IRCTC टूर पॅकेज माहिती Best IRCTC Tour Packages

IRCTC टूर पॅकेज माहिती

 नेहमी आपल्यासोबत असे होत असते की आपण कुठेतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असतो किंवा फँमिलीसोबत फिरायला जाण्याचे ठरवत असतो

पण जेव्हा आपण तिकिट बुक करायला जातो तेव्हा तिथे इतकी गर्दी असते की आपल्याला ज्या वेळेचे तिकिट बुक करायचे तेच दुदैवाने आपल्याला प्राप्त होत नसते.याने आपली खुप मोठी फजिती होत असते.

पण आता अशी फजिती आपली अजिबात होणार नही कारण आज आपण भारतीय रेल्वेने तयार केलेल्या आय आरसीटीसी ह्या आँनलाईन वेबसाईटद्वारे आँनलाईन कुठलेही टिकिट बुक करू शकतो.भारतात कुठेही पर्यटन करण्यासाठी ट्रँव्हलिंग टुर पँकेजेसची आँनलाईन बुकिंग करू शकतो.फक्त यासाठी आपल्याला आपले एक अकाऊंट तयार करावे लागत असते.

आजच्या लेखात आपण आय आरसीटीसी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

आय आरसी टीसी म्हणजे काय?

आय आर सी टीसी ही एक सहायक कंपनी आहे.ह्या कंपनीचे प्रमुख काम हे असते की भारतातील सर्व रेल्वेच्या केटरींग,टुरिझम,आणि आँनलाईन टिकिट बुकींगची कामकाज बघणे.

यासोबत आपण या सहायक कंपनीच्या वेबसाईटवरून  रेल्वेचे टिकिट,विमानाचे तिकिट तसेच एखादे हाँटेल सुदधा आपल्यासाठी बुक करू शकतो.

आय आरसीटीसीचा फुल फाँर्म काय आहे?

 आय आरसीटीसीचा फुल फाँर्म (INDIAN RAILWAY CATERING AND TOURISM CORPORATION) असा आहे.

आय आरसीटीसीचा मुख्य मालक कोण आहे?

 आय आरसी टीसी ह्या आँनलाईन पोर्टलचा मालक भारत सरकार आहे.पण याचे सर्व कामकाज रेल्वेमंत्र्यांकडुन बघितले जाते.

आय आरसीटीसीचे फायदे कोणकोणते असतात?

 

आय आरसीटीसी ह्या आँनलाईन पोर्टलचे आपल्याला अनेक फायदे होतात आणि हे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:

  • आय आर सी टीसीचा आपल्याला पहिला फायदा हा आहे की ह्या आँनलाईन पोर्टलद्वारेआपण घरबसल्या तसेच इतर कुठुनही रेल्वेचे तिकिट बुक करू शकतो.
  • आपण पाहिजे तिथे बसुन आँनलाईन तिकिट बुक करण्यासोबत काही कारणास्तव जर आपल्याला आपले तिकिट कँन्सल करायचे असेल तर ते देखील करू शकतो.
  • ह्या आँनलाईन पोर्टलचा वापर करून आपल्याला इमरजन्सीसाठी ताबडतोब देखील आपल्याला हवे ते पाहिजे त्या वेळेचे तिकिट बुक करता येते.
  • आणि आपण हे आँनलाईन तिकिट मोबाईलद्वारे तसेच आपल्या लँपटाँपद्वारे देखील बुक करू शकतो.
See also  पी एम दक्ष योजना विषयी माहीती - PM- DAKSH Yojana in Marathi

आय आर सी टीसी टुर पँकेजस :

 IRCTC सतत चांगल्या सहली ऑफर्स घेवून येत असते , उत्तम ऑफर्स सोबतच प्रवास आणि राहण्याची व जेवण्याची व्यवस्था देखील IRCTC कडून केली जाते

  • आय आरसीटीसीच्या ट्रँव्हलिंग पँकेजमधुन आपण एखादी आठवडाभराची तसेच दोन तीन दिवसाची लहानसहान ट्रीप देखील बुक करू शकतो.
  • फक्त ही पँकेजेस बुक करण्यासाठी आपल्याला आय आरसीटीसीच्या आँफिशिअल वेबसाईटला व्हिझिट द्यावी लागते.आणि तिथे मग आपण हाँलिडे ह्या आँप्शनवर जाऊन आपल्याला पाहिजे ते पँकेज निवडता येते.
  • चला तर मग जाणुन घेऊया आय आरसी टीसीच्या काही प्रसिदध टुर पँकेजेसची नावे.

