बायजूस ( BYJU’S-app) विषयी माहीती What is BYJU’S Learning Marathi information ?

बायजूस ( BYJU’S-app) विषयी माहीती

आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी टिव्हीवर,विविध युटयुब चँनल्सवर तसेच विविध सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर देखील बाय जु अँपच्या जाहीराती पाहायला मिळत आहेत.आणि ह्या अँपमध्ये प्रसिदध हिंदी चित्रपट अभिनेता शाहरूख खान देखील आपल्याला नेहमी ह्या अँपविषयी जाहीरात तसेच मार्केटिंग करताना नेहमी दिसुन येत असतो.

हे सर्व बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की एवढा मोठा चित्रपट अभिनेता ह्या अँपची जाहीरात करतो आहे म्हणजे नेमकी ही काहीतरी चांगली आणि महत्वाचीच अँप असणार.

पण नेमकी ही बाय जु अँप आहे तरी काय?आणि ह्या अँपचा आपल्याला काय फायदा आहे?हे आपल्याला लक्षात येत नसते.म्हणुन आजच्या लेखात आपण बाय जु अँपविषयी सविस्तरपणे What is BYJU’S Learning Marathi information माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्या मनातील सर्व शंका दुर होतील आणि आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील प्राप्त होतील.

BYJU’s अँप काय आहे?

बायजुस ही एक भारतातील शैक्षणिक तसेच आँनलाईन क्लासेस घेणारी संस्था आहे.जिने बायजु क्लासेस ह्या आँनलाईन क्लासेस घेत असलेल्या एज्युकेशन तसेच लर्निग अँपची म्हणजेच शैक्षणिक व्यासपीठाची निर्मिती केली आहे.

ह्या अँपचा वापर करून आपण घरबसल्या आँनलाईन अभ्यास करू शकतो.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे याची आपल्याला कोणतीही फी आकारली जात नाही.फक्त काही मोजकेच कोर्सेस आहेत ज्याची क्लासकडुन फी आकारली जात असते.

 1. BYJU’s अँपचा संस्थापक तसेच सीईओ कोण आहे?

बाय जु रविंद्रन हे बाय जु अँपचे संस्थापक तसेच सीईओ देखील आहेत.

 1. स्थापणा कधी आणि केव्हा करण्यात आली?

2015 मध्ये बाय जु रविंद्रन यांनी बाय जु अँपची स्थापणा केली होती.

 1. अँपचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

बाय जु अँपचे मुख्य कार्यालय भारतातील बंगलौर कर्नाटक येथे आहे.

 1. अँपचा ब्रँण्ड अँम्बेसेडर कोण आहे?

प्रसिदध हिंदी चित्रपट अभिनेता शाहरूख खान बाय जु अँपचा ब्रँण्ड अँम्बेसेडर आहे.

 1. अँपवर कोणकोणत्या कक्षेचा अभ्यास घेतला जातो?

बाय जु अँपवर पहिलीपासुन ते बारावीपर्यतच्या सर्व मुला मुलींचा अभ्यास घेतला जातो.याचसोबत सीएटी,आय ए एस,एमपीएससी,युपीएससी,जेईई,नीट अशा सरकारी स्पर्धा परिक्षांची देखील विदयार्थ्यांकडुन तयारी करून घेतली जाते.येथे राज्यस्तरीय परिक्षांची देखील तयारी करून घेतली जाते.

 1. आपण कोणकोणते विषय शिकु शकतो?
See also  एका चांगल्या नेत्याचे गुण- Qualities Of Good Leader In Marathi

बाय जु अँपवरून विदयार्थ्यांना खालील विषय शिकवले जातात :

 • फिजिक्स
 • केमिस्ट्री
 • बायोलाँजी
 • मँथेमँटिक्स

वरील सर्व विषयांवर क्लासकडुन आपली एक टेस्ट देखील घेतली जाते.ही टेस्ट कमीत कमी अर्धा तासाची असते ज्यात कमीत कमी दहा प्रश्न विचारले जातात.

BYJU’s क्लासेसची वैशिष्टये कोणकोणती आहेत? What is BYJU’S Learning Marathi information

