खाल्लेले बरे -Half A Loof Is Better Than None.

64) बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ -Specch Is Silver And Silence Is Golden.

65) वराती मागुन घोडे -Doctors After Death

66) Slow And Steady Win The Race -सावकाश अणि सातत्याने काम केले तर यश मिळतेच.

67) पुर्ण विचार करण्याशिवाय कुठलीही कृती करू नये -Look Before You Leap

68) Penny Wise Pound Foolish -विळा मोडुन खिळा करणारा

69) Reap As You Sow -जसे आपण पेरतो तसेच उगवते

70) Familiarity Breeds Contempt -अतिपरिचयात अवज्ञा

71) चांगले कार्य कधीच वाया जात नाही- A Good Deed Is Never Lost

72) Like Father Like Son -बाप तसा बेटा

73) गरम तव्यावर पोळी भाजुन घेणे किंवा वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेणे -Make Hay While The Sun Shine

74) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते -Habbit Is Second Nature

75) चांगले कार्य एका दिवसात घडत नसते -Rome Was Not Build In Day

76) शहाण्याला शब्दाचा मार -A Word Is Enough For Wise

77) थेंबे थेंबे तळे साचे -Many A Little Makes Mickle

78) पाचामुखी परमेश्वर -Majority Carries The Point

79) चोराच्या मनात चांदणे -A Guilty Conscience Pricks The Mind

80) माणुस ठरवतो काय अणि देवाच्या मनात काही वेगळच असते -Man Purposes God Disposes

81) Misfortune Seldom Come Alone -संकटे ही कधी एकटी येत नसतात.

82) He Plays Well Who Wins-ज्याच्या हाती ससा तोच खरा पारधी

83) दुरून डोंगर साजरा करणे -Friends Agree At Distance

84) No Rose Without Thorn-

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

85) More You Struggle More You Become Strong -आपण जेवढा संघर्ष करतो तेवढे अधिक आपण मजबुत बनत असतो.

86) लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती अणि आरोग्य लाभे -Early To Bed Early To Rise Makes Man Healthy Wealthy And Wise

87) Nothing Venture Nothing Have -धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही.

88) Many Hand Makes Work Right -अनेकांच्या मदतीने काम योग्य पदधतीने होत असते.

89) Spare The Rod And Spoil The Child -छडी लागे छम छम विद्या येई गम गम

90) Absence Makes The Heart Grow Fonder -विरहाने स्नेहभाव वाढत असतो.

91) आपले विचार बदलले की आपले जग देखील बदलते -Change Your Thoughts And Change Your World

92) चोराच्या वाटा चोरालाच माहीत असतात -Set A Theif To Catch A Thief

93) Honesty Is The Best Policy -प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण असते.

94) Failure Is Stepping Stone To Success –

अपयश ही यशाची पहिली पायरी असते.

95) ऐकावे जनाचे करावे मनाचे -Listen To People But Obey Your Conscience

96) एकाने केलेली चूक इतरांसाठी शिकवण ठरते -One Man Fault Is A Another Man Lesson

97) चार दिवस सासुचे अणि चार दिवस सुनेचे -Every Dog Has His Days

98) To Err Is Human Nature -चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे.

99) गरज सरो वैदय मरो -A Fig For The Doctor When Cured

100) Confidence Is Key Of Success -आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.

101) You Only Lose When You Give Up -आपण तेव्हाच हरतो जेव्हा आपण स्वताहुन गिव्ह अप करतो.