हात धुण्याचे महत्व – Global Hand Washing Day Marathi
गेल्या दोन वर्षात कॉरोनॉ आजाराने कधी न्हवे ते इतके स्वच्छतेच महत्व लोकांना पटवून दिले
घरातील मोठया व्यक्ती तसे ही नेहमी हात धुवून घे अस लहानपणा पासून सर्वाना सांगत असतात , कधी कधी रागावून ही सांगतात.
बाहेरून आल्यानंतर, जेवण्याआधी, बाहेरून काही आणलेला सामान वापरन्या आधी आणि वॉशरूम ,शौचास ,लघवी वगरे जाऊन आल्यानंतर तर आवर्जून हात स्वच्छ धुतले पाहिजेत
याच कारण आपल्याला सर्वाना माहीत आहे आपण जेव्हा काही काम करत असतो तेव्हा धूळ ,माती च्या संपर्कात येत असतो तेव्हा लहान किटाणू आपल्या हाताला लागतात त्यामुळं हात स्वच्छ नसतील तर ही किटाणू अन्न द्वारे पोटात जाऊ शकतात आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते तसेच दुसऱ् अन्न विष बाधे food poisoning सारखा प्रकार नाकारता येत नाही
आपण आजारी केव्हा पडतो ? जेव्हा आपल्या नाकातून किंवा हाता मार्फत किटाणू पोटात जातात.नाकातून किटाणू न जाण्यासाठी आपण गर्दीच्या ठिकाणी मास्क लावतो.अन हातातून किटाणू पोटात न जाण्यासाठी आपण सॅनिटाइझरचा किंवा साबनाचा वापर करतो.आपण जेवण करण्यापूर्वी,जेवण केल्यानंतर, बाहेरून आल्यावर किंवा शौचालयातून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत.
कोरोनाच्या काळात सर्वांना हात धुण्याचे महत्व पटले असेल.आपला जर हात स्वच्छ असला तर आपल्या हातावर बसलेले किटाणू आपल्या पोटात जात नाहीत आणि आपण आजारी पडत नाही.तु
म्ही हात स्वच्छ धुण्यासाठी मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही साबणाचा वापर करू शकता.
हात न धुतल्यामुळे होणारे आजार –
आपण जर कोरोना महामारीच्या आधी गेलो तर,लोकांना हात धुणे एवढे गरजेचे वाटत नव्हते.हात न धुण्याच्या वाईट सवयीमुळे आपल्याला कॉलरा सारखा मोठा आजार होती.टायफॉईड ,कॉलरा,एच 1 ,एन 1 यांसारखे आजार हात न धुतल्यामुळे होतात.
कोणत्या साधनाने हात धुवावे ? – Global Hand Washing Day Marathi
तुम्ही जर मार्केट मध्ये गेला तर तुम्हाला चांगल्या प्रतीचे हात धुण्याचे साबण आणि सॅनिटाइझर मिळतात.तुम्ही टीव्ही वर चांगल्या चांगल्या साबनांची जाहिराती पाहिल्याच असतील.
कोरोनाच्या महामारीमुळे सॅनिटाइझर बनवणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण खूप वाढले.तुम्ही जर यु ट्यूब वरती स्वच्छ हात कसा धुवायचे ? असे सर्च केले तर तुम्हाला स्वच्छ हात कसे धुवावे याचे भरपूर व्हिडीओज मिळतील.कोरोनाच्या काळात तुम्ही जर घरी असाल तर सारखे सारखे साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि जर काही कारणास्तव घरा बाहेर गेला तर सोबत सॅनिटाइझर ची बाटली सोबत असावी आणि अधून मधून हवे तेव्हा सॅनिटाइझर ने हात स्वच्छ करा.WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) नुसार आपण सर्वांनी 20 सेकंदापर्यंत व्यवस्थित हात धुतले पाहिजे.
ग्लोबल हँड वॉशिंग डे –
हात धुण्या संदर्भात जागरूकता व्हावी म्हणून यु.एन ने 2008 साली ग्लोबल हँड वॉशिंग डे ची सुरवात केली.तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की,हात धुण्यासाठी एक विशेष दिवस !.हात धुणे हे व्यायाम करणे आणि योग्य आहार घेण्या इतकेच महत्वाचे आहे.म्हणून WHO ने ही संकल्पना चालू केली.ग्लोबल हँड वॉशिंग डे हा दरवर्षी 15 ऑक्टोबर दिवशी संपूर्ण जगात साजरा केला जातो.ग्लोबल हँड वॉशिंग डे 2020 मध्ये ‛हँड हाईजिन’ही थीम ठेवण्यात आली होती.
हात सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाचे उपाय : Global Hand Washing Day Marathi
- कोरोना काळात हात धुणे फार गरजेचे झाले आहे.तुम्ही हात धुताना जो साबण वापरता, तो साबण निसर्गाच्या वनस्पतींचा वापर करून बनवलेला असावा.कारण केमिकल युक्त साबणाने तुमच्या हाताचे नुकसान होऊ शकते.
- सॅनिटाइझर ने किंवा साबणाने हात धुतल्यानंतर क्रिम लावणे -जेव्हा आपण साबण किंवा सॅनिटाइझर लावतो तेव्हा त्यानंतर आपण मोईसचर क्रिम लावली पाहिजे.कारण सारखा सारखा सॅनिटाइझर किंवा साबणाचा वापर केल्यानंतर तुमचे हात खराब होऊ शकतात.
- सुवासिक असणाऱ्या साबणाचा किंवा सॅनिटाइझर चा वापर कमी करणे – कोरोना काळात सुवासिक सॅनिटाइझर वापरण्याची क्रेज खूप वाढली आहे.सुवासिक साबनामध्ये किंवा सॅनिटाइझर मध्ये केमिकल चे प्रमाण खूप असते.त्या केमिकल मुळे तुमच्या हाताचे नुकसान होऊ शकते.
- तुमच्या हाताला जर भेगा असल्या तर सॅनिटाइझर चा वापर न करणे – सॅनिटाइझर मध्ये अल्कोहोल चे प्रमाण जास्त असते.तुमच्या हाताला जर भेगा असल्या तर तुम्ही सॅनिटाइझर चा वापर करू नका किंवा तुम्हाला जर सॅनिटाइझर चा वापर करायचा असेल तर सॅनिटाइझर लावल्यानंतर हातावर मॉइसचर क्रिमचा वापर करा.
हात स्वच्छ धुतल्याने पोटाचे ,डायरिया सारखे आजार 30% ने कमी होतात
हात स्वच्छ धुतल्याने श्वसन संबधीत तक्रारी व तश्या संसर्गात 20% त्रास कमी होतात
कॉलरा, इबोला, सार्स व हॅपीटेटीस सारख्या सांसर्गिक आजार कमी होतात