पी एम दक्ष योजना विषयी माहीती – PM- DAKSH Yojana in Marathi

Table of Contents

पी एम दक्ष योजना विषयी माहीती – PM- DAKSH Yojana IN Marathi

2020-2021 मध्ये सरकारकडुन ह्या पी-एम दक्ष योजनेवर अंमलबजावणी करण्यात आहे.

ह्या योजनेमार्फत काही लक्षित गट जसे की कौशल्य वृदधी पुर्नकौशल्य,उद्यमशीलता विकास कार्यक्रम,लघुकालीन तसेच दिर्घकालीन प्रक्षिक्षण कार्यक्रम इत्यादींना कौशल्य विकास प्रक्षिक्षण देण्यात येणार आहे.

आज आपण ह्या पी एम दक्ष योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

पी एम दक्ष योजना काय आहे?

पी-एम दक्ष ही केंद्र सरकार कडुन राबविण्यात आलेली महत्वाची योजना आहे.

ह्या योजनेअंतर्गत तरूणांना कौशल्य विकासाचे प्रक्षिक्षण देण्यात येते.

पी एम दक्ष म्हणजेच प्रधानमंत्री दक्षता कौशल्य संपन्नता हिताग्रही योजना मार्फत ओबीसी,एस-सी,ईबी सी एस,डीएन टी एस तसेच सफाई कामगारांना विशिष्ट कौशल्य प्रदान करणारी अणि त्यांना ट्रेनिंगच्या कालावधी दरम्यान स्काँलरशिप देत असलेली राष्टीय योजना आहे.

ह्या योजनेत प्रक्षिणणार्थींना प्रक्षिक्षण पुर्ण झाले की रोजगार देखील प्राप्त करून दिला जात असतो.

See also  भारतातील 12 प्रेक्षणीय स्थळ - 12 Best Places to Visit in India in 2022

पीएम दक्ष ह्या योजनेची सुरूवात कोणी केली आहे?ह्या योजनेची सुरूवात कधीपासुन करण्यात आली आहे?

पी एम दक्ष ह्या योजनेची सुरूवात वीरेंद्र कुमार यांनी केली आहे जे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत.

ह्या योजनेची सुरूवात ही 15 आँगस्ट 2021 पासुन सुरू करण्यात आलेली आहे.

पी एम दक्ष योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे?

पी एम दक्ष ह्या योजनेचा लाभ हा सर्व अनुसुचित जाती जमाती,मागासवर्गीय गट,सफाई कर्मचारी वर्ग ह्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

पी एम दक्ष ह्या योजनेला सुरू करण्यामागचे सरकारचे उददिष्ट काय आहे?

पी एम दक्ष योजना सरकारने यासाठी सुरू केली आहे की जास्तीत जास्त तरूणांसाठी रोजगाराची संधी निर्माण व्हावी अणि ही संधी निर्माण होण्यासाठी त्यांना योग्य प्रक्षिक्षण दिले जावे.

 पी-एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा अणि कोणत्या पदधतीने करायचा?

पी एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी आपण आँनलाईन पी एम दक्ष योजनेच्या आँफिशिअल वेबसाइट वर pmdaksh.dosje.gov.in वर व्हिझिट करून अर्ज करू शकतो.

पी एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करायचा –

● सर्वप्रथम pmdaksh.dosje.gov.in ह्या वेबसाइट वर व्हिझिट करायचे.

● मग होम पेज वरील वर दिलेल्या candidate registration ह्या आँप्शन वर क्लीक करायचे.

● मग आपल्या समोर एक फाँर्म ओपन होऊन तिथे Name of traninee मध्ये आपले नाव टाकुन घ्यावे.

● यानंतर आपली जन्मतारीख,वडिलांचे/पतीचे नाव,आपले जेंडर,आपले राज्य,जिल्हा,आपला पत्ता पिनकोड सहित,आपण राहतो तिथली लोकेशन,आपला आधार नंबर, शैक्षणिक अहर्ता,आपली कँटँगरी,आपण ग्रामीण भागात येतो की शहरी ते टाकायचे इत्यादी सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यायची.यात आपले शैक्षणिक प्रमाणपत्र हे आपण जे पीजी अणि पीएनजी ह्या दोन फाँरमँटमध्ये अपलोड करायचे आहे.

● आपण आपली पदवी कशात पुर्ण केली आहे ते specified course मध्ये द्यायचे.आपली स्ट्रीम म्हणजेच शाखा कोणती होती ते द्यायचे.

See also  आँटिस्टिक प्राईड डे विषयी माहीती - Autistic Pride Day in Marathi

● Education documents मध्ये आपले सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करायचे.जेवढे आपले शिक्षण झाले असेल ते सर्व.

● आपले Income certificate अपलोड करायचे.पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा.

● बँक खाते चालू आहे की बंद हे मेंशन करायचे.

● आपले खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे का हे विचारले जाईल होय असेल तर yes वर क्लीक करावे.

● शेवटी आपला मोबाइल नंबर टाकुन सेंड ओटीपी ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.मग आपल्या मोबाइल वर एक ओटीपी येतो जो आपण तिथे टाकायचा आहे.अणि verify option मध्ये जायचे.

