प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना विषयी माहीती (PMSYM) – Pradhan Mantri Shram-yogi Maan-dhan (PMSYM) Pension Yojana

Table of Contents

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना विषयी माहीती (PMSYM) -Pradhan Mantri Shram-yogi Maan-dhan (PMSYM) Pension Yojana

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ह्या योजनेअंतर्गत काम न करता देखील तीन हजार रूपये महिना इतके पेंशन आपणास दिले जाणार आहे.

अणि समजा ह्या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीचा अचानक अकस्मातरीत्या मृत्यु झाला तर त्याच्या जोडीदारास म्हणजेच पती तसेच पत्नीला दीड हजार रूपये महिन्याला पेंशन दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ह्या योजनेची घोषणा पीयुष गोयल यांच्यादवारे 1 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली होती.

अणि १५ फेब्रुवारीपासुन ही योजना सुरू करण्यात आली होती.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ह्या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ह्या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या सर्व कामगार मजदुर वर्गाला घेता येणार आहे.

उदा, शेतात तसेच कंपनीत काम करणारे मजुर,कामगार घरकाम करणारया स्त्रिया,रिक्षा चालवणारे व्यक्ती,नळ फीट करणारा प्लँबर,कपडे धुवणारा धोबी इत्यादींना

ज्यांचे महिन्याचे वेतन १५००० पेक्षा कमी आहे असे व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.लाभार्थीचे वय साठ झाल्यानंतर त्याला महिन्याला तीन हजार रुपये पेंशन दिले जाते.हे पैसे लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा केले जात असतात.

See also  कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna's birth

सदर योजना मध्ये सहभागी होणारा व्यक्ती शासकीय कार्यालयात काम करणारा कुठलाही शासकीय कर्मचारी नसायला हवा.तसेच तो ईपीएफ,एन पी एस सारख्या स्कीमचा,राज्य बिमा निगमचा सभासद नसावा.

तसेच जे व्यक्ती दरवर्षी इन्कम टँक्स भरतात ते देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजचेचे उददिष्ट काय आहे?

आज असे अनेक श्रमिक,कामगार आहेत ज्यांचे वय हे साठच्या वर गेल्याने वयोवृदधपणामुळे त्यांना काम करणे अवघड जात असते.अणि त्यांचे काम रोजंदारीचे असल्याने त्यांना पैसे मिळविण्यासाठी रोज कामाला जाणे गरजेचे असते.

अणि अशातच ते रोज कामाला नही गेले तर त्यांच्या रोजच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घरात पैशांची टंचाई निर्माण होत असते.

पण प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही एक अशी योजना आहे.जिचा लाभ प्रामुख्याने रोजंदारी करून पैसे कमवणारया मजदुर वर्गाला,खासगी कंपनीमध्ये काम करणारया कामगारांना होणार आहे.

कारण ह्या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात कार्य करणारया मजदुर कामगार वर्गाला ६० वय झाल्यानंतर मासिक पेंशन दिले जाणार आहे.

जेणेकरून साठ वय झाल्यानंतर त्यांचे स्वताचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठलेही हाल होणार नाहीत.

भारतीय आकडेवारीनुसार ४० करोड पेक्षा अधिक कामगार मजदुर हे असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करत आहे.

अणि अशा व्यक्तींना वृदधाल्पकाळात अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो.असे लोक आपल्या सुरक्षित भविष्यासाठी ह्या योजनेत भाग घेऊ शकतात.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कोणाकडुन राबवण्यात आली आहे?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही केंद्र सरकार कडुन राबविण्यात आलेली योजना आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी किती पैसे भरावे लागतात?

 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी अठरा वय असलेल्या व्यक्तीस दर महिन्याला 55 रूपये भरावे लागतात.
 • ज्याचे वय 29 आहे अशा व्यक्तीला 100 रूपये भरावे लागतील.अणि ज्याचे वय चाळीस आहे त्यास 200 रूपये भरावे लागतील.
 • ही रक्कम आपणास आपले वय साठ होत नाही तोपर्यत भरावी लागणार असते.
 • यात जसे आपले वय असते त्याप्रमाणे पैसे भरावे लागतात.म्हणजे आपले वय जेवढे कमी असेल तेवढा कमी हप्ता आपणास येथे भरावा लागत असतो.
 • जेवढी रक्कम आपण जमा करत करतो तेवढीच रक्कम शासन आपल्या खात्यात ट्रान्सफर करत असते.
See also  बालमजुरी विरोधी घोषवाक्ये - Child labor slogans in Marathi

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट काय ठेवण्यात आली आहे?

