27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीती,महत्व आणि वैशिष्ट्य – 27 Nakshatra information in Marathi

27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीती-Nakshatra information in Marathi

 मित्रांनो वैदिक ज्योतिष शास्त्रात असे स्पष्टपणे नमुद केले आहे की नक्षत्र हा पंचांगाचा एक अत्यंत महत्वपुर्ण भाग आहे.याचसोबत आपण जेव्हा भारतीय ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास करतो तेव्हा आपणास असे दिसुन येते की भारतीय ज्योतिष शास्त्रात नक्षत्राला चंद्र महल म्हणुन देखील संबोधिले जाते.

आज कित्येक लोक आपल्याला ज्योतिष शास्त्राचे विश्लेषण तसेच भविष्यवाणी करण्यासाठी नक्षत्रांच्याच संकल्पणेचा वापर करताना आपणास दिसुन येतात.आज शास्त्रानुसार सांगायचे म्हटले तर नक्षत्रांची एकुण संख्या २७ असलेली आपणास आढळुन येते.

आजच्या लेखात 27 Nakshatra information in Marathi आपण ह्याच २७ नक्षत्रांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

नक्षत्र कशाला म्हणतात?

आकाशात आपल्याला जे लहान तसेच मोठया आकाराचे तार्‍यांचे समूह दिसुन येत असतात त्यांनाच आपण नक्षत्र असे म्हणत असतो.वैदिक तसेच ज्योतिष शास्त्रात नक्षत्रांना खुप महत्वाचे स्थान असलेले आपणास दिसुन येते.कारण नक्षत्रामध्ये इतकी शक्ती असते की ते कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकते.

 आपण जर संपूर्ण आकाशाला 12 समान भागात विभाजित केलं तर येणाऱ्या प्रत्येक भागाला राशी म्हटलं जातं आणि आपण जेव्हा आकाशाला  27 भागात विभागतो तेव्हा येणार्‍या  प्रत्येक भागाला नक्षत्र म्हटल जाते. 

 • वृत्तीय आकारा सारखच आकाश सुदधा 360 डिग्री चं असते. या 360 कोनाला जर 12 विभागात विभाजन केले तर  एका  राशीच  चिन्ह 30 डिग्रीत मिळते.  तसेच नक्षत्र च , जर 360 कोनाला 27 भागात विभागल तर  तर एक नक्षत्र 13.33डिग्रीत च्या रुपात येते.  म्हणहूनच एकूण नक्षत्र हे  27 असतात आणी एकूण राशी या 12 असतात.  म्हणजे एका मोठया राशीत साधरण 2.25 नक्षत्र सामावतात
 • याचसाठी आपण आपली नक्षत्र नेहमी अनुकुल राहावी म्हणुन नेहमी पुजा पाठ,जपतप,उपवास इत्यादी करत असतो.

नक्षत्रांचे पौराणिक दृष्टया काय महत्व आहे? -27 Nakshatra information in Marathi

 पौराणिक दृष्टया पाहावयास गेले तर नक्षत्रांना खुप महत्व असलेले आपणास दिसुन येते.याला कारण नक्षत्रास आपण दक्ष प्रजापतीची कन्या म्हणुन ओळखत असतो.

पुराणात असे नमुद केलेले आपणास दिसुन येते की त्रषी मुनींनी आकाशाचे बारा भागात विभाजन केले होते.ज्याची ओळख आपल्याला बारा राशींचे राशी भविष्य ह्या नावाने असलेली दिसुन येते.

पण ह्याच राशींचे अत्यंत सुक्ष्म पदधतीने अध्ययन करता यावे म्हणुन याचे देखील अजुन सत्तावीस भागात विभाजन देखील करण्यात आले होते.

नक्षत्रांद्वारे कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची क्षमता,आंतरीक दृष्टीकोन आणि त्याच्या इतर वैशिष्टयांचे विश्लेषण देखील करता येत असते.

आज कित्येक लोक आपल्याला ज्योतिष शास्त्राचे सविस्तर विश्लेषण तसेच भविष्यवाणी करण्यासाठी म्हणजेच एखाद्याचे भविष्य सांगण्यासाठी नक्षत्रांच्याच संकल्पणेचा वापर करताना ठिकठिकाणी आढळुन येतात.