● Training detail मध्ये आपल्याला जिथे प्रक्षिक्षण घ्यायचे आहे ज्या राज्यात जिल्हयात प्रक्षिक्षण हवे आहे ती माहीती भरायची आहे.तसेच तेथील प्रक्षिक्षण केंद्राचे नाव,आपल्या जाँब रोल,स्कीलचे नाव देखील द्यायचे आहे ज्यात आपणास ट्रेनिंग हवी आहे.

● मग शेवटी आपली बँक डिटेल भरायची ज्यात आपले खाते आहे त्या बँकेचे नाव,तिची शाखा खातेधारकाचे म्हणजेच आपले नाव,बँक अकाउंट नंबर, आय एफसी कोड ही सर्व माहीती भरायची.अणि खाली दिलेल्या confirm बटणावर ओके करून आपले registration confirm करून घ्यायचे.

● रेजिस्टेशन करून झाल्यानंतर आपली सर्व माहीती चेक करण्यात येईल अणि ती चेक करून झाल्यानंतर आपल्या मोबाइल नंबर वर तसेच ईमेल आयडी वर आपला आयडी पासवर्ड सेंड करण्यात येतो.

पी एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट काय आहे?

पी एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 45 ह्या वयोगटातील असायला हवे.

पी एम दक्ष योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या इतर अटी कोणकोणत्या आहेत?

● उमेदवाराकडे त्याचा जातीचा दाखला असायला हवा.

● उमेदवार ओबीसी असेल तर त्याचे उत्पन्न तीन लाख रूपयापेक्षा अधिक नसावे.फक्त निमुक्त भटक्या तसेच अर्ध भटक्या जमातीस हे निकष लागु होणार नाही.सफाई कर्मचारीला देखील उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाहीये.

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडोचा दुदैवी मृत्यू - Unfortunate death of SPG commando in Prime Minister Narendra Modi's convoy

● जी व्यक्ती आर्थिक दृष्टया मागास आहे तिचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

● पी एम दक्ष योजनेमार्फत लाभ घेण्याकरीता ईबीसी उमेदवाराकडे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले प्रमाणपत्र असायला हवे.त्याच्याकडे जातीचा दाखला नसला तरी चालतो.

● पी एम दक्ष योजना अंतर्गत लाभ मिळवायला स्वच्छता कर्मचारी यांनी आवश्यक अशा प्राधीकरणाकडुन देण्यात आलेल्या व्यवसाय प्रमाणपत्राला जोडणे आवश्यक आहे.

पी एम दक्ष योजनेची काही महत्वाची वैशिष्टये कोणकोणती आहेत?

● शासनाकडुन शंभर टक्के अनुदानासोबत प्रक्षिक्षणार्थींना मोफत प्रक्षिक्षण ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

● ह्या योजनेअंतर्गत जो उमेदवार आपले प्रक्षिक्षण पुर्ण करतो त्याला प्रक्षिक्षण पुर्ण झाले की एक प्रमाणपत्र देखील दिले जात असते.

● पी एम दक्ष योजना अंतर्गत ज्या उमेदवाराने त्याचे प्रक्षिक्षण अणि मुल्यांकन यशस्वीरीत्या पुर्ण केले आहे.अशा प्रक्षिक्षणार्थीना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात.जाँब प्लेसमेंट दिले जाते.

● पी एम दक्ष योजनेअंतर्गत ज्या उमेदवाराने त्याचे अल्पकालीन तसेच दिर्घकालीन प्रक्षिक्षण पुर्ण केले आहे.अणि यात त्याची अटेंडन्स 80 टक्के पेक्षा जास्त आहे.अशा उमेदवाराला या योजनेमार्फत दर महिन्याला हजार ते दीड हजार रूपये इतकी स्काँलरशिप दिली जात असते.

● सर्व बाबींसाठी दिल्या जाणारया स्काँलरशिपचे निकष हे वेगवेगळे असतात.

● पी एम दक्ष ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावी लोकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा म्हणुन ह्या योजनेची एक आँफिशिअल अँप अणि एक आँनलाईन पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे.

पी एम दक्ष ह्या योजनेचा हेल्पलाईन नंबर काय आहे?

पी एम दक्ष योजनेचा हेल्पलाईन नंबर 1800110396 हा आहे.

पी एम दक्ष योजनेचा आँफिशिअल ईमेल आयडी –

nsfdcskill@gmail.com

support-nsfdc@nic.in

पी-एम दक्ष योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

● ह्या योजनेच्या अंतर्गत पाच वर्षात जवळजवळ तीन लाख व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

● महिलांना घरातील काम करून रोजगाराचे व्यवसायाचे,प्रक्षिक्षण घेता येणार आहे.

● ह्या योजनेमार्फत विशिष्ट कला कौशल्याचे प्रक्षिक्षण घेऊन त्यात प्रवीण होऊन आपण स्वताचा व्यवसाय,रोजगार सुरू करू शकतो.

 

 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना – PM Kisan Mandhan Yojana Marathi

Leave a Comment