बँकेशी संबंधित अत्यंत महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ -Bank Related Important Terms In Marathi

Table of Contents

बँकेशी संबंधित अत्यंत महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ -Bank Related Important Terms and their meaning In Marathi.

पेई म्हणजे काय?-Payee Meaning In Marathi.

पैसे देत असताना ज्याला पैसे द्यायचे असतात त्या त्या व्यक्तीच्या नावाने आपण चेक लिहित असतो ज्याच्या नावाने आपण चेक लिहित असतो त्याला पेई असे म्हटले जाते.

Payee ह्या शब्दाचे इतर काही अर्थ पुढीलप्रमाणे आहेत-

● ज्याला पैसे देण्यात आले आहे ती व्यक्ति

● पैसे प्राप्त होणारा

बेनिफिशरी म्हणजे काय?-Beneficiary Meaning In Marathi.

बेनिफिशरी म्हणजे अशी व्यक्ती जिला पैसे मिळणार असतात.

Beneficiary ह्या शब्दाचे इतर काही अर्थ पुढीलप्रमाणे आहेत-

● लाभार्थी

See also  LFT Test विषयी माहीती - LFT Test information in Marathi

● लाभ घेणारा

ट्रान्झँक्शन म्हणजे काय?-Transaction Meaning In Marathi.

दोन व्यक्तींमध्ये जो आर्थिक देवाणघेवाणीचा,पैसे देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार पार पडत असतो त्यालाच ट्रान्झँक्शन असे म्हटले जाते.

Transaction ह्या शब्दाचे इतर काही अर्थ पुढीलप्रमाणे आहेत-

● दोन व्यक्तींमध्ये पार पडलेला पैशांच्या देवाण घेवाणीचा व्यवहार

● एखाद्या संस्थेत पार पडलेल्या कार्याचा अहवाल

इंटरेस्ट म्हणजे काय?-Interest Meaning In Marathi.

आपण जेव्हा बँकेकडुन एखादे कर्ज घेत असतो तेव्हा त्याचे आपल्याला बँकेस एक ठाराविक व्याज द्यावा लागते त्या व्याजालाच इंटरेस्ट असे म्हणतात.

इंटरेस्ट रेट म्हणजे काय?-Interest Rate Meaning In Marathi.

आपण जेव्हा बँक आपणास एखादे कर्ज देत असते तेव्हा त्याचे बँक आपल्याकडुन काही ठाराविक व्याज दर आकारत असते त्या व्याज दरालाच इंटरेस्ट रेट असे म्हणतात.

बँलन्स म्हणजे काय?-Balance Meaning In Marathi.

बँलन्स म्हणजे आपल्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम.

ओव्हर ड्राँ म्हणजे काय?-Overdraw Meaning In Marathi.

जेव्हा आपण आपल्या खात्यात असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेचा चेक टाकत असतो तेव्हा तो चेक ओव्हर ड्राँ होत असतो अणि बँक त्यावर आपल्याला दंड देखील आकारत असते.

ओव्हर ड्राफ्ट म्हणजे काय?-Overdraft Meaning In Marathi.

जेव्हा आपल्या खात्यात असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्याची सुविधा बँकेकडुन आपणास दिली जाते तेव्हा त्याला Overdraft Facility असे म्हणतात.

डायरेक्ट डेबिट म्हणजे काय?-Direct Debit Meaning In Marathi.

बँक आपल्या खात्यातुन जेव्हा एखादी रक्कम आपणास न कळवता डायरेक्ट वजा करत असते तेव्हा त्याला डायरेक्ट डेबिट असे म्हटले जाते.

आँटो डेबिट म्हणजे काय?-Auto Debit Meaning In Marathi.

आँटो डेबिट ही एक सुविधा आहे जिचा वापर करून आपण डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्ड दवारे आँटोमँटिकली कुठलेही बिल पेमेंट करत असतो.

गँरेंटर म्हणजे काय?-Guarantor Meaning In Marathi.

आपण बँकेकडुन जे कर्ज घेतो ते आपण जर फेडले नही तर गँरेटरला ते आपल्या वतीने फेडावे लागत असते कारण तो आपला हमीदार असतो.

See also  सेंद्रिय शेती म्हणजे काय - Organic Farming Marathi

गँरेटर म्हणजे कर्ज घेत असताना आपली हमी घेणारा व्यक्ती.

प्रि-पेमेंट म्हणजे काय?-Prepayment Meaning In Marathi.

प्रिपेमेंट म्हणजे अँडव्हान्समध्ये एखादी रक्कम भरणे.ज्याला आगाऊ रक्कम भरणे असे देखील म्हणतात.

होम ब्रांच म्हणजे काय?-Home Branch Meaning In Marathi.

