बायपोलर डिसाँर्डर म्हणजे काय?लक्षणे ,प्रकार व उपचार- Bipolar Disorder Meaning In Marathi

बायपोलर डिसाँर्डर म्हणजे काय Bipolar Disorder Meaning In Marathi

 आपल्या आजुबाजुला असे अनेक व्यक्ती आपणास दिसुन येतात.जे नेहमी डिप्रेशनमध्ये ताणतणावात राहत असतात.

ज्यामुळे त्यांना पुढे जाऊन मोठमोठया गंभीर मानसिक तसेच शारीरीक समस्यांना देखील सामोरे जावे लागत असते.

आज आपण अशाच एका महत्वाच्या मानसिक आजाराविषयी बायपोलर डिसाँर्डरविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.जो अधिक ताणतणाव,मानसिक धक्का,तसेच डिप्रेशनमुळे आपणास उदभवत असतो.

आजच्या लेखात आपण बायपोलर डिसाँर्डर म्हणजे काय?हा आजार जडण्याची कारणे कोणकोणती असतात?याची लक्षणे कोणकोणती असतात?तसेच यावर आपण कोणते उपचार करणे गरजेचे आहे हे जाणुन घेणार आहोत.

 बायपोलर डिसाँर्डर म्हणजे काय? Bipolar Disorder Meaning In Marathi

 बायपोलर डिसाँर्डर ही एक आरोग्यविषयक मानसिक स्थिती तसेच समस्या आहे.

ज्यामध्ये आपला मुड हा नेहमी चेंज होत राहतो यात आपण कधी कधी खुपच आनंदी होऊन जात असतो तर कधी कधी खुपच निराश होऊन जात असतो.ज्यास मँनिक ड्रिप्रेशन म्हणुन देखील संबोधिले जात असते.

आणि ह्याच मँनिक डिप्रेशनचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनशैली,वागणुक,विचारशैली इत्यादींवर गंभीर परिणाम होत असतो.

मँनिया म्हणजे काय Mania Meaning In Marathi

मँनिया म्हणजे अशी मानसिक स्थिती किंवा मुड ज्यात आपली उर्जाशक्ती एकदम सर्वोच्च पातळीवर पोहोचलेली असते.त्याला मँनिया असे म्हणतात.

See also  १ मे रोजी गुजरात स्थापणा दिवस का साजरा केला जातो?गुजरात स्थापणा दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? - Happy Gujrat Day

बायपोलर डिसाँर्डरचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत? Types Of Bipolar Disorder In Marathi

 बायपोलर डिसाँर्डरचे एकुण चार प्रमुख प्रकार पडतात जे पुढीलप्रमाणे आहेत-बायपोलर डिसाँर्डरचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Bipolar Disorder In Marathi

1)बायपोलर 1 :

2) बायपोलर 2 :

3) सायक्लोथेमिक डिसाँर्डर :

4) अवर्गीकृत डिसाँर्डर :

 बायपोलर 1 :

 • याध्ये एखादा रूग्न कधीकधी खुपच सकारात्मक विचार करू लागतो,प्रमाणापेक्षा अधिक जास्त आनंदी राहत असतो.दानी तसेच उदार होऊन इतरांना बक्षिस देत असतो.गरजेपेक्षा अधिक प्रमाणात कुठल्याही वस्तुची शाँपिंग करत असतो.
 • कधीकधी यांचा आत्मविश्वास उत्साह देखील आधिक जास्त वाढलेला आपणास पाहायला मिळतो.

बायपोलर 2 :

बायपोलर टु ह्या विकारात आपले सतत मन उदास राहत असते आणि विनाकारण रडल्यासारखे वाटत असते,झोप येत नसतानाही अंथरुणावर पडावेसे वाटते वाटणे,कधी खूप कमी तर कधी खुप जास्त झोप येते अशी लक्षणे बायपोलर टु ची आहेत.

बायपोलर टु ह्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णास आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कमी झाल्याचे(Weakness) जाणवत असते.

जे लोक या विकाराने बाधित असतात ते जास्त कोणाशी मिळत मिसळत नाही एकटे राहत असतात सामाजिक होणे लोकांना भेटणे यांना आवडत नसते.

सायक्लोथेमिक डिसाँर्डर :

सायक्लोथेमिया तसेच सायक्लो थेमिक डिसाँर्डर हा द्ववी ध्रुवीय विकाराचा सौम्य प्रकार आहे.

