जागतिक अन्न सुरक्षा दिवसा विषयी माहीती – World food safety day information in Marathi

Table of Contents

जागतिक अन्न सुरक्षा दिवसा विषयी माहीती – World food safety day information in Marathi

मित्रांनो अन्नाला आपण परब्रहमाचा दर्जा देत असतो.कारण आज आपण जी काही मेहनत,कष्ट करतो ती आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाला पुरेसे अणि दर्जेदार अन्न प्राप्त होण्यासाठीच करत असतो.

पण आज जागोजागी ह्याच अन्नामुळे आज अनेक लोक आजारांना बळी पडत आहेत विषबाधेचे शिकार होत आहेत.याला कारण आहे जागोजागी अन्नामध्ये होत असलेल्या भेसळी,तसेच आपल्याकडुन केले जाणारे दुषित आणि खराब अन्नाचे सेवण.

आणि ह्याच दुषित अन्नाविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी जगभरात आज जागतिक आरोग्य संघटना,संयुक्त राष्टाच्या अन्न कृषी संघटनेकडुन दरवर्षी एक खास दिवस साजरा केला जातो ज्याचे नाव आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस.

आजच्या लेखात आपण ह्याच जागतिक अन्न सुरक्षा दिनाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी असतो?

जागतिक अन्नसुरक्षा दिन दरवर्षी 7 जुन रोजी साजरा केला जात असतो.

2022 मध्ये जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा केला जाणार आहे?

2022 मध्ये 7 जुन रोजी मंगळवारी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जाणार आहे.

See also  भारतातील सर्वोत्तम दहा बँक - 2021  - List of top Indian Banks in Marathi

जागतिक अन्नसुरक्षा दिवस का साजरा केला जातो?

जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्याचे मुळ उददिष्ट काय आहे?

अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या तीन अत्यंत मुलभुत गरजा आहेत.या तिघांशिवाय आपण जगुच शकत नसतो.पण या तिघेही गरजांमध्ये आपली सगळयात महत्वाची गरज चांगले आणि पौष्टिक अन्न आहे.

कारण आपण एकवेळ एकच कपडा महिनाभर घालुन राहु शकतो.झोपडीत राहुन दिवस धकवू शकतो.पण विना अन्नाचे आपण राहुच शकत नाही.दोन तीन दिवस जरी आपण अन्न नाही खाल्ले तर आपल्या शरीराची उर्जा नाहीशी होत असते.काहीजण तर उपासमारीने तसेच खराब अन्न खाल्याने अन्न विषबाधा होऊन मृत्यु देखील पावतात.

यावरून आपणास कळुन येते की पोटाला पुरेसे अन्न मिळणे ते देखील पौष्टिक आणि चांगले अन्न मिळणे आपल्या जिवंत राहण्यासाठी किती गरजेचे आहे?

म्हणुन संपुर्ण जगाला अन्नाच्या सुरक्षेचे महत्व कळावे जनतेने दुषित आहाराचे सेवण करू नये.यासाठी हा दिवस साजरा करतात.

आणि जागतिक अन्न सुरक्षा संघटनेचे देखील असे म्हणने आहे की आज दरवर्षी लाखोच्या संख्येत लोक दुषित आणि खराब अन्नाचे सेवण केल्याने अन्न विषबाधा होऊन आपले प्राण गमावत आहेत.

याचसाठी संपुर्ण जगामध्ये अन्नाच्या सुरक्षेविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी जागतिक पातळीवर जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा साजरा केला जातो.

जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी कसा साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य संघटनेकडुन WHO आणि संयुक्त राष्ट्रांचे अन्न आणि कृषी संघटना,FAO चे सदस्य असलेले इतर देश,संस्था इत्यादींच्या सहकार्याने दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस संयुक्तपणे साजरा केला जातो.

यादिवशी अन्नाच्या सुरक्षेबाबत जनतेमध्ये जागृती केली जाते.अन्नाच्या सुरक्षेविषयी सजगता निर्माण केली जाते.

