विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक आहे ? Marriage Certificate online Procedure

विवाह नोंदणी प्रमाणपत्र  

लग्नाच्या बेडीत अडकल्या नंतर विवाह प्रमाणपत्र हे वधू आणि वरांच्या वैवाहिक बंधनाचे कायदेशीर प्रमाणपत्र देणारा दस्तऐवज आहे. ऑनलाइन सेवे द्वारे व जिल्हा विवाह निबंधक धार्मिक विवाह आणि विशेष विवाह कायद्यानुसार विवाह प्रमाणपत्र देण्यात येते . भारतात हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायदा या दोन नियमांनुसार वधू वरा ला लग्नाची कायदेशीर नोंदणी करता येते.

(महाराष्टा विधिनियम आणि विवाह नोंदणी आधी नियमन 1998 व विवाह नोंदणी नियम 1999 मधील  तरतुदींनुसार )

महाराष्ट्रात विवाह प्रमाण पत्र मिळवण्या साठी प्रक्रिया ;

 विवाह नोंदणी प्रमाण (Marriage Certificate online Procedure) का आवश्यक आहे ?

  • लग्नाचे प्रमाणपत्र कायदेशीर अधिकृत कागदपत्र  म्हणून मान्यता आहे व कायदेशीर प्रकरणात  वापरले जाते
  • बेकायदेशीर होणार्‍या बालविवाहांवर आळा घालता येतो.
  • हे प्रमाणपत्र विधवांना वडीलोपार्जित मालमत्ते वर दावा करण्यात मदत करते येतो दावा करण्यास परवानगी देते.
  • द्विपत्नी व बहुपत्नीत्व विरूढ कायदेशीर हक्क लढता येतो.
  • विभक्त कुटुंबात स्त्रियांना मुलाचं कायदेशीर ताबा मिळण्या करता लढता येते .
  • या सोबतच , पासपोर्ट सेवा, रहिवाशी दाखला मिळण्या करता या प्रमाणपत्रचा उपयोग होतो.
  • हे लग्नाचे एक भक्कम कायदेशीर पुरावा मनाला जातो आहे.

विवाह नोंदणीसाठी अर्ज करण्याची पात्रता

महाराष्ट्रात  विवाहाच्या प्रमाणपत्रासाठी खालील पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागतात :

  • वर आणि वधू हे कायमचे भारतातील नागरिक असले पाहिजेत.
  • वर 21 वर्षांचा असावा आणि वधू चे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • जिथे हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख हे दोघेही पती आणि पत्नी आहेत किंवा या वरील ध्रंत धर्मांतर केलेलं आहे अश्या ठिकाणी हिंदू विवाह कायदा लागू होतो.
  • जर पती किंवा पत्नी दोन्ही हे हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख धर्माचे नसतील तर 1954 च्या विशेष विवाह कायद्यानुसार हे विवाह नोंदवले जातात
  • जर आपण वयोमर्यादा चा निकष पूर्ण करू शकत नसाल ल तर आपल्याला विवाह
  • प्रमाणपत्रासाठी अर्ज करू करता येत नाही;
See also  सात बारा(7/12) म्हणजे काय ? प्रत्येक जमीनमालकासाठी अत्यंत म्हत्वाच! - 7/12 information in Marathi

आपले विवाहबंधन -विवाह प्रमाण पत्र नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • वधू किंवा वरांच्या नावावर असणारा रहिवासी पत्त्याचा दाखला – पत्ता-रेशन कार्ड / पासपोर्ट, वीज बिल ,ड्रायव्हिंग लायसन्, आधार कार्ड इत्यादि .फोटो आयडी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • 5 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे -ओळख पुरावा -आधार कार्ड
  • मूळ लग्न पत्रिका
  • लग्न समारंभ घेतलेल्या लग्नाच्या वेषभूषामधील वधू-वरांची लग्नाची छायाचित्रे
  • पती आणि पत्नी दोन्ही च स्पेसिफिक फॉरमॅट मध्ये अफिडेवीट्स  .
  • पती-पत्नी दोघांच्या जन्माच्या तारखेचा दाखला 10 वी इयत्तेचे मार्क्स प्रमाण पत्र
  • विवाह निमंत्रण पत्र कार्ड
  • लग्नाची मंजुरी मिळविण्या करता तीन साक्षीदार.
  • २ प्रतिज्ञापत्र की दोन्ही वर आणि वधू स्वेच्छेने एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत
  • घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाची कायदेशीर प्रत
  • तीन साक्षीधार – तिन्ही साक्षीदारांचे पासपोर्ट साइज फोटो  व तीन साक्षीधार   राहण्याचा पुरावा
  • वर व वधू विधवा / विधुर असतील तर अश्या प्रकरणात जोडीदार चे  मृत्यू प्रमाणपत्र.
  • फी साधारण 200-100 Rs

यांनंतर एक गॅझेट्टेड अधिकारी वरील सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात व विवाह प्रमाण विहित नमुन्यात पत्र बहाल करतात

लग्न प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे ? Marriage certificate

Marriage Certificate online Procedure

वर म्हटले तसे लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा क्षण.मग ती स्त्री असो किंवा पुरुष,लग्न कोणा सोबत करावे ? आणि कोणत्या वयात करावे ? हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या निर्णयांपैकी एक निर्णय असतो.हा जर निर्णय चुकला तर आपले आयुष्य अमावस्येच्या अंधारासारखे काळोखात जाऊ शकते आणि हा निर्णय योग्य ठरला तर आपले जीवन अगदी सुखमय होऊ शकते.आपण लेखामध्ये ऑनलाईन आपल्या मोबाईल वर,संगणक वर  लग्न प्रमाणपत्र कसे काढायचे हे पाहणार आहोत.

