जगातील सर्वात श्रीमंत देश- Richest Country In The World Marathi

जगातील सर्वात श्रीमंत देशांची माहिती – Richest Country In The World Marathi

कुठलाही देश किती श्रीमंत आहे हे फक्त त्या देशाच्या नेटवर्थ वरून ठरत नाही तर त्या देशातील लोकांचे राहणीमान,जीवनशैली,तेथील लोकांना प्राप्त होत असलेल्या जीवनावश्यक सोयी सुविधा आणि तेथील लोकांचे आरोग्य,तेथील लोकांची आयु,जीवणमर्यादा यावरून ठरत असते.

आज जर आपण अशा जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे जाणुन घेतली तर आपणास कतार हा देश जगातील सर्वात देशांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेला दिसुन येतो.

यानंतर जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सिंगापुर,लक्झेमबर्ग,आयलँड,स्वीत्झर्लँड इत्यादी देशांचा नंबर लागताना आपणास दिसुन येतो.

आपल्याला प्रत्येकाला हा प्रश्न नेहमी पडत असतो की जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

म्हणुन आपली ही जाणुन घेण्याची उत्सुकता आणि कुतुहल पुर्ण करण्यासाठी आजच्या लेखात आपण जगातील सर्वात श्रीमंत देश कोणकोणते आहेत?त्यांची नावे काय आहेत?हे पाहणार आहोत.

सोबतच जगातील ह्या सर्वात श्रीमंत देशांमध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत?ह्या देशांतील वास्तव्य करत असलेल्या लोकांची जीवनशैली कशी आहे?येथील लोकसंख्या किती आहे?येथील लोकांचे राहणीमान कसे आहे?येथील लोकांची कमाई किती आहे?कमाईचे मुख्य साधन काय आहे?ह्या देशांमध्ये राहत असलेल्या लोकांना प्राप्त होत असलेल्या सोयी सुविधा कोणकोणत्या आहेत?ह्या देशांचे मुख्य वैशिष्टय काय आहे?हे देखील सविस्तरपणे आपण जाणुन घेणार आहे.

जगातील सर्वात श्रीमंत देश कोणकोणते आहेत? Richest Country In The World Marathi

जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत?

कतार :

मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये कतार ह्या देशाचा सगळयात पहिला क्रमांक लागतो.
कतार हा देश मासेमारी ह्या व्यवसायातुन सर्वात अधिक उत्पन्न प्राप्त करतो.

See also  EPS 95 पेन्शनधारकाचा निधन झाल्यास पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?- Document list to avail pension in case of death of eps95 pensioner

ह्या देशाचे अजुन एक सगळयात महत्वाचे वैशिष्टय हे आहे की इथे पेट्रोल खुप कमी किंमतीत म्हणजेच वाहन चालकांना परवडेल अशा स्वस्त किंमतीत उपलब्ध होते.

वाहनचालकांना एक लीटर पेट्रोल हे फक्त 30 ते 35 रूपयात इथे उपलब्ध होते.ह्या देशाचा GDP हा दुबई पेक्षा अधिक आहे.कतार ह्या देशाचा GDP हा किमान 1 लाख 30 हजार 900 डा़ँलर्स इतका आहे.

ह्या देशाचे वैशिष्टय हे आहे की इथे आपणास एक जण सुदधा गरीब असलेला आढळुन येत नाही.

इथे वास्तव करणारा प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत असलेलाच आपणास आढळुन येतो.

ह्या देशाच्या शंभर टक्के लोकसंख्येतून मोजून 10 ते 15 टक्के व्यक्ती येथील मुळचे रहिवासी आहेत बाकी 90 ते 85 टक्के लोक हे इतर देशातील आहेत.

लक्झेमबर्ग :

लक्झेमबर्ग ह्या देशाचा जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये दुसरा क्रमांक लागतो.ह्या देशातील लोक तीन भाषांमध्ये अधिक संवाद साधताना दिसुन येतात.आणि त्या तीन भाषा फ्रेंच,जर्मन आणि जाँर्ज ह्या आहेत.

