Whatsapp payment कसे करावे ?- Whatsapp payment chi mahiti

Whatsapp payment ची पूर्ण माहिती

2021मध्ये नुकतेच व्हाँटस अँपने आपले एक नवीन फिचर लाँच केले आहे.ज्याचे नाव आहे व्हाँटस अँप पेमेंट.ह्या फिचरचा वापर करून आपण व्हाँटस अँपद्वारे कोणालाही पैसे पाठवू शकतो तसेच पैशांची देवाण घेवाण करू शकतो.

आजच्या लेखात व्हाँटस अँपच्या ह्याच पेमेंट फिचरविषयी आपण माहीती जाणुन घेणार आहोत.

आणि ह्या फिचरचा वापर करून आपल्याला पैशांची देवाण घेवाण कशी करता येते? हे देखील समजुन घेणार आहोत.

व्हाँटस अँप पेमेंट काय आहे?

व्हाँटस अँप पेमेंट फिचर हे व्हाँटस अँपचे नवीन फिचर आहे ज्याचा वापर करून आपण कोणालाही व्हाँटस अँपचा वापर करून पैसे पाठवू शकतो.

व्हाँटस अँप पेमेंट फिचर आपल्या मोबाईलमध्ये चालु कसे करायचे?आणि त्यात आपले बँक अकाऊंट अँड कसे करावे?

ज्या पदधतीने आपण व्हाँटस अँपद्वारे कोणालाही सहजपणे मँसेज,व्हिडिओ,फोटो,आँडिओ पाठवू शकतो एकदम त्याचप्रमाणे आता आपण पैसे देखील पाठवू शकणार आहे.

याचसाठी आधी आपण व्हाँटस अँप पेमेंट फिचर आपल्या मोबाईलमध्ये सुरू कसे करायचे हे जाणुन घेऊयात.

आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा आपण व्हाँटस अँप ओपन करत असतो वरती उजव्या बाजुला काँर्नरमध्ये आपल्याला थ्री डाँटचे आँप्शन दिसुन येत असते.त्या थ्री डाँटच्या आँप्शनवर क्लीक केल्यावर आपल्यासमोर खालील आँप्शन दिसुन येतात.

 • New Group
 • New Broadcast
 • Linked Devices
 • Starred Messages
 • Payment
 • Setting
 • वर दिलेल्या सर्व आँप्शनमध्ये आपण पेमेंट ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
 • पेमेंट आँप्शनवर क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर व्हाँटस अँपच्या काही टर्म अँण्ड कंडिशन तसेच पाँलिसी आपल्यासमोर येत असतात.त्या टर्म अँण्ड कंडिशन अँक्सेप्ट करण्यासाठी अँक्सेप्ट अँण्ड कंटिन्यु ह्या बटणावर ओके करावे.
 • व्हाँटस अँपकडुन काही परमिशन मागितल्या जातात ज्या आपण allow करायच्या असतात.
 • मग वेगवेगळया बँकेची यादी आपल्यासमोर येते त्यात आपली जी बँक असेल ती आपण निवडावी.
 • मग आपल्याला आपले जे अकाऊंट व्हाँटस अँप पेमेंट फिचरसाठी अँड करायचे आहे त्या अकाऊंटला इथे समाविष्ट करावे.
 • मग टँप डन ह्या आँप्शनवर क्लीक ओके करावे.
See also  अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय - म्हत्वाचे मुद्दे -Affiliate marketing information in Marathi

 इथे पैसे पाठविण्यासाठी आपल्याला आपला सहा अंकी डेबिट कार्ड नंबर आणि त्याची एक्सपायरी डेट देखील इंटर करावी लागत असते.

व्हाँटस अँप पेमेंट फिचरद्वारे पेमेंट receive कसे करायचे? -Whatsapp payment chi mahiti

व्हाँटस अँपद्वारे आपले पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला खालील दिलेली प्रोसेस फाँलो करावी लागत असते :

 • अँक्सेप्ट पेमेंट ह्या आँप्शनवर टँप करावे
 • आपल्यासमोर व्हाँटस अँपच्या काही टर्म अँण्ड कंडिशन तसेच पाँलिसी आपल्यासमोर येत असतात.त्या टर्म अँण्ड कंडिशन अँक्सेप्ट करण्यासाठी अँक्सेप्ट अँण्ड कंटिन्यु ह्या बटणावर ओके करावे.
 • एस एस एस द्वारे व्हेरीफिकेशन करण्यासाठी व्हेरीफाय व्युव्ह एस एम एस वर टँप करावे.
 • मग बँकेची एक यादी आपल्यासमोर येते त्यापैकी आपले ज्या बँकेत अकाऊंट असेल ती बँक आपण निवडावी.
 • मग आपण निवडलेल्या ज्या बँकेत आपला मोबाईल नंबर अँड असेल त्यांची यादी आपल्यासमोर दाखवली जाते.
 • तिथे आपण जे अकाऊंट आपल्याला व्हाँटस अँपला अँड करायचे आहे त्यावर क्लीक करायचे असते.
 • आणि शेवटी टँप डन ह्या आँप्शनवर ओके करावे.
 • मग पेमेंट रिसिव्ह करून झाल्यानंतर बँकेकडून आपल्याला पेमेंट रिसिव्ह झाल्याचा एक कनफर्मेशन मँसेज पाठवला जात असतो.
वर दिलेल्या सर्व आँप्शनमध्ये आपण पेमेंट ह्या आँप्शनवर क्लीक करावे
पेमेंट या ऑप्शन वर क्ल्कि करावे
पेमेंट मेथड टाकण्या साठी यावर क्लिक करावे

