Food poisoning म्हणजे काय ? कारण , लक्षण व उपचार – Food poisoning information in Marathi

Food poisoning विषयी माहीती – Food poisoning information in Marathi

आज बाहेरील उघडयावरील रस्त्यावरील विक्रीस असलेल्या अन्नपदार्थाचे सेवन केल्याने अन्नातुन अनेक जणांना फुड पाँईझनिंग होण्याचा त्रास होत असतो.

ज्यामुळे आपल्याला रोजचे दैनंदिन काम करणे देखील कठिन जात असते.

यातुन आपली सुटका व्हावी म्हणुन आपण शक्य ते प्रयत्न देखील करत असतो.पण तरीही आपली समस्या मुळापासुन संपुष्टात येत नसते.

जर आपल्याला देखील फुड पाँईझनिंगचा त्रास होत असेल तर आपण आजचा हा लेख काळजीपुर्वक वाचा कारण यात आपण फुड पाँईझनिंग विषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

Food poisoning म्हणजे काय?

एखाद्या खराब झालेल्या अन्नपदार्थाचे सेवण केल्याने जी स्थिती उदभवत असते तिला फुड पाँईझनिंग असे म्हणतात.

काही लोकांना ही समस्या उदभवल्यानंतर लगेच बरी देखील होऊन जात असते.पण काही जणांना यामुळे अनेक शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागते.

Food poisoning चा मराठीत काय अर्थ होतो?(food poisoning meaning in marathi)

Food poisoning चा मराठीत अन्नातुन झालेली विषबाधा असा अर्थ होत असतो.

Food poisoning कोणत्या बँक्टेरियामुळे होत असते?

अन्न विषबाधेच्या बहुतेक प्रकरणांत अन्न हे बॅक्टेरिया,जसे की साल्मोनेला किंवा एस्चेरिचिया कोलाई (ई. कोली),किंवा नोरोव्हायरस सारख्या विषाणूमुळे दूषित होत असते.

कमीतकमी 250 विविध प्रकारचे अन्न विषबाधा दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

परंतु सर्वात सामान्य ई.कोली लिस्टेरिया,साल्मोनेला आणि नोरोव्हायरस ज्याला सामान्यत पोटाचा फ्लू म्हणतात.

इतर कमी सामान्य आजार जे अन्न किंवा अन्न हाताळणीतून हस्तांतरित होऊ शकतात ते म्हणजे बोटुलिझम,कॅम्पिलोबॅक्टर,व्हिब्रिओ आणि शिगेला.

Food poisoning ची लक्षणे कोणकोणती आहेत?

आज कोणालाही अन्नातुन विषबाधा होऊ शकते ज्याची काही लक्षणे देखील असतात.आणि ही लक्षणे आपल्याला आपल्यात आढळुन येत असतील तर आपण त्वरीत डाँक्टरांशी संपर्क साधायला हवा.

See also  जीएफ बी एफ अणि बीएफ एफ म्हणजे काय?- GF,BF and BFF meaning in Marathi

Food poisoning ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

1)पोट दुखणे –
सर्वसामान्यपणे पोटदुखी ह्या लक्षणापासुन फुड पाँईझनिंग सुरू होत असते.

ज्यात हे आपणास पहिल्या दृष्टीक्षेपात नाँरमल पोटदुखीसारखे वाटत असते.म्हणुन आपण कुठलाही निष्कर्ष काढण्याअगोदर डाँक्टर,वैदयकीय चिकित्सकांचा एकदा सल्ला नक्की घ्यायला हवा.

2) ताप येत असतो-
पोटदुखीबरोबर फुड पाँईझनिंगचे दुसरे लक्षण ताप येणे देखील असु शकते.म्हणुन आपल्याला ताप आल्यास आपण याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरीत डाँक्टरांकडे जावे.

3) वारंवार वांत्या होणे,मळमळ होणे –
जर आपल्याला वारंवार वांत्या होत असतील तर आपण कुठलाही हलगर्जीपणा न करता डाँक्टरांकडे चेक अपसाठी जायला हवे.कारण फुड पाँईझनिंगचे तिसरे लक्षण वारंवार उलटी होणे देखील असु शकते.

4) डोके दुखणे :
फुड पाँईझनिंगची अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फुड पाँईझनिंग झाल्यावर आपल्याला डोके दुखीचा देखील त्रास होत असतो.

म्हणून आपले डोके दुखत असेल तर आपण एकदा डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.

