Depression – नैराश्य कारण, लक्षण व उपचार विषयी माहीती – Depression information in Marathi

Depression – नैराश्य विषयी माहीती – Depression information in Marathi

मित्रांनो डिप्रेशन ही एक अशी गंभीर समस्या आहे जी आपल्याला नेहमी एखाद्या गोष्टीचा खुप जास्त विचार केल्यावर तसेच ताण तणावाच्या चिंतेच्या परिस्थितीत वावरल्याने उदभवत असते.

आजच्या लेखात आपण ह्याच डिप्रेशनविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण डिप्रेशन म्हणजे काय असते?याची लक्षणे कोणकोणती असतात?यातुन बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाय करायला हवे इत्यादी बाबीविषयी जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Depression म्हणजे काय?

डिप्रेशन ही एक नैराश्याची अवस्था आहे.तसेच हा एक गंभीर स्वरुपाचा आजार देखील आहे.यात आपल्या मनात कुठल्याही बाबतीत एक नैराश्यवादी भावना दृष्टीकोन निर्माण होत असतो.

डिप्रेशन ही एक मानसिक अवस्था आहे ज्यात आपण आधी आनंद घेतलेल्या एखाद्या गोष्टीत देखील आपल्याला रूची तसेच रस राहत नसतो.

आणि यात आपण सदैव चिंता आणि तणावात दुखी राहत असतो.ज्याने आपल्या आजुबाजुचे वातावरण, आपले विचार,आपला दृष्टीकोन देखील दिवसेंदिवस नकारात्मक होत जात असतो.

Depression चा मराठीत काय अर्थ होतो? (Depression Meaning In Marathi) –

डिप्रेशनचे मराठीत पुढील काही अर्थ होतात –

● नैराश्य

● उदासिनता

● खिन्नता

● सतत दूखी आणि निराश राहणे

● सतत चिंतेत राहणे

Depression चा हिंदीत त काय अर्थ होतो?(Depression Meaning In Hindi)

डिप्रेशनचे हिंदीत पुढील काही अर्थ होतात –

● अवसाद

● खिन्नता

See also  चालण्याचे आरोग्य दायी फायदे – Health benefits of walking Marathi

Depression ची लक्षणे कोणकोणती असतात?

डिप्रेशन ही एक अशी समस्या आहे जी आपल्या दैनंदिन जीवणात सर्वसामान्यपणे जाणवत असते जी अत्यंत सौम्य असते पण याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन हे एक गंभीर आजाराचे स्वरूप धारण करीत असते.

Depression ची लक्षणे कोणकोणती असतात?

 

तसे पाहायला गेले तर डिप्रेशनची अशी अनेक लक्षणे आहेत ज्यावरून आपण ओळखु शकतो की एखादी व्यक्ती तसेच आपण स्वता डिप्रेशनमध्ये आहोत.

पण आज आपण डिप्रेशनची काही अशी प्रमुख लक्षणे जाणुन घेणार आहोत.जी दिसुन आल्यास आपल्याला लगेच समजुन येईल की आपण तसेच एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे.

Depression ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

1. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कोणतेही काम करण्याचा मुड होत नसतो.सतत आळस येत असतो.

2. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कारण नसताना देखील सतत उदास आणि भकास आणि दुखी वाटत असते.अशा व्यक्तीला आयुष्यात रसच राहत नाही.आणि नेहमी काहीतरी वाईट घडण्याची भीती वाटत असते.

3. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला जी गोष्ट त्याला आधी आवडायची ज्यात त्याला अत्यंत रूची असायची ती देखील करायची अजिबात ईच्छा होत नसते.

4. व्यक्तीला जास्त भुक लागत नाही ज्याने त्याचे वजन देखील कमी कमी होत जाते.आहाराच्या प्रमाणात बदल होत असतो.

5. व्यक्तीला सतत झोपुन राहावेसे वाटते.अशी व्यक्ती सतत झोपुन राहत असते.

6. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोणतेही कार्य करण्यासाठी उर्जा राहत नसते.ज्यामुळे त्याला सतत थकवा देखील जाणवत असतो.

7. व्यक्तीला सतत अपराधीपणाची भावना जाणवत असते.आपल्यात काही करण्याची क्षमता नाही आपण लायक नाही असे वाटत असते.

8. कुठल्याही बाबतीत सखोल विचार करण्यात त्याबाबतीत योग्य तो निर्यय घेण्यात तसेच एखाद्या कामात एकाग्र होण्यास अडचण येत असते.कुठल्याही कामात मन एकाग्र होत नसते.

9. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या मनात सतत चुकीचे तसेच वाईट कृत्य करण्याचे विचार येत असतात
10. उदा,पाँर्न बघणे,नशा करणे,आत्महत्येचा विचार करणे

See also  ईपीएफओ मध्ये आजारपणासाठी आगाऊ रक्कमेचा दावा कसा करायचा? How to claim for advance for illness in EPFO in Marathi

11. व्यक्तीच्या मनात सतत नैराश्यवादी नकारात्मक विचार येत असतात ज्याने त्याचा जीवणाकडे तसेच कुठल्याही घटना प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील तसाच बनत जातो.

12. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्ती आपल्या कुटुंबातील सभासदांशी संवाद साधणे देखील कमी करत असते.

13. व्यक्तीचे मन एका जागी स्थिर राहत नसते त्याचे मन सतत विचलित होत असते ज्यामुळे त्याला कोणतेच कार्य पुर्ण करणे शक्य होत नसते.

14. व्यक्ती नेहमी एकांतात राहायला अधिक प्राधान्य देते आणि व्यक्ती कोणामध्ये जास्त येत नाही बंद खोलीत एकटे राहणे अधिक पसंद करते.

15. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट आठवण्यात खुप अडचण येत असते.म्हणजेच त्याची स्मरणशक्ती कमजोर होत असते.

16. व्यक्ती फार कमी बोलणे आणि बोलणे अधिक पसंद करते.

17. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्ती सतत चिंतेत काळजीत आणि तणावात राहत असते.अशी व्यक्ती चिडचिड देखील खुप करते,अचानक खुप जास्त भावूक देखील होऊन जात असते.एकटेपणात बडबड करत असते.आणि अशा व्यक्तींना पचनाच्या,डोकेदुखीच्या,अंगदुखीसारख्या शारीरीक समस्या देखील सतत जाणवत असतात.

Depression ची कारणे कोणकोणती असु शकतात?

तसे पाहायला गेले तर डिप्रेशनची अनेक कारणे असु शकतात.

ज्यात अनुवांशिक शोषण,एकटेपणा जाणवणे, बेरोजगारी,पैशांची टंचाई,कौटुंबिक घरगुती वादविवाद,नोकरीत उद्योग धंदयात झालेले मोठे नुकसान किंवा उद्योग धंद्यात सतत येणारे अपयश,कामाचा अतिरीक्त भार,एखादी जवळची तसेच अत्यंत प्रिय व्यक्ती सोडुन जाणे,कोणीतरी केलेली एखादी मोठी फसवणुक तसेच विश्वासघात अशी अनेक कारणे डिप्रेशन येण्यासाठी कारणीभुत ठरत असतात.

Depression मधुन बाहेर निघण्यासाठी आपण काय उपाय करायला हवे?

जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात काही चांगले घडेल अशी अपेक्षाच राहत नसते.अशी व्यक्ती संकटांसमोर परिस्थिशीसमोर हार मानून निराश होऊन बसत असते.

म्हणुन अशा व्यक्तीच्या मनात कुठलाही नकारात्मक विचार येऊ न देणे त्याच्या मनात सकारात्मकता निर्माण करणे हा त्या व्यक्तीला डिप्रेशनमधुन बाहेर काढण्याचा एक चांगला उपाय आहे.

See also  बीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene

अशा व्यक्तीच्या नैराश्याचे कारण नेमके काय आहे ते आपण जाणुन घ्यायला हवे आणि त्यानुसार त्याच्यावर उपचार करायला हवे.

Depression मधुन बाहेर पडण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकतो:

1)डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आपण एकटे सोडु नये आणि अशा व्यक्तीला सतत काहीतरी कामात व्यस्त ठेवायला हवे.

2) डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने रोज सकाळी प्राणायम तसेच योगा करायला हवा.

3) परिस्थिती अनुकुल असो किंवा प्रतिकुल नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायला हवा.चिंता करणे सोडायला हवे.

4) चांगले सुमधुर संगीत ऐकायला हवे.

5) आपल्या आवडीच्या कामात स्वताला मग्न ठेवायला हवे.

6) ताज्या हवेत फिरायला जायला हवे मोकळया शुदध हवा असलेल्या वातावरणात जायला हवे.

7) अशा व्यक्तीने स्वता देखील स्वताची काळजी करायला हवी.

8) निरोगी आहाराचे सेवण करायला हवे.आहारात पालक,रताळ,काजु,अँव्हाकँडो बेरी,अशा अन्न पदार्थांचा समावेश करायला हवा.कारण याने रताळयामध्ये व्हीटँमिन बी 6 असते आणि पालक,काजु,बेरी, अँव्हाकँडो याने सेरोटोनिनच्या मात्रेत वाढ होत असते.आणि पुरेशी झोप देखील घ्यायला हवी.

9) गरज असल्यास वेळीच मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.किंवा आपण अँण्टीडिप्रेशनच्या गोळया औषधे देखील डाँक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतो.

 

 

Health insurance – कोणत्या आजारांचे कव्हरेज मिळत नाही ? Common Health Insurance Exclusions in Marathi

1 thought on “Depression – नैराश्य कारण, लक्षण व उपचार विषयी माहीती – Depression information in Marathi”

Comments are closed.