Fixed deposit Interest rate 2022 – भारतातील टॉप 10 बँकांचे व्याजदर किती ?

 

Fixed deposit रेट व्याजदर – भारतातील टॉप 10 बँक – Fixed deposit Interest rate 2022

गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे पैसे असतात मात्र त्यांना गुंतवायचे कुठे? जिथे गुंतवणूक करणार त्यातून आपल्याला चांगला आणि जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळेल? हे प्रश्न अनेकांना सतावत असतात.

फिक्सड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून आपण कोणताही धोका न स्वीकारता एका फिक्सड व्याजदारावर पैसे बँकेत गुंतवत असतो. इथे बँकेत म्हणणे चुकीचे ठरेल कारण फक्त बँक फिक्सड डिपॉझिट देते असे नाही. अनेक वित्तीय संस्था जसे की बँका, पतसंस्था, सोसायटी या आपल्याला फिक्सड डिपॉझिट हा पर्याय देत असतात.

आज आपण याच फिक्सड डिपॉझिट विषयी फी आणि त्यावर मिळणार व्याजदर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फिक्सड डिपॉझिट म्हणजे काय?

फिक्सड डिपॉझिट जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे देखील एक असे खाते आहे ज्यामध्ये एका ठराविक कालावधीसाठी काही रक्कम आपण टाकत असतो. यावर आपल्याला आधी ठरवून दिलेल्या एका व्याजदाराप्रमाणे व्याज देखील मिळते.

आपण जी रक्कम आत्ता फिक्सड डिपॉझिट खात्यात टाकतो आहे तिला आपण मुदतीपूर्वी काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे फिक्सड डिपॉझिटला मराठी शब्द हा ‘मुदत ठेव’ असा आहे.

फिक्सड डिपॉझिट मध्ये टाकलेले पैसे आपल्याला जर मुदत पूर्व काढायचे असतील तर आपल्याला त्यावर काही फी देऊन ते काढता येतात. यासाठी आपल्याला बँकेला सर्वात आधी कल्पना द्यावी लागते.

फिक्सड डिपॉझिट वर आपल्याला सामान्य नागरिकांना वेगळे व्याजदर मिळतात आणि सिनियर सिटीझन ला वेगळे व्याजदर मिळत असतात.

भारतातील टॉप 10 बँकांचे फिक्सड डिपॉझिट वरील व्याजदर

खाली देत असलेले व्याजदर हे मार्च 2022 मधील अपडेट अनुसार आहेत. यामध्ये 7 दिवस ते 10 वर्षे कालावधी असलेल्या फिक्सड डिपॉझिट वर मिळणारा इंटरेस्ट रेट दिलेला आहे.

बँकेचे नाव FD व्याजदर (सामान्य नागरिक- प्रति वर्ष)

FD व्याजदर (जेष्ठ नागरिक – प्रति वर्ष)

बँकेचे नाव FD व्याजदर (सामान्य नागरिक- प्रति वर्ष) FD व्याजदर (जेष्ठ नागरिक – प्रति वर्ष)
स्टेट बँक ऑफ इंडिया 2.90% ते 5.50% 3.40% ते 6.30%
एचडीएफसी बँक 2.50% ते 5.60% 3.00% ते 6.35%
पंजाब नॅशनल बँक 2.90% ते 5.25% 3.50% ते 5.75%
कॅनरा बँक 2.90% ते 5.50% 2.90% ते 6.00%
ऐक्सिस बँक 2.50% ते 5.75% 2.50% ते 6.50%
बँक ऑफ बडोदा 2.80% ते 5.25% 3.30% ते 6.25%
आयडीएफसी बँक 2.50% ते 6.00% 3.00% ते 6.50%
बँक ऑफ इंडिया 2.85% ते 5.05% 3.35% ते 5.55%
पंजाब अँड सिंध बँक 3.00% ते 5.30% 3.50% ते 5.80%

 

 • 2 करोड पर्यंत ठेवींवर बँकांकडून वरील व्याजदर दिले जातात. यामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 6.00% व्याजदर IDFC बँक आपल्याला देते. आपण
 • 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी जर फिक्सड डिपॉझिट करत असू तर आपल्याला 6.00% व्याजदर मिळतो. जेष्ठ नागरिकांसाठी देखील IDFC बँकेत 6.50% व्याजदर दिला जातो. जेष्ठ नागरिकांसाठी IDFC बँकेसोबतच ऍक्सिस बँक देखील 6.50% व्याजदर देते.
 • IDFC बँकेनंतर जर तुम्हाला FD करायची असेल तर मग ऍक्सिस बँक 5.75% व्याजदर 5 वर्षांहून अधिक कालावधीच्या FD साठी देते. त्यानंतर HDFC बँकेचा क्रमांक लागतो. HDFC बँक देखील 5.60% व्याजदर फिक्सड डिपॉझिट वर देते.

टॅक्स सेव्हिंग फिक्सड डिपॉझिट

अनेकदा आपण जर मोठी रक्कम बँकेत फिक्सड डिपॉझिट करून टाकत असू तर त्यावर बँका काही चार्जेस लावते आणि त्याला आपण टॅक्स म्हणतो. आपल्याला जितका व्याजदर मिळतो त्यावर हा टॅक्स लावला जातो. मात्र अनेक बँकांकडून टॅक्स सेव्हिंग फंड देखील जाहीर केले गेले आहेत. टॅक्स सेव्हिंग फंड्स मध्ये 1,50,000 रक्कम होईपर्यंत इनकम टॅक्स कायदा,1961 भाग 80क अनुसार कोणत्याही प्रकारे टॅक्स लावला जात नाही.

