Flowchart विषयी माहीती – What Is Flowchart In Marathi

Flowchart माहीती  – What Is Flowchart In Marathi

 फ्लोचार्ट म्हणजे काय ?

फ्लोचार्ट म्हणजे एक अशी आकृती किंवा आराखडा ज्या द्वारे एखादी प्रक्रिया , तंत्र किंवा संगणकीय अलोगोरिदम  मांडल जाते. याचा वापर विविध क्षेत्रात अभ्यासाकरता , एखादी योजना मांडण्याकरता , त्या योजनेत सुधारण्याकरता व एरवी कठीण व किचकट वाटणाऱ्या प्रक्रिया अगदी सोप्या ,सरळ ,स्पष्ट व सुलभ भाषेत चित्राद्वारे किंवा आराखड्या द्वारे समजावून सांगण्याकरता मुख्यतः केला जातो.

  • आज आपण कोणत्याही कार्याचे डायग्रँमिकली रिप्रझेंटेशन (चित्र रूपी आराखडा ) तयार करण्यासाठी आधी त्या कार्याचा एक फ्लोचार्ट तयार करत असतो.
  • म्हणजेच जेव्हा आपण एखादे विशिष्ट कार्य पुर्ण करत असतो तेव्हा आपण त्या कार्याचा एक अल्गोरिदम देखील तयार करत असतो.
  • आणि ह्या अल्गोरिदमचे आपण डायग्रँमिकली रिप्रेझेंटेशन तयार करत असतो.ह्या डायग्रामिकल रिप्रेझेंटेशनलाच आपण सोप्या भाषेत फ्लोचार्ट असे म्हणत असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच फ्लोचार्टविषयी- what is flowchart in Marathi  सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

फ्लोचार्ट कशाला म्हणतात? what is flowchart in Marathi

फ्लोचार्ट हे अल्गोरिदमचे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असते.अल्गोरिदमध्ये आपण जे काही लिहित असतो.तेच आपण ग्राफच्या स्वरूपात मांडत असतो.आणि ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनलाच आपण फ्लोचार्ट असे म्हणत असतो.

ज्यात इंस्ट्रक्शन साठी आपण काही चिन्हांचा देखील वापर करत असतो.आणि ही चिन्हे आपल्याला आपला अल्गोरिदम कोणत्या दिशेने चालला आहे हे सांगण्याचे काम करत असतात.

Flowchart चे मुख्य प्रकार किती कोणकोणते असतात?

फ्लोचार्टचे एकुण चार प्रमुख प्रकार पडतात आणि ते चार प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

1) Process Flowchart

2) Workflow Chart Diagram

3) Swim lane Flowchart

4) Data Flowchart

See also  अड्रॉइड इमूलेटर म्हणजे काय ? Android emulator in Marathi
Flowchart चे मुख्य प्रकार किती व कोणकोणते असतात?
Flowchart चे मुख्य प्रकार किती व कोणकोणते असतात?

 

1) Process Flowchart :

प्रोसेस फ्लोचार्टमध्ये कोणतीही प्रक्रिया कोणत्या आणि कशा पदधतीने कार्य करीत आहे हे बघता तसेच रिप्रेझेंट करता येते.

2) Workflow Chart Diagram :

वर्क फ्लो चार्ट डायग्रामचा वापर करून आपण आपला व्यवसाय कशा पदधतीने वर्क करतो आहे त्याची वर्किंग प्रोसेस कशी चालु आहे हे दर्शवू शकतो.

3) Swimlane Flowchart :

कोणत्याही कंपनीतील वर्किंग प्रोसे कशी आहे यात त्यात काम करत असलेले कामगार यांच्यात कसा परस्परसंवाद साधला जातो आहे.हे दाखवण्यासाठी स्वीमलेन फ्लोचार्ट वापरला जातो.

4) Data Flowchart :

ह्या फ्लोचार्टचा वापर डेटा कोठे प्रवाहित होतो आहे हे पाहण्यासाठी केला जातो.

Flowchart मध्ये कोणकोणत्या चिन्हांचा वापर केला जातो?

