Metaphor म्हणजे काय? Metaphor Marathi meaning

मेटाफोर मराठी माहिती – Metaphor Marathi meaning

Metaphor हा एक असा शब्द आहे ज्याचा आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत असतो.
पण याचा मराठीत नेमकी काय अर्थ होतो हे आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत देखील नसते.

तसेच मराठीतील अशा कोणत्या शब्दाला इंग्रजीत मेटाफोर म्हणुन संबोधिले जाते.हे देखील आपल्याला माहीत नसते.

आणि जेव्हा मेटाफोर म्हणजे काय?याचा अर्थ आपण इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे देखील आपल्याला पाहिजे तसे पर्याप्त उत्तर प्राप्त होत नसते.

आजच्या लेखात मेटाफोर काय असते?मेटाफोर कशाला म्हटले जाते त्याचा अर्थ काय होतो इत्यादी विषयी सविस्तरपणे आपण माहीती जाणुन घेणार आहोत.

मेटाफोर म्हणजे काय?

मेटाफोरला मराठीत रूपक असे म्हटले जाते.रूपक हा एक साहित्यामध्ये वापरण्यात येत असलेला एक अर्थालंकार असतो ज्याचा आधार घेऊन एखादा लेखक,कवी,साहित्यिक एखाद्या वस्तुचे तसेच घडत असलेल्या क्रियेचे घटनेचे वास्तववादी पदधतीने वर्णन करत असतो.

पण हे सर्व वर्णन काल्पणिक असते त्याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध असलेला आपणास दिसुन येत नाही.

यात लेखक तसेच कवी एका वस्तुला दुसरया वस्तु समान दाखवण्याकरता मेटाफोर म्हणजेच रूपकांचा वापर करत असतो.

 

दैनंदीन वापरातले इंग्रजी शब्द व वाक्य मराठी अर्थासह वाचण्या करता क्लिक करा

 

Metaphor ची उदाहरणे

1)तो माझ्या काळजाचा तुकडा आहे

यात खरच एखादी व्यक्ती दुसरया व्यक्तीच्या काळजाचा तुकडा नसते पण यातुन तो व्यक्ती आपल्याला आपल्या काळजाइतका प्रिय आहे हे आपल्याला सांगायचे असते.म्हणुन इथे तो माझ्या काळजाचा तुकडा आहे असे म्हटले जाते.

2)शिवाजी महाराज हे सुर्यासारखे तेजस्वी व्यक्तीमत्व होते.

See also  फादर डे साठी कोटस - Father day quotes in Marathi

यात आपण शिवाजी महाराजांना सुर्याची उपमा देऊन त्यांचे व्यक्तीमत्व किती प्रखर आणि तेजस्वी होते हे सांगत असतो.

म्हणजेच शिवाजी महाराज किती तेजस्वी व्यक्तीमत्वाचे होते हे आपण यातुन सांगायचा प्रयत्न करत असतो.खरोखर शिवाजी महाराज सुर्यासारखे दिसायला होते हा आपला सांगण्याचा अर्थ येथे नसतो तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आपण सुर्याची उपमा येथे दिलेली आहे.

म्हणजेच यात आपण एका दुसरया गोष्टीचा उल्लेख करून थेट एका गोष्टींचा संदर्भ देण्याचा प्रयत्न आपण केला आहे.

3) बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर दलितांचे माय बाप होते.

यात कवीला हे सांगायचे आहे की आई वडील जसे आपल्या मुलांची काळजी घेतात त्यांचा कैवारा घेतात त्यांचे रक्षण करतात त्यांच्या हिताचा नेहमी विचार करतात तशीच भुमिका बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांनी दलितांसाठी पार पाडली होती म्हणुन त्यांना माय बाप ही उपमा देण्यात आली.

इथे आपल्या सांगण्याचा अर्थ खरच आईवडील होते असा होत नाही तर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकर यांनी दलितांची माय बापासारखी काळजी घेतली असा होतो.

म्हणजेच एका गोष्टीला दुसरया गोष्टी समान दाखवण्याकरता मेटाफोर म्हणजेच रूपकांचा वापर येथे केला गेलेला आहे.

4) महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे ज्ञानाचा सागर होते.

इथे आपल्याला खरच महात्मा फुले सावित्रीबाई फुले एक समुद्र होते असा न घेता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सागर जसा विशाल असतो पाण्याने अखंड भरलेला असतो तसेच महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्ञानाने संपन्न तसेच भरलेले आणि विदवान होते.

ज्यांनी सागराप्रमाणे घराघरात ज्ञान पोहचवले शिक्षणाची महती पटवून दिली.निराक्षरांना साक्षर केले ज्ञानाची गंगा घराघरात नेली असा अर्थ आपण इथे घेणे अपेक्षित आहे.

म्हणजेच वरील प्रत्येक वाक्यात एका गोष्टीला दुसरया गोष्टी समान दाखवण्याकरता मेटाफोर म्हणजेच रूपकांचा वापर येथे केला गेलेला आपणास दिसुन येतो.

See also  Entrepreneurship म्हणजे काय?  Entrepreneur Meaning In Marathi

Metaphor चे मराठीत होणारे इतर अर्थ :

● रूपक
● लक्षणा
● रूपांतर
● अन्योक्ती
● उपमा

Metaphor विषयी जाणुन घ्यायच्या काही महत्वाच्या बाबी –

जेव्हा एक वस्तुला दुसरया वस्तु समान दाखविले जाते तेव्हा त्यास मेटाफाँर असे म्हटले जात असते.

● येथे कोणत्याही वाक्याचा शब्दश अर्थ न घेता काल्पणिक आणि उपमात्मक अर्थ आपण घेणे अपेक्षित असते.

1 thought on “Metaphor म्हणजे काय? Metaphor Marathi meaning”

Comments are closed.