इथे राहणारे 50 ते 55 टक्के लोक इथले मुळ रहिवासी तसेच येथील नागरीक आहेत.बाकीचे सर्व व्यक्ती हे फ्रेच तसेच जर्मन सारख्या देशातुन इथे राहायला आलेले आहेत.

लक्झेमबर्ग ह्या देशाची एकुण लोकसंख्या ही आठ ते दहा लाख इतकी आहे.ह्या देशाचे चलन युरो हे आहे.ह्या देशामधील लोकांना टँक्स हा खुप कमी भरावा लागतो.

हा देश इतका अधिक श्रीमंत आहे की इथे एखाद्या व्यक्तीने एखादे छोटेसे काम केले नोकरी केली तरी तो कमीत कमी एक लाखापर्यत कमवू शकतो.

सिंगापुर :

सिंगापुर ह्या देशाच्या राजधीनीचे नाव देखील सिंगापुर हेच आहे.सिंगापुर ह्या देशाचा एकूण GDP हा किमान 72 हजार डाँलर्स इतका आहे.

सगळयात अधिक प्रमाणात समुद्री व्यवसाय हा ह्याच देशात केला जातो.आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे येथील 90 टक्के मजदुरांकडे स्वताचे मालकीचे काम आणि राहायला घर देखील आहे.इतका श्रीमंत हा देश आहे.

See also  Shark Tank India बिझनेस शो विषयी माहिती - Shark Tank India information in Marathi

ब्रुनेई :

जगात सर्वात श्रीमंत म्हणुन ओळखल्या जात असलेल्या देशांमध्ये हा देश चौथ्या क्रमांकावर आहे.

येथील लोकांना कोणत्याच सोय सुविधेची साधनाची कमी असलेली आपणास दिसुन येत नाही.

ह्या देशाचे मुख्य वैशिष्टय हे आहे की इथल्या राहत असलेल्या लोकांना आपल्या शिक्षणासाठी वैदयकीय उपचारासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही.

ब्रूनई ह्या देशाची लोकसंख्या किमान तीन ते चार लाख इतकी आहे.ह्या देशातील लोक हे 80 वय होईपर्यत जगतात कारण इथे राहत असलेल्या लोकांना कुठलाही रोग जडत नाही येथील लोक स्वस्थ,तंदूरस्त आणि निरोगी आयुष्य जगतात.याला कारण येथील लोक आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देतात.

ब्रूनई मध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांची राहणीमान आणि जीवनशैली खुप उच्च प्रतीची आहे.येथे वास्तव्य करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे स्वताच्या मालकीची कार आहे.

आयलँड :

आयलँड ह्या देशाची लोकसंख्या किमान 70 ते 75 लाख एवढी आहे.ह्या देशाचे चलन युरो आहे.

युरोपातील सर्वात अधिक श्रीमंत आणि विकसित देश म्हणुन आयँलड ह्या देशाला ओळखले जाते.

युरोपातील हा देश सौदर्याच्या बाबतीत खुप पुढे असलेला आपणास दिसुन येतो.

ज्या लोकांना पर्यटनाची घुमण्याची,फिरण्याची आवड आहे अशा लोकांसाठी हा देश खुपच उत्तम मानला जातो.

ह्या देशातील लोक नेहमी आनंदी राहत असतात आणि यांचे राहणीमान आणि जीवनशैली सुदधा खुप उच्च दर्जाची आहे.याला कारण येथील लोकांकडे पैशांची कुठलीही कमतरता नाही.

ह्या देशाचा GDP per capita देखील 72,625 डाँलर इतका आहे.ह्या देशाच्या जीडीपीवरूनच आपणास लक्षात येईल की हा देश किती श्रीमंत देश आहे?

 नाँर्वे :

नाँर्वे हा देश आपल्या नैसर्गिक सौदर्यासाठी खुप प्रचलित आहे.म्हणुन जगभरातील लोक प्रत्येक वर्षी इथे फिरायला जातात.

