EPF passbook ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे ? How to download EPF passbook Marathi

EPF passbook ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे ? How to download EPF passbook Marathi

 आज भारतामध्ये दर महिन्याला वेतन प्राप्त करत असलेल्या प्रत्येक कर्मचारीकडुन आज पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कमेची कपात करण्यात येत असते.

ईपीएफओ ही एक बचत योजना आहे जी भारत सरकारकडुन सुरू करण्यात आली आहे.यात कर्माचारींच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या पैशांची बचत केली जाते.

ईपी एफओ ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संघटना आहे जिचे प्रमुख कार्य नोकरीत वेतन प्राप्त करत असलेल्या कर्मचारींना पेंशन तसेच विम्याची सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच ईपीएफओ विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ईपीएफओ म्हणजे काय?

 ईपीएफओ म्हणजेच (employee provident fund) ज्याला मराठीत भविष्य निर्वाह निधी असे देखील म्हटले जात असते.

ईपीएफ म्हणजे काय?

ईपीएफ ही एक स्कीम असते जिचा लाभ प्रत्येक कर्मचारीला आपल्या सेवानिवृत्तीनंतर घेता येत असतो.

अशी कोणतीही कंपनीही असो जिच्यामध्ये 20 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.त्या कंपनीला आपले नाव ईपीएफओ मध्ये नोंदविणे फार बंधनकारक असते.

  1. ईपीएफओ चा फुल फाँर्म काय आहे?

ईपीएफओ चा फुल (employee provident fund organization असा आहे.

  1. ईपीएफओ ची स्थापणा कधी आणि केव्हा करण्यात आली होती?

 ईपीएफओ ची स्थापणा ही 4 मार्च 1952 रोजी करण्यात आली होती.

  1. ईपीएफओ ची स्थापणा कोणी केली होती?

ईपीएफओ ची स्थापणा केंद्र सरकारद्वारे करण्यात आली होती.

  1. ईपीएफओ चे मुख्य कार्यालय कुठे आहे?

ईपीएफओ चे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापण करण्यात आले आहे.

  1. ईपीएफसाठी काय पात्रता असावी लागते?

ईपीएफची सुविधा ही प्रत्येक वेतनदाराला प्राप्त होत असते पण त्यासाठी देखील काही पात्रतेच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत ज्या समजुन घेणे आपल्यासाठी फार गरजेचे आहे.

  1. ईपीएफसाठी पात्रतेच्या अटी :
  • ईपीएफसाठी असा प्रत्येक व्यक्ती पात्र ठरतो जो नोकरी करत आहे.
  • ईपीएफची सुविधा प्राप्त करण्यासाठी आपले वेतन हे 15 हजार पेक्षा कमी असावे लागते.तरच आपण ह्या स्कीमचा फायदा उठवू शकतो.अन्यथा आपण ह्या सुविधेचा लाभ उठवण्यासाठी पात्र ठरत नसतात.
See also  EPS 95 पेन्शनधारकाचा निधन झाल्यास पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?- Document list to avail pension in case of death of eps95 pensioner

 

 कर्मचारींच्या वेतनामधुन ईपीएफ कसा कट केला जात असतो?

 ईपीएफ हे कर्मचारी आणि कंपनी ह्या दोघांद्वारे दिलेले गेलेले योगदान असते ज्यातील १२ टक्के

रक्कम कर्मचारीचे वेतनातुन कपात केली जाते आणि तीच रक्कम कर्मचारींच्या बँक खात्यामधुन ईपीएफ खात्यात पाठवली जात असते.

ईपीएफओ मेंबर पासबुक काय असते? – How to download EPF passbook Marathi

 ईपीएफ पासबुक ही एक सुविधा असते जी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडुन कर्मचारींना दिली जात असते.

ईपीएफ पासबुक आणि बँकेचे पासबुक यात काही एवढा मोठा फरक नसतो.जसे बँकेचे पासबुक मध्ये आपल्याला आपल्या खात्यात किती पैसे आहेत?आपल्या खात्यातुन कोणत्या खात्यात कधी पैसे पाठविण्यात आले आहेत.

आपल्या खात्यातुन किती पैसे काढण्यात आले आहेत आणि ते कधी काढण्यात आले आहेत.हे कळत असते त्याचप्रमाणे ईपीएफओ पासबुकमध्ये आपल्या ईपीएफ खात्यातील सर्व व्यवहारांविषयीचा लेखाजोखा आपल्याला जाणुन घेता येत असतो.