हा विकार असलेल्या व्यक्तीचा मुड नैराश्याच्या प्राथमिक अवस्थेपासून भावनिक त्रासाचे शिखर गाठेपर्यत नेहमी बदलत असलेला आपणास दिसुन येतो.

अवर्गीकृत डिसाँर्डर :

 अवर्गीकृत डिसाँर्डर मध्ये रूग्णाच्या मुडमध्ये बदल होत असतो.पण याची लक्षणे बायपोलर डिसाँर्डरच्या लक्षणांशी मँच करत नसतात.म्हणुन याला अवर्गीकृत डिसाँर्डर असे म्हणतात.

बायपोलर डिसाँर्डरची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?- Bipolar Disorder Symptoms In Marathi

 बायपोलर डिसाँर्डरची पुढील काही प्रमुख लक्षणे आहेत जी आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

 • बायपोलर डिसाँर्डर ही आपली एक अशी मानसिक स्थिती असते.तसेच मुड असतो ज्यामध्ये आपण कधीकधी खुपच सकारात्मक विचार करू लागतो,प्रमाणापेक्षा अधिक जास्त आनंदी राहत असतो.दानी तसेच उदार होऊन इतरांना बक्षिस देत असतो.गरजेपेक्षा अधिक प्रमाणात कुठल्याही वस्तुची शाँपिंग करत असतो.
 • आणि ह्या मुडचा दुसरा टप्पा तसेच स्थिती अशी असते ज्यात आपण खुपच अधिक नकारात्मक विचार करत असतो,प्रमाणापेक्षा अधिक आणि कारण नसताना देखील दुखी तसेच निराश होऊन बसत असतो.ही एक अशी मानसिक अवस्था आहे.ज्यात आपल्याला कोणत्याच गोष्टीत कुठल्याही प्रकारची रूची राहत नाही,काहीच करू वाटत नसते,बायपोलर डिसाँर्डर म्हणजे काय याची लक्षणे कोणती Bipolar Disorder Meaning And Its Symptoms In Marathi
 • कोणाशी काहीच बोलावेसे वाटत नाही ज्यामुळे आपण सतत एकटे राहणे अधिक पसंद करत असतो.
 • आपले रोजचे जे आवडीचे काम आहे जे करताना आपण नेहमी आनंदी राहत असतो ते देखील करण्याची ईच्छा होत नाही.
 • आयुष्यात सर्व काही संपले आहे आणि आता जगण्यासारखे काहीच उरलेले नाहीये असे आपणास वाटु लागते ज्याने आपल्या मनात आत्महत्या करून आयुष्य संपवण्याचा विचार देखील येत असतो.
 • बायपोलर डिसाँर्डर असलेली व्यक्ती नाहक संताप चिडचिड करत असते.तर कधीकधी यांचा आधिक जास्त आत्मविश्वास वाढलेला आपणास दिसुन येतो.
See also  १४६ वाक्यप्रचार त्यांचा अर्थ अणि वाक्यात उपयोग -marathi vakprachar

बायपोलर डिसाँर्डरची मुख्य कारणे कोणती असतात?- Causes Of Bipolar Disorder In Marathi

 बायपोलर डिसाँर्डरची समस्या पुढील काही महत्वाच्या कारणांमुळे आपणास उदभवण्याची दाट शक्यता असते.

1)अनुवांशिकता :

बायपोलर डिसार्डर हा विकार जडण्यामागचे पहिले कारण अनुवांशिकता हे असु शकते.

म्हणजे समजा एखाद्या मुलाच्या तसेच मुलीच्या आई-वडील किंवा आजी आजोबा यांना जर ही समस्या आधीपासुन असेल तर अनुवांशिकरीत्या हाच विकार आई वडिलांपासुन त्यांच्या मुलामुलीला,आणि मग त्याच मुला मुलीचे लग्न झाल्यानंतर तो आजार त्याच्या अपत्यांना देखील जडत असतो.

अशा पदधतीने अनुवांशिकतेने हा विकार एका पिढीपासुन दुसरया पिढीकडे जात असतो.

2) अधिक जास्त मानसिक ताणतणाव:

 अधिक जास्त मानसिक ताणतणाव घेणे हे देखील बायपोलर डिसार्डरचे दुसरे प्रमुख कारण असु शकते.