 • या क्लासेसचे सगळयात पहिले वैशिष्टय म्हणजे येथे सर्व विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी भारतातील उच्चशिक्षित आणि तज्ञ आणि आपल्या क्षेत्रात पारंगत अशाच विषय शिक्षकांची नियुक्ती केली जाते.
 • या क्लासमध्ये विदयार्थ्यांनी फ्री डेमो क्लासेस देखील दिले जातात.
 • जे विदयार्थी अभ्यासात कमकुवत आहेत तसेच त्यांचा अभ्यासक्रम पुर्ण झालेला नाही अशा गरजु विदयार्थ्यांसाठी एक्सट्रा क्लासेसची सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • येथे विदयार्थ्यांना क्लासेस अटेंड करण्यासाठी वेळेची कोणतीही सक्ती नसते विदयार्थी आपल्या वेळेनुसार आपल्यासाठी क्लासेसचा टाईम निवडु शकतात.
 • प्रत्येक विषयाचे मुददे शिकवून झाल्यावर त्याच दिवशी विदयार्थ्यांची उजळणी व्हावी यासाठी त्यांना शिकवलेल्या धडा तसेच मुदद्यावर गृहपाठ देखील करावयास दिला जातो.
 • बाय जु क्लास येथे विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी आधी त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला जातो मग त्यानुसार त्यांचे क्लासेस घेतले जातात.
 • दर महिन्याला शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत विदयार्थ्यांची टेस्ट देखील घेतली जाते.
 • शाळा,काँलेजात जशी शिष्यवृत्ती दिली जाते तशीच बाय जु क्लासकडुन देखील विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीची सुविधा दिली जात असते.
 • या क्लासेसमध्ये विदयार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करावे?कोणते क्षेत्र त्यांनी करियरसाठी निवडावे याबाबद म्हणजेच करियरविषयी मार्गदर्शन देखील केले जाते.
 • विदयार्थ्याची महिन्याभरात काय प्रगती झाली आहे हे कळण्यासाठी येथे विदयार्थ्यांचा मंथली स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट देखील तयार केला जातो आणि तो पालकांना दाखवला जातो.याने क्लासेस जाँईन केल्यानंतर आपल्या मुलाची,विदयाथ्याची महिनाभरात काय प्रगती झाली आहे हे पालकांच्या आणि शिक्षकांच्या लक्षात येत असते.

BYJU’s अँपचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या अँपचा वापर करून मुले घरबसल्या आपला अभ्यास पुर्ण करू शकतात.याने त्यांचा वेळ आणि उर्जा दोघांची बचत होत असते.

येथे विदयार्थ्यांचे क्लासेस घेण्यासोबत प्रश्नोतराचे क्वीज देखील घेतले जाते ज्यामुळे विदयाथ्यांची बुदधी देखील तल्लख होते.

बायजु अँपला आत्तापर्यत कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत?

 • BYJU’s अँपला आत्तापर्यत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे.आणि ते पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत:
 • भारतात एज्युकेशन अँप स्थापण करण्यासाठी अँमेझाँन मोबाइलीटी अवाँर्ड बाय जु अँपला मिळाला आहे.
 • 2018 मध्ये गुगल डिझाईन अवार्ड प्राप्त झाला आहे.
 • सिन बीसी टीव्ही १८ यंग टर्कस आँफ द इयर हा अवाँर्ड देखील मिळाला आहे.
 • 2017 मध्ये एक्सप्रेस आयटी अवाँर्ड न्युज मेकर आँफ द ईयर
 • 2017 मध्ये बिझनेस स्टँनडर्ड स्टार्ट अप आँफ द ईयर
 • 2018 मध्ये इंटर प्रिनर आँफ द ईयर
 • 2016,2018,2019 चा व्हीसी सर्कल अवाँर्ड एज्युकेशन कंपनी आँफ द ईयर देखील बाय जु अँपला प्राप्त झाला आहे.इत्यादी.
See also  दहा प्रेरणादायी स्त्रियांविषयी माहीती- 10 Inspiring Women Information In Marathi

अँपचे प्रोडक्ट आणि सर्विसेस कोणकोणत्या आहेत? BYJU’S Learning Marathi information

एज्युकेशन मोबाईल अँप हे बाय जु कंपनीचे सगळयात मोठे प्रोडक्ट आहे.याव्यतीरीक्त बायजु क्लास पहिली ते बारावीपर्यतच्या मुलांसाठी कोर्स देखील सेल करण्याचे काम करते.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे

प्रत्येक कक्षेच्या कोर्सची फी ही बायजुने अलग अलग ठेवलेली आहे.यासोबत हा क्लास सरकारी स्पर्धा परिक्षांची देखील तयारी करून घेण्याचे काम करते.

 • टँगलाईन/स्लोगन काय आहे?

BYJU’s अँपचे टँगलाईन तसेच स्लोगन फाँल इन लव्ह विद लर्निग हे आहे.म्हणजेच शिकता शिकता प्रेमात पडणे असा याचा अर्थ होतो.

 • नेटवर्थ साधारणत किती आहे?

ही एक शैक्षणिक संस्था आहे जिचे नेटवर्थ आज 10 मिलियन डाँलर्स इतके आहे.

 • या अँपवर आत्तापर्यत किती विदयार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे?

75 मिलियनपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी या अँपवर आत्तापर्यत आपले रेजिस्ट्रेशन केले आहे.आणि ह्या अँपचे 5 मिलियन इतके पेड सबस्क्राईबर सुदधा आहेत.

 • आपल्या मोबाईलवर डाऊनलोड कसे करावे?
 • अँप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल प्लेस्टोअरमध्ये जावे.
 • आणि मग वर सर्च बार मध्ये बाय जु अँप असे नाव टाईप करून सर्च आँप्शनवर क्लीक करावे.
 • मग आपल्याला सगळयात पहिले बाय जु अपच दिसुन येईल मग आपण त्यावर ओके करावे आणि ती अँप डाऊनलोड करण्यासाठी खाली डाऊनलोड आँप्शन दिले असेल तिथे क्लीक करावे.
 • त्यानंतर मग बाय जु अँप डाऊनलोड करून झाल्यावर आपण तिला आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाँल करून घ्यावे.