 

खाली दिलेल्या ऑप्शन मधून आपली बँक निवडावी

 

आपला मोबाइल नंबर वेरिफाय केला की आपण पेमेंट करू शकता

व्हाँटस अँप पेमेंट द्वारे पैसे कसे पाठवायचे?

 • आपल्याला ज्याला पैसे पाठवायचे आहे आपण त्याच्यासोबत केलेल्या व्हाँटस अँप चँटवर जायचे
 • व्हाँटस अँप चँटवर गेल्यावर तिथे खाली आपल्याला फोटो व्हिडिओ फाईल पाठविण्याचे आँप्शन दिलेले असते. त्यावर आपण क्लीक करावे
 • खाली ड्राँप डाऊनमध्ये दिलेल्या अँटँचमेंटसाठीच्या आँप्शनवर क्लीक केल्यावर आपल्याला व्हाँटस अँप पेमेंटचे आँप्शन दिसुन येते.तिथे क्लीक करायचे.
 • मग आपल्याला आपली डेबिट कार्डची माहीती व्हेरीफाय करण्यासाठी टँप कंटिन्यु टु व्हेरीफाय ह्या आँप्शनवर ओके करावे लागते.
 • मग आपला सहा अंकी डेबिट कार्ड नंबर आणि त्याची एक्सपायरी डेट तिथे विचारली जाते आपल्याला तिथे इंटर करावी लागते.
 • मग आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जात असतो.जो आँटोमँटिक आँटोफिल होऊन जात असतो.आणि समजा आपल्या मोबाईलवर ओटीपी आलेला नसेल तर आपण तो ओटीपी रिसेंड ओटीपी आँप्शनवर क्लीक करून पुन्हा पाठवू शकतो.
 • मग आपल्याला आपला एक युपीआय पिन तयार करावा लागतो.आणि तो सेट अप युपीआय पिन ह्या आँप्शनवर जाऊन इंटर करावा लागतो.आणि सबमीट बटणवर ओके करावे लागते.
 • युपीआय सेट अप पुर्ण झाल्यावर डन ह्या आँप्शनवर ओके करावे.
 • मग आपल्याला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्यासोबत झालेली आपली चँट पुन्हा एकदा ओपन करायची आणि फाईल अटँचमेंट आँप्शनवर जाऊन पेमेंट आँप्शनवर क्लीक करावे.
 • मग आपल्याला जेवढे पैसे समोरच्या व्यक्तीला पाठवायचे तेवढे अमाऊंट तिथे इंटर करायचे.आणि पेमेंट कशाबददल आहे हे देखील आपण तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो.
 • आणि मग शेवटी सेंड बटणावर ओके करायचे असते.
See also  IDV म्हणजे काय? महत्व आणि कॅलक्युलेशन - Insured Declared Value information in Marathi

महत्वाची टीप :

 कोणतेही पेमेंट पाठवण्याअगोदर आधी आपल्याला आपला युपीआय पिन विचारला जात असतो

 • पेमेंट मध्ये जी पेमेंट डिस्क्रिप्शन आँप्शन दिलेले असते ते बँक स्टेटमेंट मध्ये कुठेही शो केले जात नसते.ते फक्त आपल्याला लक्षात राहावे की आपण कशाबाबद समोरच्याला पेमेंट केले आहे यासाठी दिलेले असते.
 • पेमेंट सेंड झाल्यानंतर पेमेंटची सर्व ट्रान्झँक्शन डिटेल चँटमध्ये आपल्याला दिसुन येत असते.
 • पेमेंट सक्सेसफुली सेंड झाल्यानंतर बँकेकडून आपल्याला पेमेंट सेंड झाल्याचा एक कन्फर्मेशन साठी मँसेज पाठविला जात असतो.
 • आपण व्हाँटस पेमेंटद्वारे अशाच व्यक्तींना पैसे पाठवू शकतो ज्यांनी आपले व्हाँटस अँप पेमेंट फिचर इनेबल केले आहे.

व्हाँटस अँप पेमेंटविषयी काही अडचण तसेच तक्रार असेल तर आपण कुठे संपर्क साधावा?

 आपल्याला व्हाँटस अँपच्या पेमेंट फिचरविषयी काहीही प्रश्न विचारायचा असेल तर आपण 1-800-212-852 ह्या टोल फ्री नंबर वर सकाळी सात ते रात्री आठच्या कालावधीत संपर्क साधू शकतो.

 

फ्लोचार्ट बद्दल माहिती