See also  आर्थिक नियोजनाचे महत्व - Financial Planning In Marathi

नक्षत्रे किती आहेत आणि कोणकोणती आहेत? -27 Nakshatra information in Marathi

नक्षत्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 • अश्विनी नक्षत्र
 • भरणी नक्षत्र
 • कृत्तिका नक्षत्र
 • रोहिणी नक्षत्र
 • मृगशिरा नक्षत्र
 • आर्द्रा नक्षत्र
 • पुनर्वसु नक्षत्र
 • पुष्य नक्षत्र
 • आश्लेषा नक्षत्र
 • पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
 • उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
 • हस्त नक्षत्र
 • चित्रा नक्षत्र
 • स्वाति नक्षत्र
 • विशाखा नक्षत्र
 • अनुराधा नक्षत्र
 • ज्येष्ठा नक्षत्र
 • मूल नक्षत्र
 • पूर्वाषाढ़ा नक्षत्र
 • उत्तराषाढ़ा नक्षत्र
 • श्रवण नक्षत्र
 • धनिष्ठा नक्षत्र
 • शतभिषा नक्षत्र
 • उत्तरा भाद्रपद नक्षत्र
 • रेवती नक्षत्र
 • पूर्वा भाद्रपद नक्षत्र
 • मघा नक्षत्र

वरील सर्व नक्षत्रांची दोन गटात विभागणी केली जाते.

 • शुभ नक्षत्र
 • अशुभ नक्षत्र
 • इतर अन्य नक्षत्र

1) शुभ नक्षत्र :

सर्व नक्षत्रांमध्ये एकुण 15 नक्षत्रे ही शुभ नक्षत्र असलेली आपणास दिसुन येते.आणि आपण ह्या नक्षत्रांमध्ये जे कार्य करत असतो त्या कामात आपल्याला यश देखील प्राप्त होत असते.

ह्या शुभ नक्षत्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 • अश्विनी नक्षत्र :अश्विनी नक्षत्र ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी केतु असलेला आपणास दिसुन येतो.
 • रोहिणी नक्षत्र : ह्या नक्षत्राचा स्वामी चंद्र असलेला आपणास दिसुन येतो.
 • चित्रा नक्षत्र : ह्या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे.
 • रेवती नक्षत्र : ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी बुध आहे.
 • हस्त नक्षत्र :हस्त नक्षत्राचा मुख्य स्वामी चंद्र आहे.
 • पुष्य नक्षत्र : पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत.
 • मृगशिरा नक्षत्र : ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी मंगळ असल्याचे आपणास दिसुन येते.
 • घनिष्ठा नक्षत्र :ह्या नक्षत्राचा स्वामी देखील मंगळ असल्याचेच आपणास दिसुन येते.
 • उत्तरा भाद्रपद नक्षत्र : ह्या नक्षत्राचे स्वामित्व शनिदेव यांच्याकडेच आहे.
 • उत्तरा फाल्गुणी नक्षत्र : ह्या नक्षत्राचे मुख्य स्वामी सुर्यदेव आहेत.
 • पुनर्वसु नक्षत्र : ह्या नक्षत्राचे स्वामी बृहस्पती आहेत.
 • स्वाती नक्षत्र : स्वाती ह्या नक्षत्राचा स्वामी राहु असलेला आपणास आढळुन येते.
 • अनुराधा नक्षत्र : अनुराधा नक्षत्राचा स्वामी देखील शनिच आहे.
 • उत्तराषाठा नक्षत्र : उत्तराषाठा नक्षत्र ह्या नक्षत्राचा स्वामी देखील सुर्य आहे.
 • श्रवण नक्षत्र : ह्या नक्षत्राचा स्वामी चंद्र असलेला आपणास दिसुन येतो.

2) अशुभ नक्षत्र :

असे म्हटले जाते की अशुभ नक्षत्रात आपण जे काम करत असतो ते कधीच पुर्ण होत नसते त्यात काही ना काही अडचण किंवा अडथळे आपल्याला नेहमी येतच असतात.अशुभ नक्षत्र हे आपल्या कामामध्ये दोष उत्पन्न करण्याचे काम करत असतात.

अशुभ नक्षत्रे ही एकुण चार आहेत.ज्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

 • कृतिका नक्षत्र :कृतिका नक्षत्राचा स्वामी हा सुर्य असलेला आपणास दिसुन येतो.
 • भरणी नक्षत्र :भरणी ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी शुक्र आहे.
 • मघा नक्षत्र :ह्या नक्षत्राचा स्वामी केतु असलेला आपणास आढळुन येते.
 • अश्लेषा नक्षत्र :अश्लेषा ह्या नक्षत्राचा स्वामी बुध असलेला आपणास दिसुन येते.

3)इतर अन्य ज्योतिष नक्षत्रे :

ज्योतिष शास्त्रात जशी काही शुभ आणि अशुभ नक्षत्रे दिलेली आहेत तशीच काही अन्य नक्षत्रे देखील दिलेली आहेत.ही नक्षत्रे खुप शुभही नसतात आणि खुप अशुभही मानली जात नाही.

पण एक गोष्ट आहे की आपण ह्या नक्षत्रात आपले कोणतेही एखादे महत्वपुर्ण तसेच मोठे काम करणे,मोठा निर्णय घेणे हे योग्य मानले जात नाही.ह्या नक्षत्रात आपण फक्त आपली सर्वसामान्य कार्येच पार पाडायला हवीत.