1) Start /End

2) Input/output

3) Process

4) Decision

5) Direction Arrow

6) Connector

7) Comment/Explanation

8) Preparation

9) Separate

1) Start /End :

Start ह्या चिन्हाचा वापर कोणत्याही फ्लोचार्टची सुरूवात करण्यासाठी केला जात असतो.

End ह्या चिन्हाचा वापर फ्लोचार्ट बंद करण्यासाठी केला जात असतो.

2) Input/output :

Input ह्या चिन्हाचा वापर आपण कोणतीही Value Accept करण्यासाठी प्रामुख्याने केला जात असतो.

Output ह्या चिन्हाचा वापर आपण इंटर केलेल्या व्हँल्युचा रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी केला जात असतो.

3)  Process :

Process ह्या चिन्हयाचा वापर आपण अशावेळी करत असतो जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचे कँलक्युलेशन करायचे असते.एखाद्या डेटावर प्रोससिंग करायची असते.

4) Decision :

Decision -ह्या चिन्हाचा वापर आपण अशा वेळेला करत असतो.जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करायचे असते.आणि हे उत्तर आपल्याला बरोबर/चुक किंवा 0/1 च्या स्वरुपात उपलब्ध होत असते.

5) Direction Arrow :

आपला तयार केलेला फ्लोचार्ट कोणत्या दिशेने धावतो आहे हे जाणुन घेण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा वापर करत असतो.

6) Connector :

ह्या चिन्हाचा वापर करून आपण एका फ्लोचार्टच्या भागाला दुसरया फ्लोचार्टच्या भागासोबत जोडु शकतो.

See also  Google word coach विषयी माहीती - Google word coach Marathi information

7) Comment/Explanation :

आपल्याला जर फ्लोचार्टविषयी काही कमेंट करायची असेल किंवा त्याबाबद कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यायचे असेल तर अशा वेळेस आपण Comment/Explanation ह्या चिन्हाचा वापर करू शकतो.

8) Preparation :

जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची अँडव्हान्स प्रोग्रँमिंग करायची असेल किंवा प्रोग्रँमिंगचे काही प्रिपरेशन करायचे असेल तर अशा वेळी आपण ह्या चिन्हाचा वापर करत असतो.

9) Separate :

एक फ्लो चार्ट दुसरया फ्लो चार्टपासुन अलग करण्यासाठी आपण सेपरेट ह्या चिन्हाचा वापर करत असतो.

Flowchart तयार करण्याचे नियम कोणकोणते असतात?

 आपण जेव्हाही एखादा फ्लोचार्ट तयार करत असतो.

  • तेव्हा तो फ्लोचार्ट तयार करण्याचे काही नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करणे देखील आपल्यासाठी खुप महत्वाचे असते.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे आपण जर फ्लोचार्ट बनवण्याचे नियम जाणुन घेतले तर आपल्याला फ्लोचार्ट तयार करत असताना कुठलीही अडचण येत नसते.

Flowchart तयार करण्याचे नियम :

  • प्रत्येक फ्लोचार्टची सुरूवात दाखवण्यासाठी जसा स्टार्टिंग पाँईण्ट असतो तसाच एक शेवट दाखवण्यासाठी एंडिंग पाँईण्ट देखील असतो.
  • आपण फ्लोचार्ट तयार करताना जेवढीही चिन्हे वापरत असतो त्या चिन्हांना आपण बाण म्हणजेच अँरो पाँईण्टने जोडणे देखील खुप गरजेचे असते.कारण यानेच आपल्याला समजत असते की आपला फ्लोचार्ट कोणत्या दिशेने धावत आहे.म्हणजेच त्याचा फ्लो कसा होत आहे हे आपल्या लक्षात येत असते.

Flowchart तयार करण्याचे फायदे तसेच नुकसान कोणकोणते आहेत?