5) शरीरात अशक्तपणा जाणवने –
फुड पाँईझनिंगचे अजुन एक लक्षण आहे.ते म्हणजे शरीरात अशक्तपणा जाणवने.

जर आपल्याला अचानक अशक्तपणा जाणवू लागत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष न करता डाँक्टरांकडे तपासणीसाठी नक्की जायला हवे.

6) भुक न लागणे –
भुक न लागणे हे देखील फुड पाँईझनिंगचेच एक लक्षण आहे.जर आपल्याला भुक लागत नसेल तर आपण डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.

7) अतिसाराचा त्रास होणे –
हे देखील फुड पाईझनिंगचे एक प्रमुख लक्षण आहे.म्हणुन आपणास जर अतिसाराचा त्रास होत असेल तर आपण त्वरीत डाँक्टरांकडे तपासणीसाठी जायला हवे.

Food poisoning ची इतर प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

● 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारा अतिसाराचा त्रास होणे.
● अंगामध्ये 102°F (38.9°C) पेक्षा जास्त ताप असणे.
● पाहताना किंवा बोलताना अडचण येणे
● गंभीर निर्जलीकरणाची लक्षणे,ज्यामध्ये तोंड कोरडे होणे,लघवी कमी होणे आणि द्रवपदार्थ खाली ठेवण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असू शकतो.
● तसेच रक्तरंजित मूत्र

See also  पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मधील फरक- Difference Between Police Custody And Judicial Custody In Marathi

यापैकी कोणतीही लक्षणे आपणास आढळल्यास,आपण डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधायला हवा किंवा ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यायला हवे.

Food poisoning ची कारणे कोणकोणती असतात?

फुड पाँईझनिंग होण्याची पुढीलप्रमाणे अनेक कारणे असतात-

1) बँक्टेरियाच्या जिवाणु विषाणुंच्या संपर्कात येणे –

अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमुख कारण असते बँक्टेरिया म्हणजेच जीवाणुंच्या तसेच विषाणुंच्या संपर्कात येणे.

अँण्टी बायोटिक्स घेऊन यावर उपचार केला जाऊ शकतो पण तरी देखील आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

हे रोगजनक आपण खात असलेल्या जवळजवळ सर्व अन्नांवर आढळुन येत असतात.

तथापी स्वयंपाक करतानाची उष्णता सामान्यत अन्नपदार्थांना आपल्या ताटात पोहोचण्यापूर्वी त्यातील रोगजनकांना मारत असते.

कच्चे खाल्लेले अन्न हे देखील फुड पाँईझनिंगचे सामान्य स्त्रोत आहे कारण ते अन्न स्वयंपाक प्रक्रियेतून गेलेले नसते.ते नीट व्यवस्थित शिजवलेले नसते.

अधूनमधून आपले अन्न विष्ठेतील जीवांच्या संपर्कात देखील येत असते.जेव्हा एखादी आजारी व्यक्ती स्वयंपाक बनवत असते.आणि स्वयंपाक तयार करण्यापूर्वी बाथरूम वरून आल्यावर स्वच्छ हात धुवत नसते तेव्हा असे होण्याची शक्यता असते.

मांस अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ वारंवार दूषित होत असतात.आजारपणास कारणीभूत असलेल्या जीवांमुळे पाणी देखील दूषित बनत असते.

दुषित-तसेच-खराब-अन्नाचे-सेवण-करणे-Food-poisoning-information-in-Marathi

 

2) दुषित तसेच खराब अन्नाचे सेवण करणे –
आपल्या खाण्यापिण्याचा आपल्या आरोग्यावर चांगला तसेच वाईट परिणाम देखील होत असतो.जर आपण उघडयावरील तसेच दुषित,खराब,अन्नपदार्थ खाल्ले तर याने देखील आपल्याला फुड पाँईझनिंग होत असते.

3) पोटाच्या समस्या असणे :
ज्या व्यक्तींना पोटाशी संबंधित आजार तसेच समस्या असतात अशा व्यक्तींना फुड पाँईझनिंग होण्याची संभावना अधिक जास्त असते.
उदा,बदधकोष्ठता,गँसचा त्रास इत्यादी.

4) शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे-
ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असते अशा व्यक्तींना कमजोर प्रतिकारशक्तीमुळे फुड पाँईझनिंगची लागण लवकर होत असते.

