गॅसलाइटिंग नेमके काय आहे- भावनिक अत्याचार – What is Gaslighting 

गॅसलाइटिंग: भावनिक अत्याचार – What is Gaslighting


आपला स्वभाव मनमिळावू आहे, कायम दुसऱ्याच्या मदतीला धावून येता पण समोरची व्यक्ती तुमाला खोटं ठरवत, तुमचच्या कडून न झलेल्या चुका तुमच्या वर थोपवतात ,तुमी न बोललेले वाक्य तुमच्या तोंडी टाकून तुमाला खोटं ठरवलं जाते, क्षुल्लक चुकीवरून मानहानी केली जाते. थोडं जरी चूक झाली तरी तुमच्या वागण्या बाबत राईचा पर्वत उभा केला जातो. आपल्या बाबत कायम दोष आणि शंका उपस्थित केल्या जातात , असा अनुभव आपल्याला येत असेल तर आपण नक्कीच हा लेख वाचला पाहिजे.

गॅसलाइटिंग नेमके काय आहे

गॅसलाइटिंग हा भावनिक अत्याचाराचा एक प्रकार आहे जिथे एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीला स्वत: च्या समज, आठवणी आणि विवेकबुद्धीवर शंका घेण्यास भाग पाडते.
यात एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीचे त्याचे काही अनुभव असतील काही भावना असतील त्यालाच नाकारतो, त्यांचे शब्द हेरफेर करून खोटे ठरवतो आणि इतकं खोट बोलतो की दुसर्या व्यक्तीला स्वतःच्या वास्तविकतेबद्दल प्रश्न निर्माण होतात.

थोडक्यात गॅसलायटिंग म्हणजे एकाद्या व्यक्तींवर भावनिक अत्याचार करणे, त्याचा भावनांचा गैरफायदा घेऊन त्यालाच वेड्यात काढणे.

Gaslighting is a form of emotional abuse where a person manipulates another person into doubting their own perceptions, memories, and sanity.

गॅसलाइटिंग प्रकार अगदी लहान किंवा मोठ्या प्रमाणातअसू , रोमँटिक नात्यात, कुटुंबातील सदस्या मध्ये, मित्रमंडळीतकिंवा आपल्या ऑफिस, कामाच्या ठिकाणी अशा विविध नात्यात होऊ शकते.
गॅसलाइटिंगचे परिणाम वाईट असतात , ज्यामुळे पीडित व्यक्तीला गोंधळ, चिंताग्रस्त आणि उदास वाटू लागते आणि यामुळे त्यांना स्वत: ची काहीच किंमत नाही असे वाटते आणि आत्मविश्वास ही कमी होऊ लागतो.

उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधित घेण्याची काळजी

या प्रकारच्या गैरवर्तनापासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी गॅसलाइटिंगची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे.

भावनिक असाल, मनस्थिती ठीक नसली की काही प्रकारात असे वाटते की आपण कोणत्या गोष्टीवर ठाम नसतो ,कायम द्विधा मनस्थिती असते, एखाद्या व्यक्तीशी बोलल्या नंतर कायम गोंधळलेले किंवा निराश राहता, आणि आपल्या वास्तविकतेबद्दल भावनेला समोरचा सतत आव्हान देतो किंवा नाकारत असतो. आपल्याला असे कुणी गॅसलिट करत आहे असा संशय असल्यास, विश्वासू मित्र किंवा थेरपिस्ट सोबत याबाबत बोलन महत्त्वाचे असते

तसेच आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या अश्या व्यक्तीबरोबर कुठं पर्यन्त संबंध ठेवले पाहिजे या बाबत विचार करा ,अश्या व्यक्ती पासून दूर राहणे केव्हाही मनशांती करता चांगले.

गॅसलाइटिंगशी संबंधित 15 सामान्य वाक्ये आहेत: 24 Common Gaslighting Phrases

गॅसलाइटिंगशी संबंधित 15 सामान्य वाक्ये आहेत 24 Common Gaslighting Phrases
What is Gaslighting 
What is Gaslighting

गॅसलाइटिंगशी संबंधित 24 सामान्य वाक्ये आहेत | 24 Common Gaslighting Phrases

खाली काही गॅस लायटिंग प्रकारात वापरली जाणारी नेहमीचे वाक्य देत आहोत त्या वरून आपल्याला अंदाज येईल की कुणी आपल्याला त्रास देत आहे का

  1. आपण फक्त कल्पना च करत आहात.
  2. असे कधीच घडले नाही.
  3. तू जरा जास्त मनावर घेतेस .
  4. तू वेडा आहेस.
  5. तू जास्त ओव्हर रिऍक्शन देतोय
  6. तू राईचा पर्वत करतेय
  7. तू वेडा आहेस.
  8. आपण गोष्टी रचत आहात.
  9. मी ते कधीच बोललो नाही
  10. मी असे केलंच नाही
  11. तुला काहीही कळत नाही
  12. तू विनाकारण भांडण उकरून काढतोय, काढतेय
  13. तुला फक्त भांडण च हवं
  14. तुला फक्त निम्मित चं हवे
  15. खरा प्रॉब्लेम तुझ्यातच आहे
  16. काही सांगितले तुला पटत नाही
  17. अवघड आहे तुझं तू काय म्हणतोय,
  18. बोलतोय मला काही कळत नाही,
  19. कशाबद्दल बोलत आहे हे मला माहिती नाही
  20. तू एकटाच नाही ,तुला वाटत तू एकटाच आहे.
  21. तुला फक्त मला टार्गेट करायचं आहे
  22. मी स्वता ऐकलं तुला बोलताना
  23. मला ऐकू आलेच नाही.
  24. फक्त लक्ष शोधत आहात.

Conclusion-

कुणी आपल्यावर किती ही शंका घेत असेल ,खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपल्या स्वतःच्या अनुभवा ,समज वर आणि भावनांवर विश्वास ठेवणे महत्वाचे आणि तितकंच गरजेचं असते , तेव्हा अश्या वरील दिलेल्या वाक्यानं ओळखा आणि संभाव्य गॅस लायटिंग किंवा भावनिक अत्याचार पासून स्वतःला सुरक्षित करा आणि हवं तिथे कुटुंबाची आणि जवळच्या मित्रांची मदत घ्या

Dr. Kat Lindley
@KLVeritas
·
Jan 16
Replying to
@KLVeritas
The term “gaslighting” comes from the 1944 movie Gaslight. In the movie, an husband brightens and dims gas powered lights, then insists that his wife is hallucinating. This causes her to doubt her sanity.
2/8
Dr. Kat Lindley
@KLVeritas
·
Jan 16
Examples of gaslighting:

Countering: This tactic involves an person questioning someone’s memory of events, even though they have remembered them correctly.
3/8