फ्लोचार्ट तयार करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे असतात:

  • फ्लोचार्टचा सगळयात महत्वाचा फायदा हा असतो की फ्लोचार्टमुळे आपण कोणत्याही प्रोग्रँमचे स्ट्रक्चर कसे आहे?हे समजून घेऊ शकतो.
  • आपल्या प्रोग्रँमिंगमध्ये काही ईरर असेल तर ते देखील फ्लोचार्टमुळे आपल्या निदर्शनास येत असतात.जे आपण काढू शकतो.
  • फ्लोचार्टमुळे आपल्या लाँजीकल अँक्युरेसीत देखील वाढ होण्यास मदत होत असते.

ज्या प्रमाणे फ्लोचार्टमुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात त्याचप्रमाणे फ्लोचार्टमुळे आपल्याला काही हानी देखील होऊ शकत असते.

See also  मराठी ब्लॉगिंग म्हणजे काय -5 Best reasons to start marathi blogging

फ्लोचार्ट तयार करण्याचे नुकसान पुढीलप्रमाणे असतात:

  • फ्लोचार्टचे सगळयात पहिले नुकसान हे असते की जेव्हा आपल्याला एखाद्या फ्लोचार्टमध्ये काही बदल घडवून आणायचे असतात.तेव्हा त्यासाठी आपल्याला नवीन फ्लोचार्ट तयार करावा लागत असतो.म्हणजे येथे आपल्याला अधुन मधुन कुठलाही बदल करता येत नसतो जो काही बदल करायचा असतो त्यासाठी नवीन फ्लोचार्ट तयार करण्याची मेहनत घ्यावी लागत असते.
  • जेव्हा आपण एखाद्या काँम्पलेक्स प्रोग्रँमसाठी फ्लोचार्ट तयार करत असतो.तेव्हा आपल्याला तेथे जास्तीत जास्त अँरो युझ करावे लागत असतात.याने आपल्याला फ्लोचार्टचे स्ट्रक्चर समजुन घ्यायला अडचण येत असते.आणि फ्लोचार्ट खुप काँम्पलीकेटेड होत असतो.

Flowchart च्या मर्यादा कोणकोणत्या असतात?

 कोणताही फ्लोचार्ट तयार करत असताना आपल्याला काही योग्य ठाराविक चिन्हांचाच वापर करावा लागत असतो.आपण इथे कोणतेही चिन्ह वापर शकत नाही.

  • फ्लोचार्ट बनवताना चिन्हांचा वापर करण्यात आपला खुप वेळ वाया जात असतो.आणि योग्य चिन्हांचा वापर करून फ्लोचार्ट तयार करण्यास मेहनत देखील खुप जास्त प्रमाणात करावी लागते.
  • कोणत्याही फ्लोचार्टमध्ये इंस्ट्रक्शनचा वापर आपण किती विस्तृतपणे करू शकतो याचे कुठलेही ठाराविक दृष्टया निश्चित प्रमाण असलेले आपणास दिसुन येत नाही.

फ्लोचार्टचा वापर कुठे कुठे केला जातो?

फ्लोचार्टचा वापर वेगवेगळया कारणासाठी वेगवेगळया ठिकाणी केला जात असतो.

फ्लोचार्टचा वापर पुढील ठिकाणी केला जात असतो:

1) सेल्स आणि मार्केटिंगसाठी :

सेल्स प्रोसेस दर्शवण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये फ्लोचार्टचा वापर केला जातो.

2) बिझनेस आँपरेशनसाठी :

बिझनेस मध्ये आपले काम आणि दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून आपल्या टीमला मदत करण्यासाठी फ्लोचार्टचा वापर केला जातो.

एखाद्या प्रोजेक्टचे वर्णन करून तो पुर्ण करण्यात आपल्याला कोणते अडथळे येणार आहेत हे जाणुन घेण्यासाठी फ्लोचार्टचा वापर केला जातो.

3) साँपटवेअर प्रोग्रँमिंगसाठी :

प्रोग्रामिंगद्वारे डेटा कुठे फ्लो होतो आहे हे दाखवण्यासाठी फ्लोचार्टचा वापर केला जातो.

डेटाचे प्रोग्रँमिंग स्ट्रक्चरचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी फ्लोचार्टचा वापर केला जातो.

FLOWCHART करण्याकरता free tools

2 thoughts on “Flowchart विषयी माहीती – What Is Flowchart In Marathi”

Comments are closed.