आपले लग्न झाल्यानंतर आपल्याला

  • पत्नीसोबत किंवा पतीसोबत बँकेचे जॉईंट खाते उघडण्यासाठी ,
  • आरोग्य विमा पोलिसि खरेदी करण्यासाठी किंवा
  • तुम्ही जर नवं विवाहित स्त्री असाल तर तुमचे आडनाव बदलण्यासाठी सुद्धा तुम्हाला विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
See also  दुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ - Milk products information in Marathi

ऑनलाईन मोबाईल वरती लग्न प्रमाणपत्र कसे काढायचे ? Marriage Certificate online Procedure

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल वर लग्न प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही Aple Sarkar ही सरकरी पोर्टलची वेबसाईट ओपन करा.
  • तुम्ही जर या सरकारी पोर्टल वरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर आणि काही वयक्तिक माहिती देऊन रजिस्ट्रेशन/ नोंदणी करावे लागेल.
  • तुम्ही जर ह्या अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला ते परत करावे लागणार नाही.तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलेल्या युजरनेम आणि पासवर्ड वरून लॉगिन करू शकता.लॉगिन करताना तुम्ही तुमचा जिल्हा आणि योग्य कॅपचा टाका.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला वेब पेज वरील माहिती मराठी मध्ये किंवा इंग्लिश मध्ये दिसेल.तुम्ही ती भाषा तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये बदलू शकता.
  • भाषा बदल्यानंतर तुम्हाला वेब पेज वरती सरकारी सेवा दिसतील.त्यामध्ये लग्न प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही ग्रामविकास व पंचायत राज्य ही सेवा निवडा.
  • पुढच्या पेज वर तुम्हाला जन्म दाखला,विवाह दाखला (लग्न प्रमाणपत्र) आणि बरेचशे दाखले काढण्याचे पर्याय मिळतील.त्यात तुम्ही विवाह दाखला (Marriage certificate) या पर्यायावरती क्लिक करा.
  • पुढच्या वेब पेजवरती तुम्ही तुमचा जिल्हा,तुमचा तालुका आणि तुमची ग्रामपंचायत निवडा.यानंतर तुम्ही नवरदेवाचे म्हणजे पतीचे पूर्ण नाव टाका ,नंतर तुमचे लग्न कोठे झाले आणि कोणत्या तारखेला झाले याची अचूक माहिती भरा.यानंतर तुम्ही पतीचा म्हणजे नवरदेवाचा आधार कार्ड नंबर अचूक टाका.यानंतर तुम्ही पत्नीचे पूर्ण नाव आणि पत्नीचा आधार कार्ड नंबर टाका.
  • वरील योग्य माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट पर्यायवरती क्लिक करा.यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक भेटेल.
  • पुढच्या वेब पेज वरती तुम्हाला पर्सनल माहिती संबंधी डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात.इथे तुम्हाला दिलेल्या संबंधित माहिती प्रमाणे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा लागतो.या अपलोड केलेल्या पासपोर्ट साईझ फोटोची साईझ 5 के बी ते 20 के बी च्या दरम्यान असावी.20 के बी च्या वरील पासपोर्ट साईझ फोटो लग्न प्रमाणपत्र अर्जासाठी ग्राह्य धरला जात नाही आणि तुम्हाला पुढील वरती प्रवेश करता येत नाही.तुम्ही नवरी मुलगी आणि नवरा मुलगा दोघांचे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
  • पासपोर्ट साईझ फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही अपलोड डॉक्युमेंट वरक्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही पेमेंट च्या पेज वर गेलात की जेवढी फी विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी लागते तेवढी फी तुम्ही यु.पी.आई ,ATM किंवा नेट बँकिंग वरून भरू शकता.जर तुम्हाला ATM द्वारे पेमेंट करायचे असेल तर तुमहो तुमच्या ATM चा पिन टाकून पेमेंट करा.
  • पेमेंट केल्यानंतर तुम्ही दोन -पाच दिवसांनी APLE SARKAR पोर्टल वरती भेट द्या.तुम्ही जर योग्य अर्ज भरला असेल तर तुम्हाला वेब पेज वर विवाह प्रमाणपत्र दिसेल.तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.डाऊनलोड केलेल्या फाईलची तुम्ही कलर प्रिंट काढा.जर तुम्हाला आपले सरकार पोर्टल च्या मुखपृष्ठ वर विवाह प्रमाणपत्र दिसत नसेल तर तुमचा अर्ज भरताना माहिती भरायची चुकली असणार.
See also  महाराष्ट्र भुषण पुरस्कार विजेते अप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत? - Appasaheb Dharmadhikari

 

 

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

2 thoughts on “विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक आहे ? Marriage Certificate online Procedure”

  1. सर मला माझ्या मुलाचे विवाह नोंदनी सर्टिफिकेट मिळावेत

Comments are closed.