5) एखादे अनुवांशिक कारण असणे-

अनेक रोग असे असतात ज्याचे कारण अनुवांशिक असते. यामध्ये फूड पॉयझनिंगचाही समावेश होतो.त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात कोणाला अन्नातून विषबाधा झाली असेल,तर त्यानी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

Food poisoning किती काळ टिकत असते?

फुड पाँईझनिंगची लक्षणे दिसण्यासाठी किती वेळ लागु शकतो हे सर्व फुड पाँईझनिंगच्या संक्रमणाच्या स्त्रोतावर अवलंबून असते.

See also  पेटंट म्हणजे काय (Patent Information In Marathi ) -

परंतु हे 30 मिनिटांपर्यंत ते 8 आठवड्यांपर्यंत देखील असू शकते.उपचार केल्यावर किंवा उपचार न करता देखील बहुतेक प्रकरणात फुड पाँईझनिंगचे 1 आठवड्यात निराकरण होत असते.

Food poisoning वर कोणकोणते उपचार केले जाऊ शकतात?

फुड पाँईझनिंग ही अन्नाशी संबंधित खुप मोठी आणि गंभीर समस्या असली तरी यावर आपण पुढीलप्रमाणे उपचार देखील करू शकतो.

1) गोळया औषध घेणे –
फुड पाँईझनिंग बरे करण्याचा सगळयात महत्वाचा आणि सोप्पा उपाय म्हणजे डाँक्टरांनी दिलेली गोळया औषधे घेणे.याने फुड पाँईझनिंग लवकरात लवकर बरा होत असतो.

2) ORS घेणे –
औषधे घेण्यासोबत अन्न विषबाधेवरील उपचारात ORS पिणे देखील फायदेशीर ठरत असते.

अन्न विषबाधे दरम्यान मानवी शरीरात पाण्याची कमतरता भासत असते आणि ORS हीच कमतरता भरून काढण्यास आपणास मदत करत असते.

3) साधे आणि हलके अन्न खाणे –

फुड पाँईझन हे खराब,दुषित तसेच उघडयावरील तेलगट तसेच मसालेदार पदार्थ खालल्याने होत असते.म्हणून फुड पाँईझनिंग झाल्यावर आपण दाळ आणि खिचडी सारखे साधे हलके आणि कमी मसालेदार अन्न खायला हवे.

Food poisoning वर करायचे इतर घरगुती उपाय –

घरगुती उपचार हा कोणताही रोग बरा करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो.कारण याचा आपल्या मानवी शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होत नसतो.

त्यामुळे फुड पाँईझन ग्रस्त व्यक्ती खालील घरगुती उपायांचा अवलंब करून यापासून मुक्त होऊ शकते-

1) व्हिनेगारचा वापर करणे –
फुड पाँईझनिंगवरील उपचारात व्हिनेगारचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो.अभ्यासातुन असे सिदध देखील झाले की व्हिनेगार फुड पाँईझनमध्ये आराम देत असते.

2) आल्याचा रस पिणे –
आल्याचा रस पिऊन देखील घरगुती उपचार करून आपण फुड पाँईझनिंग बरे करू शकतो.

3) दही खावी-
जर आपणास अन्नातुन फुड पाँईझन झाले असेल तर आपण खाण्यात दही वापरायला हवी.दही ही पोटात दव आणत असते आणि फुड पाँईझनिंगचा आजार बरा करण्यास मदत करत असते.

4) लिंबुपाणी घेणे –
फुडपाँईझनिंग झाल्यावर आपण लिंबु पाणीचे सेवण देखील करू शकतो.

5) केळी खावी-
फुड पाँईझनिंग झाल्यास आपण केळी खायला हवी.कारण हा देखील फुड पाँईझनिंगवरील एक उत्तम पर्याय मानला जातो.

Food poisoning होऊ नये म्हणुन आपण काय करायला हवे?

आपल्याला फुड पाँईझनिंग होऊ नये म्हणून आपण
सर्व फळे भाज्या नीट स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे.मग खावीत.कुठलाही अन्न पदार्थ खाण्याअगोदर तो नीट शिजवून घ्यावा.
उदा,मांस,अंडी,भाज्या

बाहेरचे उघडयावरील तेलगट,मसालेदार तसेच कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे.खराब,दुषित अन्न तसेच खराब दुषित पाण्याचे सेवण करणे टाळायला हवे.

बाथरूमवरुन जाऊन आल्यावर स्वच्छ हात धुवावे.जेवणाअगोदर देखील हात स्वच्छ धुवावे.नेहमी आपले एक रूटीन चेक अप डाँक्टरांकडुन करून घेत जावे.