आय आरसी टीसीच्या काही प्रसिदध टूर पँकेजेसची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) नवी दिल्ली ते अमृतसर :

2) वैष्णोदेवी मंदिराचे पँकेज :

3) दिवाळीसाठी तीर्थ यात्रा पँकेज :

4) रामायण यात्रा पँकेज :

5) भारत दर्शन :

6) ईशान्य यात्रा :

7) शिर्डी स्पेशल :

8) शिव दर्शन,शनि दर्शन,साई दर्शन :

9) दक्षिण भारत यात्रा पँकेज :

10) महाराजा एक्सप्रेस :

1)नवी दिल्ली ते अमृतसर :

  • यात आपण शताब्दी एक्सप्रेस मध्ये अमृतसर रेल्वे टुर पँकेजची बुकिंग करू शकतो.आणि अमृतसर शहराचे दर्शन करू शकतो.
  • येथे आपण अमृतसर शहरातील दोन ऐतिहासिक स्थळाना आवर्जुन भेट द्यायला हवी एक म्हणजे सुवर्णमंदीर आणि दुसरे म्हणजे जालियानवाला बाग.
  • आणि ह्या वन डे वन नाईटच्या टुरमध्ये आपल्याला वाघा बाँडर्र देखील पाहायला मिळते.
  • अधिक माहिती साठी क्लिक करा

2) वैष्णोदेवी मंदिराचे पँकेज :

 ह्या टुर पँकेजमध्ये आपल्याला तीन रात्र चार दिवसांची वैष्णोदेवी मंदिराची टुर करायला मिळणार आहे.

  • माता वैष्णोदेवीच्या मंदिराचे द्वार कमीत कमी 5300 फुट एवढया उंचीवर वसलेले आहे.आणि हे द्वार कटरा पासुन कमीत कमी बारा किलोमीटर एवढया दुर अंतरावर स्थित आहे.
  • या पँकेजची सुरूवात 5795 पासुन सुरू होताना आपणास दिसुन येते.
  • अधिक माहिती साथी क्लिक करा
See also  What is left Wing Right Wing In India Marathi - डाव्या विंग व उजव्या विंग विचारसरणी म्हणजे काय?

3) दिवाळीसाठी तीर्थ यात्रा पँकेज :

 ह्या पँकेजद्वारे आपण भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन द्वारे दिवाळीत तीर्थ यात्रेचा लाभ घेऊ शकतो.

  • ह्या टुर पँकेजसाठी यात्रेकरूंकडुन कमीत कमी एका व्यक्तीचे भाडे शुल्क आकारले जाते.यात यात्रेकरूंसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • रात्रीच्या वेळी वृदध यात्रेकरूंना विश्रांती करण्यासाठी हाँल बुक केला जातो.सकाळी ब्रेकफस्ट,दुपारी लंच रात्री डिनरची देखील यात्रेकरूंसाठी सोय केली जाते.
  • फक्त मंदिरात जाण्याचे शुल्क तसेच आपल्या गोळया औषधांचा वैयक्तिक खर्च यात्रेकरूंना स्वता करावा लागत असतो.

4) रामायण यात्रा पँकेज :

 ह्यात आपण अयोध्येपासुन थेट रामेश्वरम पर्यतच्या सर्व तीर्थस्थळांचे दर्शन घेऊ शकतो.

  • यात यात्रेकरूंच्या खाण्यापिण्याची,राहण्याची,फिरण्याची,त्यांना गाईड करण्यासाठी टुरिस्ट गाईडची इत्यादी सर्व सुविधा यात उपलब्ध करून दिली जाते.
  • ह्या टुर पँकेजमध्ये भाविक अयोध्या,नंदीग्राम,चित्रकुट,जनकपुर,रामेश्वरम पर्यतच्या सर्व तीर्थ स्थळांचे दर्शन भाविक करू शकतात.
  • यात प्रत्येक यात्रेकरूंकडुन वेगवेगळया तारखेच्या पँकेजेससाठी अलग अलग शुल्कची आकारणी करण्यात येते.
  • अधिक माहिती साठी क्लिक करा       

5) भारत दर्शन :

 भारत दर्शन ह्या टुर पँकेजमध्ये यात्रेकरू तसेच भाविक एकुण सात ज्योर्तिलिंगाचे दर्शन करू शकतात.एकुण 15 दिवसांची ही टुर असते.

