SSL म्हणजे काय? SSL information in Marathi

SSL  सर्टिफिकेट म्हणजे काय? SSL information in Marathi

मित्रांनो आज लाखो तसेच करोडोंच्या संख्येत आपण इंटरनेटचा वापर करतो.ईकाँमर्स साईटवर जाऊन आँनलाईन पेमेंट करून कोणत्याही वस्तुची खरेदी करत असतो.

तसेच आँनलाईन पैशांचे देवाणघेवाणीचे व्यवहार देखील करत असतो.आणि हे व्यवहार करत असताना आपण आपली पर्सनल डिटेल देखील तिथे फिल करत असतो.

पण हे सर्व आँनलाईन व्यवहार करत असताना आपण कुठेतरी याची खात्री करायला विसरतो.

किंवा त्याकडे दुर्लक्ष करत असतो की आपण ज्या आँनलाईन प्लँटफाँर्मवरून खरेदी करत असताना आपली सर्व पर्सनल डिटेल जसे की नाव,पत्ता,बँक अकाऊंट नंबर,क्रेडिट कार्ड डिटेल,भरली आहे ती तिथे सेफ आहे का?तिथुन आपली माहीती कोणी चोरणार तर नाही ना?

पण अशा प्लँटफाँर्मवरून हँकर्स हे सहजपणे कुठलाही डेटा सहज प्राप्त करू शकतात.म्हणजेच हँक करू शकतात.

असे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठमोठया आँनलाईन ईकाँमर्स तसेच शाँपिंग साईटस आपल्या वेबसाईटवर सिक्युरीटीसाठी SSL connection घेत असतात.

पण हे एस एस एल म्हणजे नेमके काय असते?याची आवश्यकता का असते?हे आपल्यापैकी खुप जणांना माहीत नसते.

पण काळजी करू नका मित्रांनो आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की SSL कशाला म्हटले जाते?त्याचा फुलफाँर्म काय होतो?SSL certificate म्हणजे काय असते?

SSL चा फुल फाँर्म काय होतो?(SSL full form in marathi)

SSL चा फुलफाँर्म (secure socket layer) असा होत असतो.

SSL म्हणजे काय?

See also  आरबी आयचे चीफ शशीकांत दास यांना देण्यात आला गवर्नर ऑफद इअर पुरस्कार - RBI Governor Shashikant Das honoured

इंटरनेटवर आपण आँनलाईन शाँपिंग खरेदी करत असताना आपण आपली जी पर्सनल तसेच बँक डिटेल भरत असतो.

ती कोणत्याही third party ने पाहु नये यासाठी इंटरनेटवर वापरण्यात येणारे हे एक encryption protocol असते.

याने आपण सिक्युअरली आपला डेटा encrypt तसेच transfer करू शकतो.आज कित्येक मोठमोठया शाँपिंग,तसेच ईकाँमर्स वेबसाईट आपल्या कस्टमरचा डेटा सिक्युअर राहण्यासाठी SSL चा वापर करताना आपणास दिसुन येतात.याने हँकर्सला आपला प्रायव्हेट डेटा चोरता येत नसतो.

SSL certificate म्हणजे काय?

एस एस एल हे एक सर्टिफिकिट असते जे आपल्या वेबसाईटवरील डेटा सिक्युअर आणि प्रोटेक्टेड राहण्यासाठी आपल्याला आपल्या वेबसाईटसाठी वेब सिक्युरीटी सर्टिफिकिट प्रोव्हाईड करत असलेल्या कंपनीकडुन दिले जात असते.

SSL certificate आपण कुठून खरेदी करू शकतो?

एस एस एल सर्टिफिकिट हे आपण आपल्या गरजेनुसार गोडँडी,होस्टिंगर,बिगराँक,होस्टगेटर,सारख्या कोणत्याही कंपनीकडुन खरेदी करू शकतो.काही कंपनी होस्टिंग सोबत आपल्याला एस एस एल सर्टिफिकिट फ्री मध्ये देखील देत असतात.

SSL certificate हा आपल्या वेबसाईटला HTTP वरून HTTPS वर जाण्यासाठी सक्षम करत असते.यात S म्हणजेच सिक्युअर असा अर्थ होत असतो.

ज्या वेबसाईटवर लाँकचे चिन्ह असते.एस एस एल सर्टिफिकिट दिलेले असते तसेच URL मध्ये https असे दिलेले असते ती वेबसाईट आँनलाईन ट्रान्झँक्शनसाठी सेफ आणि सिक्युअर आहे असे गृहित धरले जाते.कारण त्यावरील डेटा encrypted असतो.

SSL certificate चे कोणकोणते प्रकार आहेत?

SSL certificate देखील विविध प्रकारचे असतात ज्याचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

1) मल्टी डोमेन एस एस एल सर्टिफिकिट :

ह्या एस एस एल सर्टिफिकिटच्या साहाय्याने आपणास 250 डोमेन सुरक्षित ठेवता येत असतात.

इथे आपल्याला डोमेन व्हँलिडेशन,आँरगनाईझेशन व्हँलिडेशन,आणि एक्सटेंडेड व्हँलिडेशनच्या फँसिलिटी देखील प्राप्त होत असतात.