यात एखादी व्यक्ती जर खुप अधिक प्रमाणात मानसिक ताणतणावात वावरत असेल नेहमी चिंतीत राहत असेल,डिप्रेशनमध्ये राहत असेल तर त्यास बायपोलर डिसाँर्डरची समस्या उदभवू शकते.

3) मनाला लागलेला एखादा मानसिक धक्का :

 बायपोलर डिसाँडरचे तिसरे कारण आहे मनाला लागलेला एखादा मानसिक धक्का.

यात मनाला एखादा आघात पोहचलेली एखादी व्यक्ती सतत निराश आणि उदास राहत असते.कोणाशी जास्त बोलत नाही,कोणामध्ये जास्त मिसळत नसते.सतत गुमसुम पणे आपल्याच विचारांमध्ये गुंग राहत असते.

बायपोलर डिसाँर्डर चे  निदानउपचार कोणते आहेत?- Bipolar Disorder Diagnoses,Treatment And Tests In Marathi

बायपोलर डिसाँर्डर हा एक असा गंभीर मानसिक आजार तसेच स्थिती आहे ज्यावर निदान करणे सोपे मानले जात नाही.कारण हा एक असा मानसिक आजार आहे ज्याची कुठलीही शारीरीक लक्षणे आपणास दिसुन येत नसतात.

आणि फक्त मुडवरून आपण ह्या आजाराचा पुर्णपणे अंदाज लावू शकत नाही कारण माणसाचा मुड हा कधीच एकसारखा राहत नसतो.त्यात कालांतराने नेहमी चेंज होत राहतो.म्हणुन मुड बघुन ह्या आजाराचा अनुमान लावणे थोडे कठिन जात असते.

See also  भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती - भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत - Bharat Ratna Awardee list In Marathi

पण बायपोलर डिसाँर्डर यावर आपण पुढीलप्रमाणे काही निदान आणि उपचार करू शकतो-

1)मनोचिकित्सकांचा सल्ला तसेच मदत घेणे :

 आपण आपली मनोचिकित्सक चाचणी करून ह्या आजाराचे यशस्वीपणे निदान करू शकतो.कारण मनोचिकित्सक हे वेगवेगळया अँक्टिव्हिटीज आणि प्रोसेसचा वापर करून आपल्या मानसिक आरोग्याची तपासणी करत असतात.

यात जर आपण आपल्या बदलत्या मुड विषयी सर्व नोंद ठेवली तो कधी पाँझिटिव्ह असतो कधी निगेटिव्ह असतो तर याने आजाराची लक्षणे समजुन घेऊन मनोचिकित्सकांना आपल्यावर उपचार करणे अधिक सोपे जात असते.

2) मानसिक आरोग्य चाचण्या :

 आज अशा अनेक मानसिक आरोग्य चाचण्या(Mental Health Test) उपलब्ध आहेत ज्यांचा वापर आपण बायपोलर ह्या आजाराची पृष्टी करण्यासाठी करू शकतो.

3) औषधोपचार करणे :

 आपण बायपोलर डिसाँर्डर ह्या आजारावरील उपचारासाठी अँण्टी सायकोटिक मेडिसिन घेऊ शकतो.

4) आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणने:

 जर आपल्याला ह्या विकारावर मात करायची असेल यावर नित्रंत्रण प्राप्त करायचे असेल तर आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.यासाठी आपण इंटरपर्सनल थेरपीची मदत घेऊ शकतो.

 उदा,कधीही खाणे-पिणे,कधीही झोपणे-उठणे अर्धवट झोप घेणे,वागणे-बोलणे इत्यादी.

5) पर्सेप्शन थेरपी :

 ह्या थेरपीत मनोचिकित्सक कोणत्याही मानसिक रुग्णाची विचार प्रक्रिया जाणुन घेत असतात ज्यासाठी ते त्याच्याशी मित्रत्वाने संवाद साधत असतात.

आणि मग त्या मानसिक रूग्णाच्या विचार करण्याच्या पदधतीत हळुहळु बदल घडवून आणत असतात.

बायपोलर डिसाँर्डर हा आजार लवकर बरा होण्यासाठी आपण काय घरगुती काळजी घ्यायला हवी?

 बायपोलर डिसाँर्डर हा आजार लवकर बरा होण्यासाठी आपण पुढील महत्वाची काळजी घ्यायला हवी-

 • नेहमी सकारात्मक विचार करणे नकारात्मक विचारांपासुन दुर राहणे
 • जास्त ताणतणाव न घेणे
 • नियमित योगा तसेच मेडिटेशन करणे