एम ओ डी बॅलन्स म्हणजे काय – MOD balance meaning in Marathi

एम ओ डी बॅलन्स म्हणजे काय MOD balance meaning in Marathi

 

एम ओडी बॅलन्स हे खाते आहे ज्याचा कालावधी एक वर्ष इतका असतो.म्हणजेच हे खाते किमान एक वर्षासाठी तयार करण्यात येत असते.

जेव्हा आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम निर्दिष्ट रक्मेपेक्षा अधिक असते.तेव्हा आपल्या खात्यामधील जी काही अतिरीक्त रक्कम आहे ती एफ डी म्हणजेच मुदत ठेवीमध्ये ट्रान्स्फर केली जाते.

ह्या खात्यामध्ये खाते धारकास म्हणजेच आपल्याला उच्च व्याज दर प्राप्त होत असते.

एम ओडी चा फुलफाॅर्म काय होतो?mod balance full form in Marathi

एम ओडीचा फुलफाॅर्म multi option deposit असा होत असतो.ज्याला मराठीत एकाधिक पर्याय ठेव असे म्हणतात.

एम ओडीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

● एम ओडीचा डिपाॅझिटचा किमान कालावधी एक वर्ष इतका असतो अणि कमाल कालावधी पाच वर्षे इतका असतो.

● एम ओडी निर्मितीची किमान मुदत ठेव रक्कम दहा हजार इतकी असते.

● एम ओडी निर्मितीची कमाल मुदत ठेव रक्कमेची कुठलीही विशिष्ट उच्च मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये.

एसबी आय मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे एम ओडी बॅलन्स कसा चेक करायचा?

सर्वप्रथम आपण सर्च इंजिनवर जाऊन एसबीआयचे नेट बँकिंग वेबसाईट पेजला व्हिझिट करायचे.

यानंतर आपला नेटबॅकिगचा युझर आयडी आणि पासवर्ड टाकायचा अणि आपल्या नेटबॅकिग खात्यावर लाॅग इन करायचे आहे.

See also  टाटा गृपच्या ह्या शेअर्सने केली तुकान बॅटिंग १० हजाराचे केले ६ लाख - Share price of Tata Elxsi rises

यानंतर अकाऊंट समरीच्या आॅप्शनवर जायचे अणि त्यावर क्लिक करायचे.

यानंतर डिपाॅझिट एम ओडी सेक्शन मध्ये जायचे तिथे आपणास एम ओडी अकाऊंट यादी दिसुन येईल.

आपला एसबी आय एम ओडी बॅलन्स चेक करण्यासाठी क्लिक हेअर फाॅर एम ओडी बॅलन्स वर क्लिक करायचे आहे

एसबी आय मध्ये योनो अँप द्वारे एम ओडी बॅलन्स कसा चेक करतात?

सगळ्यात पहिले आपण आपल्या मोबाईल मध्ये एसबीआयची योनो लाईट ही अॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून घ्यायची आहे.

योनो अँप डाऊनलोड करून झाल्यावर योनो अँप ओपन करून आपला नेट बँकिंगचा युझर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.अणि आपल्या नेट बँकिंग खात्यावर लाॅग इन करून घ्यायचे आहे.

अँपवर लाॅग इन करून झाल्यानंतर माय अकाऊंटच्या आॅप्शनवर जायचे आहे.त्यात अकाऊंट समरी वर क्लिक करायचे.

अणि मग डिपाॅझिट अकाऊंट आॅप्शनवर क्लिक करायचे इथे आपण आपला एम ओडी बॅलन्स चेक करू शकतो.

एस बी आय एम ओडी म्हणजे काय?

एसबी आय एम ओडी ही एक अशी फॅसिलिटी आहे जिचा उपयोग करून आपणास फिक्स डिपाॅझिट प्रमाणेच व्याज प्राप्त होत असते.

पण यात एफ डी प्रमाणे लाॅक इन कालावधीची बाध्यता नसते आपण पाहीजे तेव्हा आपले एफडीचे पैसे एटीएमदवारे यात काढु शकतो.कारण हे खाते आपल्या सेविंग अणि करंट अकाऊंट सोबत लिंक केलेले असते.

एम ओडी अकाऊंट हे आपण आॅनलाईन तसेच आॅफलाईन या दोघे पद्धतीने ओपन करू शकतो.

एसबी आय एम ओडीचे फायदे –

एम ओडी डिपाॅझिटरच्या करंट अणि सेव्हिंग खात्याशी लिंक असलेली स्कीम तसेच सुविधा आहे.

एफ डी मध्ये जर आपण लाॅक इन पिरीअडच्या आधी आपले पैसे काढले तर दंड म्हणून आपल्याला कमी व्याज प्राप्त होत असते.म्हणजे व्याजाच्या बाबतीत आपणास नुकसान होत असते.

पण एम ओडी मध्ये तसा कुठलाही प्रकार नाही इथे आपण कधीही आपले पैसे काढु शकतो.

See also  खरेदी आता पैसे नंतर स्कीम (BNPL) ची माहिती - Buy Now Pay Later Marathi information

यात आपण किमान दहा हजार रूपये गुंतवून एफडी अकाऊंट ओपन करू शकतो.यावर आपणास लोन घेण्याची सुविधा प्राप्त होत असते.

आवश्यकता असल्यास आपण हे खाते दुसऱ्या ब्रांच मध्ये ट्रान्स्फर देखील करू शकतो.

एम ओडी अकाऊंटचे तोटे –

एम ओडी अकाऊंट वर जे व्याज आपणास प्राप्त होत असते त्यावर आपल्याला काही टॅक्स पे करावा लागत असतो.

आपण आपल्या एम ओडी अकाऊंटशी लिंक असलेल्या सेविंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे फार आवश्यक आहे.

एम ओडीचा अर्थ काय होतो?

एम ओडी म्हणजे multi option deposit एकाधिक पर्याय ठेव म्हणजे इथे आपल्याला एकापेक्षा अधिक म्हणजेच वेगवेगळे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत.

येथे आपण आपले पैसे डिपाॅझिट मध्ये ठेवू शकतो.एटीएमदवारे ते काढु शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला ट्रान्स्फर देखील करू शकतो.