2) ईव्ही एस एसएल सर्टिफिकिट :

हे एस एस एल सर्टिफिकिट खास बिझनेससाठी डिझाईन करण्यात आलेले आहे.हे वेब ब्राऊझरच्या अँड्रेस बारला ग्रीन कलरसह आपल्या बिझनेसचे नाव दर्शवत असते.

See also  आँप्टिमिस्टिक अणि पेसिमिस्टिक म्हणजे काय? Optimistic,Pessimistic Meaning In Marathi

3) डोमेन व्हँलिडेटिड एस एस एल सर्टिफिकिट:

ब्लाँग तसेच छोटया वेबसाईटवर असे एस एस एल सर्टिफिकिट वापरले जात असते.

4) आँरगनाईझेशन व्हँलिडेशन एस एस एल सर्टिफिकिट:

हे एस एस एल सर्टिफिकिट आँनलाईन बिझनेस व्हेरीफिकेशन करण्यासाठी आणि सिक्युरीटी प्रोव्हाईड करण्यासाठी वापरण्यात येते.याने कस्टमरला खात्री होते की आपण ज्या वेबसाईटवर ट्रान्झँक्शन करत आहोत ती एक सेफ आणि सिक्युअर वेबसाईट आहे.

5) कोड साईनिंग सर्टिफिकिट :

याच्या साहाय्याने आपणास आपल्या साँपटवेअरचा कोड सुरक्षित ठेवता येत असतो.आणि हे आपल्या फाईल्सला देखील सिक्युरीटी प्रोव्हाईड करण्याचे काम करते.

6) मल्टीडोमेन वाईल्ड कार्ड एस एस एल सर्टिफिकिट :

जर आपल्याला एकाच वेळी डोमेन आणि सबडोमेन सुरक्षित करायचे असेल तर आपण हे एस एस एल सर्टिफिकिट वापरू शकतो.यात एकूण 250 डोमेन आणि त्याचे सबडोमेन सुरक्षित ठेवायची क्षमता असते.

HTTP चा फुल फाँर्म काय होतो?

HTTP चा फुलफाँर्म हा hyper text transfer protocol असा होतो.

HTTP म्हणजे काय?

जेव्हा आपल्याला वेब ब्राऊझर मधुन वेब सर्वरपर्यत डेटा ट्रान्सफर करायचा असतो तेव्हा आपण hyper text transfer protocol use करत असतो.

पण एचटीटीपी वेबसाईटवरचा डेटा secure मानला जात नाही.कारण यातील डेटा इनक्रिप्टेड नसल्यामुळे कोणतीही third party ह्या डेटाला सहज अँक्सेस करू शकते.म्हणजेच इथे आपला डेटा हँकरदवारे हँक तसेच लीक होण्याची अधिक संभावना असते.

कारण यात आपण जी इनफरमेशन फिल करत असतो ती टेक्सट फाँरमँटमध्ये असते म्हणुन कोणीही यातील डेटा सहज अँक्सेस करू शकते.

HTTPS चा फुल फाँर्म काय होतो?

HTTP चा फुलफाँर्म हा hyper text transfer protocol secure असा होतो.

HTTPS म्हणजे काय?

HTTPS म्हणजे hyper text transfer protocol secure असा होतो म्हणजे अशा वेबसाईट ज्यांच्या युआर एलमध्ये HTTP च्या पुढे S दिलेला असतो.अशा वेबसाईटमधील डेटा लीक होत नसतो.किवा एखादी थर्ड पार्टी हा डेटा अँक्सेस करू शकत नाही,पाहु शकत नाही.

See also  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर - CTET result 2023 in Marathi

कारण अशा वेबसाईटवरील डेटा encrypted फाँरमँटमध्ये ट्रान्सफर होत असतो.म्हणुन हा डेटा कोणी हँकर बघु पण शकत नाही किंवा हा डेटा चोरू देखील शकत नसतो.

HTTP आणि HTTPS या दोघांमध्ये कोणता फरक आहे!?

  • HTTP stands for hyper text transfer protocol.आणि HTTPS stands for hyper text transfer protocol secure.
  • HTTP मधील डेटा हा टेक्सटच्या फाँरमँटमध्ये ट्रान्सफर केला जात असतो त्यामुळे हा डेटा थर्ड पार्टी सहज वाचू शकते.म्हणजेच हा डेटा सेफ आणि सिक्युअर नसतो.
  • पण HTTPS मधील डेटा हा encrypted format मध्ये असल्याने हा डेटा सेफ आणि सिक्युअर मानला जातो.
  • HTTP वेबसाईट मधील डेटा हा encrypted नसतो आणि ह्यामुळेच हा डेटा हँकरला सहज प्राप्त करता येतो.
  • HTTPS मधील डेटा encrypted असतो ह्यामुळे हा डेटा हँकरला हँक करता येत नाही.
  • HTTP असलेल्या वेबसाईट आँनलाईन पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करण्यासाठी सेफ नसतात.
  • HTTPS असलेल्या वेबसाईट आँनलाईन पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करण्यासाठी एकदम सेफ आणि सिक्युअर असतात.