आपण जेव्हा 2 करोड पेक्षा कमी रकमेच्या फिक्सड डिपॉझिटची चारचा करतो तेव्हा ते टॅक्स सेव्हिंग फिक्सड डिपॉझिट मध्ये येतात.

टॅक्स सेव्हिंग फिक्सड डिपॉझिट वर जास्त इंटरेस्ट रेट देणाऱ्या काही बँका- (वरील यादीतील सर्व बँका देखील टॅक्स सेव्हिंग फंड त्याच इंटरेस्ट रेट ने देतात, त्यामुळे त्यांना या यादीत जोडलेले नाही)

टॅक्स सेव्हिंग फंड चे नाव सामान्य नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष) जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष)
इंडसइंड बँक 6.00% 6.50%
युनियन बँक ऑफ इंडिया 5.40% 5.90%

NBFCs मुदत ठेव व्याजदर

नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या देखील बँकांपेक्षा जास्त व्याजदर फिक्सड डिपॉझिट वर देत असतात. या सर्व कंपन्यांचे रजिस्ट्रेशन हे कंपनीज ऍक्ट, 1956 अंतर्गत झालेले आहे. बँका वगळता फक्त याच काही कंपन्यांना वित्तीय व्यवहार हाताळण्याची परवानगी दिलेली आहे.
आपण आता 1 वर्षे ते 5 वर्षे कालावधीसाठी NBFCs कडून मिळणाऱ्या व्याजदरविषयी जाणून घेऊयात.

बँकेचे नाव सामान्य नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष)

जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष)

बँकेचे नाव सामान्य नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष) जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर (प्रति वर्ष)
ICICI होम फायनान्स 5.25% ते 6.65% 5.50% ते 6.90%
LIC हाऊसिंग फायनान्स 5.25% ते 5.75% 5.50% ते 6.00%
PNB हाऊसिंग फायनान्स 5.90% ते 6.70% 6.15% ते 6.95%
श्रीराम सिटी युनियन फायनान्स 6.50% ते 9.05% 6.80% ते 9.35%

सिनियर सिटीझन (जेष्ठ नागरिकांसाठी) सर्वाधिक व्याजदर देणारे फिक्सड डिपॉझिट

अनेकदा आपल्याला असे बघायला मिळते की जेष्ठ नागरिक जास्त रिस्क घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी बँक अकाऊंट मध्ये पैसे ठेवण्याचा फिक्सड डिपॉझिट हा एक चांगला पर्याय असतो. यात रिस्क देखील नसते आणि बँकांवर ट्रस्ट देखील असतो.

बँकेचे नाव एक वर्ष कालावधी साठी व्याजदर 1 ते 5 वर्षे कालावधी साठी व्याजदर 5 वर्षांहून अधिक कालावधीसाठी व्याजदर

बँकेचे नाव एक वर्ष कालावधी साठी व्याजदर 1 ते 5 वर्षे कालावधी साठी व्याजदर 5 वर्षांहून अधिक कालावधीसाठी व्याजदर
कॅनरा बँक 2.95% ते 4.95% 5.70% ते 6.00% 6.00%
HDFC बँक 3.00% ते 4.90% 5.40% ते 5.80% 6.25%
ICICI बँक 3.00% ते 4.90% 5.40% ते 5.85% 6.30%
स्टेट बँक ऑफ इंडिया 2.90% ते 4.90% 4.90% ते 5.30% 5.40%

कालावधी नुसार सर्वाधिक इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँक

Fixed deposit Interest rate 20221 वर्ष कालावधी

 • तुम्हाला जर एका वर्षासाठी मुदत ठेव पावती करायची असेल तर
 • पंजाब आणि सिंध बँक व IDFC बँक सर्वाधिक म्हणजेच 4.50% व्याजदर देतात या दोन्ही बँकांच्या पाठोपाठ
 • पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक देखील 4.40% व्याजदर देते.
 • सीनियर सिटीझन साठी देखील P&SB आणि IDFC 5.00% तर बाकी तिन्ही बँका 4.90% व्याजदर देतात.
  2 वर्ष कालावधी

2 वर्षांसाठी कालावधी

जर तुम्हाला फिक्सड डिपॉझिट करायचे असेल तर

 • कॅनरा बँक व युनियन बँक ऑफ इंडिया 5.10% व्याजदर देते.
 • सिनियर सिटीझन साठी हा व्याजदर 5.60% इतका आहे.

5 वर्षे कालावधी

 • 5 वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर आपण टॉपच्या इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँकांविषयी जाणून घेऊयात.
 • ऍक्सिस बँक आणि युनियन बँक या दोन्ही बँका 5 वर्षासाठी असणाऱ्या फिक्सड डिपॉझिट वर 5.40% व्याजदर देते.
 • जेष्ठ नागरिकांसाठी ऍक्सिस बँक सर्वाधिक म्हणजेच 6.05% व्याजदर देते. त्या पाठोपाठ युनियन बँक ऑफ इंडिया 5.90% व्याजदर देते.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठी 5.30% व्याजदर देते.
 • जेष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.80% इतका आहे. स्टेट बँक पाठोपाठ कॅनरा बँकेचा क्रमांक लागतो. कॅनरा बँक सामान्य नागरिकांसाठी 5.25% तर जेष्ठ नागरिकांसाठी 5.75% व्याजदर देते.

Leave a Comment