ईपीएफओ पासबुकद्वारे ईपीएफ मेंबर(कर्मचारी) काय काय करू शकतात?

 

  • ईपीएफ मेंबर पासबुकचा वापर करून ईपीएफ मेंबर आपल्या खात्यात किती रक्कम शिल्लक उरली आहे हे तपासु शकतात.
  • ईपीएफ मेंबर आपल्या खात्याचे सर्व विवरण तपासु शकतात.जसे की आपण किती पैसे काढले?त्यावर आपल्याला किती व्याज प्राप्त झाले?इत्यादी.
  • आपल्या खात्याच्या विवरणाच्या संपुर्ण तपशीलाची प्रिंट काढु शकतात तसेच ते डाऊनलोड देखील करू शकतात.

आँनलाईन ईपीएफ पासबुक कसे डाऊनलोड करतात?

  • ईपीएफओ चे सभासद आपले ईपीएफओ पासबुक आँनलाईन देखील डाऊनलोड करू शकतात.एवढेच नही तर ते आपल्या ईपीएफओ पासबुकची प्रिंट देखील काढु शकतात.
  • आणि हे सर्व करण्यासाठी ईपीएफओ च्या सभासदांना ईपीएफओ च्या मुख्य संकेतस्थळाला सर्वप्रथम भेट द्यावी लागत असते.
  • मग आपला यूए एन पासवर्ड तेथे इंटर करावा लागत असतो.
  • यानंतर आपल्यापुढे कंँप्च्या येतो तो देखील फील करावा लागत असतो.
  • मग लाँग इन नावाच्या बटणावर क्लीक करायचे असते.
See also  LIC IPO - पॉलिसीधारकां करता महत्वपूर्ण माहिती ? - What is LIC IPO's Policyholder Category

How to download EPF passbook Marathi

  • मग तिथे स्क्रीनवर आपल्याला आपली आयडी दिसुन येत असतो.आणि युएएनशी लिंक केलेली खाते देखील त्याच्या खाली दिसुन येत असतात.
  • मग आपण आपला मेंबर आयडी निवडायचा असतो.
  • आणि सी पासबुक ह्या आँप्शनवर क्लीक करायचे असते.
  • यानंतर आपण केलेल्या सर्व व्यवहारांचा तपशील
  • आपल्याला स्क्रीनवर पासबुकमध्ये दिसुन येत नसतो.
  • तेथेच बाजुला आपल्यासमोर डाऊनलोड आणि प्रिंट आँप्शन दिलेले असते ज्याचा वापर करून आपण त्या पासबुकची आँनलाईन प्रिंट काढु शकतो किंवा ते डाऊनलोड देखील करू शकतो.

ईपीएफओ अँपचा वापर करून ईपीएफओ पासबुक कसे डाऊनलोड करतात? – How to download EPF passbook Marathi

  ईपीएफओ चे मेंबर ईपीएफओ अँपचा वापर करून देखील आपले पासबुक डाऊनलोड करू शकतात.

ईपीएफओ अँपद्वारे पासबुक डाऊनलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

  • सगळयात पहिले गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचे आणि एम सेवा अँप डाऊनलोड आणि इंस्टाँल करायची.
  • मग यानंतर लेटस स्टार्ट आँप्शन आपल्यासमोर दिसून येते त्यावर क्लीक करावे.
  • यानंतर आपल्यासमोर ईपीएफ आँनलाईन आणि ईपीएफ सर्विसेस असे दोन नाव येतात त्यातील ईपीएफ सर्विसेसवर क्लीक करावे.
  • ईपीएफ सर्विसेसवर क्लीक केल्यानंतर ईपासबुक टँब सिलेक्ट करावा.
  • त्यानंतर लाँग इन करण्यासाठी युएएन आणि पासवर्ड इंटर करायचा.
  • मग मेंबर आयडी सिलेक्ट करून व्युव्ह पासबुक ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
  • यानंतर आपण आपले पासबुक पाहु शकतात डाऊनलोड करू शकतात तसेच त्याची प्रिंट देखील काढु शकतात.

मोबाईल नंबर आणि जन्मतारखेचा वापर करून ईपीएफओ पासबुक कसे डाऊनलोड करतात?

