जगात आधी कोण आले होते अंड की कोंबडी? – What Came First Chicken or Egg in Marathi

आधी काय अंड की कोंबडी?What Came First, Chicken or Egg in Marathi

 जगात कित्येक वर्षापासुन हा प्रश्न विचारला जातो आहे की जगात आधी कोंबडी आली होती का अंडे ज्याचे उत्तर शास्त्रज्ञांकडे देखील नव्हते.पण आता ह्या अनेक वर्षापासुन विचारल्या जात असलेल्या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांनी शोधुन काढले आहे.

  • ब्रिटन मधल्या शेफिल्ड आणि वाँरविक युनिव्हर्सिटी मधील शास्त्रज्ञांनी यावर एक संशोधन केले आहे ज्यात संशोधनातुन असे समोर आले आहे की जगात सगळयात पहिले कोंबडी आली होती.
  • याबाबद संशोधक काँलिन फ्रिमन म्हणाले की जगात सर्वप्रथम कोंबडी आली होती की अंडे याचे उत्तर शास्त्रज्ञांकडे देखील नव्हते.पण आता संशोधनानंतर याचे उत्तर शास्त्रज्ञांना आता प्राप्त झाले आहे.

चला तर मग जाणुन घेऊया याबाबद शास्त्रज्ञांचे काय मत आहे.आणि संशोधनातुन कोणत्या गोष्टी शास्त्रज्ञांच्या समोर आल्या आहेत.

संशोधकांचे याबाबद काय म्हणने आहे?

  • शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की अंडी तयार होण्याकरीता ओव्होक्लाडीन म्हणजेच ओसी 17 नावाचे प्रोटीन फार महत्वाचे असते.
  • आणि गर्भवती असताना कोंबडीच्या गर्भात हे विशिष्ट प्रकारचे प्रोटीन निर्माण होत असते.यावरून सिदध होते की जगात पहिले कोंबडी आली होती मग अंडे आले होते.

संशोधकांनी याचा शोध कसा लावला?

  • जगात पहिले कोंबडी आली होती की अंडे याचा शोध लावण्यासाठी संशोधक वर्गाने हायटेक कंप्युटरचा हेक्टर याचा उपयोग केला होता.
  • ज्याने संशोधकांना अंडयाच्या कवचाची आण्विक रचना कशा पदधतीचे आहे हे समजुन आले.
  • संशोधनात असे देखील समोर आले की ओसी 17 ह्या प्रोटीनच्या साहाय्याने अंडयाच्या शेलमध्ये कँल्शिअम कार्बोनेटचे कनव्हरझन होणे सुरू होते.
  • मग कालांतराने हळुहळु हेच घट्ट होते आणि त्यात आपल्याला कँल्साईट क्रिसटल्स सापडत असतात.
  • संशोधक काँलिन फ्रिमन याबाबद असे म्हणतात की कोंबडीचे हाड आणि अंडयाचे कवच यात कँल्साईट क्रिस्टल आढळुन येत असतात.
  • आणि ज्या वेळेस हे अंड पुर्णपणे तयार होत असते.त्यानंतर ते बाहेर येत असते.

अशा पदधतीने जगात कोंबडी आधी आली होती की अंडे ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाल आहे फक्त जगामध्ये कोंबडीचा विकास कशा पदधतीने झाला याचे उत्तर अद्याप शास्त्रज्ञांना देखील प्राप्त झालेले नाही.जगभरातील संशोधक ह्या प्रश्नाचे उत्तर अजुनही शोधत आहे.

Leave a Comment