BYJU’s क्लास जाँईन कसा करावा?

BYJU’s क्लास आपण दोन पदधतीने जाँईन करू शकतो.

1) मोबाईलद्वारे

2) कंप्युटर तसेच लँपटाँप द्वारे

मोबाईलद्वारे क्लास जाँईन करण्यासाठी आपण बाय जु अँप डाऊनलोड तसेच इंस्टाँल करावी आणि मग आपण क्लास जाँईन करू शकतो.

पण जर कंप्युटर किंवा लँपटाँपच्या माध्यमातुन आपल्याला क्लास जाँईन करायचे असेल तर आपण byjus.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी आणि तिथे आपली नाव नोंदणी करावी.

इथे आपण फ्री तसेच पेड आपल्याला पाहिजे तो क्लास जाँईन करू शकतो.

अँपवर आपले रजिस्ट्रेशन कसे करावे?

 • अँपवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया:
 • सगळयात पहिले गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन BYJU’s ची अँप डाऊनलोड करावी मग ती इंस्टाँल झाल्यावर ती अँप ओपन करावी.
 • यानंतर आता आपल्याला कोणता पहिली ते बारावीपर्यतचा कोणता क्लास जाँईन करायचा आहे हे तिथे भरावे लागते.
 • क्लास सिलेक्ट करून झाल्यावर आपल्याला इथे आपले नाव,मोबाईल नंबर,शहर,तसेच ईमेल आयडी विचारला जातो.ही सर्व माहीती व्यवस्थित भरून आपण रेजिस्टर वर क्लीक करावे.
 • मग आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो जो आपण तिथे भरायचा असतो.
 • यानंतर आपण आपल्या अकाऊंटवर लाँग इन करून घ्यावे.
See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

अँपचा वापर कसा करावा?

अँपला डाऊनलोड करून इंस्टाँल केल्यानंतर जेव्हा आपण त्यात नाव रेजिस्टर करत असतो तेव्हा तेथे आपल्यासमोर काही पुढीलप्रमाणे मेन्यु दिसुन येत असतात.

1)Learning analysis

2)Bookmark

3) notification

4) parent connect

5) quiz

6) live classes

7) share the app

8) contact

9) subscribe

1)Learning analysis: ह्या फिचरचा वापर करून आपण आपले लर्निग अँनलाईज करू शकतो.

2) Bookmark : इथे आपण जेवढे बुक मार्क केले आहे ते सर्व दिसुन येत असतात.

3) notification : ह्या अँप्लीकेशनद्वारे ज्या काही सुचना आपल्याला दिल्या जात असतात त्या सर्व नोटिफिकेशन मध्ये पाहायला मिळतात.

4) parent connect :ह्या आँप्शनद्वारे कोणताही विदयार्थी आपल्या पालकांना देखील अँड करू शकतो.जेणेकरून पालकांना आपल्या मुलाची किती प्रगती झाली आहे हे कळत असते.फक्त पालकांना यासाठी आपल्या मोबाईलमध्ये एक अँप डाऊनलोड करावी लागत असते.

5) quiz :ह्या आँप्शनचा वापर करून आपल्याला पाहिजे त्या विषयाचे क्वीज खेळायला मिळत असते.

6) live classes :ह्या आँप्शनद्वारे किती आणि कोणता क्लास लाईव्ह चालु आहे आपण हे देखील बघु शकतो.

7) share app :ह्या आँप्शनचा वापर करून आपण आपली अँप इतरांसोबत शेअर करू शकतो.

8) contact : हे आँप्शन यूज करून आपण बायजूच्या टीमसोबत संपर्क साधु शकतो.

9) subscribe : हे आँप्शन वापरून आपण बाय जु ला सबस्क्राईब देखील करू शकतो.

BYJU’s चे आतापर्यतचे सगळयात मोठे यश कोणते आहे?

बाय जुचे आत्तापर्यतचे सगळयात मोठे यश व्हाईट हँट ज्युनिअरची खरेदी करणे हे आहे.हे बायजूचे पाचवे सगळयात मोठे यश आहे.

अँपविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -FAQ – What is BYJU’S- Learning Marathi information

1) BYJU’s कोर्स मराठीत देखील उपलब्ध आहे का?

नही बाय जु मध्ये फक्त इंग्रजी भाषेतच कोर्स उपलब्ध आहे पण लवकरच मराठीत देखील कोर्स येथे उपलब्ध होणार आहे.

2) एका महिन्याचा ट्रायल क्लास उपलब्ध आहे का?

हो बायजु क्लासेस मध्ये पहिलीपासुन ते चौथीपर्यतच्या विदयार्थ्यांसाठी एक महिन्याचा ट्रायल क्लास देखील उपलब्ध आहे.ज्याची फी साधारणत दोन ते तीन हजार इतकी आहे.

3 thoughts on “बायजूस ( BYJU’S-app) विषयी माहीती What is BYJU’S Learning Marathi information ?”

Comments are closed.