  • ईपीएफओ चे मेंबर आपल्या मोबाईल नंबर तसेच जन्मतारखेचा वापर करून आपले ईपीएफओ पासबुक डाऊनलोड करू शकतात.
  • यासाठी सभासदाने एपीएफओ च्या वेबसाईटवर जाऊन ईपीएफओ पासबुक सुविधेसाठी आपली नाव नोंदणी करायची असते.
  • मग नोंदणी करण्यासाठी एखादे ओळखीचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागत असते.
  • मग आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जातो.तो तिथे नोंदणी करण्यासाठी आपल्याला इंटर करायचा असते
  • मग यानंतर मोबाईल नंबर तसेच डाँक्युमेंट नंबरद्वारे आपण सभासद पोर्टलवर जाऊन आपल्या अकाऊंटवर लाँग इन करावे.
  • यानंतर लाँग इन केल्यावर आपल्यासमोर पासबुक डाऊनलोड नावाचे आँप्शन दिसुन येते.तेथे क्लीक करावे.
See also  Mortgage loan म्हणजे काय? कसा अर्ज करावा ? तारण कर्ज संपूर्ण माहीती - Mortgage loan information in Marathi

ईपीएफ पासबुकचे प्रमुख घटक कोणकोणते आहेत?

 ईपीएफ पासबुकचे घटक पुढीलप्रमाणे आहेत:

 1) ईपीएफ बँक अकाऊंट नंबर(EPF bank account number)

2) यूएएन (UAN)

3) बेसिक माहीती (basic details)

4) ओपनिंग बँलन्स

5) महिन्याभराचे योगदान (monthly contribution)

6) व्याज (intrest)

7) पैसे काढणे( withdrawl)

8) क्लोजिंग बँलन्स

9) व्हिपीएफ (voluntery provident fund)

1) ईपीएफ बँक अकाऊंट नंबर(EPF bank account number) : 

 आपल्या ईपीएफ पासबुकसाठी लागणारा सगळयात महत्वाचा घटक आहे आपले ईपीएफ बँक अकाऊंट नंबर.

2) यूएएन (UAN) :

UAN  म्हणजे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर.प्रत्येक सदस्याला ईपीएफओ मध्ये सहभागी झाल्यानंतर आपला एक बारा अंकी यूएएन नंबर दिला जात असतो.

ईपीएफ सभासदाचा आयडी हा त्याच्या यूएएनशी जोडला जात असतो.हे ईपीएफ अकाऊंटमधील व्यवहारपुर्तीसाठी आयडी नंबर म्हणुन कार्य करत असते.

3) बेसिक माहीती (basic details) :

यात ईपीएफओ सभासदाचे नाव,जन्मतारीख,संस्थेत सहभागी होण्याची तारीख इत्यादी बेसिक माहीती समाविष्ट केलेली आपणास दिसुन येते.

 

4) ओपनिंग बँलन्स :

यात ईपीएफ अकाऊंट ओपन केल्यावर किती रक्कम आपल्या खात्यात आहे हे पाहता येते.

5) महिन्याभराचे योगदान (monthly contribution):

ईपीएफ पासबुक धारक कर्मचारीचे महिन्याचे योगदान किती आहे हे इथे यात पाहायला मिळत असते.आणि हे योगदान स्वतंत्रपणे चित्रित केलेले असते.

6) व्याज (intrest) :

ईपीएफवरील व्याज दर हे प्रत्येक महिन्याच्या शिल्लक रक्मेवरून मोजले जात असते.आणि वर्षाच्या अखेरीस कर्मचारी योगदाना करिता हे व्याज जमा होत असते.

7) पैसे काढणे (withdrawl )

ईपीएफ खातेदाराने किती पैसे काढले हे ईपीएफ पासबुकमध्ये दिले जात असते.

8) क्लोजिंग बँलन्स :

नियोक्ता योगदानाचे व्याज आणि कर्मचारी योगदानाचे व्याज हे अखेरीस पुढच्या वर्षीच्या ओपनिंग बँलन्ससाठी ठेवले जाते.

9) व्हिपीएफ (voluntery provident fund) :

प्रत्येक ईपीएफ खाते असलेला कर्मचारी 12 टक्के पेक्षा अधिक जास्त योगदान देऊ शकतो.आणि त्याने दिलेले हे योगदान म्हणजे स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी असते जे पासबुकमध्ये देखील अलिप्त दाखवले जात असते.

ईपीएफ पासबुकचे फायदे कोणकोणते असतात?

  • ईपीएफ पासबुकमुळे ईपीएफ बँक खाते धारक कर्मचारीचा वेळ वाचत असतो.
  • ईपीएफ पासबुकमध्ये आपल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद केलेली असते.
  • कर्मचारी आपल्या ईपीएफ पासबुकची प्रिंट काढु शकतात किंवा ते डाऊनलोड देखील करू शकतात.

नक्की वाचा – NPS व PPS माहिती