ज्या बँकेच्या शाखेत आपण आपले खाते उघडलेले असते.तिलाच आपली घरची शाखा,होम ब्रान्च असे म्हटले जाते.

बँक चार्जेस म्हणजे काय?-Bank Charges Meaning In Marathi.

बँक आपल्याला ज्या काही सुविधा पुरवित असते त्याचे बँकेकडुन एक शुल्क आकारले जाते त्यालाच बँक चार्जेस असे म्हणतात.

पे आँफ म्हणजे काय?-Payoff Meaning In Marathi.

पे आँफ आँफ म्हणजेच घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचे पुर्ण पेमेंट करणे होय.

सेफ्टी डिपाँझिट बाँक्स म्हणजे काय?-Safety Deposit Box Meaning In Marathi.

ही बँकेतील एक विशिष्ट जागा म्हणजेच पेटी असते जिथे आपण आपल्या सर्व मौल्यवान वस्तु सुरक्षितपणे ठेवत असतो.

कँशिअर म्हणजे काय?-Cashier Meaning In Marathi.

कँशिअर म्हणजे खजिनदार.बँकेत ज्याच्याकडे आपण पैसे जमा करत असतो.आणि तो आपले पैसे आपल्या खात्यावर जमा करत असतो.

इन्कम म्हणजे काय?-Income Meaning In Marathi.

आपण केलेल्या व्यवसायातुन आपल्याला जे उत्पन्न प्राप्त होते त्यास इन्कम असे म्हणतात.

इन्कम म्हणजेच आपल्या कामातुन प्राप्त होणारी कमाई तसेच मिळकत.

रिव्हेन्यु म्हणजे काय?-Revenue Meaning In Marathi.

सामान्य व्यवसाय प्रक्रियेतुन व्युत्पन्न केलेला पैसा.तसेच महसूल.

क्वाटर्रली म्हणजे काय?-Quarterly Meaning In Marathi.

क्वाटर्रली म्हणजेच तिमाही-तीन महिन्याचा काळ.

डेब्ट तसेच लोन म्हणजे काय?-Debt And Loan Meaning In Marathi.

डेब्ट तसेच लोन म्हणजे बँकेकडुन तसेच एखाद्या वित्तीय संस्थेकडुन एखादे घेतलेले कर्ज किंवा त्रण.

आय एम पीएस -Imps Meaning In Marathi.

आय एम पीएस म्हणजे Immediate Payment Service होय.

ही एक सुविधा आहे जिचा वापर करून आपण झटपट तसेच लगेच पैसे पाठवू शकतो

बँकिंग म्हणजे काय?-Banking Meaning In Marathi.

बँकेशी संबंधित काम करते यालाच बँकिंग असे म्हटले जाते.

See also  MPSC आणि UPSC या दोघांमध्ये काय फरक आहे? -DIFFERENCE BETWEEN MPSC AND UPSC

डिपाँझिट स्लीप म्हणजे काय?-Deposit Slip Meaning In Marathi.

बँकेत पैसे जमा करताना भरायची पावती.

फिक्स डिपाँझिट म्हणजे काय?-Fixed Deposit Meaning In Marathi.

फिक्स डिपाँझिट म्हणजे मुदतबंद ठेव.एका निश्चित कालावधीसाठी जमा केलेली रक्कम.

सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय?-Saving Account Meaning In Marathi.

सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते ज्यात आपण पैसे टाकुन आपल्या पैशांची बचत करत असतो,सेव्हिंग अकाऊंट हे पैशांची बचत करण्यासाठी प्रौढ व्यक्तींसोबत विदयार्थी देखील ओपन करू शकतात.

करंट अकाउंट म्हणजे काय?-Current Account Meaning In Marathi.

करंट अकाऊंट म्हणजे चालू खाते.हे प्रत्येकाला ओपन करता न येणारे खाते असते.हे अकाऊंट कंपनी संस्था तसेच गुंतवणुकदारांना ओपन करता येते.

नाँमिनी म्हणजे काय?-Nominee Meaning In Marathi.

नॉमिनी म्हणजे अशी एक वारसदार व्यक्ती जिला आपण आपल्या गुंतवणुकीत किंवा बँकेच्या अर्जामध्ये सूचीबद्ध करत असतो.जर आपला अनपेक्षितपणे मृत्यू झाला तर आपल्या खात्यातून ह्या व्यक्तीला पैसे काढण्याची परवानगी आपण स्वता दिलेली असते.

नॉमिनी म्हणून आपण कोणाचेही नाव लावु शकतो ज्यात आपले नातेवाईक पालक,जोडीदार,मुले,भावंड इ कोणीही असु शकते.

बाँरोव्हर म्हणजे काय?-Borrower Meaning In Marathi.

बाँरोव्हर म्हणजे कर्ज घेणारा व्यक्ती,जो व्यक्ती कर्ज घेत असतो त्याला Borrower असे म्हणतात.