वनस्पती अभिवृद्धी म्हणजे काय? रोपवाटिके करता दर्जेदार रोपांची निर्मिती

वनस्पती अभिवृद्धी म्हणजे काय?

वनस्पतींची निरनिराळ्या पद्धतीने रोपे तयार करून संख्या वाढविणे म्हणजे वनस्पती अभिवृद्धी होय

वनस्पतीची अभिवृद्धी म्हणजे बिया, कंद, पाने व मुळे इत्यादिंचा उपयोग करून नवीन रोपे तयार करण्याची प्रक्रिया होय.

अभिवृद्धी म्हणजे काय

दर्जेदार उत्पन्न देणारे रोपे मिळविण्यासाठी उत्तम बियाणे वापरले पाहिजे हे मानवाला शेती करायला लागल्यापासून माहिती असावे. बहुतांश वनस्पतीत बियाद्वारे रोपनिर्मिती करून मूळ झाडाचे गुणधर्म त्याच्या नवीन रोपात उतरत नाहीत हे त्याच्या लक्षात आल्यावर छाडे, गुटी कलम, भेट कलम, डोळे भरणे, दाब कलम यांचा वापर होऊ लागला.

अभिवृद्धी क्षेत्रात सोप्या पद्धतीने बिया टोकून रोप निर्मिती करण्यापासून थेट उती संवर्धनापर्यंत ही कला आज  विकसित झाली आहे. विविध फळक्षाडे, फूलझाडे यांच्या अभिवृद्धीत आज सूक्ष्म प्रवर्धनाने (मायक्रोप्रोपगेशन) नेत्रदीपक प्रगती केली आहे.

भारतात कृषी-फळ फुले व भाजीपाला क्षेत्राचा विकास लक्षात घेता वनस्पर्तीची रोपवटीकेचा व्यवसायला विशेष महत्व प्राप्त झाले  असून आपल्या देशात विविध प्रकारची फळझाडे, फुलपिके व ‘माजीपाला पिकाखाली क्षेत्र व उत्पादन यात लक्षणीय वाढ होत आहे. या पिकांच्या अधिक विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणून नवीन रोपे तयार करण्यासाठी वनस्पती अभिवृद्धी तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरले.

अभिवृद्धी म्हणजे काय ? त्याचे महत्व खालील मुद्द्यावरून समजून येते

  • फळे, फुले भाजीपाला पिकांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • नव्याने बाग विकसित करण्यासाठी दर्जेदार रोपांची मोठ्या प्रमाणात गरज भासते.
  • फळपिकांचे क्षेत्र वाढत असल्याने उती संवर्धित रोपे लागवडीसाठी आवश्यक आहेत उदा – केळीची
  • शेतकरी फुलपिकांच्या लागवडीस प्राधान्य देत असून शहारा लगतच्या फूल फळांच्या रोपांची मागणी वाढल आहे.
  • आहारा बद्दल बरीच सजगता वाढल्याने दररोजच्या आहारात भाजीपाल्ययांचा नित्य समावेश झाल्याने भाजीपाला उत्पादनासाठी दर्जेदार रोपे आवश्यक असतात.
  • शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात रोपनिर्मिती करणे शक्‍य होते.
  • वनस्पती अभिवृद्धी तंत्रज्ञाने ने सुधारित प्रतीची व नवीन जाती विकसित करण्यास मदत होते.
  • शाकीय अभिवृद्चीच्या तंत्रज्ञाने ने मातृवृक्षाची तंतोतंत गुणधर्म असणारी नवीन रोपे निर्मिती करता येते.
  • ज्या वनस्पतीची अभिवृद्धी बियाद्वारे करणे अवघड असते तसेच बिनबियांच्या वनस्पतीची अभिवृद्धी करणे शाकीय अभिवृद्धीने सुलभ झाले आहे.
  • परिसर सुशोभिकरण व पर्यावरण रक्षणा च्या दृष्टीने वनस्पती अभिवृद्धीने नवीन बागा विकसित करण्यास विशेष महत्त्व आहे.
  • प्रचंड प्रमाणात रोजगारनिर्मिती होते.
  • वनस्पती अभिवृद्धीद्वारे हाताळणी, बांधणी, साठवण, रचनातंत्रे, वाहतूक इत्यादीपूरक उद्योगांना चालना मिळते.
See also  Adorable म्हणजे काय? Adorable meaning in Marathi

अभिवृद्धी माध्यमे- वनस्पती अभिवृद्धी

रोपवाटिकेत रोपांची वाढ, अभिवृद्धी व बियांची लवकर व चांगल्या प्रकारे होण्यासाठी विविध माध्यमांचा किंवा एकापेक्षा जास्त माध्यमे एकत्र करून ‘माध्यम मिश्रणांचा’ वापर करण्यात येतो. माध्यमाची निवड करताना काही म्हत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक असते.

माध्यम उदाहरण – माती , शेणखत, कोकोपिट, वाळू शेततातील पालापाचोळा, भाताचे तुस , पिट व हिरवे शेवाळ इत्यादि.