See also  गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा - Ganesh chaturthi story in Marathi

ह्या नक्षत्रांची संख्या एकुण आठ असते.

इतर अन्य नक्षत्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) ज्येष्ठा नक्षत्र : ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी बुध असलेला आपणास दिसुन येतो.

2) पुर्वाषाढा नक्षत्र : ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी शुक्र असलेला आपणास आढळुन येते.

3) विशाखा नक्षत्र : ह्या नक्षत्राचा प्रमुख स्वामी बृहस्पती असलेला आपणास दिसुन येते.

4) मुल नक्षत्र : ह्या नक्षत्राचा स्वामी केतु आहे.

5) आद्रा नक्षत्र : आर्द्रा ह्या नक्षत्राचा स्वामी राहु असतो.

6) शतभिषा नक्षत्र : शतभिषा ह्या नक्षत्राचा स्वामी देखील राहुच असलेला आपणास दिसुन येतो.

7) पुर्वा भाद्रर्पद नक्षत्र : पुर्वा भाद्रपद ह्या नक्षत्राचे स्वामित्व बृहस्पतीकडे असते.

8) पुर्वा फाल्गुणी नक्षत्र :ह्या नक्षत्राचा मुख्य स्वामी शुक्र असलेले आपणास आढळुन येते.

नक्षत्र आणि राशी ह्या दोघांमध्ये काय फरक आहे?

नक्षत्र आणि राशी यात काही फारसे अंतर नाहीये पण यात थोडासा महत्वाचा फरक देखील आहे जो आपण जाणुन घेणे फार गरजेचे आहे.

जेव्हा आकाशाची विभागणी आपण बारा भागात करत असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक भागाला राशी म्हटले जाते पण त्याच ठिकाणी जर आपण आकाशाची विभागणी बारा भागात न करता 27 भागांत केली तर त्या प्रत्येक भागाला नक्षत्र असे संबोधिले जात असते एवढाच फरक नक्षत्र आणि राशी ह्या दोघांमध्ये असलेला आपणास दिसुन येतो.

नक्षत्रांची एकुण संख्या 27 आणि राशींची एकुण संख्या बारा का असते?

आज आपल्याला सर्वाना प्रश्न पडत असतो की जर नक्षत्रांची एकुण संख्या 27 असते तर राशींची संख्या त्यापेक्षा कमी म्हणजे बाराच का असते.

तर आपल्या ह्या प्रश्नाचे उत्तर आपण एका उदाहरणाद्वारे समजुन घेऊयात.

आपल्या सर्वाना हे चांगलेच माहीत असेल की आभाळ हे 360 डिग्रीचे असते.आणि ह्याच 360 डिग्रीचे विभाजन जर बारा भागात करण्यात आले तर आपल्याला एक रास ही 30 डिग्रीच्या स्वरूपात उपलब्ध होत असते.

आणि अशाच पदधतीने नक्षत्रांसाठी 360 डिग्रीचे विभाजन एकुण सत्तावीस भागांमध्ये करण्यात आले तर

एक नक्षत्र आपल्याला 13.33 च्या स्वरुपात प्राप्त होत असते.

म्हणुनच राशींची एकुण संख्या ही बारा असते आणि नक्षत्रांची एकुण संख्या 27 असलेली आपणास दिसुन येते.

नक्षत्र कसे जाणुन घेतात?

 • चंद्र हा नक्षत्रातुन दुसरया नक्षत्रात प्रवेश करत असतो.आणि चंद्र ज्या दिवशी ज्या नक्षत्रात आढळुन येतो ते त्या दिवसाचे नक्षत्र म्हणुन ओळखले जाते.
 • म्हणजेच चंद्र ज्या नक्षत्रात राहतो ते असते व्यक्तीचे चंद्र नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आपणास दिसुन येतो ती त्या व्यक्तीची चंद्र राशी म्हणुन ओळखली जाते.
 • बहतेक जणांना ह्या चंद्रराशीचे ज्ञान असते.सव्वादोन नक्षत्र एकत्र येऊन एक रास होते.याचाच अर्थ चंद्र दोन ते सव्वादोन महिने एकाच राशीमध्ये वास करत असतो.
 • ह्या काळात जो व्यक्तीला जन्माला येत असतो त्या व्यक्तीची एकच असते आणि नक्षत्रे वेगवेगळी असतात.
 • आज आपल्याला एक्सट्रोसेज येथे नक्षत्र कँलक्युलेट करण्यासाठी कँलक्युलेटरची सुविधा देखील प्रदान केली गेली आहे.ज्याचा वापर करून आपल्याला आपल्या जन्मासंबंधित कोणत्याही माहीतीचा शोध घेता येत असतो.
 • ह्या कँलक्युलेटरचा वापर करून आपल्याला आपली रास जन्म आणि नक्षत्र इत्यादी सुदधा जाणुन घेता येते.
See also  बायजूस ( BYJU'S-app) विषयी माहीती What is BYJU'S Learning Marathi information ?