  • यात्रेची सुरूवात गोरखपुर पासुन होते तर यात आपण वाराणसी,देवरीया,लखनौ,कानपुर,झाशी इत्यादी ठिकाणांहुन देखील आपल्या आवडीनुसार गरजेनुसार यात्रेची सुरूवात करू शकतो.
  • ह्या पँकेजमध्ये प्रत्येक भाविकाकडून कमीत कमी 12,290 इतके शुल्क घेतले जाते.
  • ह्या यात्रेत यात्रेकरूंसाठी तीन वेळ खाण्या पिण्याची,राहण्याची,तसेच टुरिस्टला फिरण्यासाठी बसेसची देखील सोय केली जाते.
  • यात आपण सर्वप्रथम आपल्याला उज्जैनमधील ओंकारेश्वर तसेच महाकालेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शन करावयास मिळते.यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टँच्युचे दर्शन करायला मिळते.
  • यानंतर अहमदाबादमधील साबरमती आश्रम,दारका येथे भेट दिली जाते.त्यानंतर पुण्यातील घृष्णेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शन करायला मिळते.मग नाशिकला त्र्यंबकेश्वर औरंगाबादचे भीमाशंकर ज्योर्तीलिंग अशा सर्व प्रमुख दैव स्थळांचे दर्शन यात आपल्याला करायला मिळते.
See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवसा विषयी माहीती - World food safety day information in Marathi

6)ईशान्य यात्रा :

 हे पँकेज कमीत कमी सात ते आठ दिवसांचे असते.

  • याचे शुल्क 21,715 इतके असलेले आपणास दिसुन येते.
  • ह्या टुरची सुरूवात कोलकत्ता ह्या शहरापासुन होते.ह्या टुरमध्ये आपल्याला गुवाहाटी येथे एक रात्र राहण्याची सोय केली आहे.शिलाँगमध्ये तीन रात्रींचा मुक्काम करायला मिळतो.
  • याचसोबत यात आपल्या राहण्या खाण्याची सोय देखील केली जाते.
  • अधिक माहिती

7) शिर्डी स्पेशल पँकेज :

 शिर्डी स्पेशल पँकेजमध्ये आपल्याला तीन दिवसात शिरडी,शनि शिंगणापुर,नासिक ह्या तिन्ही ठिकाणचे पर्यटन करावयास मिळते.

  • यात आपल्याला नाशिकमध्ये मुक्तीधाम,त्र्यंबकेश्वर,पंचवटी इत्यादी ठिकाणाचे दर्शन करायला मिळते.
  • यानंतर मग आपण शनि शिंगणापुरच्या मंदिराला तसेच तेथील दरवाजा नसलेल्या घरांचे दर्शन करू शकतो जे अत्यंत प्रसिदध आहेत.
  • ह्या तीन दिवसाच्या पुर्ण पँकेजसाठी आपल्याकडून 3000 रूपये शुल्क आकारले जाते.

8) शिव दर्शन,शनि दर्शन,साई दर्शन :

 ह्या यात्रेची सुरूवात जबलपुर शहरापासुन होत असते इथून यात्रेची सुरूवात करून आपल्याला नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर,शनि शिंगणापुर,शिर्डी साईबाबा मंदीर इत्यादीचे दर्शन करायला मिळते.

  • या पँकेजमध्ये प्रत्येक व्यक्तीकडुन 8920 इतके भाडे शुल्क घेतले जाते.ह्या पँकेजचा एकूण कालावधी चार रात्र आणि पाच दिवस इतका असलेला दिसुन येतो. अधिक माहिती

9) दक्षिण भारत यात्रा पँकेज :

 दक्षिण भारत यात्रा पँकेजच्या टुरची सुरूवात ही 9450 रूपयांपासुन सुरू होते.ह्या पँकेजमध्ये एकुण नऊ दिवस दहा रात्रींचा समावेश केला गेला आहे.

  • यात आपल्याला इंदौर, उज्जैन,त्रिवेंद्रम,नागपुर,कन्याकुमारी रामेश्वरम इत्यादी अशा अनेक ठिकाणांचे पर्यटन करावयास मिळते.
  • अधिक माहीत

10) महाराजा एक्सप्रेस :

 महाराजा एक्सप्रेस ह्या ट्रेनद्वारे आपल्याला आरामशीर राजेशाही पदधतीने पर्यटन करता येते.

  • ह्या ट्रेनमधुन पर्यटन करत असलेल्या पर्यटकांसाठी प्रवासादरम्यान जेवण करण्यासाठी यात जेवणाची आणि मनोरंजन म्हणुन वाचन करण्यासाठी एका वाचन कक्षाची देखील व्यवस्था केलेली असते.