चांगल्या माध्यमांची निवंड – अभिवृद्धी म्हणजे काय

  • माध्यमाच्या अंगी ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असावी. त्यामुळे वारंवाऱ पाणी देण्याची गरज भासणार नाही.
  • माध्यम दाट व घट्ट असावे. त्यामुळे बिया, छाटे, कंद व्यवस्थित रुजतील ब त्यांना चांगला आधार मिळेल.
  • माध्यम पाणी दिल्यावर जास्त प्रसरण पावू नये किंवा कोरडे झाल्यावर जास्त आकसू नये.
  • माध्यमात हानिकारक घटक किंवा प्रमाणापेक्षा जास्त क्षार नसावेत.
  • माध्यमातून पाण्याचा चांगला निचरा व्हावा तसेच हवा खेळती राहण्यासाठी त्यामध्ये सच्छिद्रता असावी.
  • माध्यम वजनाने खूप जड किंवा हलके नसावे.
  • माध्यम निर्जतुक कर्‌ता यायला  हवे.
  • माध्यम दुस-या माध्यमात मिसळून वापरता याया छवे.
  • रोपवाटिकेत विविध प्रकारची अभिवृद्धी माध्यमे रुजवणीसाठी बापरली जातात.

बियाद्वारे अभिवृद्धी करण्याची पद्धत फार पूर्वीपासून प्रचलित असून ती अतिशय सोपी व कमी खर्चीक आहे. निसर्गात आपोआप बियांपासून रोपे उगवताना आपण पाहतो.

झाडावरील  बी मातीत पडते ब ते अंकुरते. त्यामुळे या अभिवृद्धी पद्धतीत विशेष तांत्रिक  ज्ञानाची आवश्यकता नसते. आजही बहुसंख्य फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला व फुलझाडांची अभिवृद्धी बियाद्वारे होते , यामध्ये आवळा, बोर, काजू, बेत्न, लिंबू, नारळ, सीताफळ, फणस, जांभूळ, करवंद, आंबा, पपई, चिंच, कवठ, चारोळी. कॉफी इत्यादी फळझाडांचा प्रामुख्याने समावेश होतो.

बियाद्वारे अभिवृद्धी होणाऱ्या अशा असंख्य वनस्पती पृथ्वीतलावर आपणास आढळतात. मात्र निसर्गतः सर्वच वनस्पतींना बीजधारणा होतेच असे नाही , त्यामुळे अशा वनस्पतीचे शाकीय अवयव अभिवृद्धीसाठी वापरले जातात .

बी पासून अभिवृद्धी करण्याच्या प्रकाराला अशाकीय अभिवृद्धी किंवा लैंगिक अभिवृद्धी असेही म्हटले जाते.

See also  भारतातील टॉप १० जीवन विमा कंपन्या । Top 10 Life Insurance Companies in India

बियांपासून अभिवृद्धी – फायदे व तोटे

  • बी म्हणजे फुलातून तयार होणारे पक्व बीजक होय किंवा सुप्ताक्‍स्थेतील आणि सूक्ष्म अवस्थेतीत्ल वनस्पती म्हणजे बी होय.
  • बियापसून अभिवृद्धीचे फायदे
  • अनेक वनस्पतींची अभिवृद्धी बियांपासूनच केली. जाते. उदा., नारळ, पपई,सीताफळ,  लिंबू, वन लागवडीची झाडे.
  • बियांपासून अभिवृद्धी करण्याची पद्धत शाकीय पद्धतीपेक्षा सांधी, सहज व सोपी आहे.
  • ही पद्धत बरीचशी नैसर्गिक असून सर्वांच्या माहितीची आहे.
  • बियांद्वारे अभिवृद्धी करून संकरित बियाणांची निर्मिती करता येते.
  • नवीन जातीचा शोध बियांपासून अभिवृद्धी करूनच होतात .
  • शाकीय अभिवृद्धीसाठी आवश्यक असणारे मूळकांड (खुंट रोपे) याच पद्धतीने तयार करतात. (उदा., आंबा, चिकू, बोर इ.)
  • शाकीय अभिवृद्धीपेक्षा बियांपासून तयार केलेली झाडे जास्त काळ टिकतात व ते कणखर असतात.विषाणूंरहित  रोपे तयार करण्यासाठी या अभिवृद्धीचा वापर करतात. कारण बियांपासून अभिवृद्धी केल्न्याने त्यातून विषाणूंचा शिरकाव होणे शक्‍य नसते.
  • अतिशय कमी जागेत व जास्ल काळ बियाणे टिकविला येते.

बियांचासून अभिवृद्धीचे तोटे

  • या पद्धतीने अभिवृद्धी केल्यावर पुढील पिढीत मातृवृक्षांचे सर्व गुण नवीन रोपात पुर्णपणे उतरत नाहीत.
  • बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना फळधारणा होण्यास जास्त कालावधी लागतो.
  • बियांद्वारे तयार झालेल्ली झाडे फार अवाढव्य वाढतात त्यांचा आकार मोठा असल्याने मशागतीची कामे करणे (उदा., फवारणी, काढणी, नांगरणी) अवघड जाते.

बियांपासून अभिवृद्धीच्या मर्यादा

  • झाडांची वाढ समान नसते.
  • उत्पादन क्षमता, उत्पादन प्रत यात मर्यादा येतात.
  • बियांद्वारे उत्तम गुण-वैशिष्ट्ये नवीन रोपात किंवा रोपात स्थित(ट्रान्सफर) करता येत नाही.

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – अभिवृद्धी म्हणजे काय आणि रोपवाटिका