नक्की वाचा – १४ विद्या  आणि ६४ कला

नक्षत्राद्वारे व्यक्तीचा स्वभाव  जाणुन घेता येतो का ?

 होय नक्षत्राद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव देखील जाणुन घेऊ शकतो.

चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?

1)अश्विनी : अश्विनी नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती स्वभावाने फार चंचल आणि चतुर देखील असतात.

2) भरणी : भरणी नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती स्वार्थी प्रवृत्तीचे असतात.हे व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबुन राहत असतात.

3) कृतिका : कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अहंकारी,रागीट आणि आक्रमक स्वभावाचे असतात.

4) रोहिणी : रोहिणी नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती आनंदी स्वभावाचे आणि निर्मळ मनाचे असतात.

5) मृग :मृग नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती बुदधीवादी भोगवादी अशा दोन्ही प्रवृत्तीचे असतात.

6) आद्रा : आद्रा नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती कोणताही निर्णय घेताना दविधा मनस्थितीत पडणारे आणि तापट स्वभावाचे देखील असतात.

7) पुनर्वसु : पुनर्वसु ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती शांत स्वभावाचे असतात.अशा लोकांना पुजा पाठ अध्यात्म अशा गोष्टींत फार रूची असते.

8) अश्लेषा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती स्वभावाने जिददी असतात.आणि कोणावर लवकर विश्वास ठेवत नसतात.

9) मघा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती स्वाभिमानी आणि महत्वाकांक्षी प्रवृत्तीचे असतात.

10) पुर्वा :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती श्रदधाळु स्वभावाचे असतात आणि ह्यांचे कलेवर देखील नितांत प्रेम असते.

11) उत्तरा :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती व्यवहारीक परिश्रमी स्वभावाचे असतात.

12) हस्त :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती हे संवेदनशील आणि समाधानी स्वभावाचे असतात.

13) चित्रा :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती निर्मितीशील आस्वादक स्वभावाचे असतात.

14) स्वाती : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती खंबीर आणि धैर्यशील स्वभावाचे असतात.

15) विशाखा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती स्वताचा मोठेपणा गाजवणारी तसेच जिददी स्वभावाची असतात.

16) अनुराधा :  ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती साजश्रृंगार करण्याची आवड असणारे आणि गोड बोले असतात.

17) ज्येष्ठा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती आपल्या शत्रुवर लपुन आघात करणारे असतात.

18) मुल : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती राजकारणात मुरलेले आणि कलाप्रेमी स्वभावाचे असतात.

19) पुर्वाष्टा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती यांना शांतता अधिक प्रिय असते.यांना जास्त धावपळ करायला आवडत नसते.

20) उत्तराषाठा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती अध्यात्माची आवड असणारे धार्मिक प्रवृत्तीचे असतात.

21) श्रवण : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती कतृत्ववान तसेच वीर स्वभावाचे असतात.

22) धनिष्ठा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती असंयमी रागीट स्वभावाचे असतात.

23) शततारका : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती व्यसनाधिन आणि कामातुर प्रवृत्तीचे असतात.

24) पुष्य :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती हे लोक सगळयाशी हिळुन मिळुन राहत असतात म्हणुन यांचा जनसंपर्क खुप जास्त प्रमाणात असतो.

25) पुर्व भाद्रपदा :ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती

संशोधक प्रवृत्तीचे आणि काळाला धरून चालणारे असतात.

26) उत्तरा भाद्रपदा : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारे मनमोहक स्वभावाचे असतात.

27) रेवती : ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती सत्यवादी आणि समाजासाठी अहोरात्र झटणारे असतात.

कृतिका नक्षत्र विषयी माहिती – Krutika Nakshatra information in Marathi

12 thoughts on “27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीती,महत्व आणि वैशिष्ट्य – 27 Nakshatra information in Marathi”

 1. सामान्य जनांना ही माहिती भरपूर मार्गदर्शन करेल.

 2. धन्यवाद सर, नक्षत्रांची पौराणिक कथा सुद्धा सांगा आणि नक्षत्र आणि भविष्य यावर अजून माहिती द्या

 3. लेख खूप छान वाटला सर्व नक्षत्रांची माहिती आकर्षक रित्या आपण मांडणी केली आहे त्याचबरोबर आपण राशींची ही माहिती त्यासोबत दिली आहे खूप छान

Comments are closed.