ह्या देशाची एकुण लोकसंख्या 53 लाख आहे.इथे वास्तव करत असलेल्या लोकांची जीवनशैली आणि राहणीमान खुप साधे आहे.त्यामुळे येथील लोक नेहमी आनंदी जीवण जगतात.

See also  इंशुरन्स सेक्टर - डेटा सायन्सचे टॉप 10 अँप्लिकेशन्स -Data science use in insurance sector

नाँर्वे ह्या देशाचा GDP per capita 70 हजार 500 डाँलर इतका आहे.ह्या देशातील उत्पन्नाचे मुख्य स्रोत येथील पर्यटनक्षेत्रे हे आहेत.

 कुवेत :

कुवेत हा देखील एक श्रीमंत देश आहे.येथील लोक महागडया वस्तुंची खरेदी करतात त्यांचा नेहमी वापर करतात.

ह्या देशाची 42 लाख 50 हजार इतकी आहे.ह्या देशाचे चलन कुवती दिनार आहे.ह्या देशाचा gdp per capita हा 70 हजार 650 डाँलर आहे.

यूएई :

यूएई हा देश संपुर्ण जगभरात एक श्रीमंत देश म्हणुन प्रसिदध आहे.

यूएई ह्या देशाची एकुण लोकसंख्या 95 लाख 82 हजार इतकी आहे.ह्या देशाचे चलन यूएई दिरान आहे.

ह्या देशाच्या कमाईचे मुख्य स्त्रोत पर्यटनक्षेत्र आणि तेल आहे.ह्या देशाचे सरकार महागडया हाँटेल चालकांकडुन खुप जास्त टँक्स देखील घेते.

यूएई चा जीडीपी पर कँपिटा 68 हजार 620 डाँलर इतका आहे.

स्वीत्झर्लँड :

यूरोपातील तसेच संपुर्ण जगातील सर्वात सुंदर देश म्हणुन हा देश ओळखला जातो.ह्या देशाची लोकसंख्या 86 लाखाच्या जवळपास आहे.

ह्या देशाचा जीडीपी पर कँपिटा 61 हजार डाँलर इतका आहे.

ह्या देशाचे मुख्य कमाईचे स्त्रोत पर्यटन हे आहे.तसेच दरवर्षी इथे हनीमुन साठी जगभरातील न्यु कपल्स हाँटेल बुक करून येत असतात.ह्या देशात बेरोजगारी देखील खुप कमी आहे.

हाँगकाँग :

ह्या देशात दोन भाषा विशेषकरून बोलल्या जातात चायनीज आणि इंग्लिश.ह्या देशाची लोकसंख्या 80 लाखाच्या जवळपास आहे.

ह्या देशाचे चलन हाँगकाँग डाँलर आहे.ह्या देशाचा जीडीपी पर कँपिटा 61 हजार डाँलर इतका आहे.

ह्या देशाच्या कमाईचे मुख्य साधन देखील पर्यटन हेच आहे.

2022 मधील सर्वात श्रीमंत देशांची नावे- GDP आधारित
(name list of richest countries in world 2022)

1)चीन (नेटवर्थ -113 ट्रिलीयन डाँलर)

2) यूएस (नेटवर्थ -51 ट्रिलीयन डाँलर)

3) जर्मनी (नेटवर्थ -14 ट्रिलियन डाँलर)

4) फ्रान्स (नेटवर्थ -13 ट्रिलीयन डाँलर)

5) यु.के (नेटवर्थ-7 ट्रीलियन डाँलर)

6) कँनडा(नेटवर्थ-8 ट्रिलियन डाँलर

7) आँस्ट्रेलिया (नेटवर्थ-7 ट्रिलियन डाँलर )

8) मँक्सिको (नेटवर्थ-2 ट्रिलीयन डाँलर)

9)जपान (नेटवर्थ 3 ट्रिलियन डाँलर)

10) स्वीडन(नेटवर्थ-3 ट्रिलियन डाँलर)

इन्फोर्मेशन रिसोर्स