टाटा गृपच्या ह्या शेअर्सने केली तुकान बॅटिंग १० हजाराचे केले ६ लाख – Share price of Tata Elxsi rises


टाटा गृपच्या ह्या शेअर्सने केली तुकान बॅटिंग १० हजाराचे केले ६ लाख

टाटा कंपनी ही भारतातील एक आघाडीची कंपनी आहे.टाटा गृपच्या अनेक कंपन्या आज शेअर बाजारात देखील आहेत.

टाटा इलेक्सी ही हेल्थ केअर,डिझाईन,टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन,टेलिकाॅम अशा विविध सेक्टर मध्ये सर्विस देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

टाटा गृपच्या एका शेअर्सने १० हजारांच्या गुंतवणूकीचे ६ लाख करत गुंतवणूक दारांना बाजारात चांगलीच कमाई करून दिली आहे.

टाटा गृपच्या टाटा एलेक्सी tata elxsi ह्या शेअर्सने गुंतवणूक दारांना जोरदार बॅटिंग करत गुंतवणूक दारांना १० वर्षातच चांगले रिटर्न प्राप्त करून दिले आहेत.

ज्या गुंतवणूक दारांनी टाटा गृपच्या टाटा इलेक्सी शेअर्स मध्ये दहा वर्षे अगोदर १० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली आहे.अशा गुंतवणूक दारांच्या गुंतवणूकीचे मुल्य सध्या ६ लाखापर्यंत पोहोचले आहे.

टाटा इलेक्सीच्या शेअर्सचा भाव शुक्रवारी ०.३८ टक्के इतका घसरला.दिवसाच्या अखेरीस हा शेअर ७ हजार ८१५ रूपयांवर बंद होताना दिसुन आला.

मागील काही महिन्यात ह्या शेअर्समध्ये ९.७३ टक्के इतकी तेजी पाहायला मिळाली अणि सहा महिन्यांत हा शेअर्स १६.७८ टक्के इतका वधारताना पाहावयास मिळाला आहे.

२०२३ मध्ये ह्या शेअर्समध्ये २४ टक्के इतकी तेजी दिसुन आली.अणि वर्षभरात ह्या शेअर्समध्ये ९.१६ टक्के इतकी घसरण देखील झालेली पाहावयास मिळाली आहे.

ह्या टाटा इलेक्सी शेअर्सने पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० टक्के रिटर्न प्राप्त करून दिला आहे.हे शेअर्स काही दिवसांत लांबचा पल्ला गाठत इन्व्हेस्टरला अधिकतम प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त करून देतील असे बाजार तज्ञांचे मत आहे.

प्रमोटर्सकडे ह्या कंपनीचा ४२.९२ टक्के इतका वाटा असुन सर्वसामान्य इन्व्हेस्टरचा यात ५६.०८ टक्के इतका हिस्सा असल्याचे सांगितले जात आहे.

टेक्निकल अॅनेलिस्ट मिलिंद वासुदेव यांच्या मते ह्या शेअर्सची किंमत पुढे जाऊन ८ हजार तसेच ८२०० रूपये इतकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  Leadership करण्याच्या पदधती तसेच प्रकार -Leadership style and types in Marathi

NOTE -The information in this blog is not meant to be an endorsement or offering of any stock purchase. Investments in securities market are subject to market risks, Always Refer your financial consultant advice before Investing.