 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट 18 ते 40 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मध्ये सहभागी-महत्वाची कागदपत्रे –

● लाभार्थीचे आधार कार्ड

● संपर्कासाठी मोबाइल नंबर

● बँक पासबुक,बँक खाते क्रमांक मग ते सेव्हींग तसेच जनधन खाते असले तरी चालेल.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कोठे अणि कसा अर्ज करायचा?

 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मध्ये आपली नाव नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या घराजवळील ग्रामपंचायतीत मधील आपले सरकार सर्विस सेंटर,काँमन सर्विस सेंटर,एल आयसी सेंटर,ईएस आयसी आँफिस,श्रमिक कार्यालय मध्ये देखील जाऊ शकतो.
 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा?
 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी आँफलाईन किंवा आपण आँनलाईन देखील नोंदणी करू शकतो.यासाठी आपणास ह्या योजनेच्या आँफिशिअल वेबसाईटला https://maandhan.in/shramyogi व्हिझिट करावे लागेल.
 • मग आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल जिथे क्लीक टु अँप्लाय नाऊ असे आँप्शन दिसुन येईल.ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.मग आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • यात देखील आपल्यासमोर दोन पर्याय दिलेले असतील एक आँप्शन स्वता रेजिस्टर करण्यासाठी self enrolment अणि दुसरा काँमन सर्विस सेंटर.

यात आपण सेल्फ इनरोलमेंट आँप्शन निवडुन त्यावर क्लीक करायचे.आपला मोबाइल नंबर टाकायचा processd ह्या बटणावर ओके करायचे.

यानंतर नवीन पेज ओपन होईल जिथे आपण आपले नाव अणि ईमेल आयडी टाकायचा.मग तिथे दिलेला कँप्चया कोड जसाच्या तसा फील करायचा.

 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कोठे अणि कसा अर्ज करायचा?

मग यानंतर generate otp ह्या बटणावर क्लीक करायचे मग आपल्या रेजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल तो जसाच्या तसा स्क्रीनवर इंटर करायचा.

See also  होळी २०२३ कधी आहे? । तारीख, इतिहास, महत्त्व, भाषण आणि मराठीत शुभेच्छा, शुभ मुहूर्त

यानंतर उर्वरीत अर्ज व्यवस्थित भरून घ्यायचा.त्या अर्जाला आवश्यक असणारे डाँक्युमेंटस जोडुन जेपीजी फाँरमँटमध्ये अटँच करून अपलोड करायचे.

भरलेला अर्ज पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा.यानंतर भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढुन घ्यायची आपल्याजवळ ठेवायला.

आपण ही योजना मध्येच बंद करू शकतो का?

होय आपण ह्या योजनेतुन मध्येच बाहेर देखील पडु शकतो.यासाठी आपणास आपल्या शहरातील एल आयसी आँफिसमध्ये योजना बंद करायला जावे लागते.

आपण जर योजनेला दहा वर्षे पुर्ण होण्याअगोदरच ह्या योजनेतुन बाहेर पडत असु तर आतापर्यत आपण जेवढी रक्कम जमा केली आहे बँकेच्या बचत दरानुसार पैसे दिले जात असतात.

लाभार्थीचा मृत्यु झाल्यास किंवा तो अपंग झाला तर त्याच्या जागी त्याची पत्नी,तिच्या जागी तिचा पती देखील ह्या योजनेला कंटिन्यु करू शकतो.

अणि समजा योजनेत सहभागी होणारा लाभार्थी हा दहा वर्षानी किंवा दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर बाहेर पडला पण त्याने साठ वय होण्याआधीच ही योजना सोडली तर त्याला जमा व्याजाने सेव्हिंग तसेच सेव्हिंग बँकेच्या रेटवर जे काही असणार ते दिले जाणार.

 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना – PM Kisan Mandhan Yojana Marathi