जर आपल्याला आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल नेहमी निरोगी राहायचे असेल तर त्यासाठी आपण उत्तम दर्जेदार आणि पौष्टिक अन्नाचे सेवण करणे किती गरजेचे आहे हे ह्या दिवशी लोकांना सांगितले जाते.

See also  Stream म्हणजे काय, कोणत्या संदर्भात वापरला जातो ? । What is stream Meaning , What are different contexts?

खराब अणि दुषित अन्नाचे सेवण केल्याने आपल्या आरोग्याचे किती नुकसान होते आपल्याला कसे अलग अलग आजार जडतात हे लोकांना सांगितले जाते.

बाहेरील खाद्य पदार्थ खरेदी करताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी?

● आपण जो खाद्य पदार्थ खरेदी करतो आहे त्याची गुणवत्ता दर्जा कसा आहे तो खाद्यपदार्थ पौष्टिक आहे की नाही हे आधी आपण बघायला हवे.

● पँकेटमध्ये बंद असलेला कुठलाही खाद्य पदार्थ खरेदी करताना आधी त्याची एक्सपायरी डेट काँलिटी तो खाद्य पदार्थ कुठल्या कंपनीचा आहे त्याची गुणवत्ता कशी आहे हे एकदा तरी आपण चेक करून घ्यायला हवे.

जागतिक अन्न सुरक्षा दिवसाविषयी वारंवार विचारले जाणारे काही इतर महत्वाचे प्रश्न –

1)अन्न सुरक्षा दिवस कधीपासुन साजरा केला जाऊ लागला?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे 2018 पासुन हा दिवस साजरा केला जाऊ लागला होता.

2)पहिला जागतिक अन्नसुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला होता?

पहिला जागतिक अन्नसुरक्षा दिवस 2019 मध्ये साजरा करण्यात आला होता.

3)2021 मधील जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम काय होती?

2021 मधील जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम निरोगी उद्यासाठी आजचे सुरक्षित अन्न For healthy tomorrow today safe food ही होती.

4)2022 च्या जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम काय आहे?

2022 च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम सुरक्षित अन्न आणि चांगले आरोग्य safe food and better health ही आहे.

5) जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे महत्व काय आहे?

यादिवशी अन्नाच्या सुरक्षेचे महत्व लोकांना पटवून दिले जाते.अन्न सुरक्षेविषयी जनजागृती केली जाते.दुषित आणि खराब अन्न खालल्याने आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हे लोकांना समजावून सांगितले जाते.

6) FAO चा फुलफाँर्म काय होतो?

एफ ए ओचा फुलफाँर्म food and agriculture organization असा होतो.

See also  पालक दिन महत्व,कोट्स,संदेश,शुभेच्छा - Parent day quotes,message,wishes in Marathi

7) FAO काय आहे?

संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना FAO
ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे जी खाद्य, पोषण आणि अन्नसुरक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या जात असलेल्या सर्व प्रयत्नांचे नेतृत्व करते.

8) FSSAI चा फुलफाँर्म काय होतो?

एफ एस आयचा फुलफाँर्म food safety and standard authority of India असा होतो.

9) FSSAI काय आहे?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेली एक वैधानिक संस्था म्हणून ओळखले जाते.

10) FSSAI ची स्थापणा कशा अंतर्गत करण्यात आली आहे?

एफ एस आयची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानके,2006 अंतर्गत करण्यात आली आहे.

11)FSSAI ची निर्मिती का करण्यात आली आहे?

एफ एस आयची निर्मिती अन्नाच्या वस्तूंसाठी विज्ञान आधारित मानके तयार करायला करण्यात आली आहे.

याचसोबत एफ एसआयच्या स्थापणेचे अजुन एक उददिष्ट आहे ते म्हणजे मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

याचसोबत सर्व अन्न पदार्थाचे उत्पादन,साठवण,वितरण,विक्री आणि आयात यांचे नियमन करण्याचे काम देखील एफ एस एस आय स्वता करते.