माॅक ट्रेडिंग म्हणजे काय? – Mock trading meaning in Marathi
माॅक ट्रेडिंगचा फुलफाॅम multiple option checking असा होतो.
प्रत्येक ट्रेडिंग एक्सचेंजेस तसेच ट्रेडिंग सेशन कडुन दर महिन्याच्या कुठल्याही एका शनिवारी अशा प्रकारचे विशेष सेशन आयोजित केले जाते.
ह्या विशेष ट्रेडिंग सेशनच्या साहाय्याने दलाल हे चेक करू शकतात की त्यांची ट्रेडिंग यंत्रणा व्यवस्था
व्यवस्थित रीत्या कार्य करते आहे किंवा नाही.
ह्या विशेष सेशन मध्ये यंत्रणेमध्ये कोणता बदल झाला आहे, आधीच्या यंत्रणा तसेच प्रोडक्ट सर्विस मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुधारणा झाल्या आहेत हे चेक करण्यात येत असते.
हे विशेष सेशन कधी घेण्यात येईल हे एक्सचेंज कडुन सुचित करण्यात येते.अणि मग त्याच निर्धारित वेळेस हे विशेष सेशन आयोजित करण्यात येत असते.
हे विशेष सेशन पहिल्या अथवा दुसरया शनिवारच्या दिवशी स्टाक मार्केट बंद असताना आयोजित केले जाते.हे विशेष सेशन कमोडिटी डेरीव्हीटीव्ह,इक्विटी डेरीव्हीटिव्ह,करंसी डेरीव्हीटिव्ह अशा विविध प्रकारात हे सेशन घेण्यात येत असते.
जेव्हा आपण शनिवारच्या दिवशी आपले ब्रोकर कडील अॅप ओपन करत असतो.किंवा बिझनेस चॅनल ओपन करून बघतो तेव्हा आपणास मार्केट सुरू असल्याचे दिसून येते.
अशावेळी आपण विचारात पडतो की आज लक्ष्मीपूजन नाही तरी मार्केट का सुरू आहे तर याचे दुसरे काहीही कारण नसुन त्या दिवशी माॅक ट्रेडिंग सुरू असते.
हे विशेष सेशन ठरवलेल्या दिवशी दहा ते साडे तीन ह्या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात येत असते.
माॅक ट्रेडिंग मध्ये खरेदी विक्री होत असते पण ही खरेदी विक्री फक्त साॅफ्टवेअर वर होत असते.म्हणजे माॅक ट्रेडिंग मध्ये शेअर्सची खरेदी विक्री होते.
पण शेवटी जो सकारात्मक असो किंवा नकारात्मक रिझल्ट आपल्याला मिळतो तो इथे जोडला जात नसतो.
म्हणजे माॅक ट्रेडिंगच्या काळात आपणास नफा झाला तरी तो नफा जोडला जात नाही अणि तोटा झाला तरी तो तोटा देखील जोडला जात नाही.
माॅक ट्रेडिंग दवारे नवशिक्या नवोदित ट्रेडर्सला ट्रेडिंग शिकता येते.यात जो नफा तोटा आपणास होत असतो तो खरा नफा तोटा नसतो.
कारण ब्रोकर आपले साॅफ्टवेअर अॅप व्यवस्थित कार्य करीत आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी हे माॅक ट्रेडिंग करत असतात.
प्रत्येक ट्रेडिंग अॅपवर वेगवेगळ्या दिवशी आपणास ही माॅक ट्रेडिंग होताना दिसुन येते.माॅक ट्रेडिंग आपणास झिरोदधा,अप स्टाॅक्स इत्यादी कुठल्याही ट्रेडिंग अॅप वर ट्रेडिंग शिकण्यासाठी करता येत असते.